Submitted by मी मुक्ता.. on 16 May, 2015 - 08:56
किती भरभर बदलत जातात शहरं..
अनोळखी होत जातात ..
झपाट्याने बदलण्याचा काळच असतो एकेक..
आणि मग नाहीच थोपवता येत आपल्याला काही..
हरवून जातात जुनी आपुलकीची ठिकाणं..
उन्मळून पडतात मुळापासून रुजलेल्या आठवणींचे वृक्ष..
नव्या गर्दीत नाहीसे होतात आपले सरावाचे रस्ते..
आणि जपून ठेवलेल्या खाणाखुणा कधी पडल्या हे तर कळतही नाही..
.
.
बघता बघता बदललं शहर..
अनोळखी झालं..
जिथं कधी काळी माझं अवघं विश्व नांदायचं..
हरवलं..
तुझ्या नजरेतलं माझं शहर..
-------------------------------------------------------------------------
http://merakuchhsaman.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अस्वस्थ करणार लेखन आहे ..
अस्वस्थ करणार लेखन आहे .. खासकरून शेवटच्या ओळी मुळे ..
आवडल तरी कस म्हणू ..
पु.ले.शु:
काहीतरी लिहणार होते ,पण
काहीतरी लिहणार होते ,पण विसरुनच गेले .................
पण आवडली कविता....
धन्यवाद प्रकु. भुईकमळ,
धन्यवाद प्रकु.
भुईकमळ,
थॅक्स.