तेचबूक! - धनंजय माने
स्टेटस अपडेट :
आज नाश्त्याला थालीपीठ पाहून माझा अत्यंत जवळचा मित्र अमिताभ बच्चन याची आठवण आली. त्याचा आवडता पदार्थ. शाळेत असताना मला रोज डब्यात थालीपीठच न्यावे लागायचे. तसा हट्टच असायचा त्याचा, नाहीतर माझ्यावर खूप चिडायचा. आता कामाच्या व्यापामुळे आमची बरेच वर्ष भेट नाही झाली. पण जेव्हा भेटू तेव्हा थालीपीठाचा बेत पक्का
५६ लाईक्स. २ डिस्लाईक्स.
परशुराम : माझ्याकडे बिडी मागायचा पण गुणी कलावंत हो!
विश्वासराव सरपोतदार : हो का? बऽऽऽरं!!
शंतनू : lol दादा हसून हसून पडलो मी
माधुरी : माने, सकाळचे ९.३० वाजलेत. स्टेटस अपडेट काय टकताय? दुकानात वेळेवर या. गि-हाईकाला वाट बघायला लावणे गैर आहे. तुमचा हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही.
सुधा : शंतनू, तुझी पडायची सवय अजून गेली नाही सुधीरला सुद्धा थालीपीठ आवडते.
मनिषा : सुधा, मला थालीपीठाची रेसिपी देशील का?
दिप्ती प्रभावळकर पटेल लुबुम्बा : अय्या!! अमिताभला थालीपीठ आवडतं? ईकडे घेऊन ये त्याला, मी शहामृगाच्या अंड्याचे थालीपीठ करुन देईन. चविष्ट होतात हो! माझ्या लोला, पांडुरंग आणि मोंबासाला खूप आवडतात.
सुषमा : (जान्हवी मोड ऑन) काहीही हां धनंजय!!!:P
बॉबी मॉड : सकाळी-सकाळी पपलू भंकस!
जोपर्यंत सरपोतदार 'हा हलकटपणा
जोपर्यंत सरपोतदार 'हा हलकटपणा आहे माने' अशी कमेंट टाकत नाहीत तोपर्यंत पास!
अहो धनंजय मानेच्या तेचबुकात हलकट शब्द नाही?
हे म्हणजे आपल्या त्या ह्याच्यात ते हेच नसल्यासारखं आहे.
Dhananjay Mane. Khup apeksha
Dhananjay Mane. Khup apeksha nirman karnare charecter aahe he, mhanun asel kadachit. Pan tevadhe uthavdar nahi zaley techbook.
Yeta jata Banavabanavi til
Yeta jata Banavabanavi til dialogues vaparale jatat, die heard fan aahot tya ek ek charecter che. Far javalchi vatate hi film.
धनंजय माने इथेच फेबु पोस्ट
धनंजय माने इथेच फेबु पोस्ट करतात का?
साती +१
साती +१
छान. माने हे झेंडेंचे मावसभौ
छान.
माने हे झेंडेंचे मावसभौ ना ?
साती +१
साती +१
धनंजय माने इथेच राहतात का?
धनंजय माने इथेच राहतात का?
अजुन विस्तारीत पाहिजे,.
अजुन विस्तारीत पाहिजे,.