Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नागावकर रे! तेच होणारे
नागावकर रे!
तेच होणारे खिचडीची मजाच आली आणि स्वयंपाकघरातला पसारा, माजघर एक नंबर होतं.
रीया आहे का? काल रेश्मा कैवल्यच्या मुस्काडीत देईन म्हणाली..बकरीची वाघीण झाली. वाघबकरी चहाचा इफेक्ट.
ओह यस नागावकर ............
ओह यस नागावकर ............
मीनलच अमेरिका जाण्याच काय
मीनलच अमेरिका जाण्याच काय झाल?
गेली की नाही??
की जाणं रद्द झालं
काल मीनल गायबच झाली अर्ध्या
काल मीनल गायबच झाली अर्ध्या एपीसोड मधुन..
काल रेश्मा कैवल्यच्या
काल रेश्मा कैवल्यच्या मुस्काडीत देईन म्हणाली..
>>
बघ की माकड कुठली
पण काल आवडली मला ती.
अशी जरा बरी वाटते
मीनलच अमेरिका जाण्याच काय
मीनलच अमेरिका जाण्याच काय झाल? << असं होतं तिच्या बाबतीत... मधे ती स्वप्नील बरोबर हिरॉईन झाली होती. पण एका अर्धवट 'शॉट' नंतर पुढे काहीच झाले नाही..
अर्ध्या एपिसोडनंतर मीनल
अर्ध्या एपिसोडनंतर मीनल अमेरीकेला गेली असणार. ती बीएमेममध्ये असल्यावर इकडची दुनियादारी कशाला करत बसेल?
सध्या रंगतदार होतायेत एपिसोडस
सध्या रंगतदार होतायेत एपिसोडस दोन दिवस.
आशु फारच सहज करतो काम.
सध्या रंगतदार होतायेत एपिसोडस
सध्या रंगतदार होतायेत एपिसोडस दोन दिवस. >> +१
काल तो सीन लय भारी होता.
काल तो सीन लय भारी होता. किंजल सामान द्यायला येते आशुचं तेव्हा backgroundला, 'मेरा कुछः सामान तुम्हारे पास पडा है', ह्या गाण्याचं मुझिक लावलं होतं.
बाकी काहीही दाखवा. पण रेश्मा
बाकी काहीही दाखवा. पण रेश्मा मॉड कपडे घालते व एकदम सॉलिड दिसल्याने तो तिचा नवरा तिच्या प्रेमात पडतो हे घिसेपीटे प्रकार दाखवू नका. गेली ३०-४० वर्षे अनेकदा वापरून झालेले आहे ते
काल तो सीन लय भारी होता.
काल तो सीन लय भारी होता. किंजल सामान द्यायला येते आशुचं तेव्हा backgroundला, 'मेरा कुछः सामान तुम्हारे पास पडा है', ह्या गाण्याचं मुझिक लावलं होतं... +१
फारएन्ड अनुमोदन. खरतर
फारएन्ड अनुमोदन. खरतर रेश्माने डिवोर्सच घ्यायला हवा ठामपणे.
बायदवे, ती रेंटसाठी पैसे कुठून आणतेय? मागचा रेंट देऊन बरेच दिवस झाले हे विसरले का लेखक?
रेंट कसला ह्या पाच लोकांना
रेंट कसला ह्या पाच लोकांना खायला घलतेय की
ती नीशा पण काम चांगलं करतेय.
ती नीशा पण काम चांगलं करतेय. ती बहीण जरा बावळट वाटली.
रेश्मा, रेवा दोघीही आवडल्या
रेश्मा, रेवा दोघीही आवडल्या नाहीत मला.
निशा काही वेळा बरी वाटली. राकेशपण बरं काम करतो पण तो कधी कधी लिपस्टिक का लावतो ओठाला, ते नाही बरं दिसत.
बायदवे, ती रेंटसाठी पैसे
बायदवे, ती रेंटसाठी पैसे कुठून आणतेय? मागचा रेंट देऊन बरेच दिवस झाले हे विसरले का लेखक?>>>>>>>>>>भांडण शिकवण्याचा एपिसोड आठवतोय? त्यात रेश्मा बँकेतत असताना रिक्षावाला तिच्याशी भांडतो. आणि पहिल्या रेंटच्या वेळी रेश्मा म्हणाली होती कि बँकेत पैसे आहेत पण चेकबुक नाहीये.
रच्याकने, रेवावाले एपिसोड अजून रंजक करता आले असते. कंटाळवाणे केले थोडे. पण काही वेळा खूप छान दाखवतात. डोळ्यातून पाणी काढतात आपल्या ! पावसाच्या दिवशीचे आशूचे हावभाव अजूनही आठवतात. काटा येतो अंगावर!
बायदवे, ती रेंटसाठी पैसे
बायदवे, ती रेंटसाठी पैसे कुठून आणतेय? मागचा रेंट देऊन बरेच दिवस झाले हे विसरले का लेखक?>>>>>>>>>>भांडण शिकवण्याचा एपिसोड आठवतोय? त्यात रेश्मा बँकेतत असताना रिक्षावाला तिच्याशी भांडतो. आणि पहिल्या रेंटच्या वेळी रेश्मा म्हणाली होती कि बँकेत पैसे आहेत पण चेकबुक नाहीये.
रच्याकने, रेवावाले एपिसोड अजून रंजक करता आले असते. कंटाळवाणे केले थोडे. पण काही वेळा खूप छान दाखवतात. डोळ्यातून पाणी काढतात आपल्या ! पावसाच्या दिवशीचे आशूचे हावभाव अजूनही आठवतात. काटा येतो अंगावर!
हो पण चेकबुक कुठे मागवलंय
हो पण चेकबुक कुठे मागवलंय तिने घरून. राकेशनेसुद्धा त्याचे पैसे वापरू नको असे सूचित केलेलं ना
जेवण बनवतेय म्हणू़न रेंट माफ >> असू शकेल पण तसा dialog यायला हवा होता त्या अनुषंगाने. पूर्वी सुजय रेंटबद्दल किती strict दाखवलाय ते लेखक विसरला का अस म्हणायचय.
रेश्मा आवडायला लागलीये.
रेश्मा आवडायला लागलीये. खंबीर, ठाम की काय होतीये हळूहळू. लपवाछपवीच्या एपिसोड्स मधे शेवटी रेवाला सगळं समजतं असं दाखवायला हवं होतं असं वाटून गेलं. कदाचित राकेशबरोबर न राहता, या मित्रमंडळीत ती जास्त समाधानी आहे, अशी खात्री रेवाला होतं असं काहितरी दाखवता आलं असतं.
मला जे चालुये ते आवडतंय. बरेच
मला जे चालुये ते आवडतंय.
बरेच बदल करता आले असते पण आत्ता जे चालूये तेही फार वाईट नाही
मला जे चालुये ते आवडतंय. बरेच
मला जे चालुये ते आवडतंय.
बरेच बदल करता आले असते पण आत्ता जे चालूये तेही फार वाईट नाही >> +१
बरेच बदल करता आले असते पण
बरेच बदल करता आले असते पण आत्ता जे चालूये तेही फार वाईट नाही >> +१
यांच टिमवर्क मस्तय. म्हणुनच
यांच टिमवर्क मस्तय. म्हणुनच एकट अस कोणी लक्षात रहात नाही. कधी सुजय, कधी मिनल, आशु, अना, रेश्मा, कैवल्य भाव खावुन जातात पण तरिही त्या दिवशी चा विषय आणि एकुणात सगळे च लक्षात राहतात.
काल आशूने नुस्त्याच मुठी
काल आशूने नुस्त्याच मुठी आवळल्या.. द्यायला पाहिजे होता १ punch राकेश्ला..
रेश्माने मग आशुला २-३ पंच
रेश्माने मग आशुला २-३ पंच दिले असते.
काल मला पण रेश्मा सोबत रडू येत होतं
:काहीही हं री:
ए छान वाटतंय, तुम्ही सगळे या
ए छान वाटतंय, तुम्ही सगळे या सिरीअलविषयी बोलत आहात म्हणून...
मला सुद्धा, खुप वर्षांनी टि.व्ही. वर मनोरंजनासाठी, काहीतरी आवर्जुन बघावं, अशी हि सिरीअल वाटतेय.
अतिशय, साधी सरळ सोप्पी, आपल्यातलीच वाटणारी...
ना कुठले कर्कश्य संगीत, ना उगीच १२ महिने कडकडणारे विजांचे आवाज, ना उगीचच भरपुर दागदागिने घातलेल्या, आणि भरजरी साड्या नेसलेल्या बायका, ना त्यांच्या कपाळाचे ते मोठ्ठाल्ले गंध, टिकल्या, ना ते भव्यदिव्य अलिशान घर...ना उगीच कुठली तरी भंपक कारस्थानं...(म्हणूनच लोकप्रिय होत असावी बहूतेक)
आपल्या रोजच्या जीवनातील माणसं वाटतात ना, हि सगळी कॅरॅक्टर्स...
हं, आता हि थीम इंग्लिश सिरीअल, ”फ्रेंड्स” वर बेतलेली आहे. पण हरकत नाही, तरी बघायला आवडते आहे.
पूर्वी स्टार प्लसवर, साराभाई वि. साराभाई लागायची, तिही अशीच मस्त सिरीअल होती. ती किंवा ह्या अशा सिरीअल्स यायला पाहिजेत राव...
काल आशुने हळू हळू रागाचा पारा
काल आशुने हळू हळू रागाचा पारा चढण्याची आणि नंतर क्षणात शांत होण्याची acting लाजवाब केली.
राकेश सोडून सग्गळे आवडतात.
राकेश सोडून सग्गळे आवडतात. राकेश झालेला जो कोण हिरो आहे एकदम बावळट अॅक्टिंग आहे. काही नाही येत त्याला. नुसती ती मार्केटिंगची बॅग लावून फिरत असतो. :रागः
काल मीनल गायबच झाली अर्ध्या
काल मीनल गायबच झाली अर्ध्या एपीसोड मधुन..
>>>>>>>>>>>>>>>
माबोच्या कार्यक्रमाला गेली होती ना स्वानंदी अमेरिकेला..... म्हणून शूटमधून गायब असणार काही दिवस.... काय लोकहो
Pages