Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फा,
फा,
आशु खरंच जॉब कुठे करतो?
आशु खरंच जॉब कुठे करतो? बऱ्याचदा सगळ्यांना टोप्या घालत असतो आणि उधारी ठेवत असतो. त्या किंजलच्या बिघडलेल्या वस्तू रिपेअर करत असतो आणि पोलीस दिसल्यावर का घाबरतो?
मीपण पहिले काही भाग बघितले नाहीयेत .
आशू एका इव्हेंट मॅनेज
आशू एका इव्हेंट मॅनेज करणार्या कोणा माणसाकडे काम करत होता बहुतेक ...
त्याने गावाकडे असताना
त्याने गावाकडे असताना गावगुंडांचा साथीदार बनून बरेच कारनामे केलेले आहेत. त्याचं नाव पोलीस रेकॉर्डलाही आहे म्हणून तर तो मुंबईत आलाय..त्याला सारखं वाटतं की पोलीस अजूनही आपल्या मागावर आहेत. राकेशला पंख्याला उलटं टांगताना त्याने हे सांगितलं होतं. तेव्हापासून राकेश त्याला भिऊन वाट्टेल ते करायला तयार असतो.
मला खुप जास्त आवडते हि
मला खुप जास्त आवडते हि सिरीयल! आशु, कैवल्य, सुजय, रेश्मा, मिनल सगळेच भारी आहेत. अॅना पण!!!
आशू नाही का पार्टीमधे ते मिकी
आशू नाही का पार्टीमधे ते मिकी माऊस वगैरे बनुन उभे रहात त्या लोकांचं काम करतो
पण मधे एका भागात त्याने तो जॉब सोडला आणि स्वतःचा बिझनेस सुरू केला असं काही तरी दाखवलेलं.
ही डेली सोप सारखी नसल्याने बहुदा या मालिकेचे भाग सिंक मधे नसतात
आई चा एपिसोड खरच कृत्रिम
आई चा एपिसोड खरच कृत्रिम वाटला इतर भागापेक्षा. आईंच बोलणे संवाद पाठ करून बोलण्या सारखे वाटत होते.
शांकी, आशुडी, रिया thanx. मी
शांकी, आशुडी, रिया thanx.
मी खूप उशिरा बघायला सुरुवात केली. ते पंखा लटकणे प्रकरण नव्हतं बघितलं, हा एका फ्रेंडने सांगितलं होतं, राकेशला लटकवतो ते.
मी किंजल परीक्षा घेते त्याची, प्रगल्भा etc पासून बघितली ही मालिका.
फ्रेण्ड्स वर बेतल्यासारखी
फ्रेण्ड्स वर बेतल्यासारखी वाटत नाही. >>> सहा बॅचलर्स आणि त्यांचं आयुष्य हेच ते बेतणं फारएण्ड ! फ्रेंड्सने भारतातल्या तरुणाईलाही इतकी भुरळ घातली आहे की हे साम्य योगायोग आहे ह्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही.
बाकी कथा अगदीच वेगळी आहे.
समजा आठ किंवा चार किंवा दहा
समजा आठ किंवा चार किंवा दहा अविवाहित आणि असमान संख्येत मुलं मुली घेतली असती तर फ्रेंड्सचा शिक्का बसला नसता का?
इथे आणि या धाग्याबाहेरही बरेच लोक लिहीतात की फ्रेंड्सवर बेतलेली आहे. पण तसे काही आढळत नाही म्हणून कंटाळून सोडून देतात, फालतू आहे म्हणून नावं ठेवतात. फ्रेंड्समधलाच एपीसोड दाखवला तर कॉपी आहे म्हणून आणखीच हटाई करतात. आणि नियमित बघणारे वारंवार सांगतात की फ्रेंड्स ची कॉपी नाही. गंमतच आहे.
आशुडी सिक्सर मारलास.
आशुडी सिक्सर मारलास.:फिदी:
मिनल युएसला जाण्याचा भाग
मिनल युएसला जाण्याचा भाग फारचं ओढून ताणून केला होता. तेचं तेचं बोलत होता सुजय.
रेश्माचा ट्रॅक चालू ठेवला तर मालिका गंभीर होईल म्हणून तो मधे मधे घेतात का ? सतत सगळे घरी दाखवण टाळायला हवं.
आशूडी वेगळी संख्या असती तर
आशूडी
वेगळी संख्या असती तर कदाचित खरंच फ्रेंड्स नसतं आठवलं. मी फ्रेंड्स फारशी ( फारशी म्हणतेय, अजिबात नाही असं नाही ) पाहिलेली नाही त्यामुळे सीन टू सीन साम्य सापडण्याची शक्यता नाही.
बाकी मीही हेच म्हणतेय की सहा फ्रेंड्सची कहाणी ह्याव्यतिरिक्त फ्रेंड्सचा शिक्का मारण्यात अर्थ नाही.
* पोस्ट संपादित. फ्रेंड्स तुकड्यातुकड्यांत पाहिलंय त्यामुळे मी कमेंट न करणंच योग्य होईल. पुढेमागे एव्हरीबडी लव्हज रेमंडवर निघाली ( किती स्कोप आहे खरंतर ! ) तर मी अधिकारवाणीने बोलू शकेन
सतत सगळे घरी दाखवण टाळायला
सतत सगळे घरी दाखवण टाळायला हवं.+१ <<<< त्याना इतर व्यवसाय असावेत अशी रास्त अपेक्षा....
अॅना-फिबी पॅरलल आहेत असं
अॅना-फिबी पॅरलल आहेत असं लगेच लक्षात आलं. << अॅना फीबी मलातरी पॅरलल वाटले नाहीत. रॉस - सुजय थोडेफार पॅरलल वाटतील. रेश्मा केवळ आनि केवळ मराठीसीरीयल मध्येच सापडणारं कॅरेक्टर आहे.
सहा मित्र सोबत राहणे इतकंच फ्रेंड्स आणि दिदोदुमध्ये साम्य आहे. फ्रेंड्समधले विनोद अथवा स्टोरीलाईन इथं चालणार नाही. त्यामुळे स्टोरेलाईन बृयापैकी वेगळी आहे. इतर मराठी मालिकांबरोबर तुलना करता ही मालिका बरीच उजवी आहे. (पहिली गोष्ट म्हणजे यात २१व्या श तकामधले वाटणारी लोकं वावरतात) सध्या ग्लोबली टेलीव्हीजनमधेय जे काही चालू आहे त्याच्या अनुषंगानं बघायला गेलं तर ही मालिका लोबजेट आणि फालतू वाटणारच. पण मराठी मालिका एवढाच निकष ठेवला तर मालिका बरी आहे.
दिदोदु मालिका डेली सोप असनं मला फार खटकत आहे. माझ्या मते तरी ही मालिका वीकेंडला ठेवली तर कंटेंटवाई जास्त मेहनत घेता येईल आणि टीआरपी पण बराच मिळेल.
मला कालचा एपिसोड सर्वात जास्त बोर झाला. मीनलचं कॅरेक्टर सर्वात जास्त इन्कन्न्सिंस्टंट वाटतं.
नंदिनी +१ मीनल या
नंदिनी +१ मीनल या पात्रावरच्या कमेंटसकट.
दिदोदु मालिका डेली सोप असनं
दिदोदु मालिका डेली सोप असनं मला फार खटकत आहे. माझ्या मते तरी ही मालिका वीकेंडला ठेवली तर कंटेंटवाई जास्त मेहनत घेता येईल आणि टीआरपी पण बराच मिळेल.
मला कालचा एपिसोड सर्वात जास्त बोर झाला.
नंदिनी मम.
Nandini +१
Nandini +१
Tya Amerika prakarnat Meenal
Tya Amerika prakarnat Meenal ghari call karte. Tichya Baba ncha phone varcha aawaj olakhicha vatat hota. Pan aathvena. & dokyatun jaich ns te. Aaj aathvala aawaj, Ravindra Mankani yancha hota aawaj....
अगो, एवरीबडी लव्ह्स
अगो,
एवरीबडी लव्ह्स रेमंड
>>>पुढेमागे एव्हरीबडी लव्हज रेमंडवर निघाली ( किती स्कोप आहे खरंतर ! डोळा मारा ) तर मी अधिकारवाणीने बोलू शकेन
सुमीत संभाल लेगा आता बोल ..
सतत घरी दाखवणे टाळायला हवे
सतत घरी दाखवणे टाळायला हवे +१
इतर रटाळ मालिकांपेक्षा नक्कीच उजवी आहे दिदोदु..! तरीही रेश्मा चा भाग अजून पटत नाही.. कोणती मुलगी नवऱ्याने सोडल्यावर,इतके दिवस मित्र,मैत्रिणी सोबत राहिल? जरी रेवा च्या लग्ना पर्यंत ती घरी सांगणार नाही तरी तिच्या उत्पन्नाचे साधन काय? सुजय तर कुणाला ही भाडे भरायला सुट देत नाही!!! (सुरवातीला च त्या ने रेश्मा कडून २च दिवसांसाठी संपूर्ण महिन्याचे भाडे घेतले असेदाखवले आहे.) शिवाय तिच्याच बाबांचा फोन येतो नेहमी! राकेश चे आई,बाबा?ते बहुतेक मुलाचा संसार कसा चालतो हे बघायची तसदी घेत नसावे!! (फोन पण नाही आणि प्रत्यक्ष पण नाही.!!!)
असे काही प्रश्न सोडून दिले तर नक्कीच छान आहे.!!
शँकी, बस क्या ! रेमंडमध्ये
शँकी, बस क्या !
रेमंडमध्ये घरासमोर राहणारे सासूसासरे इथे घरातच राहणार म्हटल्यावर अगदीच विरस झाला. आजकाल किती कॉमन आहे आई-वडील आणि मुलगा ह्यांनी जवळ घरं घेऊन राहणं !
असो. येऊदे सुमीतला, मग काढू धागा
राकेश्च्या बाबांचा फोन आला
राकेश्च्या बाबांचा फोन आला होता की परवाच्याच एपी मधे..
हो का? नेमका तो भाग मिस
हो का? नेमका तो भाग मिस झाला....
बाय द वे, त्यांची सोसायटी
बाय द वे, त्यांची सोसायटी बाहेरुन दाखवितात ती मुलुंड पु. येथिल मंगलदीप आहे का?
आणि आताचे मारामारीचे शॉट पण केळकर कॉलेज रोड वरचे वाटत आहेत.
रेश्माचा आवाज.. ती आवाज
रेश्माचा आवाज..
ती आवाज चढ्वून बोलायला लागली की एकदम किरटा का येतो..!!
अॅनाला innocent दाखवाय्चय का बावळट? अनोळखी माणसाने ''hi'' केलं म्हणून आपण ही करायच?
ती रेश्मा कशीही, कुठल्याही
ती रेश्मा कशीही, कुठल्याही सिच्युएशनमधे माझ्या डोक्यातंच जाते.
ती अॅना मठ्ठ आहे. पण काही जाग्या ब-या घेते.
शनिवारचा एपिसोड मला नाही
शनिवारचा एपिसोड मला नाही आवडला.
Oye wala ka? Mala dhammal ali
Oye wala ka?
Mala dhammal ali
ती किंजल आली कि मी मला
ती किंजल आली कि मी मला नेहेमीच महाबोअर होतं. अजिबात आवडत नाही.
आज रेश्मा जराशी बरी वाटली, तिला जास्त डायलॉग नव्हते, त्यामुळे बरी वाटली असेल कदाचित किंवा किंजलपुढे बरी आहे ती.
आशु आवडतोच नेहेमी. पण केळ्याची साल, इतर कचरा असा टाकू नये रस्त्यात हा संदेश प्रभावीपणे पोचायला हवा होता, तेवढा नाही पोचला. उगाच अतिविनोदी वाटला. हा अजून चांगला होऊ शकला असता.
पण तो फाईन घेणारा इसम अगदी आला त्याच्यामागे, हे बरं वाटलं बघून आणि नियमाप्रमाणे फाईन घेतली, मांडवली etc नाही केली.
Pages