Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पन्नास हजार डिपॉझिट कोण मागतं
पन्नास हजार डिपॉझिट कोण मागतं हॉस्पिटलात? मागतात का? मला तरी अनुभव नाही म्हणून विचारतेय.
दाभोळकर हा माणूस काय खाऊन मोठा झालाय देव जाणे. बघेल तिथे, बघेल त्याचा अपमान करत असतो. आणि हे लोक सहन करतात. कशाला कोण जाणे? इतकं येर्यागबाळ्यागत तर आम्ही पण वागत नाही. (जनसामान्य माणसं असून)
रीया अगं बाई खरंच... मेदे आदे
रीया अगं बाई खरंच...
मेदे आदे ला म्हणेल की अरे तो आदु बिचारा लग्नाचा राहिलाय.... रजनी किंवा जुई यांना विचारू या का?
आदे म्हणेल यन्ना ब्युटिफुला .... ग्रेट आयडिया...
सोज्वळ अदिती ला पटेल.... मग तो फाटका चड्डीवाला बाबाजी शोधून आणतील मनोजसोबत जाऊन
त्या काळात विचित्रा आणि माधवीताई देसाईवाडी मध्ये हजर होतील!!!!
विचित्रा आदेच्या प्रेमात पडेल.... ते पाहून रमड "विचित्रा हेटर्स क्लब" काढेल
फाटका चड्डीवाला - रजनी / जुई
आदे चा मित्र - अंजली
हापिसातील ती बाई (जी अदितीच्या अपघाताची बातमी आऊला सांगते) - नवरे
म्हाळसा - श्री
हे सगळं बघून जान्हवी परत म्हणेल काहीही हं
आता बाकीच्या शिरेल्स पण
आता बाकीच्या शिरेल्स पण आणल्या एकत्र तरंच तो बुळ्या जय आत्ता बोलू शकतो सत्य !!!
खंडेरायाच्या शुभाशीर्वादाने !!!
रांजण आणि सुरई >> रमा अभय>>
रांजण आणि सुरई >>
रमा अभय>> खिचडी लय भारी.
काल दुर्दैवाने एक शॉट
काल दुर्दैवाने एक शॉट पाहण्यात आला शिरेलीचा ..
अरे देव्वा . काय बाई सांगु कस्स गं सांगु अस झाल ..
च्यामारी हिकडं इचा अॅक्सिडंट झालाय अन बाप ढिम्म चेहर्यान जावयावर तोंडसुख घेतोय.. पांचट.
पोरगी जित्ती हाय का मेली ते गेल चुलीत.. भयताडाची जत्रा निर्री..
ह्या बिनडोक जयनं कधी तरी त्या मेघना का कुणाला मैत्रीण म्हटलयं का रच्याकने ? कुणी तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या लाईफ मदे इतकी घुसघुस करू शकत ?
म्हणे का ? कस ? आणि हा मॅड तिला उत्तर देत होता नै तर चिडक त्वांड ठेवायचा प्रयत्न करत होता .. कशाला ?
निघुन जायचं न कन्नकन्न तिथुन.. बस म्हणा तिथं बोंबलत . उगा स्वत:वर मानसिक का काय ते अत्याचार होऊ द्यायचे अन मग गावजेवण घालुन चारचौघांना हाय रे माझ्या कर्मा म्हणून व्यथा सांगत बसायची..
सगळ्यांचे भेजे घुटण्यात आहे.. फाल्तु :रागः
रमड "विचित्रा हेटर्स क्लब"
रमड "विचित्रा हेटर्स क्लब" काढेल >>> तो तर मी आत्ताही काढायला तयार आहे. जाम डोक्यात गेली होती ती माझ्या.
भुंग्याला स्क्रिप्ट रायटींगचे
भुंग्याला स्क्रिप्ट रायटींगचे शून्य मार्क.
>>>>>>>>>>>>
मंजूडी, म्हणून मी लिहीत नाही
चेष्टा मस्करी बास करा ,आता
चेष्टा मस्करी बास करा ,आता थोडी सिरिअस चर्चा करा.धन्यवाद
तुम्ही सांगा बर सिरियसली काय
तुम्ही सांगा बर सिरियसली काय घडू शकत या सिरियलमध्ये...????
या सगळ्या अॅक्सिडेंट
या सगळ्या अॅक्सिडेंट प्रकरणात दिन्या आणि कुमुची भेट होणार हॉस्पिटलात आणि कुमुला कमीत कमी हे तरी कळेल की आदिती ही दिन्याच्या एरीयात रहात नसुन घरात रहाते... पण काकांचा आजपर्यंतचा इतिहास बघता पार गट्टुला जय-आदितीच नात कळण्याची शक्यता नाकारता येत नाही
इतक्या लवकर कळणार नाही मुगु.
इतक्या लवकर कळणार नाही मुगु. कुमु म्हणजे ती ईला भाटे का? पार सुबोध प्रेमात पडून मागणी घालायला येईल ती त्यानंतर कळेल कदाचित.
सुबोध भावे सध्या सिक्कीम, दार्जीलिंग दौर्यावर आहे विथ बायको मुलं. फोटू टाकतोय fanclubला. सो तो नसेल ना आत्ता शिरेलीत.
कुमु म्हणजे ती ईला भाटे का?
कुमु म्हणजे ती ईला भाटे का? >>> हो.. मॅडम तो आला ना मिस दाभोळकरांच्या अपघाताची बातमी ऐकुन मिटींग अर्धवट सोडुन... आहात कुठे? शिरेल नाही तर नाही शिरेलीच्या झायराती पण नै का बघत?
ओके, ओके.
ओके, ओके.
अरे तो मिटीन्ग सोडुन ( जी
अरे तो मिटीन्ग सोडुन ( जी दुबईत होती ) आणी पुढचा ( युरोपचा ) दौरा सोडुन धावत आला. आता दुसरा अपेक्षाभन्ग होईल परत. कारण बहुतेक प्रेमभन्गा मुळे त्याने तसले नियम लादलेले असतात स्टाफवर.
अरे तो दाभोळकर जयला आत जाऊ
अरे तो दाभोळकर जयला आत जाऊ देत नाही म्हणे डाॅ.ने फक्त नातेवाईकांना भेटायला सांगितलयं. नवरा म्हणजे नातेवाईक नसतो का? हा जय पण जात नाही.. जबरदस्तीनी जायच की आत.....
अग जय प्रयत्न करतो की, पण हा
अग जय प्रयत्न करतो की, पण हा म्हसोबा त्याला कोन्डीत पकडतो, म्हणतो अदिती तुझी बायको आहे हे सत्य सगळ्याना सान्गु शकशील का? याला माहीत आहे की नोकरीसाठी जय असे करु शकत नाहीये, आणी अदिती सुद्धा नाही.
आता सुबोध भावेचे गैरसमज आणखीन वाढवुन सिरीयल नाही भरकटवली म्हणजे मिळवले. नाहीतर होसुयामी सारखे प्रेक्षकान्चा अन्त पहात बसतील हे झी वाले. पण हे झी वाले परवडले इतक्या त्या कलर्स मराठी ( पूर्वीची ई टिव्ही) वरच्या सिरीयल भन्गार आहेत. झीच परवडले,निदान इतक्या डोकेउठाड नाहीत त्या असावा सुन्दर स्वप्नान्चा बन्गला सारखी. सॉरी जास्तच अवान्तर झाले.
अग जय प्रयत्न करतो की, पण हा
अग जय प्रयत्न करतो की, पण हा म्हसोबा त्याला कोन्डीत पकडतो, म्हणतो अदिती तुझी बायको आहे हे सत्य सगळ्याना सान्गु शकशील का? >>
हे मधलं पाहिलं नाही मी. (पावसामुळे लाईट गेले होते.) जयला माफी देते मग.
असू दे ग अवांतर भरकटलेल्या सिरियलपेक्षा बरं ते. इंटरेस्टींग तरी असतं.
nidhi tumhi seriouslly
nidhi tumhi seriouslly charchaa karu shakata. baakichyaana ignore Mara, khas Karun dakshina tya fakta cheshta maskari Karun yaa dhaagyaachi vaat laavat aahet..
.
मंदार कुमठेकर तुमचा काहीतरी
मंदार कुमठेकर तुमचा काहीतरी गैरसमज झालाय.
मी पण इथे चेष्टा मस्करी करण्यासाठीच येते. नाहीतर असल्या सिरियस सिरियलवर सिरियसली चर्चा करण्यात मला सिरियसली इंटरेस्ट नाहीये.
आणि कोणाला इग्नोर मारायच नि कोणाला नाही ते मी ठरवेन. तुम्ही मला सल्ले देऊ नका.
मी पण इथे चेष्टा मस्करी
मी पण इथे चेष्टा मस्करी करण्यासाठीच येते. नाहीतर असल्या सिरियस सिरियलवर सिरियसली चर्चा करण्यात मला सिरियसली इंटरेस्ट नाहीये.>>>>>>>>>
ही मालिका आता होसुमीयाघच्या
ही मालिका आता होसुमीयाघच्या दिशेने प्रवास करायला लागलीय.:राग: आता झलक पाहिली. म्हसोबा ( खर तर हा म्हसोबा नावाचा देव प्रत्यक्षात असेल तर त्याची माफी मागते) म्हणतो की मी अदितीला या जयजवळ राहु देणार नाही. आधी जे बोलला ते थोडक्यात चुकल.
खर तर मी या सिरीयलची डायरेक्टर असते तर कुठुन तरी केतकर काकाना आधी धरुन आणले असते आणी तिथेच ते बोलले असते. अरे हा तिचा नवरा आहे, फाईल घरी विसरला, ऑफिसमध्ये नाही. मग गट्टु आणी म्हसोबा दोघान्चे चेहेरे पहाण्या लायक झाले असते. पण पाणी घालायला नको का आमटीत अजून? म्हणून केतकर काकाना गावाला पाठवुन दिले.
आता जयला म्हणाव पाहीजे तितके आणी पाहीजे तेवढ्या मोठ्याने भोकाड पसर. जुई आणी रजनी आहेतच कुक्कुल्या बाळाला गाई गाई करायला. भुक्कड कुठले..
rashmi aawaràa
rashmi aawaràa
आत्ता थोडक्यात आवरल, पुढे
आत्ता थोडक्यात आवरल, पुढे पिसे काढायची आहेत.
कहानी में ट्विस्ट आदितीवर
कहानी में ट्विस्ट
आदितीवर उपचार करणारे डॉक्टर सांगतात आदिती प्रेग्नंट आहे!
आता दाभ्या, अविनाश (आणि आऊ कॉम्प्लीमेंटरी), रजनी काय करणार?
आणि सर्वात मुख्य म्हणजे शेंबड्या आता तरी बरळणार का तो मीच म्हणून?
असल नाही काही व्हायच, पण
असल नाही काही व्हायच, पण अदितीबाईन्ची जानु सारखी मेमरी नाही गेली म्हणजे मिळवले. नाहीतर आहेच मग पुढे तिचे दुसरे लग्न गट्टु ( अडाणतट्टु) बरोबर. मग जयला छापा काटा करुन दुसरी बायको निवडावी लागेल. जुई उर्फ अलका कुबल नाहीतर रजनी उर्फ म्हाळसा.
>>>> के स्क्वेअर ( कुमठेकर व
>>>> के स्क्वेअर ( कुमठेकर व केंजळे ) <<<<<
मला आमच्या कॉलेजमधली व्हीस्क्वेअरआर आठवली
>>> होसुयामीघच्या <<<<
>>> होसुयामीघच्या <<<< स्पेलिन्ग मिश्टेक आहे का?
होसुमीयाघ असे हवे ना?
अरे हो लिम्बुभाऊ चुकले ते
अरे हो लिम्बुभाऊ चुकले ते माझे. धन्यवाद!
चुका कसल्या काढता हो
चुका कसल्या काढता हो लिंबूभाऊ.... भावना पोचल्याशी मतलब!
या सिरीयलीत इतके असंख्य अपमान आणि इतके मरणाचे खोटे बोलणे, गैरसमज करवून देणे दाखवले आहे आणि तरीही लोकांना काय ही सिरीयल इंटरेस्टिंग वाटते कोणजाणे... नुसते प्रोमो पाहून मी ही मालिका कौटुंबिक मूल्यांना जाचक ठरत असल्याची आणि आक्षेपार्ह असल्याबद्दल तक्रार नोंदवली आहे.
>>> चुका कसल्या काढता हो
>>> चुका कसल्या काढता हो लिंबूभाऊ.... भावना पोचल्याशी मतलब! <<<<
अहो मंजुडी, एकुण प्रतिसादात बाकी काहीच चूक निघत नाही, सगळ्याशी मी सहमत... म्हणून मग स्पेलिन्गा शोधत बसलो इतकेच.
Pages