मायबोली गणेशोत्सव २०१५ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू क्र.५ - जोडी तुझी माझी" २६ सप्टेंबर - समाप्त!

Submitted by संयोजक on 26 September, 2015 - 05:27

गणपती बाप्पा मोरया!

लैला म्हटलं की मजनू आठवलाच पाहिजे आणि शिरीन म्हटलं की फरहाद. पाउस म्हटलं की छत्री आठवते आणि मे महिना म्हटला की उन्हाळ्याची सुट्टी. काही काही गोष्टींची खूणगाठ आपल्या मनात इतकी पक्की बसली असते की त्यांतली एक आली की दुसरी आपसूक येतेच, जसा मायबोलीचा गणेशोत्सव म्हटला की प्रकाशचित्रांचा झब्बू स्मित
खाद्यजगतही त्याला अपवाद नाहीच आणि यातल्या जोड्याही अश्या मजेशीर की जुळवत गेलो तर एक साखळीच बनून जाते. म्हणजे पाव म्हटलं की वडा आठवतो आणि वडा म्हटलं की सांबार. सांबाराबरोबर इडली येते आणि इडली म्हटलं की चटणी. चटणीबरोबर भाकरी येते आणि भाकरीबरोबर कांदा.

तर अशीच खाऊसाखळी आपल्याला बनवायची आहे 'मायबोली गणेशोत्सव २०१५'मध्ये, झब्बू खेळताना!

'जोडी तुझी माझी'

चला तर उघडा आपल्या फोटोंचा खजिना आणि जोडायला घ्या या साखळीची एक एक कडी!

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ आधीच्या चित्रातील पदार्थाच्या जोडीदार पदार्थाची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

उदाहरणार्थ:
Slide4_1.JPG

झब्बू:
Slide5_0.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतं मिरचीची जोडी बटाटा वडा बरोबर जमेल. पुढे बटाटेवड्याची पावाशी जमू शकेल. पावाची मिसळीशी. मिसळीची लिंबाशी. लिंबाची कांदेपोह्यांशी. कांदेपोह्यांची चहाशी.... and so on.

संयोजक बरोबर का?

केश्वी, अगदी बरोबर Happy मी बटाटेवड्याचाच फोटो शोधत होतो तो सापडला नाही म्हणुन कांदाभजी टाकली. Happy स्वरूप म्हणतात तसे जबरदस्तीची जोडी. Proud

Pages