मायबोलीच्या अंतराळकक्षेत आमच्या अंतराळयानाने प्रवेश केलेला आहे. सीट सोडून हलू नका कुणी! लवकरच चंद्रावर उतरायला मिळेल एकेकाला. चला आपापले पट्टे घट्ट करून बसा पाहू!
झू झू झू झू झू झू रॉकेट
चंद्राला देऊया गमतीची भेट
झू झू झू झू झू झू रॉकेट
रॉकेट निघाले झू झू वरती
वार्याशी दोस्ती ढगांशी मस्ती
हवेला छेद ढगांना भेद
पृथ्वीच्या वेडाला चंद्राचा वेध
वर वर बघणारी वाकलेली मान
रॉकेटचा आकार होइ लहान लहान
आकाशात फुगली धूराची शेपटी
मागून निघाली बिचारी एकटी
आकाशी पाटीवर खडूची रेघ
सेकंदाला हजार मैल रॉकेटचा वेग
पृथ्वीची तोफ धूराचा गोफ
मोठ्या तोफेतली छोटिशी बुलेट
झू झू झू झू झू झू रॉकेट
दूरवर कोठेही पृथ्वी दिसेना
चांदोबा कोणता तेही कळेना
आकाशात इथे शिस्तीची कक्षा
कक्षेच्या बाहेर गेल्यास भयंकर शिक्षा
आकाशात चार तास न थांबता भटक
नाहीतर शनीच्या कड्यांना लटक
गुरूच्या चंद्राच्या नागमोडी वार्या
प्लूटोला धरून मार सूर्याला फेर्या
दिव्याला घालवा ठाण्याला कळवा
रात्रीचं रॉकेटला जोरानं पळवा
घड्याळात पाचाचा लावावा गजर
सहाला आंघोळी आटपल्या तर
साताला भेटूया चंद्रावर थेट
झू झू झू झू झू झू रॉकेट
रोबोट म्हणाला चला चहा प्या
पाठीवर ऑक्सिजनची नळकांडी घ्या
चंद्रावर जोरजोरात नका मारू हाका
चालताना छोटीछोटी पावले टाका
चंद्रावर थांबायचा नका करू हट्ट
चला चला चंद्र आला पट्टा करा घट्ट
पृथ्वीचा चंद्राशी होईल समेट
झू झू झू झू झू झू रॉकेट
रॉकेटच्या बाजूच्या शिडीवर चढलो
चंद्रावर खाली उतरायला लागलो
ऊठ ऊठ ऊठ असा आरडाओरडा झाला
जोरजोरात हलल्याचा मला भास झाला
मला वाटलं चंद्रावर धरणीकंप झाला
मागोमाग बाबांचा आवाज कानी आला
इतक्या वेळ चंद्राचं स्वप्नं बघत होतो
मला काय ठाऊक झोपेमध्ये होतो ?
पुन्हा एकदा बाबांचा आवाज कानी आला
अंगातला आळस माझा कुठच्या कुठे गेला
तुम्हालाही शाळेत जायला होईल की लेट
झू झू झू झू झू झू रॉकेट
ऐ खूऊऊऊप सुंदर... राजस ला एक
ऐ खूऊऊऊप सुंदर... राजस ला एक बिग हग.. किती वर्षाचं आहे पिल्लू?
आणी कविता तुझीच..बहोत खूब!!!
वरील गाणे इथे ऐकता
वरील गाणे इथे ऐकता येईलः
http://www.aathavanitli-gani.com/Song/Zu_Zu_Zu_Zu_Rocket
लहानपणी बालगीतांची एक कॅसेट आईने कुठूनशी आणली होती. त्यातले हे रॉकेट चे गाणे माझे अगदी आवडते होते. अजूनही चाल आठवतेय.
राजसने रॉकेटचे चित्र काढल्यावर ते गाणे आठवले. लगोलग नेटवर शोधून २-३ दा ऐकले. बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या.
(अवांतरः शंकर महादेवनच्या आधी ह्या झू झू रॉकेट गाणार्या गायकाने ब्रेथलेस साँग हा प्रकार हाताळला आहे, हे नव्याने जाणवले. गाणे नक्की ऐका.)
वरील दुव्यावर गाण्याचे शब्दही दिलेत, पण काही ठिकाणी चुकीचे दिलेत. मला पूर्ण गाणे आठवले शब्द वाचता वाचताच. त्यामुळे राजसच्या चित्राखाली मी जे गाणे लिहिलेय, त्यात योग्य शब्द दिलेत.
वर्षू , कविता माझी नाही. त्या
वर्षू ,
कविता माझी नाही. त्या वरील दुव्यावर खालील माहिती कळली:
गीत -विकास भाटवडेकर
संगीत - संजय उपाध्ये
स्वर - संजय उपाध्ये
मस्तं चित्रं आणि
मस्तं चित्रं आणि कविता.
मोदकाला बिग हग? का? राजसचे बाबा म्हणून?
कलर कॉम्बिनेशन खूप सही
कलर कॉम्बिनेशन खूप सही आहे.
कश्याने कश्यावर काढलेय चित्र
मला पहिल्या नजरेत ती रंगवलेली पतंग वाटली
भारी काढलय राजसने
भारी काढलय राजसने
मस्त चित्र
मस्त चित्र
मस्तंच काढलंय.
मस्तंच काढलंय.
I want a ride.... मस्तच !
I want a ride.... मस्तच !
थांकु.. साती!!! अगा, मला
थांकु.. साती!!! अगा, मला आत्तापर्यन्त राजस चं नांव वाटायचं हे..
कभी मिली नही.. म्हणून ह्यूज गलत फहमी!!!!
शिवाय या नावाचा माझा छोटुकला भाचा ही आहे...
ओक्के निंबे, नोटेड!!!!
सुंदर ...
सुंदर ...
छान चित्र... शाब्बास राजस
छान चित्र... शाब्बास राजस
ऱाजस, छन चित्र काढलं आहेस
ऱाजस, छन चित्र काढलं आहेस
राजस, तूझं कलरफूल राॅकेट खूप
राजस, तूझं कलरफूल राॅकेट खूप आवडलं आम्हाला
रंगीबेरंगी रॉकेट मस्तच.
रंगीबेरंगी रॉकेट मस्तच.
जबरी आहे रॉकेट! चला
जबरी आहे रॉकेट! चला चंद्रावर...............:)
खुप छान
खुप छान
मस्त चित्र!
मस्त चित्र!
झकास! फ्रेश कलर्स आहेत एकदम
झकास! फ्रेश कलर्स आहेत एकदम
मस्त. कलर काॅम्बिनेशन लय
मस्त. कलर काॅम्बिनेशन लय भारी.
झकास जमलंय रॉकेट! चांदण्या पण
झकास जमलंय रॉकेट!
चांदण्या पण सफाईदार काढल्या आहेत की राजसने!
मस्तच आहे हे चित्र ! शाब्बास
मस्तच आहे हे चित्र ! शाब्बास रे राजस
भारी आहे रॉकेट!! गाण्यामुळे
भारी आहे रॉकेट!! गाण्यामुळे परिणाम वाढतोय
मस्त चित्र. शाब्बास राजस ! <<
मस्त चित्र. शाब्बास राजस !
<< कश्याने कश्यावर काढलेय चित्र >> मलाही हाच प्रश्न पडला आहे.
सर्व प्रतिसादकांचे
सर्व प्रतिसादकांचे आभार.
साध्या सफेद कागदावर आधी रॉकेट काढून बाहेरचा भाग ऑईल पेस्टल्स नी आणि आतील भाग जलरंगांनी रंगवला आहे.
ऊत्साहाने सुरुवातः
++++++++
सुरुवातीला भरलेले ऑईल पेस्टल्स रंगः
++++++++
सर्व बेस रंगांवर लाल ऑईल पेस्टलने एक लेयर दिला:
शेवटी काळ्या ऑईल पेस्टलने एक लेयर दिला. कर्कटकाच्या टोकाने त्यात चांदण्या कोरल्या.
सर्वात शेवटी मधले रॉकेट जलरंगांनी रंगवले.
काढून झाल्यावर स्वतःच म्हणाला की रॉकेट पेक्षा जास्त हा मासा वाटत आहे.
वाह मस्तं चित्र, राजस.
वाह मस्तं चित्र, राजस.