Submitted by स्वाती२ on 27 January, 2015 - 10:36
मंडळी,
नॉर्थ ईस्ट भागात ब्लिझार्डमुळे फुटभर स्नो असताना वसंत ऋतूची स्वप्ने पहात बागकामाचा धागा काढणे काहिसे वेडेपणाचे वाटेल. परंतू या वर्षीचे कॅटलॉग्ज यायला लागलेत. गावातल्या शेतीच्या दुकानात बीयाही आल्यात. तेव्हा उबदार घरात बसून यावर्षीचे बागकामाचे प्लॅनिंग करण्यासाठी धागा सुरु करत आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला आवडतात कारण मेन्टेनन्स
मला आवडतात कारण मेन्टेनन्स काही नाही, आणि समर ते फॉल पर्यंत भरगच्च फुले येत रहातात. मात्र कीटक असतात यावर कायम . मी यार्डच्या सर्वात लांबच्या कोपर्यात लावली आहेत. पांढरी आणि जांभळी.
>> एक गड्डा पुरला तर किती
>> एक गड्डा पुरला तर किती लसूण येतो पुढच्यावर्षी ?
पराग, एका गड्ड्यात जेव्ढ्या पाकळ्या आहेत त्या वेगळ्या करून ५-६ इंच अंतरावर लावायच्या, जेवढ्या पाकळ्या तेव्ढा लसूण मिळतो आणि खुप पात मिळते. सप्टेंबर- ऑक्टोबर मध्ये लावला कि मे-जून ला काढायचा. मी झोन ९ मध्ये आहे. माझा लसूण छान ४ मोठ्या गड्ड्या झालेला.
बादवे.. सिंडरेला, तुम्ही बे-एरियात असता कां, माझं तुळस उगवण्याबाबतीत सॉलिड बॅडलक आहे, मी १-२ रोपं घेतली असती.
मी तुमच्यापासून एकदम विरुद्ध
मी तुमच्यापासून एकदम विरुद्ध टोकाला आहे.
हिबिस्कस बद्दल ते invasive
हिबिस्कस बद्दल ते invasive plant धरतात म्हणून काही काऊंटी बॅन घालतात. आपापल्या काऊंटी मधे चेक करा. माझ्या बाजूच्या काऊंटीमधे बॅन होता नि आमच्या नाही तेंव्हा लॉजिक काय ते माहित नाही. आधी ते नेटीव्ह नाही म्हणून असे वाटलेले मला पण रोज ऑफ शॅरॉन आहे तरी तेही काही ठिकाणी बॅन्ड आहे
http://www.invasiveplantatlas.org/subject.html?sub=5724
पराग , मी कधी कुंडीत लसूण
पराग , मी कधी कुंडीत लसूण लावला नाहीये. ड्रेनेज चांगले हवे आणि मुळांना वाढायला जागा हवी.
इंटरेस्टिंग माहिती! मला
इंटरेस्टिंग माहिती! मला नव्हते माहित!!
Invasive alien plants threaten native species and habitats by competing for critical and often limited resources like sunlight, water, nutrients, soil and space. They succeed through vigorous growth, prolific reproductive capabilities and by causing changes that favor their growth and spread. Invasive plant species displace and alter native plant communities, impede forest regeneration and natural succession, change soil chemistry, alter hydrologic conditions, alter fire regimes, cause genetic changes in native plant relatives through hybridization and some serve as agents for the transmission of harmful plant pathogens.
हिबिस्कस यात मोडत असेल तर मग ती झाडं विकायला परवानगी कशी देतात ?!
हा कदाचित सध्या गायडन्स्
हा कदाचित सध्या गायडन्स् असेल, रूल नाही .. त्यामुळे कमर्शियली बंद केलेलं नाही असं असू शकेल ..
मी कुंडीतच म्हणजे एका
मी कुंडीतच म्हणजे एका ड्रेसरच्या २ ड्रॉवरमध्ये लावलेला ते साधारण २-१.५ फूट आणि ५ इं खोल असेल तसेच ६-७ पाकळ्या कुंडीत लावलेल्या, साधारण २-२.५ व्यासाचे लसणाचे कांदे झालेले पण मी घरी बनवलेलं कंपोस्ट वापरलेलं.
मैत्रेयी, इन्वेझिव स्पेसीज
मैत्रेयी,
इन्वेझिव स्पेसीज यादीतील झाडे ही नेहमीच अमेरीकेच्या सगळ्याच भागात इन्वेझिव असतात असे नाही. त्यामुळे त्यांच्यावरची रेस्ट्रीक्शन्स असल्यास ती बरेचदा काउंटीवाईज, स्टेटवाइज असतात, चांगली नर्सरी असेल तर नमुद करतात की या स्टेट्स मधे शीप करणार नाही वगैरे. शक्यतो तुम्ही ज्या भागात रहाता तेथील नेटिव झाडे लावावित. योग्य झाडांची माहिती स्टेटच्या एक्स्टेंशनच्या वेबसाइटवर असते.
स्वाती२.. ओके. मनी, धन्यवाद..
स्वाती२.. ओके.
मनी, धन्यवाद.. आता ड्रेसर आणायला आयकीयात जाणं आलं म्हणजे !!
पराग, गोल कुंडीतही लावता
पराग, गोल कुंडीतही लावता येईल. मी लोज मधून आडव्या कुंड्या आणून त्यात लावला होता. मनी म्हणते त्याप्रमाणे ८-९ महिन्यात तयार होईल. ताजी पात चटणी, फोडणीत, पराठयात भरपूर वापरता येते.
माझ्या नवर्याने NJ हून
माझ्या नवर्याने NJ हून विड्याच्या पानच झाड मागवलं, आम्ही सन दिएगो ला आहोत, त्याला काय पाणी हवामान लागत कुणी सांगेल का , दोन लहान पण होती ती वळायला लागली पाणी घालूनही, पाणी जास्त होतंय अस त्याला वाटल म्हणून १ दिवस पाणी घटल नाही तर दोन्ही पण गळून पडली आहेत, नुसतच दांडा उरलाय, कुणी सांगेल का काय करायचं ते,
मनी, मी पण लसुन लावलेय, पण मला वाटल नुसतीच पात वापरता येईल, लसुन पण मिळेल माहित नव्हत, पण पात काढत राहायची का? आणि माझा पुदिना पण नवीन येतोय पण आहे तो सगळा कला कला पडतोय, काय चुकतंय माझ? तो सारखा काढायचा का? मी जास्त वापरात नाही
लसणाची पाकळी लावायची (कोंब
लसणाची पाकळी लावायची (कोंब फुटलेली लावलेली उत्तम). मस्त लसूण पात, लसूण मिळतो.
पात जर वापरायला हवी असेल एकाच लसणाची सगळी नाही तोडायची, प्रत्येक (लसणाच्या) फुटलेल्या पातीच्या गठ्ठ्यातल्या थोड्या थोड्या काढत रहायच्या. सगळ्या काढल्या तर खाली लसणाचा बल्ब नीट पोसणार नाही.
लसूण तयार होत आला कि हळू
लसूण तयार होत आला कि हळू हळू जमीनीवर दिसायला लागतो हा असा..
अरे वा ! मस्तच मीपु. पराग,
अरे वा ! मस्तच मीपु.
पराग, गोल कुंडीतही लावता येईल. >>>> अंजली माहिती आहे ते. दात विचकावलेत ना वर
जबरी आहे तो लसूण
जबरी आहे तो लसूण
गेल्या वर्षी मी कुंडीतच लसूण
गेल्या वर्षी मी कुंडीतच लसूण लावला होता ... ७-८ महिने पात पराठे, भाजी , चट्णी .. आमटी असं सगळ्यात वापरली आणी नंतर ४-५ लसणीचे कांदे मिळाले
पातीसाठी लसूण लावला आहे या
पातीसाठी लसूण लावला आहे या आधी. हा वरचा फोटो बघून गड्ड्यासाठी पण लावावा असं वाटतंय आता.
पराग, माझ्याकडचे ड्रेसर/
पराग,
माझ्याकडचे ड्रेसर/ ड्रॉवर्स जुने होते म्हणून फेकून देण्यापेक्षा असे वापरले. माझ्या एका मैत्रिणीला गराज सेल मध्ये $५ ला ड्रेसर मिळालं, त्याचा तिने असा वापर केला.
पात मी खालची खालची १-२ पान काढायचे, एव्ढ्या लसणांची खुप निघायची मग आई सगळ्या भाज्यांमध्ये, चटणीत घालायची.
पुदिन्याला बरंच पाणी लागतं, ते कमी- जास्त होतंय कां याकडे लक्ष द्या. मी पुदिन्याला एक दिवसाआड पाणी घाल्ते.
सगळ्या काढल्या तर खाली लसणाचा बल्ब नीट पोसणार नाही. >> +१
माझ्याकडचे टोमॅटोचे रोप नुसतेच अगडबंब वाढताय्त पण टोमॅटो जास्त लागत नाही येत. काय कमी पडत असेल?
लसूण अगदी सहज येतो कुंडीत,
लसूण अगदी सहज येतो कुंडीत, जमीनीत
या वर्षी बागेत भाजीपाला, फळं कमी आहेत मागच्या वर्षी पेक्षा. पण जांभळी वालपापडी मात्र माईल्ड विंटर मुळे तगली आहे आणि छान फोफावली आहे. हे काही फोटो या वर्षीचे..
१>
२> कांद्याचा पॅच
३>तयार झालेले कांदे
४>जांभळी वालपापडी
अरे वा, काय भाज्या आहेत.
अरे वा, काय भाज्या आहेत. नुस्त्या बघूनही मस्त वाटलं :).
मीपु त्वाडा ज्वाँब नही!
मीपु त्वाडा ज्वाँब नही!
मस्त गं मिपु. पाणी असूनही
मस्त गं मिपु.
पाणी असूनही आम्ही फक्त टॉमेटो आणि झुकिनी एवढ्यावरचं आहोत. वाटाणे पण यंदा जास्त उन्हामुळे बहुतेक फारसे आले नाहीत.
कसलं सहीये हे. मस्त.
कसलं सहीये हे. मस्त.
जांभळ्या वालपापडीच्या बीया
जांभळ्या वालपापडीच्या बीया ऑनलाईन मागवल्या कां? माझ्याकडे हिरवी आहे पण कुंडीत वेल लावल्याने जरा कमी आल्यात.
मस्तच मीपु
मस्तच मीपु
जांभळ्या वालपापड्या मस्त
जांभळ्या वालपापड्या मस्त दिसतायत! आधी पाहिल्या नाहीत बहुतेक मी कधी. बाकी भाज्या पण मस्त
मीपु, मस्त आहेत भाज्या!
मीपु, मस्त आहेत भाज्या! जांभळी वालपापडी आणि लसूण खासच!
मीपु, तू एकदम शेतकरीण आहेस
मीपु, तू एकदम शेतकरीण आहेस की. मस्त आहेत भाज्या.
पराग, शूम्पी, अंजली, सशल,
पराग, शूम्पी, अंजली, सशल, वेका, अमितव, प्राजक्ता, स्वाती२, सायो धन्यवाद
सायो, अबब शेतकरीण? एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही गं, आमचं म्हणजे हौशे नवशे बागकामवाले
Pages