Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00
मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका
http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टण्या, हार्दिक अभिनंदन! ग्रेट
टण्या, हार्दिक अभिनंदन! ग्रेट अचीव्हमेंट!
मेडल फार सुंदर आहे!
अभिनंदन टण्या !! फुल मॅराथॉन
अभिनंदन टण्या !! फुल मॅराथॉन म्हणजे जबरीच !!
मेडल भारी आहे.
पुन्हा एकदा अभिनंदन मेडल
पुन्हा एकदा अभिनंदन मेडल मस्त आहे.
धन्यवाद धन्यवाद. इथे येऊन
धन्यवाद धन्यवाद. इथे येऊन वृत्तांत लिहायचा आहे हे पण दडपण होतेच
@हर्पेनः अरे लोक हाफ मॅराथॉनच्या वेळेतले पाच-दहा मिनिटे कमी करायला वर्षोनवर्षे सराव करतात. तू तर पूर्ण मॅराथॉनची वेळ एक वर्षाच्या आत तीन प्रयत्नातच १ तासाने कमी केलीस. ब्राव्हो!
@लिम्बूभाऊ: अरे ५ तास ३५ मिनिटे म्हणजे फारस गयी गुजरी वेळ आहे. जागतिक विक्रम २ तास २ मिनिटे ५७ सेकंद आहे. म्हणजे हा मनुष्य ताशी तेरा मैल (२१ किमी) वेगाने दोन तास पळाला! सगळे एलिट धावक २ तास १० मिनिटाच्या आत २६ मैल पुरे करतात. थोडीशी उपजत क्षमता आणि प्रचंड सराव यामुळे माणुस काय गाठू शकतो त्याचे हे जबरदस्त उदाहरण आहे. २६ मैलापेक्षा अधिक अंतराच्या स्पर्धांना अल्ट्रामॅराथॉन म्हणतात. जवळपास १३५ मैल एव्हड्या प्रचंड अंतराच्या स्पर्धा होतात.
मी परवा मॅराथॉन संपवताना परत पूर्ण मॅराथॉन पळायचे नाही असे ठरवले होते. पण आजच ऑक्टोबरमध्ये होणार्या डेमॉइन मॅराथॉनला अर्ज दाखल केला
धनि, आता तुमचा वृत्तांत येउदे.
टण्या, तो वेग ताशी बत्तीस
टण्या, तो वेग ताशी बत्तीस नसून वीस किमीच्या आसपास हवा ना?
आ.न.,
-गा.पै.
अरे हो. मैल किमी गोंधळात
अरे हो. मैल किमी गोंधळात मिश्टेक झाली
भारी, टण्या अभिनंदन!!
भारी, टण्या अभिनंदन!!
>>> म्हणजे हा मनुष्य ताशी
>>> म्हणजे हा मनुष्य ताशी तेरा मैल (२१ किमी) वेगाने दोन तास पळाला! <<< अचाट... माहितीबद्दल धन्यवाद.
तरी पाच/सहा तास वेळेस गयीगुजरी असे मी म्हणणार नाही. प्रत्येकाची परिस्थिती/पार्श्वभूमि वेगवेगळी असतेच, व ती दरवेळेस अशा खेळांना साजेशी पुरक असतेच असे नाही.
अन तरीही अतिशय विरोधी परिस्थिती असुनही किमान वेळेच्या आत तुम्ही स्पर्धा पूर्ण करता तेव्हा ती लढत कोणा व्यक्तिशी/विक्रमाशी वगैरे नसून तुम्हाला असलेल्या "मर्यादित उपलब्धतेचा" परीपूर्ण व पराकोटीचा वापर करण्याच्या तुमच्याच क्षमतेची तुम्हीच लावलेली व आजमावलेली ती कसोटी असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे करताना तुमच्यासमोर कोणतेही "पैशाचे" आमिष नसते किंवा हे तुम्ही पैसा कमविण्याकरता करीत नसून निव्वळ एक खेळ म्हणुनच करीत असता.
अन त्यामुळेच तुम्ही किम्वा बीआरएम मधील खेळाडू अभिनंदनास-कौतुकास पात्र ठरता.
हां, आता ज्याची अक्कल कॉमर्स/सीए साईडने निव्वळ स्टॅटिस्टिकल/आकडेवारीवर उच्चनीच-फायद्यातोट्याची ठरविण्याची आहे, त्यास २ तास १० मिनिटे या वेळेपेक्षा जास्त असलेली कोणतीही वेळ टाकाऊच वाटणार.
माझ्यामते त्यांनी माणसांच्या दौडीपेक्षाही "घोड्यांच्या रेसकडे" जास्त लक्ष द्यावे, तिथे निदान पैसे जुगारात लावले तर स्वतःच्या बुडास काडीचेही न कष्टवता त्यांच्या स्टॅटिस्टिकल अक्कलेला आव्हान तरी मिळेल पैसे जिंकण्याहरण्याचे. असो.
मी मात्र तुझे व अशा स्पर्धात जिद्दीने सहभागी होणार्या प्रत्येक मायबोलीकराचे अभिनंदनच करणार... आकडेवारीकडे न बघता.
टण्या जागतीक क्रमवारीत तू
टण्या जागतीक क्रमवारीत तू कितव्या नंबरवर आहेस यापेक्षा त्या क्रमवारीत तू आहेस हेच भारी आहे. ठेव ते वर!!
पण आजच ऑक्टोबरमध्ये होणार्या डेमॉइन मॅराथॉनला अर्ज दाखल केला>> जेब्बात!!
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे करताना तुमच्यासमोर कोणतेही "पैशाचे" आमिष नसते किंवा हे तुम्ही पैसा कमविण्याकरता करीत नसून निव्वळ एक खेळ म्हणुनच करीत असता.
>>>>
कमावतो कुठले डोंबलाचे. सासर्यांनी विचारले हे पूर्ण केल्यावर बक्षिस मिळणार का. म्हटलं बक्षिस म्हणजे एक मेडल, बाकी आपल्याच खिशातून एन्ट्री फी (जी १०० डॉलरच्या आसपास असते), जाण्यायेण्याचा खर्च (माझ्या इथून कॅन्साससिटी ४०० किमी) आणि वर्षभर सरावाचा आपल्याला 'त्रास'! असो. आता पुढल्या मॅराथॉनवाल्यांचे वृत्तांत येऊदेत. धनि दोन-तीन हाफ मॅराथॉन धावणार आहे.
तसेच हर्पेनचे एक वर्षात एक तास कमी कसा केला हे वाचायला अतिशय आवडेल.
लिम्ब्याने बीआरएम लवकर पूर्ण करून एक लेख पाडावा ही विनंती.
लिंबुटिंबु.. तुमच्या वरच्या
लिंबुटिंबु.. तुमच्या वरच्या पोस्टशी १००% सहमत!
टण्या.. तु जर माझे ऑलिंपिक्स सदर वाचले नसशील तर तेव्हा मी अॅटलांटा ऑलिंपिक्सचे माझे अनुभव लिहीले होते. तुझ्यासाठी व तुझ्यासारखे मायबोलिवरचे सगळे हौशी अॅथलीट यांच्या मेहनतीला दाद देण्यासाठी त्यातला एक अनुभव इथे परत लिहीतो.
(हा लेख वाचताना तुम्ही सगळ्या हौशी अॅथलिट्सनी टुलुच्या ऐवजी टण्या,धनी,रार्,वैद्यबुवा,कमळी,हायझेनबर्ग्,हर्पेन्,बी केदार्,आशुचँप व इतर सगळे..अशी आपापली नावे घालुन लेख वाचावा...
तर परत एकदा माझ्या ऍटलांटा ऑलिंपिक्स अनुभवांकडे वळुयात..
तर अशी १०० मिटर्स फ़ायनल्सची शर्यत डॉनाव्हन बेलीने जागतीक विक्रम करुन जिंकल्यावर मी माझ्या भावाला सांगीतले की तु आई व वहिनीबरोबर घरी जा मी मात्र संपुर्ण सेशन संपेसपर्यंत इथे राहाणार आहे. एव्हाना जोराचा पाउसही सुरु झाला होता व अर्धे स्टेडिअम रिकामे झाले होते. महत्वाच्या शर्यती ज्यात अमेरिकन ऍथलिट्स भाग घेणार होते त्याही संपल्या होत्या व आता फक्त महिलांची १०,००० मिटर्सची शर्यत बाकी होती. १०,००० मिटर्स म्हणजे स्टेडिअमला २५ फेर्या मारायच्या. म्हणजे अजुन ४५ ते ५० मिनिटेतरी अजुन ती शर्यत संपायला लागणार असा विचार करुन बरेच जण पावसापासुन व शेवटी होणार्या गर्दीपासुन सुटका व्हावी म्हणुन स्टेडिअम सोडुन चालले होते. पण माझ्यासारखे क्रिडाप्रेमी पावसात थांबुनच राहीले होते. पण अर्धी माणसे निघुन गेल्यामुळे एक फायदा झाला... संयोजकांनी बाकीच्यांना पुढे येउन बसण्याची मुभा दिली व मला ट्रॅकपासुन अगदी ४ फ़ुटांवर पहिल्या रांगेत जागा मिळाली जिथुन मला सगळे स्पर्धक हाकेच्या व हात शेक करायच्या अंतरावरुन बघायला मिळणार होते.
शर्यत सुरु झाली. मी माझा या शर्यतीबद्दलचा थोडा अभ्यास आधीच घरुन करुन आलो होतो. त्यावरुन मला माहीत होते की १९९२ मधे बार्सिलोना मधे ही शर्यत इथिओपियाची डिरार्टु टुलु हिने जिंकली होती व याही वेळी तिच संभावीत विजेती होती. पहिल्या दहा फेर्यांनन्तर टुलुच पहिली होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा टुलु माझ्या समोरुन पास होत होती तेव्हा मी जोरात ओरडुन 'गो टुलु गो' असे ओरडुन तिला प्रोत्साहन देत होतो. मी पहिल्या रांगेत असल्यामुळे तिला माझा आवाज ऐकु येत होता. तिला वाटले असेल की हा कोण आहे माझ्या नावाने मला प्रोत्साहन देणारा? माझ्या मनात मात्र टुलु ही मला आतापर्यंत माहीत असलेल्या ऑलिंपिक्स हिरोंचे प्रतिनिधीत्व करत होती... माझ्या मनात तीच झाटोपेक होती,तिच अलाय मिमु होती,तिच फ़ॅनी ब्लॅन्कर्स कुन होती व तीच स्टिव्हन अखवारी होती... त्या महान ऍथलिट्सनी जेव्हा ऑलिंपिक्सच्या रंगमंचावर आपापले मास्टरपीस(स्लार्टीच्या भाषेत.... मालकतुकडे!)सादर केले होते तेव्हा मी त्याला मुकलो होतो... आज टुलुला प्रोत्साहन देताना माझ्या मनात मी अप्रत्यक्षरित्या त्या व त्यांच्यासारख्या महान ऍथलिट्सना पोस्थ्युमसली एनकरेज करत होतो... माझे अंग पावसात पुर्ण भिजले होते पण त्याहीपेक्षा माझे मन माझ्या ऑलिंपिक्सच्या आठवणींनी त्याक्षणी जास्त भिजले होते. असा अनुभव आपल्याला आयुष्यात परत कधी अनुभवयाला मिळेल की नाही हे मला माहीत नव्हते म्हणुन मनापासुन टुलुला नावाने व बाकीच्यांनासुद्धा प्रोत्साहन देत मी संपुर्ण शर्यत संपेसपर्यंत उभा होतो. शर्यत संपली... टुलु पहीली आली नाही... तिला यावेळेला पदकही मिळाले नाही. पण मला त्याची पर्वा नव्हती. ती आणी हे सगळे वर्ल्ड क्लास ऍथलिट्स शर्यतीत भाग घेउन..... माणसाचे जे स्वाभावीक नेचर असते की आपण आपले सर्वस्व पणाला लावुन ट्राय टु बी द बेस्ट..त्याचे उत्तम उदाहरण होते. माझ्या मनात ते सगळे विजयी होते. मला शेवटचा नंबर आलेल्या ऍथलिटची तिने या ऑलिंपिक्समधे भाग घेण्यासाठी केलेली आयुष्यभरची मेहनत दिसत होती व म्हणुन तिचेही टाळ्या वाजवुन मी कौतुक करत होतो.
शर्यत संपली. लोक स्टेडिअम रिकामे करुन जात होते. मी मात्र झिम झिम पावसात माझ्या सिटवर बराच वेळ बसुन होतो. त्या ऑलिंपिक्सच्या विशाल स्टेडिअमकडे बघत माझ्या मन्:पटलावर मला माहीत असलेले ऑलिंपिक्सचे जुने क्षण आणत होतो व ते क्षण या स्टेडीअममधे परत एकदा जगत होतो. स्टेडिअम रिकामे असुनसुद्धा मला १९५२ मधल्या हेलसिंकी ऑलिंपिक्स स्टेडिअममधला झाटो...पेक....झाटो....पेक.. चा गजर ऐकु येत होता... मला जेसी ओवेन्स माझ्यासमोरुन वार्याच्या वेगात धावताना दिसत होता... भारताचा महान हॉकीपटु ध्यान चंद व त्याचा भाउ रुप चंद बर्लिन ऑलिंपिक्समधे त्यांच्या हॉकीच्या तळपत्या बॅटीची जादु दाखवत बॉल ड्रिबल करत सफ़ाइने गोल करताना दिसत होते...झालच तर आपल्या भारताची पलावलकुंडी ठाकरमपिल उषा फक्त एक शतांश सेकंदाने ४०० मिटर्स हर्डल्समधे पदक हुकल्याने कंबरेवर हात ठेवुन वाकुन निराशेने लॉस ऍन्जेलीस ऑलिंपिक्स स्टेडिअममधे उभी असलेली दिसत होती...
स्टेडिअममधले दिवे मालवले गेले व शेवटी मला उठायलाच लागले. परत एकदा त्या भव्य पण रिकाम्या ऑलिंपिक्स स्टेडिअमकडे पहात व माझ्या पाठीच तेवत असलेल्या ऑलिंपिक्स मशालीला मनातल्या मनात वंदन करुन मी भिजल्या अंगाने व ऑलिंपिक्सच्या आठवणींनी तितक्याच भिजल्या मनाने स्टेडिअममधुन जड अंत्:करणाने काढता पाय घेतला व डनवुडी ट्रेन पकडुन मध्यरात्री घरी पोहोचलो.....
वाह मुकुंद!!
वाह मुकुंद!!
मुकुंद, भारी लिहिलय हो
मुकुंद, भारी लिहिलय हो तुम्ही.... मनाला भिडले अगदी.
टण्या, त्याकरता मी अजुन सहा महिने तरी घेणार. प्रयत्न चालू आहेत.
मुकुंद खूप छान पोस्ट
मुकुंद खूप छान पोस्ट
टण्या अभिनंदन! आठवडा भर माबो
टण्या अभिनंदन!
आठवडा भर माबो वर नव्हतो तर आत्ता पाहिला तुझा प्रतिसाद!!
मस्त मेडल आहे आणि पहिल्या वेळेस साडे पाच तास वाईट नाहीत. हर्पेन म्हणतो ते खरं आहे. मॅरॅथॉन चे ट्रेनिंग जरा जास्तीच असते. मी अजुनही विचारच करतो आहे की फुल चे ट्रेनिंग सुरू कराअवे की नाही. टाईम कमिटमेंट महत्वाची आहे.
आता १ तासात जाऊन एक हाफ पळून येतो मग लिहितो कशी झाली ते
धनिभाऊ, हाफ मॅराथॉन कशी झाली?
धनिभाऊ, हाफ मॅराथॉन कशी झाली? का अजून पळतोच आहेस?
झाली झाली .. मग झोपुन पण झालं
झाली झाली .. मग झोपुन पण झालं
आजची काही खास नाही झाली. माइल १.५ मध्येच डाव्या पोटरीत क्रॅम्प आले. त्यामुळे पुढची सगळी थोडे पळत थोडे चालत पूर्ण केली.२:३८ लागले या वेळेस. त्यात एक मोठी टेकडी (टर्की माऊंटन) २ दा चढून उतरायची होती. त्या मुळे सगळ्यांचाच वेळ वाढला. बहुतेक कोणीच पीआर नसेल केला आज
पण मस्त वाटले. म्हणजे १००% फीट नसतानाही रेस पूर्ण करण्याचा अनुभव आला. आणि महत्त्वाचे कळले म्हणजे प्रत्येक दिवस वेगळा असतो.
आता २ आठवड्यांत फार्गो हाफ मग थोडे दिवस विश्रांती घेऊ.
अभिनंदन
अभिनंदन
मस्त रे धनि. आता फारगावात
मस्त रे धनि. आता फारगावात कमाल करा
मस्त रे धनि. आता फारगावात
मस्त रे धनि. आता फारगावात कमाल करा
मस्त रे धनि. आता फारगावात
मस्त रे धनि. आता फारगावात कमाल करा
टण्या, काय झालं रे एकदम?
टण्या, काय झालं रे एकदम? त्रिवार अभिनंदन करतोयस का?
त्रिवार धन्यु
त्रिवार धन्यु
मी पण कालच्या रवीवारी, 'पुणे
मी पण कालच्या रवीवारी, 'पुणे रनिंग' च्या 'एल्सॉम' म्हणजे 'लास्ट संडे ऑफ द मंथ' ऑटीझम अवेअर्नेससाठी आयोजित केलेली हाफ मॅरॅथॉन पळालो. स्पर्धा आमच्या सरावाच्या नेहेमीच्या परिसरात होती. त्यामुळे (च) सराव नसताना देखिल भाग घेतला.
मार्ग असा होता - प्रभात रोड गल्ली क्र्मां क १५ पासून सुरु होऊन डेक्कनवरून कॅफे गूडलक चौकातून फर्ग्युसन रस्त्यावर वाडेश्वरपाशी लगेच डावीकडे बी एम सी सी कॉलेज रस्त्यावरून पुढे परत डावीकडे लॉ कॉलेज रस्त्याला लागून तिथल्या वाडेश्वर नंतर परत डावीकडे कॅनॉल रस्त्यावरून प्रभात रस्त्याची गल्ली क्र.१५ असा लूप ४ वेळा.
माझी ही पण दोन तासाच्या आतमधे झाली पण जरा वाट लागली. सव्वापाच चे रिपोर्टिंग होते. मी तर तेव्हा उठलो. स्पर्धा ६ वा. चालू होणार होती. मी जेम्तेम ६ ला पाच कमी असताना पोचलो. कसेबसे बीब घेतले. स्ट्रेचिंग केलेच नाही, स्पर्धा ठीक ६ वा चालू झाली.
भाग कसा घेऊ नये याचे उत्तम उदाहरण
पुणे रनिंग तर्फे आयोजित एल्सॉम ह्या खास धावकांनी धावकांकरता आयोजित केलेल्या स्पर्धा असतात. त्या नेहेमीच उत्कृष्ट रित्या आयोजित असतात. ही स्पर्धा देख्लि त्याला अपवाद नव्हती.
शेवट शेवट ऊन बर्यापैकी वाढलेले होते तरी झाडांच्या सावलीतून जाणारा रस्ता असल्याने त्रास झाला नाही.
अभिनंदन धनि
अभिनंदन धनि
अभिनंदन, धनि व हर्पेन.
अभिनंदन, धनि व हर्पेन.
पुण्यात काय काय गोष्टी /उपक्रम चालू असतात ना?
इकडे पिंचिमधेही असतील... बघायला हवेत.
अभिनंदन हर्पेन! मी तरी अजुन
अभिनंदन हर्पेन!
मी तरी अजुन एक दिवस आधी जाऊन बीब घेऊन येतो. उगीच तिथे सकाळी त्या पिना लावत बसणे नको वाटते
अभिनंदन धनि आणि हर्पेन !
अभिनंदन धनि आणि हर्पेन !
धन्यवाद लिंटी, धनि आणि
धन्यवाद लिंटी, धनि आणि पराग.
धनि, हल्ली,शक्यतो कोणत्याच स्पर्धेत त्याच दिवशी बीब मिळत नाही. ही जरा घरगूती होती त्यामुळ बहुतेक पण कोणालाच आधी बीब दिले नव्हते.
असो.
एक स्फुर्तीदायक गोष्ट
कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्यावर मात करून ८ महिन्यातच पुर्ण मॅरॅथॉन (४२ किमी) धावणार्या माणसाची.
http://www.thebetterindia.com/20854/story-went-battling-cancer-running-f...
कालच्या रवीवारी, 'पुणे रनिंग'
कालच्या रवीवारी, 'पुणे रनिंग' तर्फे आयोजित 'एल्सॉम' म्हणजे 'लास्ट संडे ऑफ द मंथ' मधे भाग घेतला होता. ही नेपाळ मधल्या भूकंप पीडितांना मदत करण्यासाठी म्हणून चॅरिटी रन होती.
ही स्पर्धा फ्री रनर्स ह्या गृपने रेसकोर्सच्या परिसरात आयोजित केली होती.
मी १५ किमी मधे भाग घेतला होता. सध्या नियमीत सराव नसल्याकारणाने कसं होईल अशी धाकधूक होती पण १ तास २४ मिनिटात पुर्ण केली. फार वाईट नाहीये ना वेळ
५ किमी चे लूप होते. उत्साही स्वयंसेवक, उत्कृष्ट संयोजन...
Pages