स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अॅप ... भाग -१
नुकत्याच घेतलेल्या स्मार्टफोनवर एक अॅप आढळले - स्केच नावाचे. त्याच्याशी खेळताना लक्षात आले की हे पाटी पेन्सिलसारखे आहे. सेलचा स्क्रीन ही पाटी आणि आपले बोट ही पेन्सिल - वेगवेगळे रंग, खोडरबर(इरेजर) अशा गोष्टी सापडल्यावर माझ्या मनातले मूल जागे न झाले तरच नवल...
लहान मुलांना प्राणी - पक्षी यात सर्वात जास्त इंटरेस्ट असल्याने हे उंदीर, ससा मी नेहमीच कुठल्याही कागदावर काढत असतो - तेच पहिल्यांदा काढायचा प्रयत्न केला ...
मग जरा हात (नाही, नाही बोट) बसल्यावर इतर काही काढायचा प्रयत्न केलाय ....
मात्र हे सारे रेखाटताना अनेक अडचणी आल्या - उदा. - पेन्सिलने रेखाटताना रेष कुठे सुरु होते, कुठे संपते ते लक्षात येते. इथे बोटाची जी बाजू स्क्रीनवर टेकते ती दिसतच नाही, त्यामुळे रेष कुठे सुरु होते हे कळतच नाही त्यामुळे अनेक गमती जमतीच होतात - हे सारे कसे टाळता येईल - कृपया कोणाला याचा अनुभव असल्यास मार्गदर्शन करणे.
मा बो वर अनेक दिग्गज चित्रकार, कलाकार असल्याने त्यांच्याकडून काही शिकता येईल असे वाटल्याने इथे देत आहे इतकेच .....
एखादे चित्र पुन्हा पुन्हा पाहून काढण्याकडे माझा कल असल्याने ही सर्व चित्रकला कोणालाही बाळबोध वाटणे अगदी सहाजिकच आहे ....
गुढीपाडव्याच्या रात्री गुढी कशी दिसेल अशी कल्पना करुन हे एक चित्र ....
या सर्व चित्रात काही त्रुटी आढळल्यास त्यात सुधारणा कशा करता येतील हे जरुर कळवणे ....
धन्यवाद ....
----------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/55316 - भाग २
अरे वा! फार छान.
अरे वा! फार छान.
कोंबडा, केळीचे पान सुरेख!
कोंबडा, केळीचे पान सुरेख!
एखादे बोथट पेन/पेन्सील (ज्याने फोनच्या स्क्रीनवर ओरखडे येणार नाहीत) बोटाऐवजी वापरता येऊ शकेल. पूर्वीच्या एखाद्या मोबाईलचा स्टायलस असला तर...
आम्ही अनुभव घेतला आहेच !
आम्ही अनुभव घेतला आहेच ! मूळात चित्रकला अंगी हवी ना
केळीचे पान मस्तच जमलय.
केळीचे पान मस्तच जमलय.
वा! मस्त आहेत चित्रं
वा! मस्त आहेत चित्रं
केळीचे पान मस्तच जमलय. +१
केळीचे पान मस्तच जमलय. +१
केळीचे पान सुरेख + १०० बाकी
केळीचे पान सुरेख + १००
बाकी चित्रपण मस्त आहेत
माहिती साठी धन्यवाद शशांक
माहिती साठी धन्यवाद शशांक जी,
चित्रे आवडली,अँप बददल माहिती हवी होती ती द्यावी हि विनंती
फारच छान!!
फारच छान!!
केळीचे पान मस्तच जमलय. +१
केळीचे पान मस्तच जमलय. +१
माझाही हाच अनुभव आहे.
माझाही हाच अनुभव आहे. स्टाइलसच्या शोधात.विंडोजवर PicsArt आहेच आणि Fantasia Painter Free हे एक अफलातून आहे ते डालो केलंय.एखाद्या फोटोवर बाणाने खुण करणे ,शब्दास अथवा फोटोतल्या चेहेर्याभोवती वर्तुळ करणे इत्यादी खरीच कामाची सोय आहे.
केळीचे पान मलाही आवडले.
कागदावरच्या रंगचित्रांत पांढरा(रंग) भाग दाखवणे /रंगवणे किचकट असते ते इथे अगदी सोप्पे आहे.
स्क्रिन (६इंच)मोठ्ठा तेवढी मज्जा वाढते.
पुर्वी एक खेळणीवाला टोपलीत खेळणी घेऊन फिरायचा. त्याच्याकडे गुजरातकडचे छोटे वायोलिनसारखे खेळणे असायचे त्याची आठवण आली--बाबा रमाडे बापु रमाडे --ओरडायचा-मुलगा खेळेल मुलाचा बाप खेळेल.
कोंबडा, केळीचे पान सुरेख! +१
कोंबडा, केळीचे पान सुरेख! +१
भारी.. बोटाच्या टोकांत जादू
भारी.. बोटाच्या टोकांत जादू आहे
कोंबडा आणि ससा आवडला विंडोज
कोंबडा आणि ससा आवडला
विंडोज मधे हे अॅप आहे का शोधना पडेगा ..
Windows वरती Fantasia--
Windows वरती
Fantasia--
fantasia painter free
PicsArt
pics art app
मस्त
मस्त
केळीचे पान फारच जिवन्त आले
केळीचे पान फारच जिवन्त आले आहे...मोबाइलवर काढलय हे क्शण भर लक्शातच नाहि येत...
किती सुंदर स्केचेस! ससुल्या
किती सुंदर स्केचेस! ससुल्या (दोन्ही), उंदिरमामा, केळीचं पान, कोंबडा ही स्केचेस अगदी जमलीच आहेत
धन्यवाद या अॅपबद्दल सांगितल्याबद्दल, लेकाला दाखवते आता.
शशांक मस्तच आहेत स्केचेस!
शशांक मस्तच आहेत स्केचेस!
सर्वांचे मनापासून आभार.......
सर्वांचे मनापासून आभार.......
एखादे बोथट पेन/पेन्सील (ज्याने फोनच्या स्क्रीनवर ओरखडे येणार नाहीत) बोटाऐवजी वापरता येऊ शकेल. पूर्वीच्या एखाद्या मोबाईलचा स्टायलस असला तर... >>>> या सोनी एक्सपेरियावर बोटाशिवाय काहीही वर्क होत नाहीये...
अँप बददल माहिती हवी होती ती द्यावी हि विनंती >>>> मी हा सेल फोन घेतला तेव्हा बिल्ट-इन अॅप होते हे - त्यामुळे हे कसे डाऊनलोड करायचे याची माहिती नाहीये ...
असे दिसते हे अॅप....
कागदावरच्या रंगचित्रांत पांढरा(रंग) भाग दाखवणे /रंगवणे किचकट असते ते इथे अगदी सोप्पे आहे.>>>> मला स्वतःला तरी हे फारच चॅलेंजिंग वाटले -(बोट बॉर्डरपर्यंत जाते का नाही ते कळतच नाही ) ......
पण एकंदरीतच ज्याला चित्रकलेची आवड आहे त्याला हे अॅप वापरताना आवडेलच अशी आशा आहे ...
लहान मुलांना तर पाटीवर काहीतरी गिरगटून ठेवणे वा लगेच पुसणे हे फार आवडते - टाइम किलिंगकरता त्यांना हे मस्त वाटेल (अर्थातच काही वेळ... ) जरा जाण असणारी मुले काही तरी क्रिएटिव करु शकतील असे वाटते ....
पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद ....
केळीचे पान आणि कोंबडा मस्तच
केळीचे पान आणि कोंबडा मस्तच
मस्तय हे टूथ पिक उलट्या
मस्तय हे
टूथ पिक उलट्या बाजुने वापरली तर जमेल का?
किंवा मग करंगळी
टूथ पिक उलट्या बाजुने वापरली
टूथ पिक उलट्या बाजुने वापरली तर जमेल का? >>>> नाही फक्त बोटाचाच वापर करावा लागतोय !!
किंवा मग करंगळी >>> करंगळीचा वापर करता येतो इथे, पण इंडेक्स फिंगरने जे जमते ते करंगळीने नाही जमत ना !!! सर्व प्रयत्न करुन झालेत माझ्याकडून तरी .... पण खूप मजा येते याप्रकारे चित्र काढताना - एकदम चॅलेंजिंग प्रकार आहे हा ....
शशांक, काय जादू आहे तुमच्या
शशांक, काय जादू आहे तुमच्या बोटात. केळीचं पान सर्वात आवडलं.
" शशांक, काय जादू आहे तुमच्या
" शशांक, काय जादू आहे तुमच्या बोटात. केळीचं पान सर्वात आवडलं." ....सहमत.
क्या बात है! खुपच छान. गुढी आणि कोंबडा पण मस्तं.
सर्वांना मनापासून धन्स ....
सर्वांना मनापासून धन्स ....
केळी चे पान अस्सल साधले आहे
केळी चे पान अस्सल साधले आहे साहेब!! कोंबड़ा सुद्धा
खूप छान.. केळीचं पान मस्त
खूप छान.. केळीचं पान मस्त जमलंय..