Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
जे च्युत करता येत नाही ते.
जे च्युत करता येत नाही ते. अच्च्युत नाम असेच आहे ना? त्यावरूनचे विशेषण वाटते. (ज्ञानदीप मोमेंट असेल तर शहाणे करून सोडा.)
<अच्च्युत्य म्हणजे काय, ते
<अच्च्युत्य म्हणजे काय, ते शोधतोय> हेच लिहिणार होतो. टण्यांनी अर्थ विचारला नाही म्हणजे तो माहीत असावा किंवा ....
सीमंतिनी : दोन च
सीमंतिनी, ते 'अच्युत'
सीमंतिनी,
ते 'अच्युत'
'अच्च्युत्य' म्हणजे काय, हे बहुतेक फक्त आपले मान्नीय मंत्री श्री. मुनगंटीवारच सांगू शकतील.
ज्ञानदीप लागला...
शब्द असेल तर शब्दार्थ
शब्द असेल तर शब्दार्थ विचारणार!
चिन्हांकितः इंग्रजी स्टार्ड वा अंडरलाइन्ड या शब्दाचे मराठी रूप का? मुंगटीवारांचे प्रातिभ दिसतेय!
येस्स, highlighted / starred.
येस्स, highlighted / starred.
'अल्लाघरची गाय' म्हणजे काय?
'अल्लाघरची गाय' म्हणजे काय?
चिन्हांकित हा शब्द असलेले
चिन्हांकित हा शब्द असलेले अर्थसंकल्पाच्या भाषणातले हे वाक्य : (पान १२, शेवटच्या दोन ओळी)
"या सर्व कामांसाठी नियोजन विभागाअंतर्गत अवितरित नियतव्ययापैकी ५० कोटी रुपये नियतव्यय चिन्हांकित केला आहे."
असाच निधी अनेकदा चिन्हांकित केलेला दिसतोय.
अवांतर : बाकी मुनगंटीवार हे
अवांतर : बाकी मुनगंटीवार हे मिनी जावडेकर आहेत, कधिही चेहर्यावर हास्यच विलसत असते.
'अल्लाघरची गाय' म्हणजे काय?
'अल्लाघरची गाय' म्हणजे काय? << जिच्या मानेवर कधीही सुरी फिरवली तरी चालते.. असा समज असावा...
प्लीज ला च लावून बनवलेला शब्द
प्लीज ला च लावून बनवलेला शब्द प्लीजच बरोबर आहे का?
गोगा
गोगा
प्लीजच.. ? मुळात English
प्लीजच.. ? मुळात English शब्द.. त्याला काहीही लावा..
तराणे / तराणा म्हणजे
तराणे / तराणा म्हणजे काय
मराठी गाण्यात शब्द ऐकला आहे
चिन्हांकित हा शब्द असलेले
चिन्हांकित हा शब्द असलेले अर्थसंकल्पाच्या भाषणातले हे वाक्य
>>
या चिन्हांकित शब्दाची लोकसत्ताने अग्रलेखात यथेच्छ टिंगल केली आहे पण मुनगंटीवाराना खरे तर 'इअरमार्क्ड 'असे म्हणायचे होते . त्या त्या योजनेकरता तेवढा निधी राखून ठेवला आहे , निश्चित केला आहे -- इअरमार्क्ड केला आहे-- चिन्हांकित केला आहे असे त्याना म्हणायचे होते. तो शासकीय स्लँग आहे. राहता राहिले अच्चुत्य शब्दाचे... तर त्यांच्या त्या उच्चारांची टिंगल 'वेदांचा तो अर्थ आम्हासिचि ठावा, येरांनी वहावा भार माथा" या सेक्टर मधून येणे तसे अनैसर्गिक नाहीच ना.....
तराणे / तराणा म्हणजे
तराणे / तराणा म्हणजे काय
मराठी गाण्यात शब्द ऐकला आहे>>
जाई शास्त्रिय संगीतामधे तराणा हा गाण्याचा प्रकार आहे. त्याला शब्द नसतात. जसे की: नादीर तन न तन.. नादीर तन न न.. नादीर तननन! दिर दिर दिर तुम दिर दानी.. तुम दिर दिर दिर दानी ...
आता तू नाव काढले आहेस तर लताबाईंचा हा एक तराणा ऐकच!!! प्लीजच
https://www.youtube.com/watch?v=ddwdk7YelI0
इन्ग्लिश मध्ये 'कांगारू शब्द'
इन्ग्लिश मध्ये 'कांगारू शब्द' असा एक मजेदार प्रकार आहे. म्हणजे एका मोठ्या शब्दात साधारण त्याच अर्थाचा एक छोटा शब्द दडलेला असतो. उदा. curtail मध्ये cutआहे. असे कांगारू शब्द बनवताना एक अट असते. मोट्या शब्दातून अक्षरे घेताना सर्व अक्षरे सलग घेता येत नाहीत. उदा. enjoy मधून joy नाही चालत.
........
जरा विचार केला की मराटीत असा प्रयोग जमेल का?
....दोन उदा. सुचलीतः
१. 'महानगरपालीका' पासून 'महापालीका'
२. 'तळागाळातील' पासून ' तळातील'.
ज्यांना अजून जमतील त्यांनी जरूर लिहा...
कुमार१, समानार्थी -->
कुमार१,
समानार्थी --> समार्थी
कवटाळणे --> कवळणे
जल्पणे --> जपणे = जप करणे
आ.न.,
-गा.पै.
अमोरासमोर हा शब्द बरोबर आहे
अमोरासमोर हा शब्द बरोबर आहे का? असल्यास त्याचा अर्थ काय?
अमोरसमोर हा शब्द बोली भाषेत
अमोरसमोर हा शब्द बोली भाषेत असावा. विशीष्ठ प्रसंगी वर्णनत्मक असा वापरतात. एखाद्या प्रसंगाचे वर्णन करताना जास्त नाट्यमयता उभी करायची असेल तर. उद. दोन्ही पहिलवान अमोरासमोर उभे ठाकले.
जस आपण वाघ-बीघ असा शब्द वापरतो तसे.
चुभुदेघे
प्रातःविधी की प्रातर्विधी?
प्रातःविधी की प्रातर्विधी?
इथे विसर्ग संधी केल्यावर
इथे विसर्ग संधी केल्यावर नंतरच्या अक्षरावर रफार येतो. दोन्ही बरोबर आहेत.
हैदोस घालणे की हौदोस घालणे.
हैदोस घालणे की हौदोस घालणे. व्युत्पत्ती कशी झाली असावी?
हैदोस असा शब्द आहे. उगम ठाऊक
हैदोस असा शब्द आहे. उगम ठाऊक नाही.
मोराचा पिसारा - हिंदीमधे काय
मोराचा पिसारा - हिंदीमधे काय म्हणतात ?
हैदोसच शब्द माहीत होता पण
हैदोसच शब्द माहीत होता पण उगमाचा विचार करता हौद ओस पडेपर्यंत हुल्लडबाजी करणे असला काहीतरी तिरपागडा विचार केला *(कैच्याकैच :फिदी:)!!
मोराचा पिसारा - पंख फैलाए असंच म्हणतात बहुदा!
निबंधात शब्द वापरायचा आहे,
निबंधात शब्द वापरायचा आहे, त्यामुळे नक्की माहिती हवी होती.
विकीपेडिया मध्ये तर
विकीपेडिया मध्ये तर पिसार्याला पंख फैलाना असाच शब्दप्रयोग केला आहे. व पूर्वी हिंदी निबंधातही वापर केल्याचे स्मरते. http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0
पण फुलवलेला पिसारा छान दिसतो
पण फुलवलेला पिसारा छान दिसतो कसे म्हणाय्चे ? फैलाये हुए पंख सुंदर दिखते हे ?
हैदोस, हा शब्द अरबी / फारसी
हैदोस, हा शब्द अरबी / फारसी मधून आलाय. मुहर्रमच्या वेळेस जो मोठ्याने शोक छालतो त्याला हैदूस म्हणतात.
Pages