वापरून नरम पडलेले बूट पुन्हा कडक कसे करावेत?

Submitted by बाळाजीपंत on 10 July, 2015 - 01:08

नुकतेच माझे ऑफिसात जायचे काळे बूट वापरून वापरून नरम झाले आहेत. आज घालुन बघता असे लक्षात आले की या बुटांचे चामडे लवकरच राम म्हणेल.

त्यामुळे बुट पायातून अलगद मधेच सटकतो.

असे कोणते उपाय आहेत की ज्यामुळे चामडे कायमस्वरुपी कडक होऊन पायात व्यवस्थित बसतील?

बुट कोणत्या प्राण्याच्या कातड्यापासून बनविलेला आहे व कोणत्या प्राण्याच्या कातड्यावर तो चढविला जाणार आहे त्यावरही कडक/नरमपणा अवलंबुन असतो का?

कृपया जाणकार/तज्ञांनी सल्ला द्यावा.

तळटीपः बूट ब्रँडेड आहेत पण तो ब्रॅंड प्रसिद्ध नाही. मी एम.एन.सी.त काम करत नसून लहानशाच कंपनीत नोकरी करत असल्याने फार फेमस ब्रँडचे बूटच काय हातरुमाल देखील परवडत नाहीत.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"बुटाला" नावाचे लोक पण असतात हे लक्षात घ्या !!>> बोला काय म्हणताय...

बुटाला नावावरून नूमविमध्ये एक दोन मास्तर लोक 'चपलेला' अशी "गमतीत" हाक मारायचे ते आठवले...

राहुल१२३ | 10 July, 2015 - 18:56 नवीन
कुठल्या तेलात?? गोडेतेलात , खोबरेल तेलात की तिळाच्या??
>>
जपानी तेल वापरुन बघा.>>>>>>>>>>>आणि जिथे खरच जपानी तेल वापरायचे आहे तिथे बुटपॉलीश वापरा. Biggrin

तळटीपः बूट ब्रँडेड आहेत पण तो ब्रॅंड प्रसिद्ध नाही. मी एम.एन.सी.त काम करत नसून लहानशाच कंपनीत नोकरी करत असल्याने फार फेमस ब्रँडचे बूटच काय हातरुमाल देखील परवडत नाहीत.
>>>>>

जर ग'फ्रेंड नसेल तर सरळ बूट फेकून द्या आणि चप्पल वापरा Happy

बॉसिणीला इम्प्रेस करायला बुट वापरतोय आनी कंपणीच्या नावाने बिल फ़ाडतोय........काय माणसाची जात लब्बाड आहे.......चला मी जातो .....चिऊऊऊऊउ

कोणाची झोपायची वेळ होती पंत? Wink खरंतर दुपारी 'वामकुक्षी' घेतांत म्हणे. बुटांना डाव्या बाजुला कलते करुन ठेवले होते कां? Proud

ज्याने विकलाय त्याच्याशी जाऊन भांडा.. नाही दाद दिली तर त्याच विक्रेत्याच्या कातड्याचे जोडे करून पायात घालायला हरकत नाही. तो जर गेंड्याच्या कातडीचा असेलच अर्थात.. Wink
बदलून देत नसेल तर तो तसाच असण्याची शक्यता जास्त आहे म्हणा Wink पण मग जास्त टिकतील बूट...:D एकदम कडक..