दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की काय होता लक्षात नाही. >>>>> कैवल्य म्हणतो की फोन स्क्रीन लॉक नाहीये. याचा अर्थ फोनचा मालक सत्तरीतला असणार.

ओक्के फा, गिरीकंद! पण म्हणजे हे लेखकाने अवैध स्वातंत्र्य घेण्यासारखे झाले. एपिसोड 'घडवण्यासाठी' लॉजिक खुंटीवर टांगण्यास सुरूवात झाली. असो!

शॉर्ट्फॉर्म्स पण कहि अचाट होते..... काहीसे ओढुन ताणून आणलेले.....
मला भाग संपतो तो शॉर्ट्फॉर्म जास्त हसवणारा वाटला....

सूजयः टीवी टीवी.... त्यांना विचारतो...
आशू: टीवी टीवी.... तूच विचार Proud

पण या भागात रेश्माचं टायमिंग भारी होतं... आणि पहिल्यांदाच असं वाटलं की तिने बेअरिंग छान पकडलेय...
कारण बिचारीला पार ज्युनिअर शुभांगी गोखले साच्यात अडकवलेय.... थ्रु आउट तोच शुभांगीताईंचा टोन आणि बावळट दिसणं कॅरी करणं मेंटेन केलेय तिने असं कालच्या भागानंतर जाणवले. (बावळट दिसणं रेश्मासाठी लिहिलेय)

गिरीकंद - हो बरोबर. तोच. त्या सीन ला मला शंका आली की फ्रेण्ड्स मधे फीबी व रेचेल ला असाच फोन सापडतो तो एपिसोड येतोय की काय यात. पण तसे काही नव्हते.

मला तो मुलगा तुम्ही माझे कॉण्टॅक्ट्स बघितले का ते विचारतो, बाकी सगळे नाही म्हणतात व एकटा सुजय हो म्हणतो आणि नंतर वरमतो, तो सीन आवडला. असे सटल विनोद जितके होतील तितके चांगले. पण रेश्मा व मीनल मधला 'केळवण' संवाद होता त्याला आणि मीनल च्या त्यावेळच्या अभिनयाला तोड नाही Happy

असे सटल विनोद जितके होतील तितके चांगले. पण रेश्मा व मीनल मधला 'केळवण' संवाद होता त्याला आणि मीनल च्या त्यावेळच्या अभिनयाला तोड नाही >> +१

.. काहीसे ओढुन ताणून आणलेले..... >>> +१
काहीकाही शॉफॉचा अर्थ सुजयला सांगत असतात ते तर उच्चार पण नीट ऐकु येत नव्हते मला.

मीनल म्हणजेच स्वानंदी फारच सहज एक्स्प्रेशन्स बदलू शकते. आणि आपण मुद्दाम ते तसं करतोय हे ती एन्जॉयही करते. अगदी नॅचरल अ‍ॅक्ट्रेस.

.. काहीसे ओढुन ताणून आणलेले..... >>> +१
काहीकाही शॉफॉचा अर्थ सुजयला सांगत असतात ते तर उच्चार पण नीट ऐकु येत नव्हते मला.

>> पुर्ण पोस्टला +१

मला तो मुलगा तुम्ही माझे कॉण्टॅक्ट्स बघितले का ते विचारतो, बाकी सगळे नाही म्हणतात व एकटा सुजय हो म्हणतो आणि नंतर वरमतो, तो सीन आवडला. असे सटल विनोद जितके होतील तितके चांगले. पण रेश्मा व मीनल मधला 'केळवण' संवाद होता त्याला आणि मीनल च्या त्यावेळच्या अभिनयाला तोड नाही. >>>>>>>>>>>>>>+११११

मीनल म्हणजेच स्वानंदी फारच सहज एक्स्प्रेशन्स बदलू शकते. आणि आपण मुद्दाम ते तसं करतोय हे ती एन्जॉयही करते. अगदी नॅचरल अ‍ॅक्ट्रेस>>>>>+१११

काहीकाही शॉफॉचा अर्थ सुजयला सांगत असतात ते तर उच्चार पण नीट ऐकु येत नव्हते मला.>>>> मलाही. आम्ही पण वापरतो What's app, पण असे शॉटफॉर्म नाही वापरलेले.
OMG, Clg, TY, TTYL, GM एतपत माहिती आहे.


मला भाग संपतो तो शॉर्ट्फॉर्म जास्त हसवणारा वाटला....

सूजयः टीवी टीवी.... त्यांना विचारतो...
आशू: टीवी टीवी.... तूच विचार >>>>>>>>>> +११

आम्ही पण वापरतो What's app, पण असे शॉटफॉर्म नाही वापरलेले.
OMG, Clg, TY, TTYL, GM एतपत माहिती आहे. +१

टीवी टीवी >> म्हणजे?

ए तुम्ही लोक फारच अपेक्षा ठेवता बाबा या सिरीयल कडुन. रोज काय नवीन घडवायचे तुमच्याकरता ? आहे यान्चे रुटीन असले. तरी बर यात सासु-सुन, सासु-जावई, सासरा-सुन, सासरा - जावई, नणद- भावजया, शेजारी-पाजारी, ऑफिस मधला बॉस- घरातला बॉस, प्रेमप्रकरणे असले काही सवन्ग, पाचकळ, हेवे दावे, मत्सर दाखवले जात नाही.

निखळ करमणूक आहे ही. होसुमीया किन्वा जुयेरेगा किन्वा का रे दुरावा सारखा घिसापिटा प्रकार यात नाही हेच बरे. मेरेकु बहोत बोले तो बहोत पसन्त है ये सिरीयल. अगदी आबाल-वृद्धाना सुद्धा आवडावी यात यश आहे हिचे.

कालचा भाग हहपुवा होता.. शेवटी रेश्माचा स्टॅण्ड अगदी योग्य होता. फक्त शेवटी तिच्या तोंडी एक वाक्य हव होत अस मला वाटत "तुम्ही जर मला बायको म्हणुन नाकारलेलच आहे तर मग तुम्हाला माझ नाव इतर कुणाशी जोडल जातय याचा राग का येतोय?" अगदी हेच अस नाही पण याअर्थाच कोणतही वाक्य चालल असत.. तिच्याजागी मी असते तर नक्की विचारल असत...

मुगु +१

ती कालच्या भागात तरी शेवटी थोडी कठोर व्हावी बोलताना असं वाटत होतं. पण शेवटी तिचा टोन रडकाच झाला.

तुमच्याकडे मन साफ करनारा फिनाईल आहे का ??
आजचा एपिसॊड एकदम ‪मस्त ‬' होता !!
कैवल्यने भाऊजींना पार धुवून टाकला !!

दिल Dosti दुनियादारी's photo.

मी मिसला
बघायलाच हवा असा आहे का?

खरच ही सिरियल साप्ताहिक हवी होती पण मग रोज रात्री झोपताना खळखळून हसून झोपी जाणं सहाजा सहजी नसतं जमलं हेही खरय

पण रेश्मा कशीही मला रडीच वाटते. तिला फार मेहनत घ्यायला लागणार.
>>
+१

मला नाही आवडत ती.
सखीला दुसरीकडे कुठे तरी बघायला हवं. चांगली अ‍ॅक्टर असेल असं वाटतंय

मला वाटलेलं कैवल्य किंवा मीनल झापेल राकेशला! सुखदरित्या रेश्मा ने झापलं पण थोडी ठाम हवी होती आणि मुग्धा म्हणतेय त्याप्रमाणे ते वाक्य हवं होतं. मीनल बाकी वेळेस छान पण मोठ्याने हसताना फार कृत्रीम वाटते. आशू आणि सुजय ही विशेष आवडतात. रिफ्रेशिंग सिरीयल असली तरी स्क्रीप्ट, आणि सगळ्यांचा अभिनय यावर एकूणातच सगळ्यांनी जास्त मेहनत घ्यायला हवी!
एक मायबोलीकरही आहे ना या सिरीयलचे संवाद लेखिका म्हणून?
प्लीजच बच्चन नका रे देऊ जुयेरेगा / होसूमीयाघ सारखे! साधे सरळ संवाद द्या! ते जास्त रिलेट होतील!!

मला वाटलं मनस्विनी लता रविंद्र माबोकरीण आहे Happy
दिदोदु ची पुढची थीम बहुदा पाऊस आहे... सरळ वविच दाखवायचा की... भुशी डॅम/लोणावळा वै. धम्माल वाटला असता भाग!!

मनस्विनी लता रवींद्र बद्दल सगळे इतक्या आपलेपणाने बोलल्यामुळे तिला तसं वाटत असेल. तिकडे तिला याची गंधवार्ताही नसेल! Lol

मुग्धा म्हणतेय त्याप्रमाणे ते वाक्य हवंच होतं. >>> हो ना ड्रीमे. मी अगदी प्राण कानात आणुन बसले होते ते वाक्य ऐकायला.. पण फुस्स्स झाल.

कालचा भाग हहपुवा होता.. शेवटी रेश्माचा स्टॅण्ड अगदी योग्य होता. फक्त शेवटी तिच्या तोंडी एक वाक्य हव होत अस मला वाटत "तुम्ही जर मला बायको म्हणुन नाकारलेलच आहे तर मग तुम्हाला माझ नाव इतर कुणाशी जोडल जातय याचा राग का येतोय?" अगदी हेच अस नाही पण याअर्थाच कोणतही वाक्य चालल असत.. तिच्याजागी मी असते तर नक्की विचारल असत...>>

मुग्धटली या पूर्ण पोस्टला अनुमोदन...

आशू प्रत्येक भागाबरोबर हुकमी एक्का बनत चाललाय. तो आणि रेश्मा एकदम टेचात नाचत होते काल. शेवटी आशुची कविता आणि अभिनय म्हणजे आइसिंग ऑन केक ! स्वानंदीच्या आवाजात 'अब के सावन' पण मस्त वाटलं. उगीचच वाटलं आरती ताईंच्या आवाजात ऐकायला ही तितकीच मजा येईल ना!

Pages