कच्चा भाजीचा फणस - पाव किलो
लाल तिखटाची पावडर
हळद
मीठ
गोडा मसाला
उडद डाळीचा मोगर
कढीपत्ता (हवा असल्यास)
दाण्याचे कुट (हवे असल्यास)
तेल
लसून
गुळ
टिप: जर खाली फोटो दिसत नसतील तर ह्या लिंकवर जाऊन बघू शकता:
https://goo.gl/photos/PVpx2b6X68fgtHY77
https://goo.gl/photos/eRWiN5CvuC8qiRyr9
https://goo.gl/photos/hgFWtYU8FXnA4nTs5
https://goo.gl/photos/7AVNwLeM8B3P43Ra6
१) कच्चे फणस नळाखाली धरुन धुवून घ्यावे.
२) फणस चिरुन त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. मग त्यात हळद, मीठ, लाल तिखट घालून हाताने हे सर्व मिश्रण एकत्रित मिसळावे. मग त्यावर एक त्यावर ताट ठेवून चिरलेली भाजी झाकून ठेवावी. फक्त दहा मिनिटे.
३) एका ताटामधे हे सर्व साहित्य काढून घ्यावे. ह्यात मी माझ्याकडे होता म्हणून कांदा लसून मिरची पावडर, तीळ आणि दाण्याचे कुट, गोडा मसाला, गुळ, उडदाची डाळ - हे सर्व साहित्य घेतले. ह्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार यथायोग्य बदल करु शकता:
४) आता मी फोडणी तयार करुन घोळवलेले फणस त्यात घातले. पळीने एकजीव केले आणि दहा मिनिटे झाकून ठेवून शिजू दिले.
५) ही झाली फणसाची भाजी:
भाजी करताना कढई असेल तर ही भाजी आणखी छान होईल. माझ्याकडे इतके मोठे पातेले नव्हतेच. त्यामुळे फणस पातेल्याच्या वर उसळत होते.
बी, पाककृती खूप छान आहे पण
बी, पाककृती खूप छान आहे पण फोटो दिसत नहियेत. उडद डाळीचा मोगर म्हणजे काय?
पद्मावती, मला तर फोटो दिसतात.
पद्मावती, मला तर फोटो दिसतात. इथे कुणालाच फोटो दिसत नाहीत का?
ती पांढरी भरडलेली आणि सोललेली डाळ तिला मोगर म्हणतात.
उडीद = उडद
फोटो दिसत नाहियेत.
फोटो दिसत नाहियेत.
मला दिसत आहेत फोटो. मी गुगल
मला दिसत आहेत फोटो. मी गुगल प्लस मधे जाऊन हव्या असलेल्या फोटोवर राईट क्लिक केले आणि कॉपी ईमेज यू-आर-एल केले. तीच लिंक इथे चिकटवली. काही चुकले का?
मी आता बदल केलेत तर मलाच फोटो
मी आता बदल केलेत तर मलाच फोटो दिसत नाही आहेत. मी शेअरेबल लिंक घेतली आत्ता.
पद्मावती आणि सकुरा तुम्ही कुठले ब्राऊजर वापरले होते? मी गुगल क्रोम वापरले होते. तर मला माझे फोटो दिसत. आता परत तोच बदल करावा लागेल. नंतर करेन. इथे पण 'कॉपी ईमेज यु आर एल" असेच सुचवले आहे;
https://wordpress.org/support/topic/direct-link-to-google-photo-instead-...
Even I cannot see the
Even I cannot see the photos.....
कृती मस्तच. उडीद डाळ चव
कृती मस्तच. उडीद डाळ चव चांगली लागते का ह्याच्यात.
फोटो दिसत नाहीत.
बी, मला आधी फोटो दिसत होते,
बी, मला आधी फोटो दिसत होते, आता दिसत नाहियेत.
आता परत पहा.. मी परत
आता परत पहा.. मी परत पुर्वीच्या लिंकस पेरल्यात.
शब्दाली आधीच छान आहेत फोटो अशी प्रतिक्रिया दिली असती तर केवढे तरी कष्ट वाचले असते माझे
आता तरी दिसतात का फोटो.. प्लीज ब्राऊझर चे नाव सांगाला का म्हणजे अॅडामिन ह्यांच्याशी ह्यावर बोलता येईल. मी गु. क्रोम वापरत आहे.
मला आता दिसले फोटो. छान आहेत.
मला आता दिसले फोटो. छान आहेत.
हे.. हुश्श!!! धन्यवाद अन्जू.
हे.. हुश्श!!!
धन्यवाद अन्जू.
आता दिसत आहेत. मी मोझिलामधुन
आता दिसत आहेत.
मी मोझिलामधुन बघितले.
फोटो छान आलेत, ही भाजी खाऊन खुप वर्ष झाली, चवपण आठवत नाहिये, करुन बघायला हवी.
दिसत आहेत फोटो.....छान दिसतेय
दिसत आहेत फोटो.....छान दिसतेय भाजी.
करुन बघण्यात येईल.
धन्यवाद सकारात्मक
धन्यवाद सकारात्मक प्रतिसादाबद्दल सकुरा. एखादा पदार्थ आपण बनवावा तो इथे लिहावा आणि तो इतर कुणी करुन पहावा असे क्वचित होते. पण होते तेंव्हा आनंद होतो.
बी, वरती मी एक प्रश्न
बी, वरती मी एक प्रश्न विचारलाय, उडीद डाळ चांगली लागते का. कारण फणसाचे विविध भाजीप्रकार खाल्लेत पण उडीद डाळ घालून नाही माहिती.
बी, फोटो परत कुठे गायब केले
बी, फोटो परत कुठे गायब केले ???
अन्जू, अगदी माफक प्रमाणात
अन्जू, अगदी माफक प्रमाणात घातली मी उडीद डाळ. आपण उपम्यात नाही का घालत? तमिळ लोक तर चन्याची डाळ सुद्धा घालतात उपम्यात. मी अगदी अर्धा चमचा घातली. आमच्याकडे आई लाल भोपळ्याच्या भाजीत खसखस घालते.
उडीद डाळ मला चवीत जाणवली नाही पण भाजी भारी दिसत होती त्यामुळे
शब्दाली नाही परत फोटोला हातच
शब्दाली नाही परत फोटोला हातच नाही लावला.
बी तुमच्या आधिच्या दोन-तिन
बी तुमच्या आधिच्या दोन-तिन रेसिपी करुन बघितल्या आहेत आणि त्या आवडल्या देखिल आहेत.
पालकाची डाळभाजी,पात-टोमॅट,केल (पीठ पेरुन)
सध्या फोटो दिसत आहेत.
ओके बी. धन्स.
ओके बी. धन्स.
बापरे! सकुरा काय सांगतेस!!!
बापरे! सकुरा काय सांगतेस!!! माझ्या रेसेपी फॉलो होतात ह्याचा मला खूप खूप आनंद होतो आहे. मी खूप काही करुन बघत असतो पण इथे रेसेपी देताना मला सगळे बळ एकवटावे लागते
मला ३ पासुन पुढचे फोटो दिसत
मला ३ पासुन पुढचे फोटो दिसत नाहियेत.
पान रीफ्रेश करुन बघ मग.
पान रीफ्रेश करुन बघ मग.
मला ३ पासुन पुढचे फोटो दिसत
मला ३ पासुन पुढचे फोटो दिसत नाहियेत.<<<+१
पहिले २ च फोटो दिसतायत.
पहिले २ च फोटो दिसतायत.
बी, फणसाची भाजी माझी आवडती.
बी, फणसाची भाजी माझी आवडती. पण मला एकच फोटो दिसतोय. हा तिथे मिळाला का ? याला आम्ही गर्याचा फणस म्हणतो. यापेक्षा कोवळ्या फणसाची पण भाजी करतात. ( त्याला कुयरी असा शब्द वापरतात कोकणात ) त्याची अनेक पद्धतीने होते भाजी. उपवासाची पण करतात त्याची भाजी.
फणसाची भाजी आवडतेच रेसिपी
फणसाची भाजी आवडतेच
रेसिपी छान
फोटु दिसत नाहीत पहिले दोन सोडून
पाकृ आवडली. एकच फोटो दिसतोय.
पाकृ आवडली. एकच फोटो दिसतोय.
गूगल अकाउंटमधे जाऊन फोटोवाला
गूगल अकाउंटमधे जाऊन फोटोवाला फोल्डर पब्लिक शेअर करा. फक्त पहिला फोटो दिसतो आहे, नंतरचे दिसत नाहीत. फोटोवर राईट क्लिक करून लिंक पहा, त्यातली गोची समजेल.
मला ६ फोटो दिसतायत.
मला ६ फोटो दिसतायत.
Pages