Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
ती विचीत्रा कसली बोलतीय? ती
ती विचीत्रा कसली बोलतीय? ती म्हणते की तिला मनोज बरोबर रहायच नाहीये. पण आदित्य म्हणतो की त्याने स्वतःहून करुन कशी आहेस विचारलेय ( हे आदेला विचीत्रा सान्गते) तर तू त्याच्याशी बोल. पण आदेच्या प्रेमात पडलेल्या विचीत्राला मनोज आवडेनासा झालाय. त्यामुळे आदेला मेदेचे विचीत्राबद्दल बोलणे खरे वाटायला लागलय.
आदेला रिअलाईज झालं चिवित्रा
आदेला रिअलाईज झालं चिवित्रा त्याच्या प्रेमात पडलीय ते?
आजपासून बघायला हवी परत.
अर्र म्हणजे आदेच्या डोक्यात
अर्र म्हणजे आदेच्या डोक्यात प्रकाश पडला का एकदाचा ?
रच्याकने , काल अर्चुचा डयलॉग होता - विजयाला मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, तिला मुलगी आहे हे विसरल्ये का ? मधे त्या ट्रिपला पण ती नव्हती आणि उल्लेख होता की तिला नाही जमते , इतक्या लहान मुलीला असं काय कारणं असावं ? आणि तरी अर्चु-सतीश मजेत.... लॉजिकल का दाखवत नाहीत......
परीक्शांमुळे मूलं नाहीयेत मालिकेत असं आलं होतं पेपरमधे पण गायब होणं जरा पटेल असं दाखवावं
रमड+१ काल मलाही नक्की समजले
रमड+१
काल मलाही नक्की समजले नाही की कश्यावरुन आदेला जाणिव झाली की चिवित्रा त्याच्या प्रेमात पडली ते. आणि त्यांच्यासाठी ऑकवर्ड होणारा कुठला तो प्रसंग होता??
त्याने सरळसरळ मनोजचे मिसकॉल्स पाहुन तिला विचारले की तुला का करायचे नाही पॅच अप? आणि हे करताना तिचे हात पकडले आणि नेमकं ते मेघनाने पाहिलं आणि मग लगेच ती चिवित्रा रडत पळत रुममधे गेली आणि दार बंद करुन घेतले.
नंतर मेघना तिला समजाऊन सांगायला गेली की झालं त्यात तुझी काय चूक वगैरे? नक्की काय झाल होत? अस फुगुन रुसुन बसण्यासारख तर नक्कीच काही नाही मग त्या चिवित्राला नक्की कसला राग्/ऑकवर्डनेस आला होता? की आदित्यने हात धरण्याऐवजी मेघना नस्ती तर मिठीच मारली असती अश्या भ्रामककल्पनेचा फुगा फुटल्याच वाईट वाटलेलं
सगळ्च विचित्र आहे त्या चिवित्राच.
आत्ता तो भाग पाहीला, त्यांनी
आत्ता तो भाग पाहीला, त्यांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहीलं आणि आदेला कळलं किती प्रेमाने बघत्ये विचित्रा त्याच्याकडे
बायदवे, मला मेदे नाही दिसली कुठे त्या सीनमधे.
मेदे होती कालच्या एपि च्या
मेदे होती कालच्या एपि च्या सुरूवातीलाच. ती बघते की त्यांना!
अगं मी ऑफीसमधे पळवला व्हीडीओ
अगं मी ऑफीसमधे पळवला व्हीडीओ , त्या प्रसंगात नाही दिसली - गदागदा हलवताना
ते गदागदा हलवणं परवाच्याच
ते गदागदा हलवणं परवाच्याच भागात झालं तो भाग संपताना. काल त्याने तिच्या हाताला धरलंय आणि ती रडका चेहरा करून त्याच्या हाताकडे चोरट्या नजरा टाकतेय असा काहीतरी शॉट होता. आदेचा गोंधळलेला चेहरा आणि तिचा रडका चेहरा बघून निदान आपल्याला तरी काहीही समजत नाही. आदे ला काय समजतं कोण जाणे! आणि मग तेवढ्यात तिथे मेदे येते आणि दोघं चपापतात. मग चिवित्रा रडत पळून जाते.
हुश्श!! अजून नका बाबा सांगू टायपायला
I m loving it
I m loving it
मग नक्की चिवित्रा कोण आणि
मग नक्की चिवित्रा कोण आणि मेघना कोण हे ठरवणे कठीण होऊन जाईल.>>>>
I m loving it>>> मी टू
I m loving it>>> मी टू >> मी
I m loving it>>> मी टू >> मी थ्री
मला वाटतं आता आदे-चिवित्रा , मेदे-फाटकी चड्डी वाला.. अश्या जोड्या लावुन समस्त जुयरेगा प्रिय लोकांना जबरदस्त शाॅक द्या!
ओह ओके, मी परवाचा भाग पाहीला,
ओह ओके, मी परवाचा भाग पाहीला, कालचा आत्ता बघितला.
एवढी कन्फ्युजिंग झालीय
एवढी कन्फ्युजिंग झालीय सिरियल.
झाल विचीत्राबाईनी एकदाच
झाल विचीत्राबाईनी एकदाच देसायान्च्या तोन्डच पाणी पळवल. बाई सकाळपासुन गायब झाल्या. मग सगळ्यान्ची शोधाशोध सुरु. आदे-मेदेचे एकमेकाला धीर देणे सुरु. इकडे आदेला विचीत्राच्या रुममध्ये शोधाशोध करताना त्याचा पेन सापडतो, मग बाबाजीची एकदाची खात्री पटते की मेदे सान्गत होती ते खरे होते.
आता विचीत्राबाई अस्वलाकडे गेल्या की भजनाला गेल्या ते कळेल आज. आजच्या भागाची झलक दाखवताना सगळे अवाक झालेले दाखवलेत, म्हणजे बाई परत येतील.
मग बाबाजीची एकदाची खात्री
मग बाबाजीची एकदाची खात्री पटते की मेदे सान्गत होती ते खरे होते.>>>>>>. नक्की काय?
पेनची काय स्टोरी आहे??
मेदेने आदेला सान्गीतलेले असते
मेदेने आदेला सान्गीतलेले असते की विचीत्रा त्याच्या प्रेमात पडलीय, पण त्याला ते खरे वाटत नाही. आदे ऑफिसमधून येऊन मेदेशी बाहेर गप्पा मारत असतो, त्याचे पेन तो बाहेर विसरतो. विचीत्रा ते वरुन बघते आणी मोठ्या प्रेमाने स्वतःजवळ ठेऊन घेते.
ओह रश्मी, अस आहे होय. म्हणजे
ओह रश्मी, अस आहे होय.
म्हणजे हिन्दी शिनुमातून हिरो हिरॉइनचा रुमाल वगैरे सापडला तर ठेवून घ्यायचा, वा तो परत करायच्या निमित्ताने जवळीक साधायचा... तसे मराठी सेरियलमधल्या व्हिलनीश हिरॉइनी हिरोचे हृदय लम्पास करायच्या आधी पेन लम्पास करतात तर! तरी बर, लॅपटॉप/गॅलक्सीनोट वगैरे लम्पास करताना नै दाखवलय.... हो ना, नैतर तो ट्रेन्ड पडायचा अन पोरी पोरांचे सर्रास लॅपटॉप/मोबाइल लम्पास करू लागायच्या.... कसे परवडणार ते?
हे माझं लकी पेन आहे अस नोट
हे माझं लकी पेन आहे अस नोट पॅडवर त्याच पेनाने लिहिते आणि गोंजारुन त्या पेनाला पर्समधे ठेवते.
लिंब्या, सहजगत्या लक्षात
लिंब्या, सहजगत्या लक्षात येणार्या गोष्टी चोरत नसतय कुणी
चिवित्रा त्या अस्वलाला घेऊन
चिवित्रा त्या अस्वलाला घेऊन येईल परत , आदेच्या सांगण्यावरून परत गेले, मनोजवर प्रेम नाहीये असा काहीतरी डायलॉग मारून आदेला गिल्ट देत राहीलं ( रादर आदे गिल्ट घेईल )
मनोजवर प्रेम नाहीये असा
मनोजवर प्रेम नाहीये असा काहीतरी डायलॉग मारून आदेला गिल्ट देत राहीलं >>>>>>>>>>>> ऑ?? त्या अस्वलाशी लग्न करायला हीच हटटाला पेटली होती ना??
ते आधी, आदे भेटायच्या आधी
ते आधी, आदे भेटायच्या आधी
आता तिला आदे आदर्श नवरा वाटायला लागलायं ना, ती आदे-मनोजला कंपेअर करत राहते, मग भांडणं.........
ऑ?? त्या अस्वलाशी लग्न करायला
ऑ?? त्या अस्वलाशी लग्न करायला हीच हटटाला पेटली होती ना??>>> मग, किती रडली होती त्यावेळी. घरात पूर यायचा बाकी होता.:फिदी: आजारी असताना पण अस्वलाला भेटायला काय गेली, लपुन छपुन आदेच्या गाडीवरुन काय आली. मज्जा मज्जा केली तिने. आता सगळी मज्जा निघतीय बाहेर.:फिदी:
ति विचित्राचा रोल करणारी
ति विचित्राचा रोल करणारी कुठून धरून आणली आहे? काय बेक्कार अभिनय (?) करते.
काल तिच्या चेहेर्यावर एकमेक दिसणार्या काँस्टिपेशन एक्स्प्रेशन वरून नक्की काय घडतयं हे कळालच नाही.
आदे च्या हावभावावरुन समजलं कि त्याला क्लिक झालं फायनली बायको काय डोकेफोड करत होती ते..
विचित्राला कधी आणि कस समजलं देव जाणे. तिच्या नंतरच्या पश्यातापयुक्त मोनोलॉग मुळे प्रेक्षकांना समजल कि या बयेला पण अचानक साक्षात्कार झाला चुकीच्या वागण्याचा...
बाबाजी तिला विचित्राच म्हणतात
बाबाजी तिला विचित्राच म्हणतात ना!
परवा पाहीला थोडा वेळ, खुप दिवसाम्तुन पाहील्यामुळ असेल कदाचीत पण चित्राची तब्बेत बरीच सुधारलीय, गाल वर आलेत अस जाणवलं मला
मेघनाची तब्येत चांगलीच
मेघनाची तब्येत चांगलीच गुटगुटीत झाली आहे
आदेचे केस वाढल्यामुळेच विचित्राला त्याच्या मधे अस्वलाचे भास होत असावेत म्हणून हात धूऊन मागे लागली आहे त्याच्या
अय्या त्या चिवित्राला झाला का
अय्या त्या चिवित्राला झाला का एकदाचा साक्षात्कार की ती चुकिची वागत होती? असो किती ते भराभर घटनाक्रम प्रेमात पडायच, मग हट्टान लग्न करायच, खरा स्वभाव कळल्यावर सोडायच, मग दुसर्याच्या प्रेमात पडायच, आणि चुकीच वागतोय याचा साक्षात्कार झाल्यावर पुन्हा हरदासाची गाडी मुळपदावर आणायची.
आदेचे केस वाढल्यामुळेच
आदेचे केस वाढल्यामुळेच विचित्राला त्याच्या मधे अस्वलाचे भास होत असावेत म्हणून हात धूऊन मागे लागली आहे त्याच्या
>>>\मलाही अगदी हेच वाटलेलं थोडं अधुन मधुन आदेने खेकसायला पाहिजे होतं म्हणजे मग फुल टु धमाल झाली असती.
पण आपण सगळे मनोजला अस्वल का
पण आपण सगळे मनोजला अस्वल का म्हणत आहोत? बाबाजी त्याच्या घरी जातात तेव्हा तो केळे खात पहुडलेला असतो, बेडजवळ केळ्यान्चा मोठा घड असतो. मग त्याला अस्वल समजण्या ऐवजी ओरान्ग उटान्ग, गोरीला किन्वा चिम्पान्झी का समजू नये?
विचित्राला कधी आणि कस समजलं
विचित्राला कधी आणि कस समजलं देव जाणे. तिच्या नंतरच्या पश्यातापयुक्त मोनोलॉग मुळे प्रेक्षकांना समजल कि या बयेला पण अचानक साक्षात्कार झाला चुकीच्या वागण्याचा... >> हे कधी झलं ? त्या गदागदा सीननंतर विचित्रा दिसलीचं नाहीये ना
Pages