Submitted by संयोजक on 25 August, 2009 - 11:53
प्रवेशिका ३
मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी
घडोघडी अस्वस्थ मी रीफ्रेश मारत होते
काही नवे नाही ..सर्व्हर का निद्रिस्त होते
मायबोलीचीच पहावी का कुंडली कोणी
सगळेच असे का प्रेमकविता पाडत होते ?
कशास होती सुरू तिथे ती चर्चा नक्की?
कुडमुडे व्यासंगी धबाबा पोस्टत होते
खरेच का कळती कविता यांना
वाहवा! जे नित्यही म्हणत होते
कितीक परोपकारी शंकासूर येथे
मित्र मैत्रिणींच्या अडचणी विचारत होते
वैभवा तुझ्यासारखे कवी क्वचितच नशिबी
बरेचसे बिचारे! कळत नव्हते, बरळत होते
सुरेख तुझी ही गजल पाहता
विडंबन कीबोर्डावर उमटत होते
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोलीचीच पहावी का कुंडली
मायबोलीचीच पहावी का कुंडली कोणी
सगळेच असे का प्रेमकविता पाडत होते ?
खरेच का कळती कविता यांना
वाहवा! जे नित्यही म्हणत होते
>>>
हे दोन चांगलेत.. एकूणच ह्या विषयावर ह्यावेळी बरीच विडंबने येणार असे दिसतय..