स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग -३

Submitted by पुरंदरे शशांक on 5 September, 2015 - 06:17

स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग - ३

आता या अ‍ॅपबद्दल अजून अजून कळू लागले आहे. अर्थातच ज्याने कोणी हे बनवले आहे त्याला चित्रकलेची आणि रेषा, विविध आकारांची जी जाण आहे त्याला मानावेच लागेल. या अ‍ॅपमधील ब्रश, पेन्सिल, इरेजर इ. जी साधने दिलेली आहेत ती पहाता या छोट्याशा स्क्रीनवर काय काय गमती जमती करता येतील हे पूर्णपणे आपल्या कल्पनाशक्तीला आव्हान देणारेच आहे.

जसजशी आपण ही साधने व विविध रंग वापरत जाऊ तेवढी त्यातील गंमत समजत जाऊन या अ‍ॅपमधे अगदी लहान मुलासारखे रमायला होते...

मला स्वतःला पाने-फुले इ.चे रंग, आकार यांचे आकर्षण असल्याने ते काढायचा प्रयत्न केला आहे.

१]
1_6.jpg

२]
2_5.jpg

३]
3_2.jpg

४]
4_2.jpg

५]
5_0.jpg

६]
6_0.jpg

७]
7_1.jpg

८]

8_0.jpg

-----------------------------------------------------------------------------------
या चित्रांमधे कोणाला काही सुधारणा सुचवायच्या असतील तर नि:संकोचपणे कळवणे.

धन्यवाद.

-------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/54184 भाग १

http://www.maayboli.com/node/55316 भाग २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक, माझ्या श्रीलंकेवरील मालिकेत अजून खुप फुलांचे फोटो येणार आहेत.. तूम्हाला नक्कीच त्यांची चित्रे काढाविशी वाटतील या अ‍ॅपवर !!

काय मस्तं स्केचस आहेत.
तुमची स्केच काढण्याची पद्धत जपानी वळणाची वाटली-- minimalistic & very classy .
सगळीच आवडली, खासकरून २, ३, ४ आणि ८.