"बस दो मिनट" च्या निमीत्ताने

Submitted by गिरीकंद on 10 June, 2015 - 02:21

चिंगी आणी मॅगी हा लेख आणी त्यावरील प्रतिसाद वाचताना एकुणातच पॅकेज्ड फुड्स आणी त्यातील असणारे/असु शकणारे हानीकारक घटक, त्या अनुषंगाने होऊ शकणारे दुष्परीणाम, उत्पादक कंपन्या अन्नसुरक्षा मानकाने घालुन दिलेल्या नियमांचे कितपत काटकोर पणे पालन करत असतील, एक जागरुक ग्राहक या नात्याने आपण काय करु शकतो, असे बरेच प्रश्न मनात उभे राहीले.
तर या निमीत्ताने आपले अनुभव, शंका, माहिती, प्रश्न येथे शेअर करुया का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असं नाही हो काका,
लोकांना आठ आठ पानांच्या लिंका वाचत बसायला वेळ नसतो , मग वरवरचं वाचून काहितरी निष्कर्ष काढला जातो.
काही लोक म्हणतात 'थोडक्यात मराठीत लिहा'
बघा , आता तुमच्याशिवाय कुणी लिंकविषयी काही विचारलं का?
Happy

वै.म. - लिंक दिली तर चालतं पण त्याबरोबर थोडक्यात सारांशपण द्यावा. नुसतीच लिंक देऊन 'बसा वाचत' म्हटले की माझ्याकडुन तरी पुर्ण वाचली जात नाही सहसा.

मॅगी खाऊ नकोयाच. ते नेसलेवाले काही का सारवासारव करुदेत. (आजवर फारच कमी खाल्लीये या जाणिवेने हुश्श्य)

शंकासूरांकरिता स्पष्टीकरण

http://www.dailymail.co.uk/news/article-2165422/Coke-Pepsi-contain-tiny-...

No wonder so many people like it! Coke and Pepsi contain ALCOHOL, reveals French research

Tests reveal more than half of leading colas contain minute traces of alcohol

Read more: http://www.dailymail.co.uk/news/article-2165422/Coke-Pepsi-contain-tiny-...
Follow us: @MailOnline on Twitter | DailyMail on Facebook

Coca-Cola and Pepsi contain minute traces of alcohol, scientific research published in France has revealed.

The revelation will cause concern among those who chose the carbonated soft drink for religious, health or safety reasons.

According to tests carried out by the Paris-based National Institute of Consumption (INC) more than half of leading colas contain the traces of alcohol.

Read more: http://www.dailymail.co.uk/news/article-2165422/Coke-Pepsi-contain-tiny-...
Follow us: @MailOnline on Twitter | DailyMail on Facebook

नाही पण ज्यानी खुप मॅगी खाल्ली त्यांच काय?
काही उपाय खबर्दारी.. की आता जाउ दे.. झाल ते झाल
किती/ काय परिणाम झाला असेल नियमीत/ कधी कधी/ खुप खाणार्या लोकांवर..
याबद्दल कुठेच काही सापडल नाही..

आनंदी,
शरीरातील शिसे वाढल्यास म्हणजे एका ठराविक लेव्हलपेक्षा जास्त झाल्यास काही ठराविक लक्षणे दिसतात.
डॉक्टरकडे गेल्यास त्यांना नखांमध्ये, त्वचेवर काही विशिष्टं लक्षणे दिसतात.

भारतात रक्तातील लीड टेस्ट करून घ्यायची सोय सहजरित्या मोठ्या शहरांत उपलब्धं आहे.
आम्ही लहान गावातले लोक मुंबईला रक्तं पाठवून टेस्ट करून घेतो.
(मला वारंवार करावे लागते कारण इथले लोक त्या त्या पॅथीच्या तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याखेरिज सांगोवांगीवर सो कॉल्ड आयुर्वेदिक / युनानी औषधे किंवा गावठी उपचार घेतात.
तसेच आमच्या परिसरात थोडे मायनिंग असल्याने वर्कर्सच्या फिटनेस टेस्टमध्ये हेवी मेटल टेस्ट करतो)

अजिनोमोटोची रक्तातील टेस्ट इथे सहजरित्या अवेलेबल आहे का ते मला माहित नाही. कधी करायची वेळ आली नाही.

पण उगाच आपल्या मनाने टेस्ट करण्यापेक्षा आपल्या फिजीशीयनला किंवा लहान मुलांबाबत शंका असेल तर आपल्या पेडिअ‍ॅट्रिशीयनला दाखवा.

धन्यवाद साती,
लक्षणांच्या यादीतील; Declines in mental functioning, Memory loss, Mood disorders इत्यादी वाचून मायबोलीवरील काहीजण मॅगीचे नियमीत ग्राहक असावेत याची खात्रीच पटली.

अवांतर :

चेतन सुभाष गुगळे,

कोकाकोलात मद्यार्क फार कमी प्रमाणावर असतो. कोकाकोलाची चटक लागते. तशी लागण्याचं कारण त्यात कोकेनचा अंश आहे. १९१४ साली अमेरिकेत कोकेनमिश्रित पेयांवर बंदी घालण्यात आली. तत्पूर्वी कोकेनमिश्रित पेये लोकं सर्रास पीत. कोकाकोला १८९६ साली प्रथम निर्माण झाला तेव्हा त्यात कोकेन होतंच. हल्ली थेट कोकेन मिसळण्याऐवजी कोकोच्या पानांचा अर्क असतो असा अंदाज आहे.

संदर्भ : http://www.livescience.com/41975-does-coca-cola-contain-cocaine.html

स्वानुभव : मला स्वत:ला दोनदा तत्सम पेयांची चटक लाली होती. पहिल्यांदा कोकाकोलाची आणि नंतर स्प्राईटची. दोन्ही वेळेस इथे इंग्लंडमध्येच होतो.

आ.न.,
-गा.पै.

@ गामा_पैलवान_५७४३२
धन्यवाद.

तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तर ही पेये अधिकच घातक आहेत असे समजते.

कोकाकोला किंवा बहुतेक सर्व कार्बोनेटेड पेयां मध्ये कॅफिन असते.
कॅफिन असण्या नसण्याचा चवीवर काहीही परिणाम होत नाही. पण असे असूनही कंपन्या कॅफिन वगळायला तयार नाहीत.
तसेच यात मोठ्या प्रमाणात साखर असते. एका कॅन मध्ये सुमारे ४० ग्रॅम साखर असते.

हे पेय प्यायल्यावर शरिराला भरपुर साखर मिळते. त्यामुळे क्षणिक ताजेपणा येतो. याच वेळी कॅफिन मेंदूवर कोरण्याचे काम करते! डोपामाईन नावाची संप्रेरक मेंदू सोडतो. मग आनंदी वाटू लागते. कॅलशियमची अचानक मोठी झीज होते.
शरिराला साखर आणी त्या अनुषंगाने येणारे ताजेपण याची चटक लागण्याची सुरुवात कॅफिनमुळे होते... आणि मेंदू परत परत ते मागू लागतो. पण मग साखर शरिराला पचवायला लागते. याचा किडन्यांवर गंभीर प्रैणाम असतो. साखर जिरली की काही काळात शरीराला सुस्ती येते. निराश वाटू लागते. मग परत एक कॅन...

खरे तर शरिराला प्राणवायू हवा असतो. शरिर कार्बनडाय ऑक्साइड बाहेर टाकत असते.
त्या नैसर्गिक क्रियेच्या विरोधात जाऊन कार्बोनेटेड पेयांद्वारे कार्बनडाय ऑक्साइड शरिरात कोंबणे, हे पुर्णपणे अनैसर्गिक नाही का?

कॅफिन मुळे फर्टिलिटी कमी होते, लहान मुलांनी प्यायले तर दातांचे प्रश्न तयार होतात.

या कॅफिन मुळे अजून काय काय वाट लागते ते इथले तज्ञ सांगतील...
मग कशाला प्यायचे असले प्रकार हे मला कळत नाही...

कोणतीही पॅकेज्ड अन्न विकणारी कंपनी करणारी तुम्हाला आरोग्यदायी बनवण्यासाठी काम करत नाही.
ती फक्त नफ्यासाठी काम करते!

यापुढे कोणतेही प्रोसेस्ड अन्न घेतांना विचार करणे आवश्यक आहे...

~पुर्व प्रकाशित लेख~

कॅफिन
कॅफिनेटेड कोला सॉफ्ट ड्रिंक्स चा खप प्रचंड का होतो, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. कोक अथवा पेप्सि या कंपन्यांच्या नफ्याचे आकडे पहिले तर वर्षानुवर्षे या कंपन्या जगातून किती पैसा गोळा करत आले आहेत याची जणिव होते. या कॅफिनेटेड कोला सॉफ्ट ड्रिंक्स चा खप सदैव चढत्या आलेखात कसा ठेवू शकतात? असे काय त्या ड्रिंक्स मध्ये आहे तर पाणी, साखर, कार्बनडाय ऒक्साईड आणी कॅफिन. इथे गोम आहे. या ड्रिंक्समध्ये कॅफिन आहे. बहुतेक सगळ्या सॉफ्ट ड्रिंक मध्ये असणाऱ्या कॅफिन चा गुणधर्म हा त्या पदार्थाची चटक वा व्यसन लावण्यासाठी होतो. हा निष्कर्ष मेलबर्न येथील डिकिन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी काढला आहे. आर. जे. किस्ट व इतर, या शास्त्रज्ञांचा लेख 'ऍपेटाइट' या जरनल (२००५) मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या प्रयोगा नुसार, असे सिद्ध झाले की, कॅफिन मुळे कोक च्या चवी वर कोणताही परिणाम होत नाही. या प्रयोगात लोकांना कोक आणी कॆफिन नसलेले कोक सारखे पाणी दिले गेले परंतू कोणालाही, चवी मधला ऒळखता आला नाही!

का हे कॅफिन?
मग तरी पण कोक अथवा पेप्सी सारख्या पेयां मध्ये कॅफिन का घातले जाते? याचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात हे सत्य बाहेर आले की, कॅफिन नर्व्हस सिस्टिम वर परिणाम घडवून, मेंदूला परत परत तोच पदार्थ मिळवण्यासाठी उद्युक्त करते. कोक म्हणजेच कॅफिनयुक्त साखर असलेले द्रव्य मिळाल्याने आलेले तरतरी मेंदू लक्षात ठेवतो. आणि त्याच संबंध कोला पेयाशी जोडतो. थोडक्यात व्यसनाची सुरवात घडवून आणली जाते.
लहान मुलांवर तर कॅफिन जबरदस्त परिणाम घडवते. नकळतपणे मुले जास्त जास्त कॅफिनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स मागू लागतात, आणी या व्यसनाच्या अधीन होतात. हे सगळे तुमच्या नकळत पणे घडवले जाते. या संदर्भात एक जुने दंत-मंजनाचे उदाहरण आठवते. आपलेच दंत मंजन चालावे म्हणून पूर्वी त्यात तंबाखू घातली जात असे. रोजच तंबाखू चे सेवन केल्यामूळे त्याचे व्यसन लागत असे. त्यामुळे रोज सकाळी तास तासभर तोंडात बोट घालून बसलेले अनेक जण दिसत. तसे आता कॅफिन मुळे सवय लागलेले कोक ची बाटली घेतलेले दिसतात!

नक्की परिणाम?
कोक पिण्याची सुरवात झाली की सर्वसाधारण पणे दूध पिणे कमी होते. काही वेळा याचा संबंध 'मी आता मोठा झालो' असाही जोडला जातो. हे आपण थम्प्स-अप विरुद्धं पेप्सी या जाहिरातीतून पाहिले आहेच. दूध कमी करून कॅफिनेटेड कोला घेतला तर काय परिणाम होतो या संदर्भात मेटे क्रिस्तेन्सेन व इतर यांनी एक प्रयोग केला. फक्त दहा दिवस चाललेल्या या प्रयोगात असे सिद्ध झाले की, दुधा ऐवजी कॅफिनेटेड कोला प्यायले असता, हाडांची झीज मोठ्या प्रमाणात होते. अर्थातच सदैव कॅफिनेटेड सॉफ्ट ड्रिंक प्यायल्याने ही झीज अनेकदा भरून काढण्याच्या पलीकडे जाते. हाडे ठिसूळ होऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या विकाराला ऒस्टेओपोरोसिस (?) असे नाव आहे.
सदैवच कॅफिन आणि साखर पित राहील्याने पित्ताचे प्रमाण शरिरात वाढते रहाते. त्यामूळे यकॄताला जास्त काम करावे लागते. किडन्यांवर त्याचा ताण येतो. अश्या रीतीने विकरांची मालिकाच सुरु होते. (कुणी काही संदर्भ देवू शकेल काय?)

कोण असे म्हणते?
या शिवाय वूल्फगाँग व इतर यांनी केलेल्या प्रयोगात मानसिक ताण-तणाव कमी जास्त होण्याच संबंध कॅफिनेटेड कोला पेयांशी आहे हे सिद्ध करून दाखवले आहे.
कोक आणि पेप्सी सॉफ्ट ड्रिंक चे युद्ध अमेरिकेत, ऐंशीच्या दशकात जोरात होते, त्यावेळी, कोक ने आपले धोरण बदलले. नवीन धोरणानुसार सॉफ्ट ड्रिंक ने सर्व नैसर्गिक पदार्थांची जागा व्यापली पाहिजे असे निश्चित केले. हे घडवून आणण्यासाठी, अमेरिकेच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात कोक चे फ्रीजेस बसवले गेले. कॉफी, चहा आणी दूध या सर्वांची जागा कोक ने मिळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे अर्थातच कंपनी चा सॉफ्ट ड्रिंक खप प्रचंड वाढला. परंतु याचे भयाण परिणाम अमेरिकन जनतेवर झाले. एका बाटली मध्ये सधारण दहा चमचे साखर असते. (संदर्भ?) सदैव साखर पाणी पित राहील्याने जाडपणा वाढला. (संदर्भ?)

तेथे आता डायबेटीस आणी ओबेसिटी अर्थात जाडपणाचा सरळ संबंध कोक शी जोडला जातो आहे.(संदर्भ?) हा संबंध उघड झाल्यावर, आपला खप खाली येऊ नये म्हणून, शुगर फ्री ड्रिंक्सचा उपाय या काढला गेला. पण नैसर्गिक साखर न वापरता आणलेला गोडवा आणि त्याचे शरीरावर दुष्परिणाम याविषयी संशोधन अजून व्हायचे आहे. एकेकाळी अमेरिकेत कॅफिनेटेड कोला सॉफ्ट ड्रिंक्स पिणे 'कूल' होते, ते आता 'डंब' आहे. आता फ्रेश फ़्रुट ज्युसेस पिणे 'कूल' मानले जात आहे! (संदर्भ?)

कोण घेणार मग?
प्रगत राष्ट्रांमध्ये आरोग्यविषयक सामाजिक जाणिव वाढली आणि या कॅफिनेटेड कोला सॉफ्ट ड्रिंक्स कंपन्यांचा खप खाली आला आहे. त्यामुळे त्यांना भारता सारख्यादेशां मध्ये हे कोला सॉफ्ट ड्रिंक्स खपविण्याशिवाय पर्याय रहिलेला नाही. कारण नफा मिळवणे हा एकमेव उद्देश या कंपन्यांचा आहे. त्यांना तुमच्या आरोग्याची काळजी असण्याचे कारणच नाही. जेंव्हा तुम्ही कोला सॉफ्ट ड्रिंक विकत घेता तेंव्हा या प्रचंड नफ्याचा पैसा कंपन्यांकडे जातोच आणि डॉक्टर ची बिले तुम्ही भरता. म्हणजेच तुम्ही, कंपन्यांना पैसा पुरवता, डॉक्टर, डेंटिस्ट, हॉस्पिटल ची बिले भरता, आणी असेलच तर मेडिकल इन्शुरंस चा वाढलेला हप्ता पण भरता! आणी हे सगळे वारंवार घडत रहावे म्हणून तुमच्या मेंदूवर कॅफिन काम करत रहाते.

वैधानीक इशारा?
कॅफिन वर प्रयोग करणारे डॊ. हेरल्ड आणि आर. जे. किस्ट, या प्रयोगाच्या शास्त्रज्ञांनी तर असे म्हटले आहे की, हे पेय कोणत्याही अठरा वर्षा खालील व्यक्तीस विकू नये. शिवाय 'व्यसन लागू शकते' असा वैधनिक इशारा कॅफिनेटेड सॉफ्ट ड्रिंक वर छापला पहिजे!
या या शास्त्रज्ञांचे प्रयोग प्रसिद्ध झाल्या पासून कोणतेही कॅफिनेटेड सॉफ्ट ड्रिंक शाळेत विकण्यावर बंदी घालण्यासाठी अनेक सरकारांवर वर दबाव येतो आहे. भारतातही या सर्व गोष्टींची जाणिव सर्व सामान्य माणसा पर्यंत गेलीच पहिजे. आणी आपण सर्वांनी कॅफिन ला नको म्हंटले पाहीजे.

२७-०९-२००७

याला संदर्भ म्हणता येणार नाही पण या लेखा साठी
http://lib.bioinfo.pl
http://www.21food.com
http://www.newstarget.com/003228.html
http://www.theage.com.au/news/national/coke-in-the-firing-line-as-caffei...
या वेब साईट्स चा उपयोग केला आहे.

जेवण अथवा नाश्त्याबरोबर कोकादि पेये पिणारी मंडळी तर डोक्यातच जातात माझ्या... पुन्हा ती तसली कॉम्बोज . पिझ्याबरोबर कोक इत्यादि....

हो होतात.
पण आपण कॉफी किंवा चहा घेताना त्यात १० चमचे साखर घालत नाही. त्यामुळे जरा कमी.
शिवाय कॉफीतले कॅफिन चे प्रमाण आणि कोक मधले मिसळलेले प्रमाण हे ही निरनिराळे असणार ना?
जास्त परिणाम साधण्यासाठी असलेले प्रमाण तसे दुष्परिणाम करेल.

पण चहा कॉफीचे व्यसन आजूबाजूला आपण पाहतोच ना... कारण स्वच्छ आहे.

सातीतै मग तुम्हीही ४-५ महिन्यातून एकदा डोक्यात जाणार. प्रश्न तत्वाचा आहे... ::फिदी:

काही वर्षापूर्वी म्हणे कोक वर प्रयोग केला होता. कोक मध्ये ( कोकाकोला, पेप्सी ) एक दात बुडवुन ठेवला सहा ते सात तास. नन्तर काढुन पाहीला तर झिजला होता. कोकमध्ये एका छोट्या बाटलीत ६ ते ८ चमचे साखर असायची. आता काय ते शुगर फ्री/ डाएट फ्री फॅड आलय.

निनाद उत्तम माहिती दिलीत.

जेवण अथवा नाश्त्याबरोबर कोकादि पेये पिणारी मंडळी तर डोक्यातच जातात माझ्या... पुन्हा ती तसली कॉम्बोज . पिझ्याबरोबर कोक इत्यादि...>>>>> आपण नाही का हॉटीलात इडली वा डोसा वा वडापाव खाल्ल्यावर चहा-कॉफी मागवतो तसेच हे.:फिदी::दिवा:

चहा-कॉफी मध्ये पण कॅफीन व टॅनिन असतेच. काही महाभाग दिवसाला ७ ते ८ कप चहा रिचवु शकतात की.( मी होते त्यात सामिल.:फिदी: पण मी फुल कप पीत नव्हते, तरी ४ कप निश्चीत होत होता)

कसं आहे की मी काय खाणार ते मी ठरवेन याबाबत काही स्वातंत्र्य देशाने आपल्याला दिलंय.
अगदीच अंमली पदार्थं सोडले तर अगदी सिगरेट, विडी, दारू यांवरही भारतात बर्‍याच ठिकाणी बंदी नाही.
एका सज्ञान व्यक्तीला आपल्या भल्याबुर्‍याची जाणीव असते असे देश समजतो:
पण मी एरवी दारू पिते/ पितो म्हणून उद्या कुणी मला लिंबूसरबतात अल्होहोल गुपचूप मिसळून पुन्हा वर 'नॉनाल्कोहोलिक'असं खोटं लेबल लावून विकलं तर चालणार नाही.
मुलांना तर स्वतःचे भलेबुरे समजायची ताकद नसते. त्यांच्यासाठी खास स्नॅक्स्/पेये विकून त्यात अल्कोहोल किंवा अ‍ॅडिक्टीव्हज गुपचूप मिसळून चालणार नाही.

मी स्वतःच्या मनाने दोन चमचे पर कप साकर घातलेल चहा घेईन पण तुम्ही लो शुगर कंटेंट लिहून दहा चमचे साखर घातलेले कोल्डड्रिंक मला फसवून विकू शकत नाही.

मुख्य मुद्दा फसवाफसवीचा आहे.

Kola nut असे सर्च करून बघा. हे नायजेरियातले फळ आहे. त्याचा अंश पुर्वी कोका कोला मधे असायचा. कोका कोला मधल्या कोला या शब्दाचा उगमच तो आहे.

कोक हा दगडी कोळश्याचा एक प्रकार आहे. बहुधा त्याचा अर्क कोक्/कोका कोला मध्ये मिसळत असावेत ...
म्हणून कोक डार्क जाम्भळाही दिसतो....

Coke is a fuel with few impurities and a high carbon content, usually made from coal. It is the solid carbonaceous material derived from destructive distillation of low-ash, low-sulfur bituminous coal.

सौजन्य : विकीबाब

Pages