Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
हल्लीच मालवणला जाऊन आलो,
हल्लीच मालवणला जाऊन आलो, तेव्हा या धाग्याची आठवण आली आणि मिळालेले काही नमुने.
१) माझी चालते, तर तुझी का जळते.
२) जलतील मेले (टायपो नाही असच लिहलेल)
३) जळतात मेले (हे सुध्दा होत)
४) जिस देशमे बहती है कृष्णा कोयना, उस देशमे चलती है मेरी मैना.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर एकदा डाव्या लेनमधून एक छोटा हत्ती चालला होता. केवळ चार चाकं आहेत म्हणून एक्स्प्रेस वे वर प्रवेश मिळाला होता. अगदीच अशक्त वाहन आणि अतिशय हळू हळू चाललेलं.. त्याच्या मागे गडद भगव्या अक्षरात एकच शब्द लिहिला होता तो वाचून आमची हसून हसून मुरकुंडी वळली... लिहिलं होतं...
"वादळ"...
वांद्र्याच्या जिल्हाधिकारी
वांद्र्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीबाहेर मी कितीतरी महिने धूळ खात असलेली एक जुनी ambassador गाडी बघत होतो. घरी येताना मला रोज दिसायची. एके दिवशी कुणीतरी विंडस्क्रीनवर धुळीतच बोटाने गिरवलं होतं:
" माज्याकडे कुनीतरी बघा" ..
अशक्य हसलो होतो..
मारवा डचीम शहूरमें दीमिलेल
मारवा डचीम शहूरमें दीमिलेल
कालच एका नव्या कोऱ्या झायलोवर
कालच एका नव्या कोऱ्या झायलोवर बघितला:
मित्रप्रेम
मी बाई चिक्याचीच!
आलात आनंद, बसलात अत्यानंद,
आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद!
.
.
मारवा डचीम शहूरमें दीमिलेल
मारवा डचीम शहूरमें दीमिलेल >>>>:हाहा:
सद्दा मी कामानिमित्त रोहा
सद्दा मी कामानिमित्त रोहा येथे आहे
तिथे कामावर जाताना एका रिक्शाच्या मागे मी हे वाचले
आयुष्यभर जळत रहा
सु-रक्षीत आतंर (हा शब्द वाचुन
सु-रक्षीत आतंर (हा शब्द वाचुन दाखवा) ठेवा
एका रिक्षाच्या मागे असलेली
एका रिक्षाच्या मागे असलेली जाहिरात :
'दणकट पायजमा, मुलायम बंडी'
गाडीवर असल्यामुळे प्रचि काढता आलं नाही
ती जाहीरात आहे एका दुकानाची.
ती जाहीरात आहे एका दुकानाची. पुण्यात पाहीली असेल अशी रिक्षा.
(No subject)
आज कुर्ल्यातल्या एका थेटरावर
आज कुर्ल्यातल्या एका थेटरावर 'जय हो जगदंबे माई' आणि 'द डर्टी डान्सर' ही पोस्टरं गुण्यागोविंदाने नांदताना पाहिली. वर जगदंबेच्या पिक्चरच्या पोस्टरवर ठळक अक्षरात लिहिलं होतं 'All Shoot In Malaysia'. देवा रे!
चेपु. साभार...
चेपु. साभार...
एका ट्रॅक च्या मागे लिहिलं
एका ट्रॅक च्या मागे लिहिलं होतं....
" भगवान तेरा भला करे
तेरे बीवी- बच्चे जिये...और तेरा खून पिये."
दिव्यश्री
दिव्यश्री
ना किसीकी नजर बुरी ना किसीका
ना किसीकी नजर बुरी ना किसीका मुंह काला
सबका भला सोचे ७३२९ वाला
एका ट्रकवर डाव्या बाजूला
एका ट्रकवर डाव्या बाजूला 'गोरे' आणि त्याच्या खाली 'ज्ञानेश्वर' असं लिहिलेलं बघून दुसर्या बाजूला सावळ्या मुक्ताबाई आहेत की काय अशी शंका आली. पण तिथे वेगळं कोडं होतं. वरचा शब्द 'बंधू' आणि खालचा शब्द 'एक्सप्रेस'.
आता हे 'गोरे बंधू' आहे म्हटलं तर 'ज्ञानेश्वर एक्सप्रेस' काय आहे म्हणायचं??
इथे आला असेल हा फोटो बहुधा...
इथे आला असेल हा फोटो बहुधा...
अशक्य हसलेय सगळ्यांचे
अशक्य हसलेय सगळ्यांचे प्रतिसाद वाचून …. फिदीफिदी
Facebook sabhar
Facebook sabhar
कोल्हापुरातल्या एका
कोल्हापुरातल्या एका रिक्षाच्या मागे... "तू तुझं बघ"
३६ येतील आणि जातील, माझीला
३६ येतील आणि जातील, माझीला मम्मीच आणणार.
"बुरी नजर वाले तेरे भी बच्चे
"बुरी नजर वाले तेरे भी बच्चे जिये
और बड़े होकर फिर गांजा दारू पिये"
१. बघतोस काय रागानं, ओव्हरटॅक
१. बघतोस काय रागानं, ओव्हरटॅक केलंय वाघानं
२. आलं बया दाजी
३. जल्दी मत करो, जिन्हें जल्दी थी वो चले गये
४. भगवान् सबका भला कर, लेकिन शुरवात मुझसे कर
(No subject)
बस्स एव्हढंच बाकी होतं.
बस्स एव्हढंच बाकी होतं.
(No subject)
एका मिनी टेम्पोच्या मागे
एका मिनी टेम्पोच्या मागे लिहलं होत 'पिवळं वादळ' ... भगवं एकवेळ ठीक होत पण पिवळं ??
Pages