होणार सून मी या घरची या मालिकेतला झालेला पुनर्मिलन भाग बघितला. मी ही मालिका बघत नाही पण एका मैत्रीणीने हा भाग बघून हमखास (विनोदी ) मनोरंजन होईल म्हणून सुचवले.
तर गाणं सुरु झालं, हिरोईन दुधाचा ग्लास हातात घेऊन लाजत जीने चढु लागली. गाणं ऐकायला चांगलं वाटलं अणि अपेक्षा उंचावल्या.
सुरवात हळुवार झाली तरी रोमांस नंतर पकड घेइल अस वाटत होतं. पण हाय रे कर्मा, त्या लंबुटांग्या हिरोईन समोर आल्यावर हिरो अगदी ईटुकला वाटला. तो समोर आल्यावर ति त्याला पटकन उचलून कडेवर घेतीये की काय अस क्षणभर वाटलं.
मग तो हिरो दुधाचा ग्लास हिरोईन च्या हातातून घेऊन मागे मागे चालतो( हिरोईन तर त्याच्या पुढे होती मग हा मागे का चालला अस वाटेपर्यंत त्याने दुधाचा ग्लास टेबल वर ठेवला.)
हिरो मग हिरोईनच्या हातातल्या बांगड्या, घड्याळ काढून (शब्दशः) फेकतो.
हे रोमँटिक जेश्चर असावे दिग्दर्शकाच्या मते पण ते बघताना फनी वाटले.
हे सगळं करताना, हिरोच्या चेहर्यावर देवळात गेल्यावर घंटा वाजवताना जसे सात्विक सोज्वळ भाव असतात तसेच असतात. त्यात अजिबात रोमांस, मिस्चीफ अशा प्रसंगोचित भावनांना थारा नसतो..
(अरे बाबा रोमांस करतोस कि भजन? असं त्याला विचारायचा मोह होतो.)
बरं त्या हिरोईनचा ड्रेस पण अगदीच खास या प्रसंगासाठी (भजन, तुम्हाला काय वाटलं?) शोधून काढलेला असतो. अरारा, साफसफाईसाठी घर आवरायला काढल्यावर किंवा रंगपंचमीला, धुलवडीला रंग खेळताना सुध्दा मुली याहून चांगले ड्रेस घालतात..
तर हिरोईन पण आपल्याला हिरोने आता काहितरी करावं म्हणून डोळे मिटून घेते. आता तरी काहितरी चांगला रोमांस बघायला मिळेल म्हणून आपण प्रेक्षक डोळे मोठे करतो.
पण कस्सच काय.. मंद हिरो आणि मंदा हिरोईन ते मसाला दुध पिऊन तेवढ्याच तुपकट चेहर्याने ईंटेस रोमान्स, प्रेम, केमिस्ट्री वगैरे समयोचित अपे़क्षांना सुरुंग लावतात आणि झोप, विरक्ती वगैरे गहन विषयांवर अचानक बोलायला लागतात.
ते झोपेवरचे डायलॉग्स तर कहर अंगाईगीत आहेत.. ते ऐकुन १००% झोप येण्याची ग्यॅरेंटी, निद्रानाश झालेल्या व्यक्तीला सुध्दा झोप लागेल.
मंद तुपकट भाव घेऊन वावरणारा हिरो, वेडसर हसणारी हिरोईन आणि महा बोअरिंग डायलॉग्ज..
ते रटाळ संवाद हिरोईन तितक्याच भावहीन सुरात म्हणते, त्यात कोण्त्याच भावनेचा, अभिनयाचा, केमिस्ट्रीचा थांगपत्ता नसतो. अत्यंत बालीश अभिनयाची झलक बघायला मिळते.
मला त्यावेळी रंगिला सिनेमातल्या अमीर खान चा डायलॉग ओरडून म्हणावासा वाटला "अरे ईस्से अच्छा तो हमारे गली के गणपती का कार्यक्रम होता हे"
झोप अणि विरक्ती वगैरे विषय अशा वेळी काढून जर ईतके पुस्तकी, भावहीन , नाटकी संवाद कोणी म्हटले तर रोमान्स सोडून संन्यास घ्यावा वाटेल
नो वंडर, जेव्हा हिरोईन वरचे संवाद म्हणते तेव्हा हिरोला आधी बरेच दिवसात न आलेली झोप तात्काळ येते आणि तो गाढ झोपतो.
असला तुपकट, अळणी, भजन रोमान्स ( ?) टिव्हीवर बघत असलेल्या तमाम प्रेक्षकांना सुध्दा त्यावेळी गाढ झोप लागली असेल.
त्या कमाल नाटकी, मेंगळट हिरोईन ने प्रत्येक सीन च्या आधी एनर्जी ड्रिंक पिण्याची फार फार गरज आहे.
आणि त्या हिरोला देवळातले सात्विक तुपकट भाव रोमान्स च्या वेळी नको, समोर बायको आहे, देवी नाही हि आठवण करुन द्यायला हवी झोपलेल्या डिरेक्टरने. (आधी झोपलेल्या डिरेक्टरला उठवायला हवे पाणी मारुन).
अर्थात भजन हिरो तरी काय करणार बिचारा, त्याला साथ समोर असलेल्या वेडसर हास्याच्या मंदाची, त्याला "तसे" भाव आणता येणं पण अवघडच असणार म्हणा..
बरं त्या दुध पिण्याचा सीक्वेन्स पण गंडलेलाच वाटला. म्हणजे पुढे फुली गोळा खेळायला शक्ती मिळावी म्हणून दुध आधी घेत असावेत असा हिंदि सिनेमे बघून माझा तर्क. पण तो हिरो, हिरोईन च्या बांगड्या, घड्याळ, ओढणी काढूनच दमला बहुधा. मग दुधाचा ब्रेक झाला. मग तो गाढ झोपी गेला..
अरे पण मग पलंगाला ति प्लॅस्टीकच्या फुलांची सजावट ज्या कारणासाठी केली होती, ते काम मुदलात झाले कि नाही देव जाणे?
या सगळ्या संवादात मराठीची पण वाट लावली.
हिरो हिरोईनला विचारतो "मी तुझ्या मांडीत डोके ठेउ?"
अरे बाळा, तुला मांडीवर डोके ठेऊ असं विचारायचं आहे का?
हे राम, प्लीज या भावना झी मराठी आणि या सिरियल च्या टीम पर्यंत कोणी पोचवेल का?
मंडळ आभारी राहिल!!
जर उत्सुकता असेल तर हि या भागाची लिंक, तुम्हाला हे बघण्याची शक्ती मिळो
वेडसर हास्याच्या मंदाची>>
वेडसर हास्याच्या मंदाची>> तिच्या घरचा शॉट नेहमी CCTV अँगल ने असतो
मनावर नका घेऊ.. खूप त्रास
मनावर नका घेऊ.. खूप त्रास होईल तुम्हाला...
आपण ह्या असल्या वेड्या
आपण ह्या असल्या वेड्या सिरीयली खपवून घेतो म्हणून त्या चालतात. जर फक्त ३ दिवस अख्या महाराष्ट्राने ठरवलं की प्राईम टाईम मध्ये टीव्ही बंद ठेवायचा तर ह्या चॅनेलवाल्यांना अक्कल येईल. पण आपण टीव्हीचा रिमोट वापरणार नसू तर मग तक्रार देखिल करता येणार नाही! We do not get what we desire..we get what we deserve!
गोष्टीगावाचे, मनावर नाही घेत
गोष्टीगावाचे, मनावर नाही घेत हो, हसण्यावर घेते मात्र
जिज्ञासा, अगदी बरोबर.
@ अॅडमिन जेव्हां धाग्याचा
@ अॅडमिन
जेव्हां धाग्याचा लेखक / लेखिका अज्ञात असेल तेव्हां हे पण पहा या यादीत संबंधित नसलेल्यांचे लेख दिसू नयेत ही विनंती. हे पण पहा मुळे अमूक म्हणजे तमूक असा समज दृढ होतो. तर ते असो.
आज पहिल्यांदा घरापासून लांब
आज पहिल्यांदा घरापासून लांब आहे ते बर वाटल............ नाहीतर ही भयानक आणि न संपणारी मालिका जुलमाचा राम करत बघावी लागली असती.......रोज ८ वाजता
(No subject)
हिरो हिरोईनला विचारतो "मी
हिरो हिरोईनला विचारतो "मी तुझ्या मांडीत डोके ठेउ?">>>>
अश्लील. टीव्ही सिरीयल्स ना सेन्सॉर असतात की नाही?
याचि लिन्क मिलेल का ?
याचि लिन्क मिलेल का ?
आयटीगर्ल मस्त लेख मीही मागे
आयटीगर्ल मस्त लेख
मीही मागे असेच काहीतरी एक लिहिले होते
http://www.maayboli.com/node/46731
अभि१, हि घ्या लिंक, तुम्हाला
अभि१,
हि घ्या लिंक, तुम्हाला हे बघण्याची शक्ती मिळो
https://www.youtube.com/watch?v=-IQTah7-HTo
बेफिकीर, लेख वाचून आवडल्याचे
बेफिकीर, लेख वाचून आवडल्याचे कळवल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
तुम्ही दिलेली लिंक वाचून कळवते नक्की, आभार
भारी लिहिल आहे
भारी लिहिल आहे
धमाल लिहीले आहे .. मंद तुपकट
धमाल लिहीले आहे ..
मंद तुपकट भाव घेऊन वावरणारा हिरो........
धन्यवाद .. इतका विनोदी असेल
धन्यवाद ..
इतका विनोदी असेल असे वाटले नव्हते .. खतरनाक .. आधी ५ /१० मिनिटे अपेक्षा उंचावून जेव्हा बेड वरचा सीन सुरु होतो तेव्हा त्याचे पहिले वाक्य ऐकून बेफाम हसू आले आणि मग काय एकापेक्षा एक विनोदच विनोद ..
किरण कुमार धन्यवाद अभि१,
किरण कुमार धन्यवाद
अभि१, खरचं कोणताही प्रसंग विनोदी करण्यात या अशा सिरीयलवाल्यांचा हात कोणी धरू शकत नाही.
अशक्य हसलो..... <<म्हणजे पुढे
अशक्य हसलो.....
<<म्हणजे पुढे फुली गोळा खेळायला शक्ती मिळावी म्हणून दुध आधी घेत असावेत असा हिंदि सिनेमे बघून माझा तर्क.>>
<<हिरो हिरोईनला विचारतो "मी तुझ्या मांडीत डोके ठेउ?">>
आयटे................
आयटे................
ह्या प्रसंगात पण तिला तोच रोज
ह्या प्रसंगात पण तिला तोच रोज ताबडलेला जांभळा ड्रेसच .
अजुन एक शन्कासमाधान होइल
अजुन एक शन्कासमाधान होइल का
सर्व सिरीअल्स मध्ये दरवाजा ला फक्त वर्चि कडी का अस्ते.... खाल्ची का नस्ते
निशदे, लिंबुटिंबु, मृणाल,
निशदे, लिंबुटिंबु, मृणाल, असुमो लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे
अरे देवा! हा सीन इतका
अरे देवा! हा सीन इतका काॅमेडी होता? मी मिसला
आयटी गर्ल >> धम्माल लिहिलयस. काही पंच तर असले जबरी आहेत की बस्स.
निधी, धन्यवाद मी वर लेखाच्या
निधी, धन्यवाद
मी वर लेखाच्या शेवटी त्या भागाची युट्युब लिंक दिली आहे ती बघ
धन्यवाद! आता हा भाग बघताना
धन्यवाद!
आता हा भाग बघताना तुझं प्रत्येक वाक्य आठवून मला जास्तच हसायला आलं... काय सही लिहिलयस.
खुपच आवडलं! मस्तच!
अरे पण मग पलंगाला ति
अरे पण मग पलंगाला ति प्लॅस्टीकच्या फुलांची सजावट ज्या कारणासाठी केली होती, ते काम मुदलात झाले कि नाही देव जाणे? >>>>
झालं की ते काम! ते दोघे गाणं संपताना एकमेकांच्या जवळ येतात, तिची ओढणी खाली पडते आणि पुढच्याच सीनमधे ते दोघे बेडवर त्या लाल पांघरूणाखाली आहेत. तिची टिकलीही पडलेली आहे यावरून काय ते ओळखावे मराठी मालिकेत अजून काय बोल्ड दाखवणार कपाळ?
हे ह्हे ..भारी लिहिलयस ....
हे ह्हे ..भारी लिहिलयस .... पण खरच डोक्यात जातात या मालिका..
चीकू असं आहे होय, असेल असेल.
चीकू असं आहे होय, असेल असेल. झालं ना काम एकदाच हुश्श्!
गुड्डु, धन्यवाद
अरे पण प्रत्यक्षात नवरा-बायको
अरे पण प्रत्यक्षात नवरा-बायको असताना काही (मालिकेच्या मर्यादीत) दाखवायला हरकत काय आहे?
प्रॉब्लेम क्या है?
>>अरे पण मग पलंगाला ति
>>अरे पण मग पलंगाला ति प्लॅस्टीकच्या फुलांची सजावट ज्या कारणासाठी केली होती,
प्लॅस्टिकची फुले ? ओह, पर्यावरणस्नेही जीवनपद्धती.
देशमुख, सिरियलवाल्यांचं
देशमुख, सिरियलवाल्यांचं कल्पनादारिद्र्य अजून काय
विजयकुलकर्णी, लोल
Pages