अजित डोवाल : बस नाम हि काफी है

Submitted by बावरा मन on 31 May, 2014 - 02:35

"It is not always easy. Your successes are unheralded--your failures are trumpeted."
President John F. Kennedy, CIA Headquarters, 28 November 1961

गुप्तहेर खात म्हंटल की मराठी माणसाला थेट बहिर्जी नाईक आठवतो आणि चाणक्याचे कोटस वैगेरे आठवायला लागतात . एरवी गुप्तहेर खात्याची आठवण आपल्याला कुठे बॉम्ब स्फोट झाला की खापर फोडायला आणि शिव्या घालायला कुणीतरी पाहिजे तेंव्हा च होते. वर केनेडी ने म्हणल्याप्रमाणे यांच्या यशोगाथा कुणाला कळत नाहीत मात्र यांच्या अपयशाचा सार्वजनिक पंचनामा होतो. अनेक उदाहरण अशी आहेत की गुप्तहेर खात्याच्या सतर्कतेमुळे अनेक बॉम्बस्फोट आणि अतिरेकी हल्ले टळले आहेत. मात्र सर्व सामान्य जनतेपुढे हि माहिती फारशी येत नाहि. पण कुठे बॉम्बस्फोट झाले की प्रसारमाध्यम लगेच आपल्या गुप्तहेर यंत्रणेतल्या त्रुटिवरुन आरडाओरड सुरु करतात . आणि फुटबॉल क्रमवारी पासून जागतिक आरोग्या निर्देशांकामध्ये पाकिस्तान शी स्पर्धा करण्याच्या भारतीय वृत्तीला, "त्या पाक्ड्यांची ISI बघा कशी हिरीरीने काम करते नाहीतर आपली RAW बघा बसलेत हातावर हात ठेवून " अस म्हणे मानवते. यातल्या बहुतेक लोकाना RAW चा longform पण माहित नसतो मग त्यांनी १९७१ च्या युद्धात बजावलेली जबरदस्त कामगिरी यांचा पत्ता असण्याची सुतराम शक्यता नाहिच. गुप्तहेर खात्याबद्दल चे हे औदासिन्य सर्वसामान्य लोकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वत्र आढळते .

अशा या देशात अजित डोवाल सारख्या खमक्या माजी गुप्तहेर अधिकाऱ्याची मोदींचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक झाल्याच्या बातमीला माध्यमांमध्ये कुठेतरी कोपरयात किंवा मधल्या पानावर जागां मिळाली यात आश्चर्य ते काय ? त्या बातम्यांमध्ये पण डोवाल हे अडवाणी यांचे निकटवर्तीय असून पण मोदी यांनी त्यांची नेमणूक कशी केली असा आश्चर्यमिश्रीत खोचक सुर होता. पण सुदैवाने अजित डोवाल ला प्रसिध्द होण्यापेक्षा त्याचे काम अचूक करण्यात जास्त रस आहे. त्याची दीर्घ कारकीर्द तरी हेच सांगते .

मी डोवाल बद्दल पहिल्यांदा वाचले ते हुसैन झैदी च्या डोंगरी ते दुबई या दाउद इब्राहिम च्या उदयावर लिहिलेल्या अप्रतिम पुस्तकामध्ये . भारतीय गुप्तहेर खात्याने पाकिस्तान मध्ये दडुन बसलेल्या दाउद ला उडवण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत . पण एकदा ते त्याच्या खुप जवळ पोहोंचले होते . जावेद मियांदाद चा मुलगा आणि दाउद च्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस . छोटा राजन या दाउद च्या प्रतिस्पर्धी टोळीशी हातमिळवणी करून हा बेत आखण्यात आला होता . या टोळीचे दोन उत्कृष्ट नेमबाज फरीद तनाशा आणि विकी मल्होत्रा हे दुबई (जिथे विवाह सोहळा पार पडणार होता ) ला पोहोंचले पण होते.सर्व तपशील ठरवला होता . अगदी बारीक सारीक गोष्टी पण पक्क्या झाल्या होत्या . म्हणजे अगदी हे नेमबाज कुठे उभे राहणार आणि गोळ्या कधी झाडणार इथ्पर्यन्त. पण ……। कुठेतरी माशी शिंकली आणि अंतर्गत गडबडीमुळे हे योजना ऐन वेळेस बारगळली . हातातोंडाशी आलेला घास गेला. हुसैन झैदी च्या पुस्तकातले हे प्रकरणच (प्रकरण २२- हेरांचे संमेलन ) मुळातुन वाचण्यासारखे आहे. तर हे सगळे operation अजित डोवाल पार पाडत होता . ह्यानंतर अजित डोवाल या नावाबद्दल कुतूहल तयार झाले नसते तरच नवल ,

कळस म्हणजे हा अजित डोवाल चक्क पाकिस्तानात ७ वर्ष राहून हेरगिरी करून राहून आला आहे . ते पण काहुटा (पाकिस्तान ची पहिली आण्विक भट्टी जिथे आहे ) अशा ठिकाणी . त्यामुळेच अजित डोवाल ला पाकिस्तान आणि ISI याबद्दलचा तज्ञ म्हणून ओळखले जाते. operation Blustar च्या काही वेळ अगोदर हा पठ्ठ्या वेश बदलुन सुवर्ण मंदिरात जाऊन राहिला होता . कारकीर्दीच्या सुरुवातीलाच याने २० वर्ष खदखदणारा मिझोराम प्रश्न सोडवण्यात सक्रिय वाटा उचलला होता . अशा असंख्य देशाच्या इतिहासाला वळण देणारया कामगिऱ्या पार पाडणारा हा लढवय्या कायमच पडद्याआड राहिला . गुप्तहेर खात्याबद्दल प्रचंड औदासिन्य असणार्या देशात या योद्ध्याला भारत रत्न किंवा गेला बाजार पद्मश्री मिळणे तर शक्य नाही . पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर नेमणूक झाल्याने त्या पदाचा नक्कीच सन्मान झाला आहे . अजित डोवाल चि या पदावर नेमणूक झाल्याने दाउद , सलाउद्दीन आदी लोकांमध्ये नक्कीच धडकी भरली असेल . बाकीचे माहित नाही पण राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तहेर खाते या आघाडीवर नक्कीच अच्छे दिन येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वतहाचा जीव देशासाठी धोक्यात घालणाऱ्या या unsung hero ला बहिर्जी नाईकांच्या महाराष्ट्रातुन एक मानाचा मुजरा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बावरा मन आणि अजित डोवाल तुम्हा दोघांना मुजरा !

या नेमणुका कश्या घडतात हे माहित नव्हत. बातम्यात अजित डोवाल आय बी चे डायरेक्टर होते असा उल्लेख होता. एखादा माणुस सी बी आय किंवा आय बी मध्ये आय पी एस करुन जात असेल असा माझा समज आहे. एखादा ऑफीसर पाकिस्थान मधे सात वर्षे राहुन आलेला आहे. ऑपरेशन ब्ल्यु स्टार मध्ये पण सहभाग होता. पण त्याच्या करियर ची सुरवात कशी होते हे समजण्यात जास्त रस आहे.

यावर विस्त्रुत लेख किंवा लेखमालिकाच लिहाना

अनेकानेक धन्यवाद ह्या लेखाबद्दल....

कीर्तीचक्र मिळवणारा पहिला पोलीस अधिकारी हे ही लिहायला हवे होते (एरवी हे कीर्तीचक्र फक्त सैन्यातील व्यक्तींनाच मिळत असे)

सुंदर आणि माहितीपूर्ण लेख....

पण नितीनचंद्र म्हणतात तसे अजून डिटेलवार वाचायला आवडेलच .. Happy >>>>>> +१

कळस म्हणजे हा अजित डोवाल चक्क पाकिस्तानात ७ वर्ष राहून हेरगिरी करून राहून आला आहे . >>
D-day या सिनेमातले ईरफानचे पात्र बहुतेक त्यांच्यावर आधारित आहे. कथानक सुद्धा तुम्ही लिहिलेल्या घटनांबाबत आहे.

अभिमान वाटावा असे व्यक्तीमत्व आहे. पण सुरक्षिततेच्या कारणाखाली अशी नावे व त्यांच्या योजना जाहीर व्हायला नको होत्या, असे वाटते.

सर्वाना धन्यवाद . @दिनेश हि माहिती अगोदरच प्रसिद्ध झाली आहे . मी काही नवीन गौप्यस्फोट नाही केलेला : ) हलके घ्या

सुंदर आणि माहितीपूर्ण लेख....

पण नितीनचंद्र म्हणतात तसे अजून डिटेलवार वाचायला आवडेलच .. >>>>>> +१

छान माहिती दिली आहे.

दिनेश, मला वाटतं, कालांतराने काही माहिती बाहेर पडतेच. ह्यापेक्षा अधिक माहिती फेसबुकवर व काही वर्तमानपत्रात आली आहे.

असा हिरा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणुन आला आहे ते दिलासा देणारे आहे. कारण आता खरे गुन्हेगार पकडायला सुरवात होईल.

ग्रेट ! बस्स नाम ही काफी नही था खरे तर .. हि ओळख होणे गरजेचे होते .. हि माहिती आणखी चार जणांना सांगायचे काम आता कर्तव्य म्हणून बजावण्यात येईल.

झैदी च्या पुस्तकातले हे प्रकरणच (प्रकरण २२- हेरांचे संमेलन ) मुळातुन वाचण्यासारखे आहे. <<< हो ते प्रकरण भन्नाट आहे. (पुस्तकही भन्नाट आहे!!)

http://en.wikipedia.org/wiki/Ajit_Kumar_Doval

(रच्याकने, विकीपीडीयामध्ये त्यांची नेमणूक झाल्याचे अपडेटदेखील झाले आहे. पीएमओचे सायबर खाते फारच कार्यक्षम आहे!!)

अजित डोवाल - विवेकानंद केंद्राचे He is the founder Director of the Vivekananda International Foundation set up by the Vivekananda Kendra in December 2009.[9] ही माहिती नव्यानेच समजली.

यावर ते संघवाले आहेत अशी काविळ उठणे शक्य आहे. पण भ्रष्टाचारात अडकलेल्या अनेक आय. पी. एस यांच्या पेक्षा आपल्या कार्याने मोठे आहेत.

अजित डोवाल हे भाजपाला जवळचे असणारे अधिकारी आहेत हे सर्वज्ञात आहे. वाजपेयी सरकार २००४ मधे पडलं नसतं तर त्यांना तेव्हाच अशी पोस्टिंग मिळाली असती असं बोललं जातं.

अर्थात अजित डोवाल यांची विचारसरणी हा त्यांच्या प्रसिद्धीचा मुद्दा नव्हेच. तर मिझो बंडाळी मोडून काढणे (लालडेंगा चे सातपैकी सहा कमाण्डर या माणसाने फितुरी करून फोडले होते - त्यामुळे त्या संघटनेला सरकारबरोबर बोलणी करण्यावाचून पर्यायच राहिला नव्हता), काश्मिरी अतिरेकी संघटनांमधे हेरगिरीचे जाळे पसरून अतिरेक्यांना फितूर करून घेणे, ऑपरेशन ब्लॅक थंडर मधे आतली बित्तंबातमी आणणे अशा कितीतरी कारनाम्यांसाठी ते खूप पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत.

उत्तम लेख बा.म.! धन्यवाद! इंदरकुमार गुजराल यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात (१९९० च्या आसपास) भारतीय हेरव्यवस्थेचे अपरिमित हानी झाली होती. ती झपाट्याने भरून निघेल अशी आशा आहे.
आ.न.,
-गा.पै.

ऑपरेशन ब्ल्यु स्टार मध्ये पण सहभाग होता.
------ ते ब्लॅक थण्डर आहे.... इन्दिरा गान्धी यान्च्या काळात ब्ल्यु स्टार ऑपरेशन झाले आणि त्याच्या बद्दलच्या रागातुनच त्यान्ची हत्या करण्यात आली.

ब्लॅक थण्डर मधे खुप कमी हानी आणि मोठे यश मिळाले होते. मन्दिराचा पाणि पुरवठा आणि विज तोडली होती असे स्मरणात आहे, मोठी जिवीत/ वित्त हानी टळली आणि सर्व अतिरेकी बिळातुन बाहेर आले, शरण येतानाही अतिरेक्यान्ना हात वर, आणि विशिष्ट मार्गानेच (१ फुट या बाजुला किवा त्या बाजुला जायचे नाही) येण्याची सुचना होती. मार्ग थोडाही बदलला तर.... त्या काळात India Today (?) मधे पहिल्या पानावर आलेला फोटो आजही आठवतो.

यशात अनेकान्चा वाटा होता तसाच के पी एस गिल आणि तत्कालीन राज्य सरकार यान्चा पण पाठिम्बा होता.

http://en.wikipedia.org/wiki/Operation_Black_Thunder

<इंदरकुमार गुजराल यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात (१९९० च्या आसपास) भारतीय हेरव्यवस्थेचे अपरिमित हानी झाली होती. ती झपाट्याने भरून निघेल अशी आशा आहे.> +1

<इंदरकुमार गुजराल यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात (१९९० च्या आसपास) भारतीय हेरव्यवस्थेचे अपरिमित हानी झाली होती. ती झपाट्याने भरून निघेल अशी आशा आहे. - हानी झाली ती कशी हेही वाचायला आवडेल.

मी परवाच वाचले कि हिंदी चित्रपट क्षेत्रातील एक अभिनेत्री नुकतीच दाऊदला भेटून आली. त्याबद्दल गुप्तहेर खाते अंधारात होते. त्या अभिनेत्रीचे नाव वेबदुनियाने दिलेले नाही पण अंदाज करता येतोय. ही पाळेमूळे खणता आली तर फार बरे होईल.

Pages