वुड डक्स ...

Submitted by rar on 27 April, 2015 - 10:00

तुम्हाला कोणाला सावंतवाडीला मिळणारी लाकडाची खेळणी आठवतात का? त्या खेळण्यात एक बदक असायचं, विविध रंगांचं. स्प्रींगमुळे त्याची मान हलायची.... ते बदक म्हणजे 'वुड डक' !
उत्तर अमेरिकेतल्या अनेक पानथळीच्या जागी हे वुड डक्स आपला संसार थाटतात. त्यातले काही स्थलांतरही करतात.
वुड डक हा एक अतिशय देखणा, रंगांची मुक्त उधळण असलेला पक्षी. थोडासे लाजाळू, स्वतःला सांभाळून असणारे हे वुडडक्स म्हणजे फोटोग्राफीसाठी पर्वणीच !
एखाद्या पानथळीच्या जागी मालार्ड, स्वान किंवा कॅनडीयन गीज जेव्हा लोकांना न बिचकता बिनधास्त मुक्तपणे संचार करत असतात, त्याच ठिकाणी तळ्याच्या किनारी वाढलेल्या एकाद्या झाडाच्या फांद्यांमधे, आडोशाला, अडचणीत जिथे सहज माणसं पोचू शकणार नाहीत अश्या कोपर्‍यात हे वुड डक्स असतात.
फिरायला गेलं की वाकडी वाट करुन, थोडंसं आडबाजूला जाऊन ह्या वुडडक्सला पाहणं हा माझा आवडता छंद. माणसांची चाहूल लागली की हे पटकन लपून बसतात. मग काहीही न बोलता, आवाज करता १०-१५ मिनीट तिथं थांबलं, की आपलं अस्तित्व त्यांना सरावाचं तरी होतं, किंवा त्याचा पूर्णतः विसर तरी पडतो. मग ते त्यांच्या लपलेल्या जागेतून बाहेर येतात आणि पाण्यात विहार करायला लागतात...
वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी आवश्यक, चांगली दूरच्या पल्ल्याची टेलेफोटो लेन्स असलेला कॅमेरा सध्यातरी माझ्याकडे नाही. पण छोट्या कॅमेरॅवर हे इतके 'क्लोसअप' असलेले पक्षांचे फोटो काढण्याची एकमेव ट्रीक म्हणजे प्रचंड पेशन्स आणि खूप काळ कोणतीही हालचाल न करता एका जागी बसून त्यांना चाहूल लागू न देता, हळूहळू त्यांच्या जवळ जावून, थोडक्यात पक्षांना 'गंडवून' त्यांचे फोटो काढणे...
ह्या वुडडक्सचे काही फोटो माझ्या Nikon Coolpix वर ....
इतकं मुक्त आणि तरीही शिस्तबद्ध रंगकाम पाहून ह्याचा निर्माता कोण असावा हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही !!

ही फीमेल वुड डक :

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव! भारी आहेत सगळे फोटोज! हे फोटो कमी आणि चित्र जास्ती वाटत आहेत Happy
आणि साध्या कॅमेराने इतके छान फोटो..you are really good at it!

छान. इतकी जास्त रंगांची उधळण न केलेले बऱ्यापैकी धीट आणि लोकांकडून खायला मिळतं म्हणून माणसांचा तळ्याच्या काठाकाठानी पाठलाग करणारे डक बघितलेत. त्यांची जात वेगळी का माणसाच्या अस्तित्त्वाला सरावलेत माहित नाही. थोडं तापमान वाढलं की दिसतील, मग फोटो डकवतो.

रार, ह्या फोटोंमधले रंग नैसर्गिक वाटत नाहीयेत अजिबात. (का माझ्या मॉनिटरवर काही वेगळं दिसतय?)
फारसे नाही आवडले हे फोटो. Sad

वुड डक्सचे रंग नैसर्गिकरित्याच इतके ब्राईट असताता, आणि सूर्यप्रकाश पडला की ते अजूनच चमकतात.
त्यामुळे हे रंगकाम मी केलेले नसून निसर्गाने केलेले आहे...
एक मात्र नक्की, की बॅक ग्राऊंड पासून पुढचं ऑब्जेक्ट सेपरेट करणं माझ्या लहान कॅमेरॅवर शक्यच नाही. त्याला DSLR च हवा, आणि ह्या उणीवेची मला पुरेपुर जाणीव आहे.

रार, पण डक्स सोडून बाकीचे रंगही नैसर्गिक दिसत नाहीयेत. जसं की शेवटच्या फोटोतलं पाणी.
DSLR मिळेल तेव्हा परत काढ ह्यांचे फोटो. Happy

पराग, नाही फोटो आवडले पर्यंत ठीक, पण परत काढ वगैरे Lol
परत काढले तरी ते असेच नसतील, कारण वाइल्ड लाईफ फोटोग्राफी मधे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 'मोमेंट' परत मिळेलच असं नाही.
ह्या फोटोतले २ फोटो सोसायटी ऑफ बर्डींगच्या ह्या महिन्याच्या न्यूज लेटर साठी सिलेक्ट झालेत.... लोल !!

मस्त रार !!! पेशन्सबद्दल प्रचंड अनुमोदन. हमिंगबर्ड चे फोटो काढण्यासाठी मी दोन दोन तास डेक वर बसलेले आहेत, तेही DSLR असताना तेंव्हा तुझ्या कष्टांची कल्पना येतेय Happy

पराग "DSLR मिळेल तेव्हा परत काढ ह्यांचे फोटो" हे आवडले Wink

परत काढ म्हणजे हेच (म्हणजे ह्याच बदकांचे, असेच वगैरे) फोटो परत काढून सुधार असं नाही.. Proud
हे फोटोज चांगले असतीलच पण तू म्हणालीस साध्या कॅमेर्‍याच्या उणिवा आहेत.. म्हणून म्हटलं की जेव्हा DSLR हातात येईल तेव्हा वुडडक्सचे फोटो परत काढ.. मग तुला बॅकग्राऊंड सेपरेट वगैरे करता येईल..

ह्या फोटोतले २ फोटो सोसायटी ऑफ बर्डींगच्या ह्या महिन्याच्या न्यूज लेटर साठी सिलेक्ट झालेत >>>> अरे वा. अभिनंदन. Happy

फोटो कमी आणि चित्र जास्ती वाटत आहेत +१. मला फोटो म्हणून पाहायला विशेष नाही आवडणार कारण रंग थोडे भडक वाटताहेत पण हे डक्स पाहायला आवडतात त्यामुळे तरीही पाहिलेच Happy
"ही फीमेल वुड डक" च्या खालच्या फोटोतले रंग आता दुर्बीण घेऊन पाहायला जाणार एक दिवस. तिला इतक्या डिटेलमध्ये पाहिलं नसाव Wink सो डिटेल्ससाठी आभार.

सोसायटी ऑफ बर्डींगच्या सिलेक्शनसाठी अभिनंदन.

अमितव, तुमच्याकडचे कनेडियन गीज आहेत का चेक करा.

सही फोटोज आलेत रार !
ह्या फोटोतले २ फोटो सोसायटी ऑफ बर्डींगच्या ह्या महिन्याच्या न्यूज लेटर साठी सिलेक्ट झालेत.... लोल !! >>> अभिनंदन .

अप्रतिम फोटोज! आणि हे फोटो काढण्यासाठी तू जे कष्ट घेतले आहेस त्याची पूर्ण माहिती आहे सो विशेष कौतुक Happy

रार, छान आहेत फोटो. मी डीसीला असताना टायडल बेसिन आणि पोटोमॅक नदीमधे कित्येकदा हे बदक पाहिले आणि मेल बदल जास्त आकर्षक दिसतात.

तू ह्या फोटोवर काही प्रक्रिया केल्या आहेत का कारण ती बॉर्डर वगैरे नकोशी वाटते बघायला? फोटो जसे काढले तसेच ते पहायला मला आवडतात. सहसा जर खूप उन्हात फोटो काढले तर ते थोडे भडक होतात. फोटोग्राफी म्हणजे प्रकाशाचा खेळ आहे. त्यामुळे फोटो काढताना आजूबाजूला प्रकाश किती आणि कसा आहे ह्याकडे आधी लक्षात द्यायचे. त्यानंतर फोटोचे बॅकग्राउंड.

मी हे तुला शिकवत वगैरे नाही पण कमेन्ट म्हणून लिहित आहे. कृपया गैरसमज नको. फोटो काढून काढून आणि कॅमेरा वापरुन वापरुन आपोआप फोटोंमधे सुधार होतो हा माझा स्वानुभव आहे.

त्याच ठिकाणी तळ्याच्या किनारी वाढलेल्या एकाद्या झाडाच्या फांद्यांमधे, आडोशाला, अडचणीत जिथे सहज माणसं पोचू शकणार नाहीत अश्या कोपर्‍यात हे वुड डक्स असतात.
फिरायला गेलं की वाकडी वाट करुन, थोडंसं आडबाजूला जाऊन ह्या वुडडक्सला पाहणं हा माझा आवडता छंद. माणसांची चाहूल लागली की हे पटकन लपून बसतात. मग काहीही न बोलता, आवाज करता १०-१५ मिनीट तिथं थांबलं, की आपलं अस्तित्व त्यांना सरावाचं तरी होतं, किंवा त्याचा पूर्णतः विसर तरी पडतो. मग ते त्यांच्या लपलेल्या जागेतून बाहेर येतात आणि पाण्यात विहार करायला लागतात...>>
हे भारी आहे. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय त्याची गंमत कळणार नाही.

सगळ्या फोटो मधे तो डोळ्यात डोळा घातलेला फोटो मस्त. बाकी जोड्यांचे फोटो पण मस्त.

आधीच अनेक रंग व त्यात भडक रंग असलेल्या पक्षांचे फोटो काढताना लाईट खूप हार्श झाल्याने सगळ्यांना फोटो आणखी भडक वाटत आहेत. (पण DSLR घेतलास की परत काढ ही पग्याची कॉमेंट हशा व टाळ्या घेत आहे Lol )

यावर एक उपाय म्हणजे थोडा ब्राईटनेस कमी करता आला तर बघ. ISO\वWhite Balance चेक करत जा. पक्षांचे फोटो काढताना हमखास त्रास होतो तो हार्श लाईटचा. खूप लाईट असेल तर कमी ISO व कमी लाईट असेल तर जास्ती ISO ठेवणे. शक्यतो Birdwatching सुर्योदय होताना\झाल्यावर केले तर कलर भडक वाटत नाहीत. तेच १०-११ नंतर काढलेल्या फोटोमधे खूप जस्ती अंगावर येतात. अर्थात पक्षीनिरीक्षण करताना वा त्यांचे मोठी तोफ लेन्स नसताना Point and Shoot ने इतक्या जवळुन फोटो काढणे या करता अमाप पेशन्स लागतो. २ तास बसुन तुम्ही थोडी गडबद केलीत की डोळ्यादेखत उडुन जातात पक्षी. अशावेळी फक्त डोळ्यात क्लिक करता येतो फोटो. त्यामुळे अनेक जण हळु हळु पक्षाजवळ जाता जाता फोटो काढत रहातात.

ह्या फोटोतले २ फोटो सोसायटी ऑफ बर्डींगच्या ह्या महिन्याच्या न्यूज लेटर साठी सिलेक्ट झालेत>>
सही अभिनंदन. (हे राहीलेच) Happy

काय हो हे ? किती सुंदर ? मोराचा छोटा भाऊ वाटतोय . आपल्याकडे नसतात का हि बदकं ?

आपल्याकडे नसतात का हि बदकं ?>>
नाही फक्त युरोप अमेरीकेतच दिसतात. यांचे भाऊबंद म्हणजे मँडारीन डक. ते काही आशीयाई देशात दिसतात.

Pages