"बस दो मिनट" च्या निमीत्ताने

Submitted by गिरीकंद on 10 June, 2015 - 02:21

चिंगी आणी मॅगी हा लेख आणी त्यावरील प्रतिसाद वाचताना एकुणातच पॅकेज्ड फुड्स आणी त्यातील असणारे/असु शकणारे हानीकारक घटक, त्या अनुषंगाने होऊ शकणारे दुष्परीणाम, उत्पादक कंपन्या अन्नसुरक्षा मानकाने घालुन दिलेल्या नियमांचे कितपत काटकोर पणे पालन करत असतील, एक जागरुक ग्राहक या नात्याने आपण काय करु शकतो, असे बरेच प्रश्न मनात उभे राहीले.
तर या निमीत्ताने आपले अनुभव, शंका, माहिती, प्रश्न येथे शेअर करुया का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धाग्यात फक्त पॅकेज फुडचाच विचार केलेला दिसतोय. पण एकूणच बाहेर हॉटेलात वा रस्त्यावरच्या टपरीवर सुध्दा जे पदार्थ मिळतात त्यामध्ये वापरण्यात येणार्‍या आरोग्याला हानिकारक घटकांचे काय? अन्नसुरक्षा नियमांच्या अनुसरून हॉटेलात मिळणार्‍या पदार्थांची नियमित चाचणी घेतली जाते का? आणि आतापर्यंत किती हॉटेलांवर अशी कारवाई केली गेली आहे? या प्रश्नांचा सुध्दा उहापोह होणे गरजेचे आहे.

एकुणात अन्नसुरक्षेबाबत भारतातील कायदे आणि त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा, त्यांची कार्यपध्दती आणि जर यंत्रणेकडे तक्रार करावयाची असल्यास तक्रार कशी करता येईल याबद्दल मार्गदर्शन यावर चर्चा व्हावी असे मला वाटते. जाणकारांची मते वाचायला नक्कीच आवडतील.

मॅगी मधे शिसे आणी एम.एस.जी. सापडल्याची बातमी पहिल्यांदा वाचल्यावर माझा खरेच विश्वास बसला नव्हता. कारण शक्यतो नेस्ले सारख्या नामवंत कंपन्या भारतीय अन्नसुरक्षा मानकांचे इतक्या सहजी उल्लंघन करतील असे वाटले नव्हते. अर्थात उत्पादीत पदार्थांमधील जड धातुंचे परीक्षण खर्चिक असते आणी माझा अनुभव आहे की बर्‍याच कंपन्या असे परीक्षण वर्षातुन दोनच वेळेला करतात. आता वर्षातुन एखाद्या प्रॉडक्टच्या हजारो बॅचेस बनवल्या जातात आणी तपासणी फारतर १-२ बॅचेसची केली जाते.

पॅकेज्ड फूड का, एकंदरीतच बाहेर मिळणार्‍या अन्नपदार्थांबाबत जागरुकता हवी आहे. मोठ्या मोठ्या हॉटेल्समधेही अन्नसुरक्षा पाळली जात नाही, तिथे अन्नघटकांच्या जागरुकतेबाबत काय ?

दादर टीटीला स्वागत नावाचे रेस्टॉरंट आहे. तिथे एकदा कचोरी मागवली होती तर त्याखाली चक्क काळपट तेल होते. मी खाल्ली नाही तर तो वेटर दुसरी आणून देतो असे म्हणत गयावया करू लागला होता. नंतर कधी गेलोच नाही तिथे.

पनवेलला गार्डन हॉटेलमधे मागवलेल्या चिप्स ( फ्राईज ) चक्क आंबलेल्या होत्या.

मला तेलात जरा जरी भेसळ असेल तर लगेच जाणवते ( घश्याला त्रास व्हायला लागतो. ) अनेक ठिकाणी समोसे / बटाटेवडे वगैरे तळताना बघितले तर तेल काळे झालेले असते. मी तर आता कुठलाही तळलेला पदार्थ खायचे टाळतो. माटुंग्याला संदेशमधे लस्सीमधे टीपकागद ( साय म्हणून ) घालत असत. तेव्हापासून तिथेही खाणे सोडलेय.

खाद्यपदार्थातील रंगाबाबत काय बोलायचे ? जिलेबी वगैरेचे रंग इतके भडक असतात कि डोळ्यांना त्रास होतो. अगदी प्रसिद्ध मिठाईवालेही केशराच्या जागी भलतेच काहीतरी ( प्राजक्ताचे देठ वगैरे ) वापरतात.

प्राचीन रोममधे शिशाची भांडी आणि नळाचे पाईप सर्रास वापरात होते. द्राक्षाचा रस त्यात आटवत असत. हा द्राक्षाचा रस सापो नावाने ओळखत आणि तो बहुतेक अन्नपदार्थात वापरत. प्रा. स्टेवर्ट यांच्या मते या शिश्यामूळेच रोमन साम्राज्य लयाला गेले. त्याकाळचे बहुतेक राज्यकर्ते मनोरुग्ण होतेच शिवाय इतर अनेक व्याधी त्यांना जडल्या होत्या.

हा धागा "पॅकेज फुड" एवढाच मर्यादित ठेवला तर चर्चेला बरे पडेल असे वाटते.
हॉटेल, रस्त्यावरचे पदार्थ हे सगळे यात भेसळ नको करायला.
तसेही प्रत्येक गोष्टीसाठी मार्गदर्शक तत्वेही वेगळीच असतील नं ?

रश्मी, धागाकर्त्यानेच "...एकुणातच पॅकेज्ड फुड्स आणी त्यातील असणारे/असु शकणारे हानीकारक घटक,..." असे लिहीले आहे, म्हणून मी म्हणाले, बाकी ....

बरोबर आहे मन्जुषा तुझे, मी वाचले ते. पण या अनुशन्गाने सर्व बर्‍या वाईट गोष्टीन्वर चर्चा होईल असे वाटले, पण ओके.

पेप्सी कोक वा तत्सम सॉफ्ट ड्रिंकमध्ये काय किती हानीकारक असते माहीत नाही पण मला तरी त्यामुळे स्टोनचा त्रास वा युरीनमध्ये जळजळ होते, तसेच माझा पोटाचा एक आजार आहे तो देखील बळावतो. तरीही त्या फसफसणार्या पेयांची चटक अशी आहे की नाही राहावत. एकेकाळी म्हणजे चार-पाच वर्षांपूर्वी रोज म्हणजे अगदी रोजच सॉफ्टड्रिंक प्यायचो. आठवड्याला किमान एक लीटर वा आसपास पकडल्यास वर्षाकाठी कमीतकमी 40-50 लीटर पोटात जायचे. नंतर ते सोडल्यापासून वर्षाला फार तर एक-दिड लीटर पिणे होत असेल.

यांच्या जाहीरातींवर एवढे करोडो रुपये खर्च होताना दिसतात, याची प्रॉडक्शन कॉस्ट नक्की किती असेल हा प्रश्न पडतो. यामुळे शरीराला काही अपाय होतो की नाही कल्पना नाही पण हे पिऊन कोणाचे भले झाल्याचे ऐकीवात नाही.

तसेच ते रेल्वेस्टेशनवर मिळणारे फाऊंटन पेप्सी. मागे मी वाचलेले की त्यातील पाणी रेल्वे कॅन्टीनवाले आपले वापरतात. आणि मग ते काय दर्जाचे असेल याबद्दल बोलायलाच नको. मी चुकूनही रेल्वे कॅन्टीनचे पाणी पित नाही. तेव्हापासून ती फाऊंटनपेप्सी पिणेही सोडले.

गिरीकंद,
चांगला धागा.

मॅगीवरच्या आक्षेपांचे आणि उत्तरांचे एक मजेशीर नाटक चालू आहे. नेस्टले मॅगीवर सध्या खालील तीन आक्षेप आहेत.

१. मॅगीमध्ये २.५ पीपीएम पेक्षा जास्त शिसे मिळाल्याची चर्चा.
याबद्दल सर्वप्रथम युपी आणि मग इतरत्र टेस्टींग केल्यावर आक्षेप घेतले गेले.

नेस्टले म्हणतंय की आम्ही नूडल्स, टेस्टमेकर वेगवेगळं पॅकेज करून (एकाच पाकिटातून्)देतोय आणि त्यात पाणीही मिसळून उकळायचे आहे. आता पाणी , नूडल्स इ मिसळल्यावर अन्नाच्या पार्ट पर मिलीयन शिस्याचे प्रमाण कमी होणारच.
तुम्ही शिजवलेल्या मॅगीतले शिसे चेक केले का?
- तर आपल्या खुळसट लॅब्जनी 'नाही, आम्ही शिजवलेल्या तयार मॅगीतले कंटँट नाही चेक केले' असं आन्सर दिलंय.

२. दुसरा आक्षेप- 'नो अ‍ॅडेड एम एस जी लिहिलंय'
यावर नेस्टले म्हणतंय आम्ही 'नो एम एस जी' लिहिलेलं नाही, नो 'अ‍ॅडेड' एम एस जी लिहिलंय.
आमच्या घटक पदार्थांत अगोदरच मिसळलेले किंवा नैसर्गिक असे एम एस जी असेल तर माहित नाही पण आम्ही तरी आपणहून मिसळत नाही. (किती विश्वास ठेवावा?)
- मग एफ एस एस आइ वाले म्हणाले तरी पण यातून दिशाभूल होतेय, असे लिहू नका.
- मग मॅगी म्हणाले आता आहेत ती पाकिटं विकू दे आम्हाला, मग नविन पाकिटावरून हे वाक्यं काढून टाकतो.
- मग एफ एस एस आय म्हणालं 'नाही, आत्ताच काढा'
- मग मॅगी म्हणाले 'बरं, बरं, सगळी पाकिटे परत मागवून नविन मजकूर छापून विकतो.
Wink

३. तिसरा आक्षेप- मॅगी मसाला ओट नूडल्स विथ टेस्टमेकर हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणताना एफ एस एस आय ची परवानगी घेतली नाही.
-नेस्ले म्हणतं, 'अरे,अरे! स्वारी बरंका! गडबडीत राहूनच गेलं. आता लगेच घेऊन टाकतो परवानगी. हाय काय नी नाय काय!'

हे इतकंच.
बाकी काही नाही.

थोडक्यात काय, भारताच्या एफ एस एस आय ला आणि भारतीयांना 'काय म्हणतात ते' बनवायचे प्रयत्न चाललेत कंपनीचे.

मूळातून हा आरोप प्रत्यारोपाचा खेळ वाचायचा असेल तर लिंक देते.
किंवा एफ एस एस आय च्या साईटवर जाऊन गंमत वाचा.

आपल्या सगळ्यांची लाडकी अ‍ॅमवे कंपनीची प्रॉडक्टसही 'अप टु द क्रायटेरिया' नसल्याने वारंवार तुमची प्रॉडक्टस , त्यात एक लहान मुलांसाठीचे हेल्थ ड्रिंकही आहे मागे घेण्याचा इशारा(!) देणारी एफ एस एस आय ची पत्रकेही आहेत.
अजूनही मी कधी न ऐकलेली न ऐकलेल्या कंपन्यांची प्रॉडक्टस आहेत.

साती छान विवेचन आणी माहिती. मला प्रश्न हाच पडलाय या परदेशी कम्पन्या यान्च्या स्वतःच्या देशात असले लोकान्च्या आरोग्याशी खेळण्याचे धन्दे करतात का? माझ्या माहितीवरुन तरी परदेशात यान्चे नियम कडक आहेत. पण राहीले आपले भारतीय. तर ते डोळ्यावर पट्टी ओढुनच बसलेय. आपलेच लोक आपल्याच सरकारने बनवलेले नियम पाळत नाहीत, तर मग या परदेशी कम्पन्यान्चे फावणार नाहीतर काय?

आपण एकूणातच घराबाहेर तयार केलेले काय पदार्थ खातो त्याबद्दल चर्चा व्हावी. अनेक मोठ्या स्टार हॉटेल्समधेही किचनमधे स्वच्छता नसते. ( स्वतः बघितले आहे. )

पुर्वी कॉपर चिमनी मधे किचनमधले सर्व पाहता येत असेल. अजूनही असावे. माटुंग्याच्या मणिसमधलेही किचन तसे बंदीस्त नाही. त्यामुळे तिथे खायला मला आवडते.

पॅक्ड खाद्यपदार्थांबाबत आपल्याकडे कायदे आणि नियम आहेत पण त्यातही पळवाटा आहेत. स्पाईसेस खाली काय काय येते ते खुपदा लिहिलेले टाळलेले असते. व्हिनीगरचा उल्लेख ( खास करुन लोणच्यातला ) टाळलेला असतो. कोका कोलाचे घटक कधीच उघड होऊ शकत नाहीत.

साती, असे शाब्दीक खेळ होणारच. आधीही शिसे हे नैसर्गिक घटकातून ( पाणी ? ) आले असेल असे म्हणाले होते.

मूळात मॅगी ( किंवा तत्सम सर्वच ) नूडल्स डिप फ्राईड असतात, हे तरी किती जणांना माहीत असते. त्याशिवाय क त्या दोन मिनिटात शिजतात ?

पॅक्ड खाद्यपदार्थांबाबत आपल्याकडे कायदे आणि नियम आहेत पण त्यातही पळवाटा आहेत.
>>> आधी P.F.A. (Prevention of Food adulteration) act होता, तो जाउन FSSAI कायदा साधारण २०१०-२०११ मधे आला. पण अजुनही कायद्यातील काही तरतुदी आणी नियमांचा अर्थ खुद्द अथॉरीटी सांगु शकले नाहीयेत.

साती छान पोस्ट ..

थोडेसे अवांतर - काही ठिकाणी एक्स्पायरी डेट जवळ आलेले पदार्थ ऑफरमधे काढतात. मागे माझ्या आईला याची कल्पना नसल्याने कोल्ड्रींकच्या मोठाल्या बाटल्या निम्म्या किंमतीत आणलेल्या. नंतर मी पाहिले का एवढे स्वस्त तर समजले दोन दिवसांतच त्यांची एक्स्पायरी डेट आहे. जवळपास सर्वच फेकून द्यावे लागले कारण ते कोणाला वाटणेही योग्य वाटले नाही. आता गिर्हाईकांना त्याची कल्पना दिली होती का नाही हे ठाऊक नाही.

<< कोका कोलाचे घटक कधीच उघड होऊ शकत नाहीत. >>
त्यात मद्य मिसळलेले असते हे उघड गुपित आहे.

"<< कोका कोलाचे घटक कधीच उघड होऊ शकत नाहीत. >>
त्यात मद्य मिसळलेले असते हे उघड गुपित आहे." - चेतन सुभाष गुगळे, हे खरं आहे की 'मना'चे श्लोक?

सुरेख १,
अ‍ॅमवे (हायला, तुम्हीपण मोबाईलवरून लिहिताय वाट्टं!) कंपनीच्या प्रॉडक्टसचा वैयक्तिक अनुभव नाही.
पेशंटसचे अनुभव आहेत पण ते पेशंटसनी उगाच एजंटच्या भूलथापांना बळी पडून पॉकेटवरचे कंटेट न वाचता (टु बी अवॉइडेड इन रिनल डिसऑर्डर) बळी पडून घेतल्याने झालेत. त्यामुळे प्रत्यक्ष कंप्व्नीला जबाबदार धरता येईल असे वाटत नाही.

पण अश्या कंपनींची गंमत अशी आहे की त्या जेव्हा प्रॉडक्टस बाजारात आणतात तेव्हा प्रत्यक्षात औषध असे वर्गीकरण होऊन औषधांचे ड्रग अ‍ॅक्ट लागण्यापासून वाचण्यासाठी फूड प्रॉडक्ट म्हणून आणतात.
पण मार्केटींग मात्रं अ‍ॅनेमिया, कॅल्शिअम डिसऑर्डर यांची औषधे म्हणून करतात.
एफ एस एस अ आय ने त्यांना नोटीसांमागून नोटिसा पाठवल्यात की बुवा तुम्ही जे फूड म्हणताय त्यात काय फूड बीड नाही (तेव्हा विकायचेच असेल तर ड्रग अँड फार्मसी अ‍ॅक्ट खाली त्या ऑफिसकडून परवानगी घेऊन विका)
पण ते काय अ‍ॅम्वेवाले ऐकत नाहीत.
ही लिंक-
http://www.fssai.gov.in/Portals/0/Pdf/Recall_Letter_Amway.pdf

कोक, पेप्सी यांत पेस्टिसाइड तत्सम काही असते असे कधीतरी वाचलेले स्मरते. माझ्यापुरते सांगायचे तर ज्या ज्या उत्पादनांत रंग दिसतात, ते मी चुकुनही घेत नाही. त्याला पर्याय शोधते. चिप्सएवजी साधे वेफर्स घेते. लिंबु सरबत, नारळ्पाणी, फळे घेते. भारतात बाहेर फिरतानाही असेच उसाचा रस, शेवकुर्मुरे, कणसे असले unpackaged प्रकारच घेते.

आजकाल chocolates खाताना देखील वेगळिच चव जाणवते. माझ्या मुलाला चीझ प्रचंड आवड्ते. पण तेही इतक्या प्रकारांत मिळ्ते की माझी त्रेधा उडते सगळे घटक पदार्थ आणि प्रक्रिया वाचताना. overall, grocery shopping is exhausting these days. reading everything on the packets..

साती, तोंडाने घेताय ना मग ते फूडच.. अशी त्यांची व्याख्या असणार बहुतेक. त्यांचे मार्केटींग जबरदस्त आहे.

मॅगीच्या बाबतीत एक आहेच, कि हिमालयात ट्रेक करताना त्या उंचीवर पाणी उकळणे अवघड असते तिथे सहज शिजण्याजोगा प्रकार म्हणजे ह्या नुडल्स. मायबोलीवरच्या अनेक लेखातही हे उल्लेख आहेतच. त्याला पर्याय शोधावा लागेल.. (. जणू काही मॅगी पूर्वी ट्रेक्सच होत नव्हते. )

आपले म्हाराष्ट्रीय दूर्गप्रेमी पण यावरच अवलंबून असतात, गडावरच्या नाश्यासाठी !

कोकाकोलात मद्य हे माझ्यासाठी तरी नवीन आहे. चेतनजी काही खुलासा कराल का?

राया, आपल्या पोस्टमध्ये ऊसाचा रस वाचून एक सहजच आठवले, जर ऊस व्यवस्थित साफ नसेल तर त्याचा रस त्रास देऊ शकतो. माहीतीचा स्त्रोत माझी आई - या कारणास्तव ती मला लहानपणी ऊसाचा रस आवडत असूनही कुठेही पिऊ द्यायची नाही.

साती, माझ्या नात्यत अ‍ॅमवे प्रॉडक्ट वापरणारे खुपजण आहेत a to z सागळ्या वस्तु.

मला ते सगळ खुप महाग वाटते.

माझ्या मुलांनी लहानपणी खुप मॅगी खाल्ली आहे. मि त्यात भाज्या घालायची मटार, गाजर ऑम्लेट वगैरे आता

वाटत आहे आपण चुकिचे तर नव्हतो ना करत? पण आता वाटुन काय उपयोग!

पालकांनी मुलांच्या आहाराच्या बाबतित खुप सजग रहायला पाहिजे.

मूळातून हा आरोप प्रत्यारोपाचा खेळ वाचायचा असेल तर लिंक देते.
<<
देऊन मोकळे व्हावे. वाचायचा असेल वगैरे कल्पनाविलास करू नये, हे न वि.

Pages