दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नागावकर रे!
तेच होणारे Proud खिचडीची मजाच आली आणि स्वयंपाकघरातला पसारा, माजघर एक नंबर होतं.
रीया आहे का? काल रेश्मा कैवल्यच्या मुस्काडीत देईन म्हणाली..बकरीची वाघीण झाली. वाघबकरी चहाचा इफेक्ट.

काल रेश्मा कैवल्यच्या मुस्काडीत देईन म्हणाली..
>>
बघ की माकड कुठली Angry
पण काल आवडली मला ती.
अशी जरा बरी वाटते Proud

मीनलच अमेरिका जाण्याच काय झाल? << असं होतं तिच्या बाबतीत... मधे ती स्वप्नील बरोबर हिरॉईन झाली होती. पण एका अर्धवट 'शॉट' नंतर पुढे काहीच झाले नाही.. Proud

अर्ध्या एपिसोडनंतर मीनल अमेरीकेला गेली असणार. ती बीएमेममध्ये असल्यावर इकडची दुनियादारी कशाला करत बसेल? Happy

काल तो सीन लय भारी होता. किंजल सामान द्यायला येते आशुचं तेव्हा backgroundला, 'मेरा कुछः सामान तुम्हारे पास पडा है', ह्या गाण्याचं मुझिक लावलं होतं.

बाकी काहीही दाखवा. पण रेश्मा मॉड कपडे घालते व एकदम सॉलिड दिसल्याने तो तिचा नवरा तिच्या प्रेमात पडतो हे घिसेपीटे प्रकार दाखवू नका. गेली ३०-४० वर्षे अनेकदा वापरून झालेले आहे ते Happy

काल तो सीन लय भारी होता. किंजल सामान द्यायला येते आशुचं तेव्हा backgroundला, 'मेरा कुछः सामान तुम्हारे पास पडा है', ह्या गाण्याचं मुझिक लावलं होतं... +१ Proud

फारएन्ड अनुमोदन. खरतर रेश्माने डिवोर्सच घ्यायला हवा ठामपणे.
बायदवे, ती रेंटसाठी पैसे कुठून आणतेय? मागचा रेंट देऊन बरेच दिवस झाले हे विसरले का लेखक?

रेश्मा, रेवा दोघीही आवडल्या नाहीत मला.

निशा काही वेळा बरी वाटली. राकेशपण बरं काम करतो पण तो कधी कधी लिपस्टिक का लावतो ओठाला, ते नाही बरं दिसत.

बायदवे, ती रेंटसाठी पैसे कुठून आणतेय? मागचा रेंट देऊन बरेच दिवस झाले हे विसरले का लेखक?>>>>>>>>>>भांडण शिकवण्याचा एपिसोड आठवतोय? त्यात रेश्मा बँकेतत असताना रिक्षावाला तिच्याशी भांडतो. आणि पहिल्या रेंटच्या वेळी रेश्मा म्हणाली होती कि बँकेत पैसे आहेत पण चेकबुक नाहीये.

रच्याकने, रेवावाले एपिसोड अजून रंजक करता आले असते. कंटाळवाणे केले थोडे. पण काही वेळा खूप छान दाखवतात. डोळ्यातून पाणी काढतात आपल्या ! पावसाच्या दिवशीचे आशूचे हावभाव अजूनही आठवतात. काटा येतो अंगावर!

बायदवे, ती रेंटसाठी पैसे कुठून आणतेय? मागचा रेंट देऊन बरेच दिवस झाले हे विसरले का लेखक?>>>>>>>>>>भांडण शिकवण्याचा एपिसोड आठवतोय? त्यात रेश्मा बँकेतत असताना रिक्षावाला तिच्याशी भांडतो. आणि पहिल्या रेंटच्या वेळी रेश्मा म्हणाली होती कि बँकेत पैसे आहेत पण चेकबुक नाहीये.

रच्याकने, रेवावाले एपिसोड अजून रंजक करता आले असते. कंटाळवाणे केले थोडे. पण काही वेळा खूप छान दाखवतात. डोळ्यातून पाणी काढतात आपल्या ! पावसाच्या दिवशीचे आशूचे हावभाव अजूनही आठवतात. काटा येतो अंगावर!

हो पण चेकबुक कुठे मागवलंय तिने घरून. राकेशनेसुद्धा त्याचे पैसे वापरू नको असे सूचित केलेलं ना

जेवण बनवतेय म्हणू़न रेंट माफ >> असू शकेल पण तसा dialog यायला हवा होता त्या अनुषंगाने. पूर्वी सुजय रेंटबद्दल किती strict दाखवलाय ते लेखक विसरला का अस म्हणायचय.

रेश्मा आवडायला लागलीये. खंबीर, ठाम की काय होतीये हळूहळू. लपवाछपवीच्या एपिसोड्स मधे शेवटी रेवाला सगळं समजतं असं दाखवायला हवं होतं असं वाटून गेलं. कदाचित राकेशबरोबर न राहता, या मित्रमंडळीत ती जास्त समाधानी आहे, अशी खात्री रेवाला होतं असं काहितरी दाखवता आलं असतं.

यांच टिमवर्क मस्तय. म्हणुनच एकट अस कोणी लक्षात रहात नाही. कधी सुजय, कधी मिनल, आशु, अना, रेश्मा, कैवल्य भाव खावुन जातात पण तरिही त्या दिवशी चा विषय आणि एकुणात सगळे च लक्षात राहतात.

ए छान वाटतंय, तुम्ही सगळे या सिरीअलविषयी बोलत आहात म्हणून...
मला सुद्धा, खुप वर्षांनी टि.व्ही. वर मनोरंजनासाठी, काहीतरी आवर्जुन बघावं, अशी हि सिरीअल वाटतेय.
अतिशय, साधी सरळ सोप्पी, आपल्यातलीच वाटणारी...
ना कुठले कर्कश्य संगीत, ना उगीच १२ महिने कडकडणारे विजांचे आवाज, ना उगीचच भरपुर दागदागिने घातलेल्या, आणि भरजरी साड्या नेसलेल्या बायका, ना त्यांच्या कपाळाचे ते मोठ्ठाल्ले गंध, टिकल्या, ना ते भव्यदिव्य अलिशान घर...ना उगीच कुठली तरी भंपक कारस्थानं...(म्हणूनच लोकप्रिय होत असावी बहूतेक)
आपल्या रोजच्या जीवनातील माणसं वाटतात ना, हि सगळी कॅरॅक्टर्स...

हं, आता हि थीम इंग्लिश सिरीअल, ”फ्रेंड्स” वर बेतलेली आहे. पण हरकत नाही, तरी बघायला आवडते आहे.
पूर्वी स्टार प्लसवर, साराभाई वि. साराभाई लागायची, तिही अशीच मस्त सिरीअल होती. ती किंवा ह्या अशा सिरीअल्स यायला पाहिजेत राव...

राकेश सोडून सग्गळे आवडतात. राकेश झालेला जो कोण हिरो आहे एकदम बावळट अ‍ॅक्टिंग आहे. काही नाही येत त्याला. नुसती ती मार्केटिंगची बॅग लावून फिरत असतो. :रागः

काल मीनल गायबच झाली अर्ध्या एपीसोड मधुन..
>>>>>>>>>>>>>>>

माबोच्या कार्यक्रमाला गेली होती ना स्वानंदी अमेरिकेला..... म्हणून शूटमधून गायब असणार काही दिवस.... काय लोकहो Proud

Pages