फेसबुकवर सध्या एक मेसेज फिरत आहे - खात असलेल्या फळांच्या बिया साठवून ठेवा आणि पावसाळ्यात कुठे फिरायला गेलात तर त्या आजूबाजूला टाका, निदान काही तरी रुजतील. तेवढाच पर्यावरण हरित करण्यास आपला हातभार.
कल्पना खरंच खूप छान आहे. सध्या आंबे, फणस, जांभळं वगैरेचे दिवस आहेतच. त्यामुळे या सगळ्या फळांच्या बिया एकत्र करून ठेवायला हरकत नाही. शिवाय ही खास आपल्या भूमीतील झाडं. मग ही झाडं रुजवायला थोडा अजून सजग हातभार लावता येईल का?
समजा प्रत्येकानं / किंवा एखाद्या गटानं मुद्दाम यंदाच्या पावसाळ्यात असा प्रयत्नपुर्वक उपक्रम हाती घेतला तर?
वर उल्लेख केलेल्या बिया तर आहेतच पण शिवाय जर शक्य असेल तर दुकानांतून खास इतर बिया अथवा झाडेच विकत घेतली आणि पाऊस सुरू झाल्यावर आठवडाभरानं गावा / शहराबाहेरच्या एखाद्या वापरात नसलेल्या जमिनीच्या तुकड्यावर लावली तर?
एकटे जाऊन लावा, कुटुंबासकट जाऊन लावा, मित्रमैत्रिणींबरोबर जाऊन लावा, एखाद्या संस्थेतर्फे मोहिम काढून लावा, गटग करून लावा ..... एक बी लावा, एक झाड लावा, ट्रकभर झाडे लावा ...... पण लावा!
कोणकोणती झाडं आवता येतील बरं? फुलांची लावण्यापेक्षा फळांची, उपयोगी झाडं लावण्यावर कटाक्ष ठेवला तर? म्हणजे फळझाडं, मोठे वृक्ष, भाज्या वगैरे लावल्या तर?
एक यादी करतेच. यादी करताना स्थानिक उपयुक्त झाडं आणि वृक्ष लक्षात घेतले आहेत. सह्जपणे रुजणारी आणि मेंटेनन्स न लागणारी झाडं निवडली आहेत.
फळझाडं : आंबा, फणस, जांभूळ, नारळ, सीताफळ, चिकू, केळी, पपया
याव्यतिरिक्त इतर वृक्ष : वड, पिंपळ
भाज्या : मिरच्या, टोमॅटो, अळूचे कंद, सुरण, रताळ्याचे कंद, शेवगा, वाल, भोपळा, घोसाळी, कारली
यात अजून भर घालता येईल. मूळ कल्पनाही अधिक कशी चांगली राबवता येईल याचा विचार करता येईल.
मस्त कल्पना मामी. हा बाफ
मस्त कल्पना मामी.
हा बाफ 'गणेशोत्सव २०१२ संयोजन' मध्ये का आहे?
हा बाफ 'गणेशोत्सव २०१२
हा बाफ 'गणेशोत्सव २०१२ संयोजन' मध्ये का आहे? >>> तिकडे कसा गेला? मी पर्यावरण मध्ये काढला होता.
आम्ही तसे गेले काही महिने
आम्ही तसे गेले काही महिने बहाव्याच्या बिया गोळा करतोय. पक्ष्यांचे आवडते झाड!
गावी भरपूर टाकून आलोय. आता पुढचे लक्ष्य टॅबेबूइया!
कॉलेज च्या वाटेवर भल मोठ गुंजाचे झाड आहे. त्याच्या लाल बिया मला खुप आवडतात बघायला. लालचुटुक! सकाळी तिथे झाडू मारायच्या आधी पोहोचले तर हमखास उचलते.
यादी करताना स्थानिक उपयुक्त
यादी करताना स्थानिक उपयुक्त झाडं आणि वृक्ष लक्षात घेतले आहेत>>>>हे महत्वाचं.
मी सुरूवात केली आहे.
मामी अशाच तर्हेचा एक मेसेज मी http://www.maayboli.com/node/2399 या लिंकमध्ये लिहिला होता (२००८ साली ).
जर्बेरा फळांची आणि भाज्यांची
जर्बेरा फळांची आणि भाज्यांची झाडं, वृक्ष लाव ना गं. तिथल्या स्थानिक लोकांना, आदिवासींना तेवढाच उपयोग आणि उत्पन्न मिळेल.
जिप्सी, हो रे. खरंच की.
मी तरी जुलै मध्ये मुद्दाम जाऊन काही झाडं लावायचं ठरवलं आहे. विही गावाकडे जाताना एक उजवीकडे जाणारा रस्ता आहे तिथे बरीच जागा मोकळी आहे. तो रस्ता मुंबई-नाशिक हायवेला मानस रिझॉर्ट जवळ येऊन मिळतो. तो परिसर मी हेरून ठेवला आहे.
शिवाय विही गावाहून पुढे खोडाळ्याहून उजवीकडे जाणारा रस्ता (माझा अत्यंत आवडता पावसाळ्यातला लाँग ड्राईव्ह) हा वैतरणा तलावाच्या शेजारून पुढे मुंबई-नाशिक हायवेला घोटीजवळ मिळतो. तिथे तर अशा वृक्षारोपणाला चिक्कार स्कोप आहे.
खरेच फळांची झाडे लावायला
खरेच फळांची झाडे लावायला हवीत. मी जेव्हा कधी (चुकून) जंगलात फिरायला जाते तेव्हा आंबा, चिकू, सिताफळ इत्यादी झाडे का नाही आढळत जंगलांमध्ये हा प्रश्न कायम पडतो. तसा आंबा असतो जंगलात भरपुर पण एकतर त्याला आंबे नसतात किंबा असले तर ते उंचावर असतात. चिकू, सिताफळे इत्यादी झाडे जास्त उंचा वाढत नाहीट त्यामुळॅ त्यांची फळे तोडणे सोप्पे जाईल. खरेतर सोसायट्यांमध्येही शोभेच्या झाडांच्या जागी फळांची झाडे का लावत नाहीत? मुन्सिपाल्टीच्या बागांमध्ये फळांची झाडे का लावत नाहीत? लावायला हवीत ना...
नि.ग. वाले ह्या कामाला
नि.ग. वाले ह्या कामाला लागलेले आहेत.
झाडे शक्यतो फळांची लावावी जेणेकरून पक्ष्यांनाही त्यांचा उपयोग होईल.
फळांच्या बाबतीत पेरू सोडला तर
फळांच्या बाबतीत पेरू सोडला तर नैसर्गिक रित्या बीजप्रसार होणे कठीण आहे. पेरू पक्षी खातात. आंबे माकडे खातात पण ते कोयी पण खातात. चिकूचे कलमच करावे लागते, आणि अशा वाढवलेल्या झाडावर आपण प्राण्यांना येऊ देत नाही आणि तश्याही त्याच्या बिया रुजत नाहीत.
पण त्याव्यतीरिक्त बरीच फळझाडे आहेत. चारोळी आणि आंब्याचे झाड एकाच कूळातले. मोह आणि चिकूही एकाच कूळातले त्यामूळे चारोळी आणि मोह यांच्या बिया जमवता येतील.
फणसाचा प्रसार माकडे किंवा कांडेचोर नावाचा प्राणी करतो. माकडे मात्र आता फणसाकडे फिरकत नाहीत.
फणसाच्याच कुळातली अकी, दूरीयान, चक्का नावाची झाडे आहेत. ती पण जंगलात वाढू शकतात.
गूगल अर्थवर मुद्दाम आमची कॉलनी ( शिवसृष्टी, कुर्ला पूर्व ) बघा. १९७४ / ७५ साली लावलेली झाडे आता मस्त वाढली आहेत. कॉलनीमधल्या घरात गारवाही असतो.
ही झाडे सोसायटीच्या आवारात लावली असल्याने त्यांची नीट निगा राखली गेली. त्यामूळे पहिली काही वर्षे निगा राखणे हेही घडलेच पाहिजे.
आपण सगळे आरंभशूर असतो. बिया
आपण सगळे आरंभशूर असतो. बिया लावू पण त्या रोपांची निगा ठेवणे आपल्याला जमत नाही. आमच्या कॉलनीतील त्या काळात निवृत्त झालेल्या लोकांनी काळजी घेतली.
सध्या आपल्याला वेळ नसेल तर काही गरजू मूलांना पैसे देऊन हे काम करता येईल. एका झाडामागे महिन्याला १० रुपये सुद्धा चालतील. त्या मूलाला हे काम द्यायचे. आणि महिन्यातून एकदा स्वतः बघून पैसे द्यायचे.
प्रत्येकाने अशी दहा झाडांची जबाबदारी घेतली तरी खुप झाले.
मुंबई परीसरातली माती आता
मुंबई परीसरातली माती आता तेवढी सकस राहिलेली नाही. वर्षानुवर्षे त्यात प्लॅस्टीक व इतर घाण पडत राहिलेली आहे. रस्त्याच्या बाजूला देखील गुटखा, काच वगैरेंचा कचरा झाला आहे. मूळातच उत्तर भारतातल्यासारखी ती कधी सकस नव्हतीच आणि आता तर बघायलाच नको. थोड्याफार फरकाने हे बहुतेक महाराष्ट्राला लागू आहे. आपल्याकडची झाडे फारशी उंच वाढतच नाहीत.
हे पोषणमूल्य आपल्याला कचर्यापासून खत निर्माण करून देता येईल. अनेक सोसायट्यांच्या आवारात मोकळी जमीन नसते. असते ती कॉक्रिटने झाकली गेलेली असते. तिथे असे खत / माती तयार करता येईल. याचा प्रचार मात्र झाला पाहिजे. टांगलेल्या टोपल्यात भाज्या व्यवस्थित वाढतात. पण सोसायटीच्या जागेत भाज्या वाढवण्याबद्दल एक विचित्र मानसिकता आहे आपल्याकडे.
चांगले विचार आहेत. भाज्या
चांगले विचार आहेत.
भाज्या अल्पजीवी आणि भाज्या लावून पुढे त्याची निगाही राखायला लागेल ना? पुढे त्या भाज्यांवर मालकी कोणाची?
वापरात नसलेल्या अशा कुठल्याही जमिनीवर झाडे / भाज्या लावण्यापूर्वी संबंधीतांची परवानगी घेणे आवश्यक असेल ना? संबंधीतांमध्ये कोण कोण येतात? जमीनमालक? सरकार? आणखी कोण?
गजानन, झाडे तोडायला मनाई आहे,
गजानन, झाडे तोडायला मनाई आहे, लावायला बहुतेक नसावी.
भाज्यांची लागवड मी सोसायटीच्या आवारातच करावी असे लिहिले आहे ( तशी शेवग्याची झाडे सार्वजनिक जागी लावता येतील ) आमच्या सोसायटीतले नारळ सोसायटीतल्याच सदस्यांना विकतात आणि ते पैसे रितसर सोसायटीच्या खात्यात जमा करतात.
भाज्यांची मालकी हाच मी म्हणतो तो विचित्र मानसिकतेचा मुद्दा
विचार चांगला आहे. पण असंच
विचार चांगला आहे.
पण असंच कुठलीही जागा हेरुन झाडं कशी काय लावु शकतो??
आपल्या गावी वैगेरे आपल्या जमिनीत वैअगेरी ठीक आहे.
दिनेश, तुम्ही वर लिहिलेय ना
दिनेश, तुम्ही वर लिहिलेय ना सोसायटीत भाज्या लावण्याविषयी.
माणुस आणि झाड मध्ये निळू दामल्यांनी एक प्रकरण यावर लिहिलेय. ते वाचुन कपाळावर हात मारुन घ्यावासा वाटतो. भाज्या लावण्याची नुसती चर्चा सुरू झाल्यावर त्या भाज्या कशा वाटुन घ्यावयात यावरुन भांडणे आणि शेवटी नुसती भांडणेच उरली. भाज्या लावण्याची मेहनत घ्यायला कोणीच पुढे नाही.
तुमच्या सोसायटीबद्दल तुम्ही जे लिहिलेत ते हल्ली विरळाच झालेय.
बाकी मुंबईतल्या जमिनीबद्दल सहमत. अगदी नर्सरीमध्येही लाल मुरूम देतात माती म्हणुन.
गटग करुन झाडे लावण्याची
गटग करुन झाडे लावण्याची कल्पना भारी आहे.
हो ना साधना, या भाज्या विकून
हो ना साधना, या भाज्या विकून जसे काही कुणी करोडपतिच होणार आहे !
तूमच्या घरापुरत्या भाज्या लावल्या तरी पाणीच पडतेय, सिलिंग गळतेय, डास होतात, बेडूक येतात, चोर येतात, सोसायटीच्या जागेचा कमर्शियल कारणासाठी वापर करताय.. असे आरोप सुरु होतात.
जर्बेरा फळांची आणि भाज्यांची
जर्बेरा फळांची आणि भाज्यांची झाडं, वृक्ष लाव ना गं. तिथल्या स्थानिक लोकांना, आदिवासींना तेवढाच उपयोग आणि उत्पन्न मिळेल.
पण त्यांची काळजी नाही घेता येणार.
शिवाय माणसाचा स्वभाव नुसता ओरबाडण्याचा आहे. हल्ली गावी गेलेलो. तिथे हि मोठी काजूची झाडं होती. बरेचसे तोडलेले पण म्हणून कोणीही स्वताहून झाडं लावलेली नव्हती. आयतं मिळतंय तर तोडा, पण बाकीच्यांनाही मिळू दे, तर नाही.
त्यामानाने इथे मुंबईत पक्ष्यांची अवस्था बघवत नाही. आधी मानखुर्द हायवे वरून निघालो कि दोन्ही बाजूला सगळ्या झाडांवर घरटी दिसायची. आता तिथली झाडंच काढली. अजून काही महिन्यांनी मॅनग्रोव्स पण तोडतील. मग फ्लेमिंगो पण जातील
मी फक्त बिया टाकून आलेय. परत जाईन तेव्हा अजून टाकेन. त्यांचे ते मोठे वृक्षही होतील किंवा होणारही नाहीत पण मी मात्र बिया टाकत राहणार. पक्ष्यांना राहायलाही मिळेल आणि खायलाही.
भारतात जिथे तिथे माकडे दिसतात
भारतात जिथे तिथे माकडे दिसतात पण बीजप्रसारांसाठी ती कुचकामी आहेत. एकतर आयते अन्न मिळाल्यामूळे ती नैसर्गिक खाद्य शोधत नाहीत आणि दुसरे म्हणजे खाणे कमी नासधूस जास्त असते. नाहीतर बहाव्यांचा प्रसार हा पुर्वी त्यांच्यामार्गतच होत असे.
निसर्गात पडून, कुजून, इतर जीवांचे अन्न बनून ९९ % बिया वायाच जातात.. तरीही तो बीजप्रसार पुरेसा होता. आता त्यात मानवाची भर पडलीय.
वर जर्बेरा ने काजूचा उल्लेख केलाय, ती झाडे गोव्यात पोर्तुगीजांनी जमिनीची धूप थांबावी म्हणून लावली. ते काम तर त्यांनी केलेच पण स्थानिकांना बरेच काही दिले. जर काजूच्या सगळ्या बिया वेचल्या नाहीत तर नैसर्गिक रित्या पहिल्या पावसात काही रुजतातच... पण त्या रुजलेल्या बियाही वेचून खाल्ल्या जातात.
शक्यतो फायकस फॅमिलीतील झाडे
शक्यतो फायकस फॅमिलीतील झाडे लावावीत.उदा. वड, पिम्पळ,उम्बर ई.
जिप्स्या, घराजवळ वड / पिंपळ
जिप्स्या, घराजवळ वड / पिंपळ लावून चालणार नाहीत. मुळांचा इमारतीला त्रास होतो. ती मोकळ्या जागीच लावायला हवीत.
शिवसृस्टीतल्या बस स्टॉपजवळ पिंपळाचे झाड आहे. त्याचा पार अनेकवेळा मोडतो. ( तडे जातात. )
इमारतीजवळ, इमारतीवर जर अशी झाडे वाढत असतील तर ती हळूवारपणे काढून दुसरीकडे लावायला हवीत.
घराजवळ लावायला बिमली, करमळ,
घराजवळ लावायला बिमली, करमळ, बकुळ, आवळा अशी अनेक झाडे आहेत. कवठाची झाडे पुण्यात आहेत पण मुंबईत फारशी नाहीत. हा सगळा मेवा लहान मुलांना मिळायलाच हवा. हि झाडे आटोपशीर असतात आणि त्यांना भरपूर फळे लागतात.
जरा मोकळी जागा असेल बोर, जांभूळ पण लावायचे. झाडावरून पडलेली ही फळे वेचण्याचा आनंद अनोखा असतो.
कल्पना छान आहे. पण असंच
कल्पना छान आहे.
पण असंच कुठलीही जागा हेरुन झाडं कशी काय लावु शकतो?? >> लावु शकतो का? तिथे खड्डे वगैरे खोदायला लागल्यावर जमिन लाटायला आलेत असा ग्रह होइल ना लोकांचा?
जर्बेरा, बहाव्याचे बी लगेच रुजणार नाही. त्यामुळे नुसत्या बिया टाकुन फारसा उपयोग होणार नाही. तसेच चिकुचेपण लवकर रुजणार नाही.
आपली जी मोठी झाडे आहेत जसे चिंच, उंबर, अंजीर, मोह, फणस, वड, जांभुळ यांची वाढ अतिशय हळु होते. त्यामुळे ही झाडे म्युनिसिपाल्टी लावायला घेत नाही. त्यांची वाढ झाली असा रिपोर्ट लवकर मिळत नाही म्हणुन त्यामुळे दिखावेगीरी करत लवकर वाढणारी बरिचशी बिन कामाची झाडे लावली / वाढवली जातात.
आपणही ही हळू वाढणारी झाडं लावली तर पावसानंतर किमान दोन चार वर्ष तरी त्यांची काळजी घेतली तरच ती वाढणार. नाहीतर गुढग्याएवढ्या रोपट्याला शेळ्याबकर्यांनी तोंड लावलं की मग ती वाढत नाहीत. त्यामुळे नुसत्या बिया टाकताना लवकर रुजणार्या टाका किंवा मग सरळ रोपं लावा.
शक्यतो फायकस फॅमिलीतील झाडे
शक्यतो फायकस फॅमिलीतील झाडे लावावीत.उदा. वड, पिम्पळ,उम्बर ई. >>>> माळरानात लावायची असतील तर ही झाडं बेस्ट.
सावली, आधीच कल्पना देवून वृक्षारोपण करु शकतात. मग लाटायला येण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. जे बघे लोक जमतील किंवा आजू बाजूचे रहिवासी असतील त्यांना झाडं मोठी होईस्तवर सांभाळायला सांगायचे. आदिवासी भागात जंगल हा लोकांचा क्लोज टू हार्ट विषय असतो. जंगलंच उजाड झाल्याने असं कुणी लावायला आलं तर कदाचित को-ऑपरेशन मिळेलही.
काही एनजिओ आहेत उदा. हरियाली,
काही एनजिओ आहेत उदा. हरियाली, त्या तुम्ही घरी साठवलेल्या बिया एकत्र करुन त्यांचं योग्य ठिकाणी, योग्य तर्हेने रोपण करतात. त्यात तुम्हालाही सहभागी करुन घेतले जाते.
बिया कोणत्या, कशा साठवयच्या तेही ते सांगतात.
बिया वाटेल तिथे टाकून त्यांची रोपे येतीलच असं नाही किंवा चुकीच्या जागी येतात. मग त्या फुकट जातात.
काही बिया घरी प्लास्टिक किंवा ज्यूटच्या पिशव्यांमधे रुजवून मग त्यांची रोपटी करुन लावण्याची गरज असते.
चांगली कल्पना आहे-कागदावर
चांगली कल्पना आहे-कागदावर तरी.
भाज्यांची लागवड मी
भाज्यांची लागवड मी सोसायटीच्या आवारातच करावी असे लिहिले आहे >>>>> हा आदर्शवाद ठरेल हो दिनेशदा!
आमच्या सोसायटीतील ४-४ नारळ, सर्वांना देऊन उरलेले सदस्यांना विका हे सांगितले होते.ते अंमलात आणेपर्यंत बरीच वर्षे जावी लागली.एकाने केळीचे रोप लावले होते.त्याचे घड आल्यावर स्वतःने खाल्ला.बाकी कचरा सोसायटीच्या जागेत.शेवटी ती केळीची रोपे काढून टाकली.
फुलझाडांवर एकही फूल टिकू देत नाही.आया,मुलांना खाली घेऊन आल्या की ६-६.३० वाजता बिनदिक्कतपणे कळ्या तोडतात.त्यांच्या मुले सांभाळणार्या बाया आणि त्या, झाडे ओसाड करतात.४ दिवसांपूर्वी एकीच्या हातात १७-१८ जास्वंदाच्या कळ्या पाहिल्या.जीव जळतोहो.
वडाचे झाड कुठे देता येईल का?
वडाचे झाड कुठे देता येईल का?
वडाचे झाड कुठे देता येईल
वडाचे झाड कुठे देता येईल का?>>>>>>देवकीताई, हि लिंक वाचा "वृक्षसखा" - http://www.maayboli.com/node/49397. जर वडाचे झाड घराच्या आवारात, भिंतीवर उगवले असेल तर विक्रमला सांगा. तो/त्याची टिम झाडाचे रेस्क्यु करून योग्य त्या जागी त्याचे पुनर्रोपण करेल.
त्याच लेखातील एक परिच्छेद. जो या लेखासाठीही उपयुक्त आहे.
विक्रमला कोणतीही झाडे लावत जायचे ही गोष्ट मान्य नाही. तो वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करतो आणि त्यानंतर कुठे कोणती झाडे लावायची याचा निर्णय घेतो. त्याने झाडांचा अभ्यास करताना पुस्तकांमधून माहिती मिळवली, अनेक पक्षीतज्ञ आणि निसर्गतज्ञ यांच्यान भेटी घेतल्या . तो वृक्षप्रेमींसोबत विविध ऋतूंमध्यें जंगलांमधून फिरला. त्या कामात त्या्ला पुण्याचे पक्षीतज्ञ उमेश वाघे यांची मदत झाल्याचे तो नमूद करतो. आपल्या वातावरणाशी सुसंगत, दीर्घायू, जीवनसाखळीला पोषक अशी झाडे वाचवण्यात आणि ती वाढवण्यात त्याला विशेष रस आहे. तो म्हणतो, की आपल्या रस्त्याच्या दुतर्फा किंवा इतरत्रही परदेशी झाडे मोठ्या प्रमाणात लावलेली दिसतात. ती झाडे आपल्याक वातावरणातील नसल्या्मुळे त्यांना कीड लागत नाही. त्यामुळे त्यांची वाढ लवकर होते. त्यामुळे वनखाते व मनपाकडून ही विदेशी झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यालत येतात. त्यामध्ये निलगिरी, अॅकेशिया, सुबाभूळ, गुलमोहर, रेनट्री आणि पेल्ट्रोफोरम अशा झाडांचा समावेश असतो. झाडांची लागवड करताना स्थानिक झाडांचा किंवा त्यांच्यावर जगणा-या जीवजंतू-पक्ष्यांचा विचार केला जात नाही. याचा परिणाम आपल्या बायोडायव्हर्सिटीवर होतो. त्याचा परिणाम पक्ष्यांच्या संख्येवरही होऊ लागतो.
लोकहो. झाडे लावा गटग करायचे
लोकहो. झाडे लावा गटग करायचे असल्यास माझी नसरापुर बनेश्वर इथे थोडी जागा आहे तिथे भरपूर म्हणजे कमीतकमी १००-१५० झाडे लावायची सोय आहे. निसर्गप्रेमींना पेशल अवताण.
In the early 2000s, famous
In the early 2000s, famous Brazilian photographer Sebastião Salgado and his wife Lélia Wanick decided to rebuild their 600-hectare desert land in Aimorés. They have planted more than 2 million tree seedlings with employees and volunteers in 18 years.
And the result is amazing! They created a new forest and now the site has 293 species of plants, 172 species of birds, and 33 species of animals, some of which were on the brink of extinction.
Pages