Submitted by साधना on 20 April, 2015 - 01:28
ठिकाण/पत्ता:
राणी बाग, भायखळा
निसर्गप्रेमी मंडळींनो,
सालाबादाप्रमाणे राणीबागेत वसंताचे आगमन झालेले आहे.
राणीबागेबद्दल पेपरात येऊन धडकणा-या विविध बातम्या वाचल्यास अजुन काही वर्षांत वसंताला राणीबागेचा पत्ता सापडणे कठिण होईल असा रंग दिसतोय. असे कधीही न होवो ही इच्छा मनी धरुन आपण आपल्याला जेवढे जमेल तसे, जेव्हा जमेल तेव्हा राणीबागेतल्या निसर्गाचे दर्शन घेऊया.
तर सालाबादाप्रमाणे आयोजित केलेल्या या उत्सवास भरभरुन हजेरी लावा.
राणीबाग दर्शन करुन दमलेले निगप्रेमी चर्चगेटच्या सत्कार मध्ये थालीचा आनंद घेत श्रमपरिहार करतील असा एक विचारप्रवाह पुढे येत आहे. तर या प्रवाहास अजुन पुढे घेऊन जावे ही विनंती.
माहितीचा स्रोत:
असेच रिकामटेकडे लोक, ज्यांना शनवार रविवार कुठे जावे हा प्रश्न कायम पडलेला असतो.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, April 25, 2015 - 00:00 to 06:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तेव्हाच इतके उन लागत होते,
तेव्हाच इतके उन लागत होते, आता कल्पनाच नाही करू शकत!
>>>>>>
साडेसहाला बंद होते, साडेचारपाचला गेलात तरी दिड दोन तास निसर्गाच्या सानिध्यात पुरेसा ठरावा .. त्यावक्ताला तरी आत उन्हं किंवा गरम वगैरे नाही वाटत.. मी तिथे शेवटचे १० दिवसांपूर्वी गेलो होतो
हा लेटेस्ट फोटो..
हा लेटेस्ट फोटो.. पाणघोड्याचा.. भले जिप्सीसारखा सुंदर नसेल च, तरी थीम बघा काय भारी आहे.. समोरून एक महाकाय पाणघोडा चाल करून येतोय पण त्याच्यासमोर एक यकिंश्चित कावळा बिनधास्त उभा आहे.. कारण त्याचा आपल्या पंखांतील बळावर विश्वास आहे
तर सांगायचा मुद्दा हा की, संध्याकाळच्या वेळेला गेले तर पाणघोडे मस्त डबक्यातून बाहेर येत दर्शन देतात. आणि झुलत झुलत पिंजर्यात जातात. मी हा एकच फोटो काढला आणि मग पुढचे सारे विडिओमध्ये कैद केले.. याच्या पाठोपाठ दुसराही पाण्यातून बाहेर येत पिंजर्यात गेला, त्या मिनिटभराच्या विडिओत
डब्बल पोस्ट झाली
डब्बल पोस्ट झाली
प्रत्येक वर्षी असत हे गटग
प्रत्येक वर्षी असत हे गटग
मला यायची खुप इच्छा आहे. पण
मला यायची खुप इच्छा आहे. पण मी इथे कुणालाच प्रत्यक्ष ओळखत नाही. शनिवारी ऑफ़िस देखील आहेच. पण जमत असेल तर आले तर चालेल का?
तुम्हाला हे स्थळ म्हणायचे आहे
तुम्हाला हे स्थळ म्हणायचे आहे काय?
http://www.mumbai.org.uk/parks-gardens/victoria-gardens.html
पण आता तर याचे नाव जिजामाता उद्यान http://en.wikipedia.org/wiki/Jijamata_Udyaan असे आहे ना?
वेळ बदलून रविवार करा कृपया
वेळ बदलून रविवार करा कृपया
शुक्रवार रात्री नऊपर्यंत
शुक्रवार रात्री नऊपर्यंत पक्की वेळ आणि वार पुन्हा लिहा (रविवार असेल तर).पिंजर्यातले प्राणी एवढे हाल काढतात तर आपण एक दिवस चार तास उन्हात काढूया.नंतर त्याचे उट्ट काढू. डबा बाटली आणावी लागेल का?
जाई, अगं रविवार करायचा विचार
जाई, अगं रविवार करायचा विचार केलेला पण मलाच जमत नाहीय. एका न टाळता येण्याजोग्या समारंभाला उपस्थित राहावे लागणार. मग पुढच्या रविवारचा विचार केला (३मे) त्याला जिप्सीला जमत नाहीय. सो, बहुतेक हा शनवारच फिक्स होईलसे वाटतेय. तुझे गेल्या वेळेलाही असेच हुकलेले हे आहे माझ्या लक्षात. पण यावेळेस नाईलाज आहे गं. तरी परत एकदा बघते, बहुसंख्येने काय जमते ते आणि जर तारीख बदलत असेल तर तुला कळवते.
चेतन, जिजामाता उद्यान हे अधिकृत नाव आहे हे खरेय. पण लहानपणापासुन राणीचा बाग म्हणुनच बोलायची सवय झालीय. तशी जिजामाताही राजमाता होतीच ना. सो, त्या अर्थानेही राणीचाच बाग.
एसार्डी, पाण्याची बाटली आणावी लागेल. राणीबाग भटकंतीनंतर सत्कारमध्ये जायचे असा एक विचारप्रवाह चर्चिला गेलाय ऑफलाईन. ज्यांना जमेल ते सत्कारमध्ये जातील, ज्यांना सत्कार लांब पडेल (चर्चगेटला आहे) त्यांनी राणीबागेतच श्रमपरिहार करावा. तसेही आम्ही सोबत डबाबाटली बाळगतोच. राणीबागेत भर वैशाखाच्या उन्हात एकाच वेळी पायांची सायकल आणि तोंडाची टकळी चालवणे काय खायचे काम नाही. मागचे रिव्यु वाचले तर हिंट मिळेल.
मला यायची खुप इच्छा आहे. पण मी इथे कुणालाच प्रत्यक्ष ओळखत नाही. शनिवारी ऑफ़िस देखील आहेच. पण जमत असेल तर आले तर चालेल का?
इथे एकमेकांना आता ओळखत असलेलेही कधी काळी एकमेकांना ओळखत नव्हते. प्रत्यक्ष भेटल्याशिवाय ओळखणार कसे? माबोवरचे असंख्य गटगवृत्तांत वाचले तर दर गटगमध्ये कोणी ना कोणी नविन असतेच जे कोणालाही ओळखत नसतात. माबोगटग ही इथल्या आयडीजना प्रत्यक्ष भेटण्याची संधी असते. ज्यांना भेटण्याची इच्छा आहे त्यांनी अवश्य येऊन भेटावे. उगीच इतरांनी आग्रह करण्याची वाट पाहात बसु नये.
तु तुझा फोन नंबर मला संपर्कातुन पाठव. मी शनवारी तुला सकाळी फोन करेन. तु येत असशिल किंवा उशीरा येत असशील तर तसे मॅनेज करता येईल.
साडेसहाला बंद होते, साडेचारपाचला गेलात तरी दिड दोन तास निसर्गाच्या सानिध्यात पुरेसा ठरावा
एवढा वेळ कदाचित पुरेल जर तुम्ही फक्त तोंड बंद करुन प्राणी पाहात आणि जमल्यास झाडे पाहात भराभरा चालत असाल तर. माबोकर कुठेही गेले की आधी दंगा घालायला सुरवात करतात. त्यात राणीबागेत इतकी झाडे आहेत आणि ती इतक्या संख्येने फुललेली असतात की बहुसंख्य माबोजनतेला त्या झाडांच्या नावांचा विसर पडतो. मग प्रत्येक झाडाखाली उभे राहुन त्या झाडाचे नाव गाव, त्याची फॅमिली, , त्या झाडावर लिहिलेले नाव, मग ते नाव खरेच त्या झाडाचे आहे की कोणी मुर्खाने चुकीचे नाव त्याला चिकटवले, त्याचे मागच्या वेळेल कोणी फोटो काढलेले, कोणाला त्या झाडाबद्दल आणि त्या झाडानिमित्त अजुन कोणाकोणाबद्दल काय काय आठवले या सग़ळ्या गोष्टींची उजळणी होते. मग वेगवेगळ्या कोनातुन त्या झाडाचे फोटोसेशन पार पडते. प्रत्येकाला आपल्याला दिसतेय तीच बाजु फोटोसाठी उत्तम आहे असे वाटत असल्याने एका फोटोवर काम भागत नाही. तर अशी कल्लागिरी करत झाडे पाहणे हे एक दिड तासात आटपणारे काम नाही. मोस्टली आम्ही १० च्या सुमारास आत जातो ते शेवटी साधारण ३- ३.३० च्या सुमारास पोटात भुकेने कावळॅ बोंबाबोंब करु लागले की बाहेर पडतो. बाहेर पडतानाही यावेळी किती झाडे पाहिलीच नाहीत याची चर्चा करतच बाहेर पडतो.
पाण्याची बाटली काचेची हवी.
पाण्याची बाटली काचेची हवी. प्लॅस्टीकची आत नेता येत नाही. ऑस्ट्रेलियन चेस्टनटच्या झाडाखाली वॉटर कूलर आहे. आतमधे एक कँटीन आहे ( मोराच्या पिंजर्याजवळ. तिथे काहीबाही मिळू शकते ) बाकी बाहेर बरेच स्टॉल्स आहेत.
ज्यांना बी बियाणे, खते घ्यायची आहेत त्यांनी भायखळा स्टेशनसमोरच्या दुकानांना अवश्य भेट द्या.
आतमधे एक कँटीन आहे ( मोराच्या
आतमधे एक कँटीन आहे ( मोराच्या पिंजर्याजवळ. तिथे काहीबाही मिळू शकते )
नाही हो. आतमध्ये बहुतेक कँटिन नाहीय. आत खायचे पदार्थही नेता येत नाहीत. ते मोराच्या पिंज-याजवळ कर्नाळ्याला आहे.
आहे, अगदी धुरकट आहे. मी कोल्ड
आहे, अगदी धुरकट आहे. मी कोल्ड ड्रींक्स घेतले होते तिथे. केवड्याचे झाड आहे त्याच्या मागे.
टेंभुर्णीच्या झाडाजवळ दर्गा पण आहे. पुर्वी एक खुले नाट्यगृह पण होते. शाहीर साबळ्यांचा कार्यक्रम मी तिथे बघितला होता. अजून आहे ते पण आता बंद असते.
गेलात की, टॉयलेटजवळच्या नर्सरीला पण भेट द्या. तिथे काही दुर्मिळ फुलझाडे आहेत ( जिप्स्याला माहीत आहे ती जागा. )
अहो ती नर्सरी ११ वाजता बंद
अहो ती नर्सरी ११ वाजता बंद होते. मी गेल्या वेळेस पाहात होते. तरीही पाहते परत एकदा. मी आशा करतेय की मला सीताअशोकाच्या झाडाखाली रोपे मिळतील.
ओके साधनाताई , या वेळीही नाही
ओके साधनाताई , या वेळीही नाही जमणार . यू पीपल एन्जॉय
ओक्के.. जमत असेल तर नक्की
ओक्के.. जमत असेल तर नक्की कळवते. मला कधिपासून एखाद्या गटगला यायची इच्छा आहे.. पण कधी जागा ज़मत नाही तर ह्यावेळी वेळ..
>>मी फेब्रुवारीत गेले होते.
>>मी फेब्रुवारीत गेले होते. तेव्हाच इतके उन लागत होते, आता कल्पनाच नाही करू शकत>>>> +१
माझीही त्यामुळेच हिम्मत होत नाहिये. फेब्रुवारीत गेलो होते त्यानंतर बाळ उन्हामुळे आजारी पडला होता.
मी अमी, बाळ लहान असेल तर नका
मी अमी, बाळ लहान असेल तर नका रिस्क घेऊ. खुप उन आहे बाहेर, अगदी वैशाखवणवा म्हणतात तसा. येणा-यांनी कृपया डोक्यावर हॅट किंवा छत्री असा काहीतरी बंदोबस्त करावा. झाडांची गर्द सावली असते तरीही आपण काळजी घेतलेली बरी.
sorry Saturday la important
sorry Saturday la important kam aslyamule yeta yenar nahi mala tumha saglyana bhetayche hote mi maaybolivar new ahe manun sarvanchi olahk Karun ghyayachi hoti
ज्यांना बी बियाणे, खते
ज्यांना बी बियाणे, खते घ्यायची आहेत त्यांनी भायखळा स्टेशनसमोरच्या दुकानांना अवश्य भेट द्या>>
नामदेव उमाजी हे प्रसिध्ध दुकान आहे ना?
इथे राणीच्या बागेतील झाडांची
इथे राणीच्या बागेतील झाडांची यादी आहे..
http://www.saveranibagh.org/botanicalWealth.html
सर्व झाडे दिसल्याशिवाय बाहेर पडू नका
आतापर्यंत फक्त ९ च. त्यातही
आतापर्यंत फक्त ९ च. त्यातही पुण्यातून मीच? बहुदा मग माझे येणेही मी रद्द करीन.
पुण्यातुन कोणी येत नाहियेत.
पुण्यातुन कोणी येत नाहियेत. पण मुम्बैतुन नाव नोन्दनि न करता येणारे आहेत. सो, सन्ख्याबळ पाहुन बिचकु नका.
शनिवारी ऑफिस चालु आहे पण
शनिवारी ऑफिस चालु आहे पण नक्की प्रयत्न करतो
)
( हाफ डे च्या हाफ डे च नवीन कारण शोधतो काहीतरी एडिसन मोड ऑन
वेका भोसले राजांची आहे..ं
वेका भोसले राजांची आहे..ं म्ह णु न म हा राज बाग..
ॠन्मेशा टाक रे फेबु मेसेज.
ॠन्मेशा टाक रे फेबु मेसेज.
अजून पाय दुखतो आहे सो येणे कॅन्सल. इतर कोणत्या गटगला भेटेन इतरांना.
मला लेकाला झाडांची ओळख करून द्यायची होती सो हे गटग मिस करेनच..
उद्या सकाळी ९.३० पर्यंत राणी
उद्या सकाळी ९.३० पर्यंत राणी बागेतल्या भाऊ दाजी लाडसमोर असलेल्या गेटच्या बाजुच्या टपरीवर भेटुया. तिथे चहापान करुन आत जाईतो १० वाजतील. येणा-यांनी मायबोली टी शर्ट्स घालुन या म्हणजे ओळखणे सोप्पे जाईल. ( या वर्षी पुरुषांचे निळे आहेत आणि स्त्रीयांचे मरुन.)
जे कोणी उशीरा येतील त्यांनी आपले फोन नंबर मला संपर्क मधुन कळवा. म्हणजे परत गेटवर येऊन त्यांना भेटुन गृपमध्ये घेता येईल.
बिसलेरी वगैरे "वापरा आणि फेका" पाण्याच्या बाटल्या राणीबागेत आत घेऊन जाता येत नाहीत. म्हणुन तसल्या बाटल्या आणण्यापेक्षा घरच्या फ्रिजमधल्या बाटल्या आणा ज्या फेकायला तुम्ही धजावणार नाहीत :).
तसे खाद्यपदार्थही आत नेता येत नाहीत कारण लोक उगीच प्राण्यांना ते खायला घालतात. तरी आपण ते नेऊन आपले आपण खाऊ शकतो.
तर मंडळी, नाव नोंदणी करणारे आणि न करणारे सुद्धा, उद्या सकाळी भेटूया आणि परत एकदा राणी बागेतल्या दुर्मिळ निसर्गाचे दर्शन घेऊया.
मी १२-३० पर्यंत आलं तर चालेल
मी १२-३० पर्यंत आलं तर चालेल ना? तुम्हाला नंबर कळवलाय ऑलरेडी
हो. उशिरा आले तरी चालेल.
हो. उशिरा आले तरी चालेल. फक्त आत मायबोली ग्रुप कुठे आहे हे जाणण्यासाठी फोन करावा लागेल.
या वर्षी पुरुषांचे निळे आहेत
या वर्षी पुरुषांचे निळे आहेत आणि स्त्रीयांचे मरुन.
जे असतील ते.. घालुन या
जे असतील ते.. घालुन या म्हणजे झाले
Pages