लता मंगेशकर यांची, माझ्या आवडीची सर्वोत्कृष्ट १० गाणी ( हिन्दी/मराठी, फिल्मी/ गैरफिल्मी)

Submitted by रॉबीनहूड on 20 July, 2015 - 10:44

लता मंगेशकर !
बस नाम ही काफी है.
मला माहीत आहे अलीबाबाला त्या रत्नखचित गुहेतून फक्त दहाच रत्ने उचलायला परवानगी दिली असती तर तो वेडा झाला असता. अनेक लोक लताच्या टॉप टेन च्या याद्या बनवता बनवता वेडे पिसे झालेत. ही यादी अर्थातच वादग्रस्त असते. दुसरे लोक काय पण आपण स्वतःच आपण बनवलेल्या त्या यादीशी सहमत नसतो ::फिदी:

चला तर , बनवा टॉप टेन गाण्यांची यादी. पाहू या किती गाणी कॉमन येतात ती.

लक्षात ठेवा ...

फक्त दहाच !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरच्या याद्या न वाचता लिहितोय
१) आएगा आनेवाला (महल : खेमचंद प्रकाश)
२) सपना बन साजन आए (शोखियां : जमाल सेन)
३) बलमा बडा नादान (अलबेला : सी रामचंद्र)
४) मनमोहना बडे झूठे (सीमा : शंकर जयकिशन)
५) मचलती आरजू कहे बाहें पसारे (उसने कहा था : सलिल चौधरी)
६) खुदा निगेहबान हो तुम्हारा (मुगल-ए-आझम : नौशाद)
७) जुर्म-ए-उल्फत पे हमें लोग सजा देते हैं (ताजमहल : रोशन)
८) पिया तोसे नैना लागे रे (गाइड : सचिन देव बर्मन)
९) बैंया ना धरो ओ बलमा (दस्तक : मदन मोहन )
१०) तू चंदा मैं चाँदनी तू तरवर मैं शाख रे (रेश्मा और शेरा : जयदेव)

एका संगीतकाराचं एकच गाणं घ्यायचं असं ठरवून यादी केली. अनिल बिस्वास (रूठ के तुम तो चल दिए, तुम्हारे बुलाने को जी चाहता है, बेइमान तोरे नैनवा ) यादीत हवेच होते. मदनमोहनची बेताम दिल की तमन्ना, हमारे बाद अब मेहफिल में अफसाने आणि असंख्य गझला मागे सारून त्याऐवजी रोशनची गझल आली. पाकिजातलं एकही गाणं नाही आलं. एल्पीचं अँखियों को रहने दे राहिलं. जयदेवची अल्ला तेरो नाम , ये दिल और उनकी निगाहों के साए, तुम्हें देखती हूँ, रात भी है कुछ भीगी भागी ही गाणी नाही आली. राहुल देव बर्मनची आँधी किंवा घरमधली गाणी नाही आली.

भरत मयेकर लिस्ट आवडली. १० नम्बरचे रेश्मा और शेरा चे गाणे फारच अनुल्लेखीत झाले आहे.( जयदेव प्रमाणेच) तिकडे 'काय ऐकताय 'मध्ये मी हे गाणे टोप टेन मध्ये लोक का घेत नाही म्हणूनम्प्रश्न उपस्थित केला होता. तुम्ही त्याची दखल घेतल्याबद्दल आनन्द वाटला.

तू चंदा मैं चाँदनी तू तरवर मैं शाख रे (रेश्मा और शेरा : जयदेव)<< हे खर्ंच अप्रतिम आहे. माझेही आवडते. काल कसे काय विसरले?

खूपच अवघड काम आहे पण मग जशी आठवतील तशी टॉप १० टाकावी.

रस्मे उलफत को निभाये तो निभाये कैसे!!
यु हसरतोंके दाग मुहोब्बत मे धो लिये!!
खुदा करे कि क़यामत हो, और तू आए!!
आपकी नझरोने समझा प्यार के काबील मुझे!!
अगर मुझसे मुहोब्बत है, मुझे सब अपने गम दे दो!!
बाहों में चले आओ, हो, हमसे सनम क्या परदा!!
रहते थे कभी जिनके दिल में हम जान से भी प्यारों की तरह!!
छुपा लो यूँ दिल में प्यार मेरा, के जैसे मंदिर में लौ दिये की!!
एहसान तेरा होगा मुझपर, दिल चाहता है वो कहने दो!!
ना जिया लागे ना, तेरे बीना मेरा कही जीया लागे ना!!

ये न्याय नही अन्याव है. टॉप १० म्हणजे छळ आहे.

फार फार कठीण काम आहे हे....न घेतलेली गाणी नाराज होऊन पायरीवर बसलेली आहेत...आणि येता जाता आपल्याकडे न पाहता फुरंगटून दुसरीकडे बघत आहेत अशीच भावना या क्षणी मनी आली आहे.>> +१००१

बाकी सगळ्यांची लिस्ट भारीच आहे. Happy

हीरा....

तुमच्या गाण्यांची यादी वाचत असता असता पुढील मजकूर वाचनात आला...."..शंकर जयकिशनचे सुद्धा एक तरी हवे होते. पण कोणते? कदाचित रुक जा रात ठहर जा रे चंदा, बीते ना मिलन की बेला. बदरा बैरी जा च्या ऐवजी. पण मदनमोहनना आमचे कायम झुकते माप. म्हणून शंकर जयकिशनचा पत्ता कटाप....." ~ असे तुम्ही म्हटले आहे पण यादीतील तुमच्या पसंतीचे पहिलेच गाणे शंकर जयकिशन यांच्याच संगीताचे आहे...."रसिक बलमा..." चोरी चोरी मधील.

चैनसे हम को कभी आपने जीने ना दिया!! : आशा -ओपी

>> गम्मत म्हणजे हे गाणे चित्रपटात नाही आहे....
( तसेच आशाचे काटे न कटे रैना हे मेरा नाम जोकर मधलेही गाणे चित्रपटात नाही.)

अशक्य कोटीतली गोष्ट पण तरीही जास्त वेळ न घालवता लगेच आठवतील ती लिहिते. विचार करत बसले तर १०० गाणी आठवतील.

१. जादूगर सैया, छोड मोरी बैया
२. आयेगा आनेवाला आयेगा
३. हम ने देखी है उन आखों की महकती खुशबू
४. अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम
५. हवा मे उडता जाये मेरा लाल दुपट्टा
६. सोलाह बरस की बाली उमर को सलाम
७. चले जाना नही नैन मिलाके
८. प्यार किया तो डरना क्या
९. दिल से मिलाके दिल प्यार किजिये (परवाच शिला रमाणी वारल्या तेव्हा न्युझ मधे हे गाणे खूप दिवसांनी ऐकले. तेव्हा पासून तोंडात बसले आहे. लताचा आवाज खूप अल्लड वाटतो याच्यात )
१०. मुश्किल है बहुत मुश्किल चाहत का भुला देना

ही माझी १ ली लिस्ट. १० गाणी शोधणं म्हणजे समुद्रातुन १० अनमोल मोती शोधण्यासारखं आहे. ईथे सगळ्या संगीतकारांकडे गायलेली रत्नं निवडायचा प्रयत्न केलाय. तरी बरीचशी गाणी १ल्या लिस्ट्मध्ये घेता आलेली नाहीत, ती २र्‍या लिस्टमध्ये.

१) वो तो चले गये ए-दिल - संगदिल - सज्जाद हुसेन
२) तोड दिया दिल मेरा - अंदाज - नौशाद
३) मुहब्बत की झुठी कहानी पे रोये - मुघल ए आजम - नौशाद
४) दुआ कर गम ए दिल - अनारकली - सी. रामचंद्र
५) हाये रे वो दिन क्यूं ना आये - अनुराधा - रवीशंकर
६) कदर जाने ना - भाई भाई - मदनमोहन
७) जिसे तु कबूल कर ले - देवदास - सचिनदेव बर्मन
८) सपनेमे सजनसे दो बाते - गेटवे ऑफ ईंडिया - मदनमोहन
९) सुनो छोटीसी गुडिया की - सीमा - शंकर जयकिशन
१० ) अपनी आप रातोंमे - शंकर हुसेन - खय्याम

@अशोक,
अरे हो की!
पण त्याची गंमत आहे. कच्च्या यादीत बरीच गाणी होती आणि त्यात हे सर्वात वर ठेवले होते. नंतर ते काढून टाकायचे मनात ठरवले. गाण्यांना नंबर आधीच दिले होते. यादीत एक नंबर कट ऑफ करायचा राहिला आणि तसाच टाइप झाला. नंतरचे नंबर काही मॅच होईनात.(बारा वाजून गेले होते.) मग एक गाणे बाजूला ठेवले होते ते कुठेतरी तरी सरकवून, एक दोन डिलीट करून अखेर दहा गाणी जमली. हुश्श्य!
रात्री 'लता' नामक भुताने संपूर्ण ताबा घेतला होता. त्यामुळे माफी असावी!

वरच्यापैकी कुठलिही यादी, मी माझी म्हणू शकेन.. तरीही मला आवडणारी लताची काही हटके गाणी लिहितो.

१) पवन दीवानी न मानी उडावे मोरा घुंघटा ( डॉ. विद्या. हे गाणे पूर्ण ऐका. वैजयंतीमालाचा अप्रतिम नाच आहे )
२) हम गवनवा न जैबे / सकल बन चलत / विकल मोरा मनवा ( ममता मधली रागमालिका, आता काढून टाकलीय बहुतेक सिडीमधून )
३) मचलती आरजू खडी बाहे पसारे ( उसने कहा था, अत्यंत वेगळा ताल आहे या गाण्याला )
४) हाये जिया रोये, पिया नाही आये ( मिलन, जूना अजित नलिनी जयवंतचा )
५) नैनोवालीने हाय मेरा दिल लूटा ( मेरा साया मधले हे थोडे कमी ऐकले जाणारे, वेगळेच गाणे )
६) हीर .. ( हि एक पंजाबी पारंपरिक रचना आहे, लताने कुठल्याही तालवाद्याशिवाय लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमधे १९७४ साली गायली होती. यू ट्यूबवर आहे )
७) आजा भँवर , सूनी डगर ( रानी रुपमति मधली ब्रिंदावनी सारंग रागातली द्रुत रचना )
८) कभी ए हकीकते मुन्तजर, नजर आ ( दुल्हन एक रात की, मधली कव्वाली )
९ ) ए दिलरुबा, नजरे मिला ( रुस्तम सोहराब मधली अत्यंत अवघड रचना )
१०) चंदा जा, चंदा जा रे ( मनमौजी, लता आणि तिचा मदनभैया )

, दहा झाली पण Sad

माझ्या आवडी प्रमाणे मी यादी बनवलीय.१)आज मेरे मनमे सखी बासुरी बजाये कोई..
२)मुरली बैरन भयी...
३ )तेरे सदके बलम न कर कोई गम...
४) रंग दिलकी धडकनभी लाती तो होगी
५)तूम क्या जानो तुम्हारी यादमे..
६)हमारे बाद अब महफिलमे..
७)मेरी पायल गीत सुनाये
८)बादलो बरसों नयनकी ओरसे
९)कारे बदरा तू न जा नजा
१०) इस दिलकी हालत क्या कहीये दिल शादभी है नाशाद भी है
आणि अनुराधा ,चित्रलेखा,पाकिजा मधली सर्व...सबकुछ लुटाके होशमे आये तो...
तसेच जानेवालेसे मुलाकात ना होने पायी ,वो चुप रहे तो मेरे दिलके दाग जलते है 'यादी वाढतच जाईल...

वंदे मातरम (आनंदमठ) /
ने मजसी ने परत मातृभुमीला, सागरा प्राण तळमळला (स्वातंत्रवीर सावरकर ह्यांची कविता)
अखेरचा हा तुला दंडवत (मराठा तितुका मेळवावा)
जा रे जा रे उड जा रे पंछी, बहारो के देस जा रे (माया)
ओ जोगी जब से तु आया मेरे द्वारे (बंदिनी)
तेरे बिना जिया जाए ना (घर)
रंगीला रे तेरे रंग मे यु रंगा दे मेरा मन (प्रेम पुजारी)
ओ सजना बरखा बहार आयी (परख)
कुछ दिल ने कहा (अनुपमा)
धीरे धीरे मचल (अनुपमा)
रजनीगंधा फुल तुम्हारे (रजनीगंधा)

अरे हो वन्दे मातरम् माझ्या कसे काय लक्षात नाही आले. इतक्या वरच्या पट्टी मधे आणि तरीही इतक्या सुरात फक्त लताजीच गाउ शकतात. थॅंक्स Sanjeev. B.

बहुत ना इन्साफी है गाने लाखो और लिखने है सिर्फ दस? बहुत ना इन्साफी है Sad

फिल्मी

१. ओ आसमांनवाले शिकवा है जिंदगी का, सुन दास्ताँन गम की अफसाना बेबसी का.
२. रात और दिन दिया जले, मेरे मन में फिर भी अंधियारा है
३. ये समां समां है ये प्यार का किसिके इंतजार का
४. मुझको इस रात की तनहाई में आवाज ना दो
५. रुलाके गया सपना मेरा
६. हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे है
७. जुर्म ए उल्फत पें हमें लोग सजा देते है , कैसे नादान है शोलों को हवा देते है
८. फिर तेरी कहानी याद आयी, फिर तेरा फसाना याद आया
९. दगा दगा वै वै वै, हो गयी तुमसे उल्फत हो गयी
१०. ऐ दिल कहाँ तेरी मंझिल ना कोई दिपक है ना कोई तारा

गैरफिल्मी
१. घन तमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना, बघ जरा तरी
२. कमोदिनी काय जाणे हो परिमळ, भ्रमर सकळ भोगितसे
३. सरणार कधी रण प्रभो तरी हे, कुठवर साहु घाव शिरी
४. मोगरा फुलला मोगरा फुलला
५. दहर में नक्ष्-ए-वफा वदह तसल्ली न हुआ (गालिब)
६. दिनानाथ अब बारी तुम्हारी (मीरा सुर कबिरा)
७. केनु संग खेलू होरी (मीरा)
८. पपिहा रे पिव की बाणी ना बोल (मीरा)
९. हर एक बात पे केहते हो के तु क्या है
१०. जन पळभर म्हणतील हाय हाय

अहा....दक्षिणा....यू रॉक्स वुईथ दगा दगा वै वै..... मला आजही अर्थ समजलेला नाही...दगा दगा वै वै म्हणजे नेमके ती कुमकुम कशाबद्दल कुमकुमत आहे ते. आता तू इथे केलेल्या उल्लेखामुळे पुन्हा यू ट्यूब्याला सांगून हे चित्रगुप्त गाणे ऐकले....तिच मधुरता....आणि ते आकर्षक नृत्य.

....आणखीन एक....सलिल चौधरी यांची कन्या अंतरा हिने आमच्यासाठी परवाच्या मुंबई गटगमध्ये "...ऐ दिल कहाँ तेरी मंझिल ना कोई दिपक है ना कोई तारा..." हे गाणे अगदी अप्रतिमरित्या सादर केले...इतकेच नव्हे तर वन्स मोअर मिळाल्यावर तिने हसून हॉलमधील आम्हा सर्वांना आपल्यासोबत हे गाणे म्हणायला भाग पाडले...मीही म्हटल्या एकदोन ओळी....सुंदरच सारे.

हीरा....

"...रात्री 'लता' नामक भुताने संपूर्ण ताबा घेतला होता..." ~ सकाळी कदाचित ताबा सोडला असेल...पण माझ्या मानगुटीवरून जाईनाच...[जाऊही नयेच अर्थात....]

मामा सगळं श्रेय आमच्या बाबांना बरं का. दगा दगा वै वै वै बाबांचं अतिशय आवडतं गाणं. इयत्ता ६ वीत त्यांनी मला ऐकवलं (काली टोपी लाल रूमाल सिनेमा बहुधा) तेव्हापासून अतिशय प्रिय.
तिच कथा हम तेरे प्यार में सारा आलम ची. हे गाणं गाऊन मी अनेक मित्रमैत्रिणीच्या प्रेमळ बैठका, शाळेतले ऑफ तास गाजवलेत Happy

ऐ दिल कहाँ तेरी मंझिल ना कोई दिपक है ना कोई तारा.>> मस्त गाणे Happy यानंतर का कुणास ठाऊक लगेच 'मै दिल हु एक अरमान भरा' आठवते मला.

"....हम तेरे प्यार में सारा आलम....~ अहा आपली मीनाकुमारी....."दिल एक मंदिर...." नायिकेच्या आजारी पतीचे कठीण असे ऑपरेशन व्हायचे आहे उद्या....करणारा डॉक्टर आहे तिचा पूर्वीचा प्रियकर....पत्नी आता पतीसाठी जीव द्यायला तयार आहे...तिला भीती वाटत आहे प्रियकराच्या हेतूविषयी...पण पतीचा त्याच्यावर आहे विश्वास....आता हिचा जीव टांगणीवर आणि म्हणत आहे हे गाणे....लता अमर रहे !

कांदापोहे....

"...ऐ दिल कहाँ तेरी मंझिल ना कोई दिपक है ना कोई तारा...~ हे जसे लताचे तसे द्विजेन मुखर्जी या गायकाचेही आहे, पडद्यावर देव आनंदने सादर केले होते.

मला ' ऐ दिल कहाँ तेरी मंझिल आणि मुझको इस रात की तनहाई में आवाज ना दो' ही दोन्ही गाणी लताची जास्त आवडतात. काय एक्स्प्रेशन्स आहेत नुसतं ऐकून मन खिन्न होतं.

दक्षिणा....

त्याला कारण पडद्यावरील नायिकाही असू शकतात...काही वेळा.....माया मधील माला सिन्हा आणि दिल भी तीरा हम भी तेरे मधील कुमकुम यानी लताची तुला आवडत असलेली वरील दोन्ही गाणी आपल्या अभिनयाने अक्षरशः जिवंत केली आहेत...विशेषतः ती अपंग कुमकुम. लताची गाणी आवडताना हाही विचार मनी येतोच.

रॉबीन, काटे ना कटे रैना हे गाणे आधी चित्रपटात होते, रफीचेही एक गाणे होते. मी पहिल्याच आठवड्यात तो चित्रपट बघितला होता, तेव्हा दोन्ही गाणी होती. मग कापली. ( आणखी काही सीन्सही कापले. ) पण त्यात लताचे एकही गाणे नव्हते... तेव्हाही.

काटे ना कटे रैना, ज्या गौड सारंग रागात आहे त्याच रागात, लताने नादीर दीम ताना देरे ना, असे गाणे परदेसी चित्रपटात गायलेय ( चाल तशीच आहे ) आणि योगायोगाने त्या गाण्यावरही पद्मिनीच नाचलीय.

Pages

Back to top