Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्यात सगळे बरेचदा खूप कृत्रिम
ह्यात सगळे बरेचदा खूप कृत्रिम हसतात असं वाटत नाही का कुणाला ?
फ्रेंड्सवर बेतलेली असली तरी बाकीचे कथानक इथल्या मातीतले आहे हे आवडले मला नियमित नाही बघणं होत पण रेवा आल्यानंतरचे सगळे भाग आज सलग पाहिले. आवडले. मला समहाऊ राकेशचं काम करणारा मुलगा नाही आवडत. अभिनय चांगला करतो पण त्याचा चेहेरा नाही आवडत !
मला रेश्माचं हसणं ब-याचदा
मला रेश्माचं हसणं ब-याचदा कृत्रिम वाटतं. पण मी विचार केला की मला रेश्मा आवडतंच नाही म्हणून मला असं वाटतंय का?
मला सुजय, कैवल्य आणि मीनलचं
मला सुजय, कैवल्य आणि मीनलचं हसणंही कृत्रिम वाटलं बर्याच प्रसंगांत.
आशूचं अॅक्टिंग सगळ्यात जेन्युईन वाटतं.
आईला अॅक्टिंग जमत नाहीय..
आईला अॅक्टिंग जमत नाहीय.. वाक्य चुकताहेत. कृत्रीम वाटतय..
खास वाटलाच नाही एपिसोड. नाही
खास वाटलाच नाही एपिसोड. नाही आवडला. हल्लीची यंग मुले, विकृत वगैरे शब्द इतक्या easily म्हणतात का? खरंच मला माहिती नाहीये म्हणून विचारते.
रेश्मा कैवल्यला विकृत म्हणते ते नाही आवडलं.
आज कैवल्यची आईची साडी आणि
आज कैवल्यची आईची साडी आणि मंगळ्सूत्र मधेच बदलले गेले जेव्हा सुजयला ती विचारत असते कैवल्य कुठे आहे तेव्हा चेक्सची साडी आणि चकमक मंसु होते आणि मधेच अचानक खणटाईप्स साडी आणि काळ्या पोतीचे मंसु दिसले. हा काय प्रकार?
रच्याकने कैवल्यची आई केस वाढवलेल्या किरण राव सारखी दिसली तिचे काम एवढे नाही आवडले.
कैवल्यच्या आईची अॅक्टींग
कैवल्यच्या आईची अॅक्टींग कृत्रीम वाटली. कालचा एपी boer झाला..
आज कैवल्यची आईची साडी आणि
आज कैवल्यची आईची साडी आणि मंगळ्सूत्र मधेच बदलले गेले जेव्हा सुजयला ती विचारत असते कैवल्य कुठे आहे तेव्हा चेक्सची साडी आणि चकमक मंसु होते आणि मधेच अचानक खणटाईप्स साडी आणि काळ्या पोतीचे मंसु दिसले. हा काय प्रकार? > दिग्दर्शकाच्या डुलक्या दुसरं काय
पण मला आवडला कालचा भाग.. थोडा वेगळा वाटला.. आणि तो कैवल्य ( अमेय वाघ) खरच खूप क्युट आणि हँडसम दिसत होता त्या शर्टमध्ये..
रेश्मा कैवू ला टवका म्हणाली.
रेश्मा कैवू ला टवका म्हणाली. टोटल लाईन मारिंग!
आई वाक्यं विसरत होती. अॉथेंटिक आईचं असं कधी होतं का? बावीस मैल लांबीचा पट्टा.:फिदी:
टवका भारी!
टवका भारी!
कैवल्य ची आई झालेल्या बाईला
कैवल्य ची आई झालेल्या बाईला अज्जीबात अभिनय जमत नव्हता...आणि तिची वाक्य चुकलेली लगेच कळुन येत होतं...यांना रीटेक्स घ्यायला काय झालेलं..असं चुकीच्या वाक्यांसकट कसं काय दाखवतात राव....काहीही हं...
बाकी कैवल्यच्या आईच्या रोल साठी एखादी अनुभवी अभिनेत्री आणायला हवी होती....ईला भाटे कशी दिसली असती ?... ....तिला मस्त मॉडर्न गेट अप पण छान देता आला असता....
समहाउ मला इला भाटे मॉडर्न
समहाउ मला इला भाटे मॉडर्न लुकमध्ये पटत नाही.. कारण कपडे कुठलेही घाला तिच लाड लाड बोलण लपत नाही. राधा बावरीमध्ये तिला डॉक्टर दाखवल होत ट्राउजर वगैरे घालुन ती राधाशी तसच लाड लाड बोलायची... मॉडर्न विचारसरणीची आई म्हणुन शुभांगी गोखले, आसावरी जोशी, नीना कुलकर्णी, ती एक घार्या डोळ्यांची व्हीलनच काम करणारी पण आहे टिपरेमध्ये आबांची मुलगी झाली होती. या अभिनेत्री चालल्या असत्या..
घरी येते आणि नंतर घरात वावरते
घरी येते आणि नंतर घरात वावरते ती आई आणि सुजय कैवल्यला हाक मारतो त्यावेळी 'तो असाच आहे' असं म्हणणारी आई ह्या दोन समांतर विश्वातल्या बायका होत्या. मध्येच क्षणभर वेगळ्या मितीत डोकावून आलो आपण सगळे
मला मजा आली काल. खरंतर सगळेच
मला मजा आली काल. खरंतर सगळेच इतके कल्ला करत होते की कैवल्यच्या आईच्या चुकांकडे लक्षच गेलं नाही.
साडीची चुक कल्ल्यामुळे खरच
साडीची चुक कल्ल्यामुळे खरच लक्शात आली नव्हती...अत्ता परत जाउन पाहिलं तेव्हा कळलं....
दोन समांतर विश्वातल्या बायका.>>...हा हा हा.....
शुभांगी गोखलेल सखी समोर असताना कैवल्यची आई म्हणुन आणलं असतं तर सगळाचं गोंधळ उडाला असता
कालचे पंचेस मस्त होते पण .....कैवल्य नीट वागा असं सांगताना मस्त केविलवाणा झाला होता....
बरं झालं काल पाहिला नाही
बरं झालं काल पाहिला नाही ते.
बाकी कैवल्यने लाल हाफ चड्डी सोडून इतरही काही घातलं याचा आनंद झाला.
नाही रे भुंग्या, बघ तू.
नाही रे भुंग्या, बघ तू. आईसाठी छान स्टेट अॉफ माईंड मध्ये का असायला हवं, हे सांगताना मलाही कैवू टवका वाटला होता. गबू!
ओके... बघायला हवा वेगळा लूक
ओके... बघायला हवा वेगळा लूक
टिपरेंची लेक म्हणजे सुमुखी
टिपरेंची लेक म्हणजे सुमुखी पेंडसे.. फिट्ट बसली असती या रोल मधे!!!
कैवल्य भारी दिसत होता. आणि
कैवल्य भारी दिसत होता. आणि रेश्मा सुद्धा मस्त लाईन मारत होती त्याच्यावर!!! टवका !! के.के. च ऑकवर्ड होण पण मस्त! खुप हसलो. पोट धरुन!!! आणि सुजय सांगतो, कि के.के. प्रगल्भा च्या मागे आहे.... बाकी के.के. च्या आई कडे जास्त लक्षच नाही दिल मी.
मुळात त्यांनी मेलोड्रामा केला
मुळात त्यांनी मेलोड्रामा केला नाही, हे खुप आवडल.
हल्लीची यंग मुले, विकृत वगैरे
हल्लीची यंग मुले, विकृत वगैरे शब्द इतक्या easily म्हणतात का?
>>
हो ! आम्ही म्हणतो गं
माझंही कैवल्यमुळे आईकडे अजिबात लक्ष गेलं नाही.
काल ख र च टवका दिसत होता.
मला आवडला कालचा भाग.
मित +१
रिया thanx. मग ठीक आहे तो
रिया thanx.
मग ठीक आहे तो शब्द.
"गब्बु" भारी होत काल.
"गब्बु" भारी होत काल.
काल खरंच कैवल्य बनियन दिसला
काल खरंच कैवल्य बनियन दिसला नाही त्यामुळे फॉर अ चेंज छान वाटला शर्ट जिन्स.
टवका
बहुतेक कैवल्यच्या आईचा रोल
बहुतेक कैवल्यच्या आईचा रोल कर्णारी अभिनेत्री आलीच नाही म्हणून सेटवर उपलब्ध असलेल्या आंटींना मेकप करून त्या भूमिकेपुरतं उभं केल्यासारखं वाटलं. अजिबात नीट अभिनय जमला नाही, त्यामुळे इतरांचे सुरेख पंचेस सुद्धा वायाच गेले.
अरे समोर कैवल्य असताना तुम्ही
अरे समोर कैवल्य असताना तुम्ही त्यांच्याकडे बघितलंच कसं आणि का?
वाक्यांमधे कलाकार चुकतो आणि
वाक्यांमधे कलाकार चुकतो आणि तरी दिग्दर्शक/संकलक ते तसेच ठेवतो.. यावरून छापायची किती घाई असते हेच लक्षात येतं..
ती कैवल्याची आई काकू इतकी
ती कैवल्याची आई काकू इतकी गोड आहे कि त्या तरुण मुलींपेक्षा तीच गोड आहे
आजचा (आता कालचा म्हणायला हवं)
आजचा (आता कालचा म्हणायला हवं) आवडला एपिसोड मला. कालच्यापेक्षा आज ती आई बरी वाटली.
आशु छोट्या छोट्या जागा पण फार सुंदर घेतो. सुजय त्याला म्हणतो आता कोणाला खाणे आठवणार तेव्हा तो स्वतःकडे बोट दाखवतो ते सिंपली ग्रेट. नंतर त्याची भावुकता सुंदर.
आज कधी नव्हे ते पहिल्यांदा मला कैवल्य आवडला. शेवटच्या गाण्यात सुंदर acting. फार भावुक झाला होता. त्याचे पाणावलेले डोळे बघुन मलाही रडू आलं.
Pages