तेचबूक! - धनंजय माने
Submitted by sonalisl on 24 September, 2015 - 11:35
तेचबूक! - धनंजय माने
स्टेटस अपडेट :
आज नाश्त्याला थालीपीठ पाहून माझा अत्यंत जवळचा मित्र अमिताभ बच्चन याची आठवण आली. त्याचा आवडता पदार्थ. शाळेत असताना मला रोज डब्यात थालीपीठच न्यावे लागायचे. तसा हट्टच असायचा त्याचा, नाहीतर माझ्यावर खूप चिडायचा. आता कामाच्या व्यापामुळे आमची बरेच वर्ष भेट नाही झाली. पण जेव्हा भेटू तेव्हा थालीपीठाचा बेत पक्का
५६ लाईक्स. २ डिस्लाईक्स.
परशुराम : माझ्याकडे बिडी मागायचा पण गुणी कलावंत हो!
विश्वासराव सरपोतदार : हो का? बऽऽऽरं!!
शंतनू : lol दादा हसून हसून पडलो मी
विषय:
शब्दखुणा: