छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२२ व्या पुण्यतिथीनिमित्त यंदाच्या फाल्गुन अमावास्येला वढू - तुळापुर येथे जाणे झाले. शिवाय तिथूनच जवळच असलेल्या इंदोरी येथील खंडेराव दाभाडे यांनी बांधलेल्या किल्ल्याची आणि वडगाव येथील दुसऱ्या मराठा - इंग्रज युद्धाचे स्मारक असलेल्या ठिकाणी घेतलेली काही क्षणचित्रे...
तुळापुरचा इतिहास - तुळापुरचे मूळनाव नागरगाव असे होते. १६३३ मध्ये शहाजी राजांनी या ठिकाणी हत्तीचा वापर करून तुळा केल्यानंतर ह्या जागेचे नाव तुळापुर करण्यात आले. ह्या प्रसंगी रुद्रनाथ महाराजांच्या आदेशावरून मुरार जगदेव आणि शहाजी महाराज यांनी येथील संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. नदीकाठी सुंदर घाट बांधला ज्याचे उद्घाटन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या हस्ते झाले. ह्यावेळी शिवाजी राजे अवघ्या ३ वर्षांचे होते.
पुढे १६८९ मध्ये ह्याच ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची निघृण हत्या करून, त्यांच्या देहाची विटंबना करून, शरीराचे तुकडे नदीपलीकडे फेकून दिले. नदीच्या पलीकडे वढू नावाचे गाव आहे तेथील काही लोकांनी त्यांच्या शरीराचे उरले-सुरलेले अवयव एकत्र शिवून त्यांना भडाग्नी दिला. ज्या लोकांनी हे काम केले त्यांचे आडनाव आता 'शिवले' असे आहे. आजही गावात मोठ्या प्रामाणावर शिवले आडनावाच्या लोकांची वस्ती आहे. तुळापुर बरोबर वढू येथे देखील संभाजी राजांचे एक स्मारक उभारलेले आहे.
१. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा - तुळापुर.
२. कवी कलश यांची समाधी - तुळापुर.
३. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी - तुळापुर.
४. समाधी समोरील संगमेश्वर मंदिर.
५. भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम.
६. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी - वढू
७. वढू येथे काढलेली रांगोळी -
आम्ही मग तिथून निघालो आणि देहू मार्गे इंदोरी येथे गेलो.
८. देहू येथील तुकाराम महाराज गाथा मंदीर -
९. इंदोरी किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार.. दरवाज्यासमोरच आता अतिक्रमण झाले आहे. हा किला अजूनही दाभाडे यांच्या मालकीचा आहे.
१०. किल्ल्यामागून वाहणारी इंद्रायणी नदी -
११. किल्ल्याच्या दरवाजा २ माजली असून आतील बांधकाम विटांचे आहे.
इंदोरी वरून २० एक मिनिटात जुन्या मुंबई-पुणे हायवेवर बाहेर पडता येते. तिथून वडगाव येथे रस्त्याच्या बाजूलाच हे छोटेसे पण सुंदर स्मारक बांधलेले आहे.
१२. वडगाव येथील मराठा - इंग्रज युद्धाचे स्मारक. ब्रिटीश अधिकारी नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करताना.
१३. युद्धाचा संक्षिप्त इतिहास - मराठीत.
१४. युद्धाचा संक्षिप्त इतिहास - इंग्रजीत.
१५. महादजी शिंदे यांचा विरासानातील पुतळा -
१६. पुतळा आणि विजयस्तंभ
१७. महादजी शिंदे यांचा विरासानातील पुतळा - सूर्यास्त होता होता.
भटकंती आणि इतिहास प्रकाश चित्रांमधून गुंफायचा हा एक छोटासा प्रयत्न कसा वाटला ते नक्की कळवा.
समाप्त...
धर्मवीर छत्रपती संभाजी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना
त्रिवार मुजरा !
मस्तच !!
मस्तच !!
अप्रतीम
अप्रतीम
प्रचि ७ मधील रांगोळीतील
प्रचि ७ मधील रांगोळीतील राजमुद्रा सुरेख! सेनापती,वा.सी.बेंद्रे यांच्या संभाजी महाराजांवरील पुस्तकाबद्द्ल माहिती दिल्याबद्दल आभार!
३३३व्या पुण्यतिथीनिमित्त
३३३व्या पुण्यतिथीनिमित्त शिवपुत्र धर्मवीर सम्भाजिराजाना त्रिवार प्रणाम
रोहन मस्तच प्रची आहेत सगळ्या.
रोहन मस्तच प्रची आहेत सगळ्या.
एक सुचना फक्त. तू देहूमधील तुकाराम मंदीर म्हणुन जे सांगितल आहेस ते गाथा मंदीर आहे तुकारामाचे मंदीर देहूगावात आहे जुन्या वाड्यात तिथे पादुका आहेत त्यांच्या आणि वरती पत्र्याची शेड आहे.
खरोखर ऐतिहासिक भटकंती शेवटचा
खरोखर ऐतिहासिक भटकंती
शेवटचा प्रचि जबरदस्त.
Pages