कोकण फ्रेश पुन्हा !

Submitted by Yo.Rocks on 28 June, 2015 - 16:59

एका कामानिमित्त कोकणात एका दिवसासाठी जाणे झाले.. ही वेळ होती नुकतेच आगमन केलेला पाउस अनुभवण्याची.. मग एक दिवस का होईना... आतापर्यंत गणेश चतुर्थीत जाणे होत असल्याने पावसात स्थिरावलेला निसर्ग पाहीला होता.. जून मध्ये जाण्याची पाहिलीच वेळ.. शिवाय चतुर्थीत आतापर्यंत कोकण ट्रेनच्या जनरल डब्याने प्रवास करण्याचे धाडस केले होते.. पण आता उन्हाळी सुट्टी संपल्याने ऑफ सिझन..! फारशी गर्दी नाही.. स्लीपर क्लासची तिकीट सहज मिळून गेली.. खिडकीजवळची सीट नाही मिळाली तरी बसायचे कुणाला होते.. दरवाज्यात उभे राहून पावसाचे शिंतोडे अंगावर झेलण्याची मजा काही औरच.. असो, वेगवेगळ्या मोसमात दिसणारा कोकण सुद्धा वेगवेगळी रूप दाखवतो.. आता तर पाऊस सुरु झालेला.. साहाजिकच आपण मग एकदम फ्रेश !!

१.

- -
२.

- -
३. खेड रेल्वे स्थानक

- -

४.

- -

५.

- -

६.

- -

७.

- -

८.

- -

९.

- -

१०.

- -

११.

- -

१२.

- -

१३.

- -

१४.

- -

१५.

- -

१६.

- -

१७.

- -

१८.

*(प्रचि २,३,८,१५,१८ मोबाईलद्वारे)

- -
कोकणच्या कुशीतले आधीचे कप्पे :
कोकण फ्रेश
मुक्काम पोस्ट कोकण !
कोकणातलो गणपती: आगमन ते विसर्जन
गाव माझं सुंदर
मु.पो.तेर्से बांबार्डे - भाग २
कोकण किनारा...
ऐल तीर पैल तीर.
कोकणातलो गणपती !
मु.पो. तेर्से बांबार्डे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

धन्यवाद सर्वांचे.. Happy

@ बी.. खर सांगायचे तर कोकण मीच अजुन संपूर्ण फिरलो नाही.. Happy मला तर कोकणातला एकेक कोपरा आवडतो मग ते पर्यटन स्थळ असूदे की छोटे टुमदार गाव.. उदा. माझ्या गावी घरापासूंन विसेक मिनिटावर एका टेकडीवर मंदीर आहे आमचे ग्रामदैवत.. तिथे जायचे तर शेतमळे, जंगल यांतून जाणारी पाऊलवाट.. माझे मन इथेच रमते.. किंवा नदीकाठी जाऊन शांत बसणे हाही एक विरंगुळा.. माझ्यासाठी देखणा कोकण हाच.. Happy बाकी तुम्ही पुण्यावरून जाणार तर कोल्हापुर- मार्गे आंबोली करा.. स्वताःचे वाहन जास्त सोईस्कर ठरेल अन्यथा ज्या भागात फिराल तिथे गाडी बुक करा.. उदा मालवण भाग फिरायचा असेल तर तिथली गाडी दिवसाकरता बुक करायची.. दिवसभरात पुष्कळ काही बघता येईल. बाकी पावसात नुसते आंबोली फिरणे एकदम बेस्ट ! पुढे सावंतवाड़ी- वेंगुर्ले-कुडाळ-मालवण-कणकवली या मार्गावरची ठिकाण घेऊ शकता.. पावसात समुद्रकिनारे कितपत तुम्हाला आवडतील हा प्रश्न आहे पण फ़क्त हायवेवरून गाडीने फिरताना दिसणारी भातशेती नक्कीच सुखावह ठरेल.. जेवनासाठी ख़ानावळ बेस्ट ! कुडाळ।मालवण ला उत्तम आहेत.. तिथे कोकणातील घरगुती जेवणाचा स्वाद नक्कीच मिळेल. हे फ़क्त कोकणातील सिंधुदुर्ग याच जिल्ह्याबद्दल बोलत आहे Happy बाकी तर मलाही बघायचे आहे.. पण सिंधुदुर्ग जिल्हा पहीले बघुन घ्या Wink नक्कीच प्रेमात पडाल.. फोटो माहितीसाठी जिप्स्याने माबो वर दिलेली 'कोकणमय' ही फोटो मालिका नक्की बघा..

शेवटुन - २ -३ फोटो खुप छान आलेत.. पावसापुर्वी न पाऊस असतानाचा... काय छान वाटतय फोटो पाहताना... Happy

क्या बात है यो!!! अप्रतिम हिरवाई टिपलीयेस..
दोन दिवसांपूर्वी माबोचा अ‍ॅक्सेस मिळाला हे नशीब.. माझेच मागे टाकलेले कोकणातले काही फोटो आणि लेख पहात होतो. त्यात तुझे हे पावसातले टिपलेले कोकण बघायला मिळाले. व्वाह!! Happy

Pages