निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

जागु तु कीत्ती लकी आहेस ग... ईतक्या गोड पान कोंबड्या तुझ्या कडे ramp walk करतात....:)

साप, खतरनाक.... इतके स्पष्ट फोटो कोणी काढलेत... बापरे काय धाडस आहे!
मागच्या वर्षी तु साळुंक्यांच्या ढोली वर हल्ला बोललेला साप क्रमशः दाखवला होता...

बापरे जागु, नाग म्हणजे खाऊ नाही ग. सगळ्यात खतरनाक. अर्थात आपण त्रास दिला नाही तर तोहि त्रास देणार नाही पण मुले अजाणते पणि चुक करू शकतात।. सो, टेक केयर. त्याला मारा बिरा म्हणणे मला जमायचे नाही कारण आपल्याइतका त्याचाही हक्क आहे वंश परम्परागत चालत आलेल्या त्याच्या जागेत मुलाबाळान्सकट राहायचा.

शशांकजी, मस्त कविता..

छान लिहिलयस गं जागुतै..
शतपावली करणार्‍या पानकोबंड्या म्हणजे कहर आहे Biggrin
खर्र खर्र सांग फोटू कुणी काढले..कसला आहे तो.. खतरनाक.. हा आणि भुत्/भुतांच्या गोष्टी म्हणजे अस प्रकरण आहे माझ्या आयुष्यातल की, 'भेव त लागते पण पाहिल्याबगर राहवत बी नाय' ..
हे असे कुटुम्ब आजुबाजुला आहे या कल्पनेनेच मला रात्र रात्र झोप येणार नाही. Uhoh >> +१
मला तर घरात गोम किंवा सळी जरी गायब झाली तरी आठवडाभर मी पाय वर करुन बसते..घरी आजवर ११ साप निघाले तरी प्रॅक्टिस व्हायची आहे मला amazed.gif

सायली, सुपली मस्तच.. विदर्भात सुपाला सुपडी किंवा सुपली म्हणतात.. गोकर्णीच्या फुलांचा आकार सुपलीशी मिळताजुळता असल्याने त्यांना सुपली हे नाव पडले असावे..

बाकी माझ्या अतिआतुरतेने वाट पाहण्यामुळे पावसाने नेहमीप्रमाणे आजही चकोंडी दिलीय.. Sad

नागाचे कुटुंब वगैरे नसते ( असा माझा समज आहे ) तो काही कुटुम्बवत्सल प्राणी नाही. नागिण पालापाचोळा एकत्र करुन घरटे करते आणि पिल्ले अंड्यातून बाहेर येईपर्यंत राखणही करते पण एकदा ती बाहेर आल्यावर काहीच करत नाही ( करू शकतही नाही )

त्यामूळे तो एकच असावा किंवा काही काळापुरते नागिणीच्या मागावर आलेले नाग असावेत.

नागिण पालापाचोळा एकत्र करुन घरटे करते आणि पिल्ले अंड्यातून बाहेर येईपर्यंत राखणही करते पण एकदा ती बाहेर आल्यावर काहीच करत नाही ( करू शकतही नाही ) >>>> अ‍ॅनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी इ. चॅनेल्सवर जे दाखवतात त्यानुसार बहुतेक फक्त क्विन कोब्रा Happy हे पालापाचोळ्याचे घरटे बनवते, नागाबाबत माहित नाही....

निळ्या कृष्णकमळाची (पॅसिफ्लोरा सेरूलिया) फुले सुंगधी असतात. पॅशन फ्रूट (पॅसिफ्लोरा एड्यूलिस) या निळ्या सुंगधी फुलांची जाती भारतात आणून लावली असून,तिची पिवळी फळे खाद्य आहेत. त्यांच्यातील गर पौष्टिक असतो. या वेली बागेत मांडवावर, कमानीवर किंवा बंगल्याच्या काही भागांवर चढवितात. समारंभात सुगंधी फुलांच्या जातीचा वापर करतात. निद्रानाश व अस्वस्थता दूर करण्यासाठी कृष्णकमळाच्या काही जातींचा उपयोग होतो. पॅसिफ्लोरा फेटिडा ही लहान पांढर्‍या फुलांची जाती असून तिच्या पानांचा काढा, दमा व पित्तविकारावर उपयुक्त असतो; फळ वांतिकारक असून याची पाने डोकेदुखीवर व घेरीवर डोक्याला बांधतात.

(https://kumarvishwakosh.maharashtra.gov.in/kumarm/index.php?option=com_c... )

वा सायली सुंदर ग.

माझी वेल सावलीत आहे त्यामुळे जास्त फुले येत नाहीत.

पारंब्यांनी दाटलेला वड

आहा.. इवलूसं कृष्णकमळ.. कित्ती गोड दिसतंय Happy
हा माझा झब्बू.. कुंपणावर फुलली आहेत पण यांच मराठी नाव नाही माहीत.. जालावर मॉर्निंग ग्लोरी दिसत आहे..

a flower.jpg

शशांक, पॅसिफ्लोरा कुळात आता काही संकरीत जाती आहेत. खुप सुंदर रंग असतात त्यात.
आपल्याकडे अजूनही या फळाचा हवा तेवढा प्रसार झालेला नाही.

जागुतै कसली धीट आहे तु छोटा भीम सारखी.. भारी..
ससा सर्पमित्राने पकडला आहे >> २ मि कळलच नाही मी ससा कुठ मिसला ते Wink Lol
वडपारंब्या छानच..

आत्मधुन मस्त आहेत फुल.. लसणीचा वास म्हणजे लसुणच म्हणत आहे ना सगळे ?
गार्लिक किपर.. नाव पण छानच आहे.

बाकी आज मै उपर .. आसमां नीचे.. अस झालय मला..
खुदा ने मेरी सुनली..आपल हे पावसाने..
मस्त सरी येत आहे इकडं .. सतत नाही पण येत जात आहे वरुण देवाने स्प्रे मारल्यासारखा Lol
मी तर आला त्यातच खुश आहे ..

Pages