गणपती बाप्पा मोरया!
लैला म्हटलं की मजनू आठवलाच पाहिजे आणि शिरीन म्हटलं की फरहाद. पाउस म्हटलं की छत्री आठवते आणि मे महिना म्हटला की उन्हाळ्याची सुट्टी. काही काही गोष्टींची खूणगाठ आपल्या मनात इतकी पक्की बसली असते की त्यांतली एक आली की दुसरी आपसूक येतेच, जसा मायबोलीचा गणेशोत्सव म्हटला की प्रकाशचित्रांचा झब्बू स्मित
खाद्यजगतही त्याला अपवाद नाहीच आणि यातल्या जोड्याही अश्या मजेशीर की जुळवत गेलो तर एक साखळीच बनून जाते. म्हणजे पाव म्हटलं की वडा आठवतो आणि वडा म्हटलं की सांबार. सांबाराबरोबर इडली येते आणि इडली म्हटलं की चटणी. चटणीबरोबर भाकरी येते आणि भाकरीबरोबर कांदा.
तर अशीच खाऊसाखळी आपल्याला बनवायची आहे 'मायबोली गणेशोत्सव २०१५'मध्ये, झब्बू खेळताना!
'जोडी तुझी माझी'
चला तर उघडा आपल्या फोटोंचा खजिना आणि जोडायला घ्या या साखळीची एक एक कडी!
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ आधीच्या चित्रातील पदार्थाच्या जोडीदार पदार्थाची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ:
झब्बू:
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
म्हणजे मी वड्याचा फोटो दिला
म्हणजे मी वड्याचा फोटो दिला तर पुढच्याने सांबार/चटणी चा फोटो द्यायचा का? झब्बू म्हणून?
पोपट हा पदार्थ नसल्याने
पोपट हा पदार्थ नसल्याने संपादित![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हर्पेन.... नियम क्र २
हर्पेन.... नियम क्र २ बघ
पदार्थाचे चित्र अपेक्षित आहे
मीच करतो सुरुवात
मीच करतो सुरुवात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आशुतोष, ढोकळ्याची जोडीदार
आशुतोष, ढोकळ्याची जोडीदार मिरची म्हणून ढोकळ्यावर मिरचीचा झब्ब्बू.... आता मिरचीचे जोडीदार कोण त्याचा फोटो टाका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पोपट जास्त योग्य वाटल्याने
पोपट जास्त योग्य वाटल्याने संपादित.
मिर्ची- पोपट
मिर्ची- पोपट![IMG_20150923_192733~2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u29789/IMG_20150923_192733~2.jpg)
पोपट --> घुबड
पोपट --> घुबड
खाऊसाखळीत पोपट आणि घुबड
खाऊसाखळीत पोपट आणि घुबड![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अरे नियम वाचा
अरे नियम वाचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खाऊसाखळीत पोपट आणि घुबड >>>>>
खाऊसाखळीत पोपट आणि घुबड >>>>>:फिदी:
गरुड आणि घारी मायबोलीवर
गरुड आणि घारी मायबोलीवर आल्यात ते माहीत नव्हतं.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मिर्चीच्या सोबतीला कांदाभजी
मिर्चीच्या सोबतीला कांदाभजी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![](https://lh3.googleusercontent.com/-cct5o5gkTAM/VB-TBdcCzCI/AAAAAAAAS8E/dkvSMk5xbpc/s640-Ic42/IMG_9379%252520copy.jpg)
मामी, घुबडाची रेसिपी टाका
मामी, घुबडाची रेसिपी टाका म्हणजे कसं खायचं ते तरी कळेल..
जिप्सी, मस्त फोटो !!
मिरची म्हंटली की लोणचं
मिरची म्हंटली की लोणचं आठवतं...
जिप्सीने टाकलेला फोटो भारी.
जिप्सीने टाकलेला फोटो भारी. लोणचं बाद!
भज्यांबरोबर शिरा....
भज्यांबरोबर शिरा....
हायला , ते खाऊसाखळीचं वाचलं
हायला , ते खाऊसाखळीचं वाचलं नाही. पण जीवो जीवस्य जीवनम ना?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भरलं घुबड अशी एक मेसोपेटेमियन रेसिपी आहे.
आता पुण्ण्हा एडिड करणं आलं. किंवा राहूदेत. आपण कांदाभज्यांपासून सुरवात धरूयात.
आता शिर्याबरोबर लोणचं चालेल.
आता शिर्याबरोबर लोणचं चालेल.
सत्यनारायणाचा शिरा तर नारळी
सत्यनारायणाचा शिरा तर नारळी पोर्णिमेचा नारळीभात :
लोणच्याचा फोटो एकदम
लोणच्याचा फोटो एकदम टेम्प्टिंग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भरलं घुबड अशी एक मेसोपेटेमियन रेसिपी आहे. >>>>मामी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नारळीभाताबरोबर काहीतरी तिखट
नारळीभाताबरोबर काहीतरी तिखट तोंडीलावणं... सखुबत्ता!
तिखटाबरोबर थोडं आंबट चिंबट
तिखटाबरोबर थोडं आंबट चिंबट
![](https://lh3.googleusercontent.com/-UEfMS034DZI/UststUSRc9I/AAAAAAAANz0/5IFygx7qKDo/s640-Ic42/IMG_0935%252520copy.jpg)
कैरी म्हणजे कोकणचा मेवा. मग
कैरी म्हणजे कोकणचा मेवा. मग हे मागे राहून कसं चालेल?
कुळथाचं पिठलं आणि भाकरी :
कसल्या जबरदस्तीने जोड्या
कसल्या जबरदस्तीने जोड्या जुळवणे चाललय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
स्वरूप
स्वरूप![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
साध्याश्या(अर्थातच चविष्टही!)
साध्याश्या(अर्थातच चविष्टही!) ताटानंतर मेजवानीचं ताट रांगोळीसह
![](https://lh3.googleusercontent.com/-Bezil612TCM/Vga4sxvx_eI/AAAAAAAAUBo/41sJ2M-IArg/s640-Ic42/Photo0528.jpg)
श्या!! स्टफ्फ्ड घुबडाची
श्या!! स्टफ्फ्ड घुबडाची रेस्पी म्मिस्स झाली नं..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मेजवानीच्या जेवणानंतर
मेजवानीच्या जेवणानंतर मुखशुद्धी हवीच :)![20150926_212829-1-640x441.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4843/20150926_212829-1-640x441.jpg)
Pages