तो वेडा होता. सगळे तसंच म्हणायचे.
वेडाच असणार. कारण त्याचे कपडे मळलेले असायचे. फाटलेले सुद्धा.
त्याची दाढी राठ वाढलेली आणि केस सुद्धा लांब आणि राठ. आंघोळ नसणारच करत कधी.
शहाणी माणसं असं थोडीच राहतात? छान छान कपडे घालून, पावडर लावून शाळेत जातात, ऑफिसला जातात...
तो मात्र कुठेच जायचा नाही. तिथंच असायचा. एका कडेला. दोन रस्ते मिळतात तिथंच. फाट्यावर.
त्यानं कुठून कुठून जमा केलेल्या फाटक्या तुटक्या उशा, चादरी, तक्के... त्याची त्यानं त्याच्यापुरती एक छान बैठक तयार केली होती.
तिच्यावर तो दिवसभर बसून असायचा. राजासारखा! मला तर ते त्याचं सिंहासन वाटायचं!
त्याच्यासमोरून हजारो माणसं यायची जायची. कुणी गाडीतून, कुणी पायी.. कुणी घासत रडत, कुणी थकुन चूर, कुणी हसत खिदळत!
कुणीच त्याची दखल घ्यायचं नाही. कधीच.
कुणी दखल घ्यावं असं तोही काही कधीच करायचा नाही. नुसताच कुठल्याश्या काडीनं घाणेरडे दात कोरत येत्या-जात्याकडे बघत रहायचा. एकाच नजरेने. मधूनच थुंकायचा.
कुणीच त्याच्याविषयी काहीच बोलायचं नाही. त्याला कधी कुणी हटकायचं नाही.
मला कधी कधी असंही वाटायचं की तो खरंतर नाहीच्चे तिथे! फक्त मलाच दिसतो तो... किंवा तिथं तो आहे असा मला उगाच भास होतो.
मग मी शहारून जायचे.
उंच खिडकीतून खाली उतरून कधी मी त्याच्या जवळ जायचे. त्याला बोट लावून बघावं एकदा असं वाटायचं.
पण मग नुस्तीच त्याच्या समोर जाउन बसायचे. तो आठ्याभरल्या कपाळानं मला खाली-वर बघायचा. मग हसायचा.
मी त्याला द्यायचे माझ्याकडचं एखादं चॉकलेट किंवा गोळी.
तो मला त्याच्या एखाद्या फाटक्या उशीतला एखादा कापसाचा पुंजका द्यायचा. किंवा एखादा दोरा, किंवा चिंधी.
मी त्याच्याकडे न बोलताच सोपवायचे माझी काही प्रश्नांकीत कुतुहलं.
आणि तो मला द्यायचा त्याची बेपर्वा नजर. त्यातलं विरक्त जहर. आणि एक हसू.
मला खरंतर हवं होतं त्याचं बेदखल राजेपण! त्याचं त्याच्यापुरतं त्यानं उभारलेलं सार्वभौम साम्राज्य...!
कुठल्याही शिक्क्याची, नावाची, प्राज्ञेची, नोंदीची, दखलीची कणभरही गरज नाकारणारं त्याचं उद्धट अफाट तरिही क्षुल्लक अस्तित्व!
त्याची उर्मट नजर! फाट्यावर बसून सगळ्या जगाला फाट्यावर मारण्याची त्याची सुंदर अदा!
मी फिदा होते त्याच्या वेडावर.. हे आत्ता लक्षात आलं. मी शहाण्यांच्या गर्दीत सामिल झाले तेंव्हा.
नंतर तो नाहीसा झाला अचानक. त्याचं सिंहासन तिथंच टाकून. अगदी त्याची दात कोरायची काडी सुद्धा नेली नाही त्यानं सोबत.
मी दिलेली गोळ्या-चॉकलेटं त्याच्या उशाखाली सापडली. मुंग्या लागून लगदा झालेली.
मी दिलेल्या ऐवजाचं त्यानं असं केलं. अव्हेरही केला नाही आणि स्वीकारही केला नाही.
नंतर कधीतरी मोठी वगैरे झाले तेंव्हा त्यानं दिलेल्या सगळ्या ऐवजाचा मी मात्र नकळत फारच उपयोग केला.
घरटं बांधलं. माझं घरटं!
त्याच्या पायात विरक्ती पेरली आठवणीनं. हसू जोपासलं चार भिंतींतून आणि बेपर्वा नजरही टांगली दाराशी, खिडकिशी! आतून बाहेर... बाहेरून आत... ती हिंदोळत राहते आता.
मी घेतली होती त्याच्या असण्याची दखल तेंव्हा! त्याच्या नजरेला सामोरं गेले होते! कारण तेंव्हा लहान होते.
आता भेटला तर आताही जाईन त्याला सामोरं! पण पुन्हा लहान व्हावं लागेल. खुपच लहान व्हावं लागेल.
मुग्धमानसी..... झक्कास जमलय
मुग्धमानसी.....
झक्कास जमलय हे !!
खास करुन >>नंतर कधीतरी मोठी वगैरे झाले तेंव्हा त्यानं दिलेल्या सगळ्या ऐवजाचा मी मात्र नकळत फारच उपयोग केला. घरटं बांधलं. माझं घरटं! त्याच्या पायात विरक्ती पेरली आठवणीनं. हसू जोपासलं चार भिंतींतून आणि बेपर्वा नजरही टांगली दाराशी, खिडकिशी! आतून बाहेर... बाहेरून आत... ती हिंदोळत राहते आता.<<
वेड पान्घरुन पेडगाव ला जाणार्या असंख्य दिड शहाण्यांच्या जगात असा खरा वेडा कधीतरी मनात उगाच घर करुन जातो हे नक्की.
-प्रसन्न
मस्त
मस्त
छान लिहिलेयम वेगळेच..
छान लिहिलेयम वेगळेच..
अप्रतिम!
अप्रतिम!
वाह! मस्त.
वाह! मस्त.
खुप मस्त
खुप मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच!
छानच!
अगं!!!!!!
अगं!!!!!!
काळजाला लागणारं लिहिलयेस अगं.
काळजाला लागणारं लिहिलयेस अगं. विचारात पाडलं
धन्यवाद!
धन्यवाद!
धकाधकीच्या जिवनात क्षणभर
धकाधकीच्या जिवनात क्षणभर रेंगाळायला लावणारे लेखन. खुप आवड्ले..
मानसी काटा आला.... छान जमलय!
मानसी काटा आला.... छान जमलय!
फार फार सुरेख जमलय हे,
फार फार सुरेख जमलय हे, मुग्धमानसी.
ओ हो .......
ओ हो .......
खूपच सुरेख जमलय मुग्धमानसी
खूपच सुरेख जमलय मुग्धमानसी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खासच अगदी !!!!!!
छान जमलय!
छान जमलय!
आवडलं!
आवडलं!
छानच.....
छानच.....
त्याचे काळीज सोलून 'त्या'ची
त्याचे काळीज सोलून 'त्या'ची व्यथा समोर मांडली आहेस. असे त्या हृदयीचे ह्या हृदयी घालणार्या कलाकृतीला विशेषणे तोकडीच पडतात म्हणून काहीच म्हणत नाहीये.
कुणीच त्याच्याविषयी काहीच बोलायचं नाही. त्याला कधी कुणी हटकायचं नाही. मला कधी असंही वाटायचं की तो खरंतर नाहीच्चे तिथे! फक्त मलाच दिसतो तो... किंवा तिथं तो आहे असा मला उगाच भास होतो. मग मी शहारून जायचे. >>> माझ्याही अंगावर शहारा आला वाचताना. इतकं निग्लेक्ट करतो एखाद्याला आपण ? बापरे!
आवडलं. वेड पान्घरुन पेडगाव ला
आवडलं.
वेड पान्घरुन पेडगाव ला जाणार्या असंख्य दिड शहाण्यांच्या जगात असा खरा वेडा कधीतरी मनात उगाच घर करुन जातो हे नक्की.>> हो खरच.
कुणीच त्याच्याविषयी काहीच बोलायचं नाही. त्याला कधी कुणी हटकायचं नाही. मला कधी असंही वाटायचं की तो खरंतर नाहीच्चे तिथे! फक्त मलाच दिसतो तो... किंवा तिथं तो आहे असा मला उगाच भास होतो. मग मी शहारून जायचे. >>> माझ्याही अंगावर शहारा आला वाचताना. इतकं निग्लेक्ट करतो एखाद्याला आपण ? बापरे!>>> खरच किती भयानक वाटत हे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सुरेख!!
सुरेख!!
अप्रतिम!
अप्रतिम!
एकदम सही लिहिले आहे. असेच
एकदम सही लिहिले आहे. असेच काही वेडे पाहिलेत लहान्पणी, अचानक गायब झालेले.
काय होत असेल त्यान्चे पुढे?
मी दिलेल्या ऐवजाचं त्यानं असं
मी दिलेल्या ऐवजाचं त्यानं असं केलं. अव्हेरही केला नाही आणि स्वीकारही केला नाही. >> ... अशीच स्थिती आयुष्यात कितीतरी वेळा येत असते, बहुधा तेव्हा देणारे आपण वेडे ठरतो. खास लिहिलंय तुम्ही!
मस्त.
मस्त.
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
हे मस्त आहे. वेगळेच.
हे मस्त आहे. वेगळेच.
सुरेख. आतपर्यंत स्पर्श
सुरेख. आतपर्यंत स्पर्श करणारं लिखाण.
धन्यवाद!
धन्यवाद!
छान आहे. तुम्ही खूप छान
छान आहे. तुम्ही खूप छान निरीक्षण करता. नुसतच डोळ्यातून मेंदूत आणि तिथून कुठेतरी मेंदूच्या कधी न उघडणाऱ्या एखाद्या कोपर्यात असं नाही. डेटाची इन्फोर्मेशन करून अशी बाहेर काढता!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages