"It is not always easy. Your successes are unheralded--your failures are trumpeted."
President John F. Kennedy, CIA Headquarters, 28 November 1961
गुप्तहेर खात म्हंटल की मराठी माणसाला थेट बहिर्जी नाईक आठवतो आणि चाणक्याचे कोटस वैगेरे आठवायला लागतात . एरवी गुप्तहेर खात्याची आठवण आपल्याला कुठे बॉम्ब स्फोट झाला की खापर फोडायला आणि शिव्या घालायला कुणीतरी पाहिजे तेंव्हा च होते. वर केनेडी ने म्हणल्याप्रमाणे यांच्या यशोगाथा कुणाला कळत नाहीत मात्र यांच्या अपयशाचा सार्वजनिक पंचनामा होतो. अनेक उदाहरण अशी आहेत की गुप्तहेर खात्याच्या सतर्कतेमुळे अनेक बॉम्बस्फोट आणि अतिरेकी हल्ले टळले आहेत. मात्र सर्व सामान्य जनतेपुढे हि माहिती फारशी येत नाहि. पण कुठे बॉम्बस्फोट झाले की प्रसारमाध्यम लगेच आपल्या गुप्तहेर यंत्रणेतल्या त्रुटिवरुन आरडाओरड सुरु करतात . आणि फुटबॉल क्रमवारी पासून जागतिक आरोग्या निर्देशांकामध्ये पाकिस्तान शी स्पर्धा करण्याच्या भारतीय वृत्तीला, "त्या पाक्ड्यांची ISI बघा कशी हिरीरीने काम करते नाहीतर आपली RAW बघा बसलेत हातावर हात ठेवून " अस म्हणे मानवते. यातल्या बहुतेक लोकाना RAW चा longform पण माहित नसतो मग त्यांनी १९७१ च्या युद्धात बजावलेली जबरदस्त कामगिरी यांचा पत्ता असण्याची सुतराम शक्यता नाहिच. गुप्तहेर खात्याबद्दल चे हे औदासिन्य सर्वसामान्य लोकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वत्र आढळते .
अशा या देशात अजित डोवाल सारख्या खमक्या माजी गुप्तहेर अधिकाऱ्याची मोदींचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक झाल्याच्या बातमीला माध्यमांमध्ये कुठेतरी कोपरयात किंवा मधल्या पानावर जागां मिळाली यात आश्चर्य ते काय ? त्या बातम्यांमध्ये पण डोवाल हे अडवाणी यांचे निकटवर्तीय असून पण मोदी यांनी त्यांची नेमणूक कशी केली असा आश्चर्यमिश्रीत खोचक सुर होता. पण सुदैवाने अजित डोवाल ला प्रसिध्द होण्यापेक्षा त्याचे काम अचूक करण्यात जास्त रस आहे. त्याची दीर्घ कारकीर्द तरी हेच सांगते .
मी डोवाल बद्दल पहिल्यांदा वाचले ते हुसैन झैदी च्या डोंगरी ते दुबई या दाउद इब्राहिम च्या उदयावर लिहिलेल्या अप्रतिम पुस्तकामध्ये . भारतीय गुप्तहेर खात्याने पाकिस्तान मध्ये दडुन बसलेल्या दाउद ला उडवण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत . पण एकदा ते त्याच्या खुप जवळ पोहोंचले होते . जावेद मियांदाद चा मुलगा आणि दाउद च्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस . छोटा राजन या दाउद च्या प्रतिस्पर्धी टोळीशी हातमिळवणी करून हा बेत आखण्यात आला होता . या टोळीचे दोन उत्कृष्ट नेमबाज फरीद तनाशा आणि विकी मल्होत्रा हे दुबई (जिथे विवाह सोहळा पार पडणार होता ) ला पोहोंचले पण होते.सर्व तपशील ठरवला होता . अगदी बारीक सारीक गोष्टी पण पक्क्या झाल्या होत्या . म्हणजे अगदी हे नेमबाज कुठे उभे राहणार आणि गोळ्या कधी झाडणार इथ्पर्यन्त. पण ……। कुठेतरी माशी शिंकली आणि अंतर्गत गडबडीमुळे हे योजना ऐन वेळेस बारगळली . हातातोंडाशी आलेला घास गेला. हुसैन झैदी च्या पुस्तकातले हे प्रकरणच (प्रकरण २२- हेरांचे संमेलन ) मुळातुन वाचण्यासारखे आहे. तर हे सगळे operation अजित डोवाल पार पाडत होता . ह्यानंतर अजित डोवाल या नावाबद्दल कुतूहल तयार झाले नसते तरच नवल ,
कळस म्हणजे हा अजित डोवाल चक्क पाकिस्तानात ७ वर्ष राहून हेरगिरी करून राहून आला आहे . ते पण काहुटा (पाकिस्तान ची पहिली आण्विक भट्टी जिथे आहे ) अशा ठिकाणी . त्यामुळेच अजित डोवाल ला पाकिस्तान आणि ISI याबद्दलचा तज्ञ म्हणून ओळखले जाते. operation Blustar च्या काही वेळ अगोदर हा पठ्ठ्या वेश बदलुन सुवर्ण मंदिरात जाऊन राहिला होता . कारकीर्दीच्या सुरुवातीलाच याने २० वर्ष खदखदणारा मिझोराम प्रश्न सोडवण्यात सक्रिय वाटा उचलला होता . अशा असंख्य देशाच्या इतिहासाला वळण देणारया कामगिऱ्या पार पाडणारा हा लढवय्या कायमच पडद्याआड राहिला . गुप्तहेर खात्याबद्दल प्रचंड औदासिन्य असणार्या देशात या योद्ध्याला भारत रत्न किंवा गेला बाजार पद्मश्री मिळणे तर शक्य नाही . पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर नेमणूक झाल्याने त्या पदाचा नक्कीच सन्मान झाला आहे . अजित डोवाल चि या पदावर नेमणूक झाल्याने दाउद , सलाउद्दीन आदी लोकांमध्ये नक्कीच धडकी भरली असेल . बाकीचे माहित नाही पण राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तहेर खाते या आघाडीवर नक्कीच अच्छे दिन येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वतहाचा जीव देशासाठी धोक्यात घालणाऱ्या या unsung hero ला बहिर्जी नाईकांच्या महाराष्ट्रातुन एक मानाचा मुजरा
म्यानमार हे अतिरेक्यांच्या
म्यानमार हे अतिरेक्यांच्या बाबतीत झीरो टॉलरन्स असलेला देश आहे.
>>>
लो करलो बात!! इतके वर्षे नागा फुटीरतावादी म्यानमारमध्ये राहत आहेत त्याचे काय?
सोन्याबापू , बापरे !! भारीच
सोन्याबापू , बापरे !! भारीच आहे ..
सोन्याबापू, जबरदस्त!
सोन्याबापू, जबरदस्त!
छान माहिती सोन्याबापू!
छान माहिती सोन्याबापू!
सोन्याबापू, जबरदस्त!>>>१
सोन्याबापू, जबरदस्त!>>>१
भारतीय पोलिसिंग हे कितीतरी
भारतीय पोलिसिंग हे कितीतरी बाबतीत पायनियर होते
१ आधुनिक जगातले सर्वात जुने गुप्तहेर खाते म्हणजे आइबी उर्फ़ केंद्रीय अंतर्गत गुप्तचर खाते , ह्या खात्याचा विस्तार अन कार्य महाप्रचंड आहे, हिंमत सिंह समिति च्या recomendation नुसार रॉ वेगळी होइस्तोवर रॉ च काम सुद्धा आइबी करत असे
२ फिंगर प्रिंट्स चा उपयोग पुरावा अन तपासात करणारे जगातले प्रथम पोलिस खाते म्हणजे अठराव्या शतकात ले कलकत्ता मेटोपोलिटीएन पोलिस डिपार्टमेंट हे होय
ओह ! ग्रेट .. हे काही माहितच
ओह !
ग्रेट .. हे काही माहितच नव्हत ..
धन्यवाद सोन्याबापू ....
महाराष्ट्रातुन एक मानाचा
महाराष्ट्रातुन एक मानाचा मुजरा>>> +१० धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल ...
No doubt this guy is
No doubt this guy is genius...but claiming whole dept is worldclass would be too much...
-- Dawood still alive and have been to public places thousand of times--- Big failure
-- Airoplane kidnapping -- Whole world saw our failure
आपले RAW तोडीस तोड होतेच. आणि
आपले RAW तोडीस तोड होतेच. आणि आता होत आहे. मधल्या काळातले काही राजकीय निर्णय अदूरदृष्टीपणे घेतले गेले आणि सगळ्या खात्यावर पाणी फेरलं गेलं.
जेव्हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे पंख कापले जातात तेव्हा असेच होते. मधल्या काळात RAW चे अधिकार पध्धतशीरपणे संपवले गेले. इंदिरा आणि राजीव गांधीनंतर आलेल्या कॉंग्रेसेतर सरकारांचा विशेषतः व्ही पी सिंग आणि आय के गुजराल यांचा RAW म्हणजे इंदिरा आणि राजीव गांधी ह्यांच्या समर्थकांचा अड्डा असा समज होता. मग काय, एक एक करत बंद करत गेले ऑफिसेस.
गुजराल डोक्त्रीनने ऑफिशियली भारत इतर देशांच्या अंतर्गत हेरगिरी करणार नाही असे ठरवून टाकले आणि गुप्तहेरगिरी संपवली.
एक नोटीस केल असेल तर त्या पिरेडनंतरच 'खरे दहशतवादी' हल्ले सुरु झाले.
गुजराल डोक्त्रीनने ऑफिशियली
गुजराल डोक्त्रीनने ऑफिशियली भारत इतर देशांच्या अंतर्गत हेरगिरी करणार नाही असे ठरवून टाकले आणि गुप्तहेरगिरी संपवली. >>>> काय लोक असतात खर.. दुर्दैव आपल ..!!
फार उच्च विचारसरणी असली की
फार उच्च विचारसरणी असली की असे होते. कुठेशिक वाचले होते की शांतता समोरच्याला हवी असेल तरच ती आपल्याला मिळते.
आणि त्याला ती हवी आहे अशी जाणीव करून द्यायला आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात, ज्यात त्याच्या भागात जाउन गोंधळ घालणे, आणि इतर सगळ्या गोष्टी घडवून आणणे महत्वाचे ठरते. त्यामुळे गुप्तहेरी ही नैतिक कधीच नसते. आयदर बाय हूक ऑर बाय क्रूक काम पार पाडायचे असते.
मग एखाद्या हळव्या मनाच्या शांततावादी माणसाला हे चुकीच वाटेल आणि ह्याला नैतिकतेच्या गोष्टींमधून तोलले जाइल!
असो, सध्या झोपलेली गुप्तहेरी परत जागी होतेय हे महत्वाचे.
अतिशय उत्तम लेख !! असे आणखी
अतिशय उत्तम लेख !! असे आणखी येऊ द्या.
http://online5.esakal.com/New
http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4713086945609721872&Se...
नागा बंडखोरांबरोबर सरकारने
नागा बंडखोरांबरोबर सरकारने नुकत्याच केलेल्या करारात अजित डोवालांनी महत्त्वाची भुमिका बजावल्याचं वाचलं. ह्या लेखाची आठवण झाली.
देवानु अजित डोवल हे चालते
देवानु अजित डोवल हे चालते बोलते जिवंत ज्ञानकोष आहेत पुर्वोत्तर अन खालिस्तानी चळवळीचे !! अचाट अफाट व्यक्ति आहे ती , इंटेल च्या जगात " The ghost who enters ur mind" असे म्हणतात
Pages