निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या धाग्याने रजत महोत्स्व पुर्ण केल्याने सर्व निसर्गातील मंड्ळी इथे येउन शुभेच्छा देत आहेत जणू. Happy
मस्त फोटो सगळे.

व्वा काय मस्त फोटो... एक कप चहा देता कोणी असे भाव आहेत...:)
टिना, मला पण जाम आवडते पांढर घुबड बघायला, पण ते जरा उंचावर असत ग.. तरी ट्राय करील फोटो काढायला..

भिजलेली साळुंकी ... आताच पडावं या पावसाने... भिगी मोरी सारी हाय !!

जागूचा, दयाळ पण मस्तच !

गेली ५/६ वर्ष १ कावळ्याचे जोडपे आमच्या बेडरुम बाहेरच्या पिंपळाच्या झाडावर दर वर्षी घरटं करते. आम्ही सुरवातीला त्यांना खिडकीत खाणं द्यायचो. नंतर ते वळसा घालुन लिव्हिंग रूमच्या बाल्कनी मधुन खाणं घ्यायला लागले. हळूहळू लिव्हिंग/बाल्कनी च्या दाराजवळच्या खुर्चीवर येऊन सांगायचे .... अाता वाढा... भूक लागली...

आणि आता तर चक्क लिव्हिंग रुमच्या मध्यभागी खुर्चीवर बसून तीच Demand करतात.....
Crow 1.jpgCrow 2.jpgCrow 3.jpg

निरु, तुमचं घर आणि इंटेरिअर सुद्धा खूप नॅचरल इफेक्ट वालं दिसतंय. भिंतीचा इफेक्ट, ती पांढरी खुर्ची.. जस्ट वॉव!! Happy

निरु, तुमचं घर आणि इंटेरिअर सुद्धा खूप नॅचरल इफेक्ट वालं दिसतंय. भिंतीचा इफेक्ट, ती पांढरी खुर्ची.. जस्ट वॉव!! स्मित >> +१०००००..
मोरपिसांच्या बाजुची आरामखुर्ची आहे न? मस्त..

कावळा कावळीनी .. कसले धीट आहे. ते पाळीव झालेत वाटत आता Happy

आमच्या इमारतीचे रंगकाम चालू असताना परांची बांधली होती. त्यावरुन बाल्कनीत आलेला छोटासा अनाहूत पाहुणा..

Monkey At Home.jpg

नीरु तुमच्याकडे आपले पूर्वज आले पाहुणे म्हणून Lol

छान सर्वांनाच तुमचं घर आपलंस वाटते, किती विश्वासाने, आपुलकीने येतात तुमच्याकडे. ग्रेट.

अन्जू,
पूर्वज म्हटल्यावर दोन मिनीटासाठी माझ्या डोक्यात निरू यांनी पहिले टाकलेला कावळा आला आणि मग माकड ..
आता एक पुर्वज दुसरा आत्मा Uhoh अस म्हणूया का ?

Kay mast tiplayat to ghubdacha photo
To pan dholi sakat.... Dhanyawad..

Tumch ghar phar surekh aahe.... Ek ek vastu prekshaniya aahe ..
Baithak kholit asa kawala yeun basalela pahlyandach pahate aahe.
Jagu khar mast

निरु गुलजार.. लाख लाख धन्यवाद.
कसल रुबाबदार आहे ते..

याच्याजवळ जातय ना जरासं Wink .. बघा मी आधीच एक क्लोन करुन ठेवलाय ..

WP_20150311_16_15_37_Pro.jpg

इथ हा प्रचि टाकल्याबद्दल समस्त निसर्गकर्स ची मनापासुन माफी ..

सध्या कडुलिंबावर खूप वेगवेगळे पक्षी येताहेत. त्यात नवीन म्हणजे पोपट आणि कोणते तरी वेगळेच पक्षी आहेत जे एकमेकांशी संवाद केल्यासारखे शीळ घालत रहातात. खूप गोड.
बाकी आपले कावळे चिमण्या होले बुलबुल, सन्बर्ड्स, साळुंख्या, ककधीमधी वेडे राघू.
पण आजिबात दिसत नाहीत. शीळ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला पण गल्लीतल्या मुलांचा गोंगाटच जास्त ऐकू येतोय त्यात.
आणि पोपटाचे लांबून फुट्टु काढलेत पण आता निरूच्या फोटोनंतर इथे डकवावेसे नाही वाटत.बाकी निरू...घुबड ऑस्समच!
. बघा मी आधीच एक क्लोन करुन ठेवलाय ..>>>>>>>>>>>>टिने तू पण ना..........

Pages

Back to top