एक उरलेले कोडे - शिळ्या कढीला ऊत

Submitted by हर्पेन on 28 February, 2015 - 08:12

हे एक मागच्या मभादि निमित्त तयार केलेले कोडे आता देत आहे. म्हणून शिळ्या कढीला ऊत म्ह्टलंय

अनेक उत्तम चित्रकृती साहित्यावर आधारित आहेत / असतात. चित्रपट विषयक लिखाण आवडीने वाचणारे अनेक वाचक मराठीत आहेत. वाचक आहेत तर लिहिणारे देखील आहेत. मराठीत चित्रपट या विषयावर रसरंग, चंदेरी अशा नियतकालीकांद्वारा विपुल लिखाण झाले आहे. पण मराठीतल्या एका वाचकवर्गाची भूक नियतकालीकांमधल्या गावगप्पांपेक्षा अधिक काहीतरी वाचायची आहे. त्यामुळेच असेल पण मराठीत समीक्षा, आस्वादक रसग्रहण, चित्रपट-निर्मिती कथा, स्मरणरंजन अशा अनेक स्वरूपातले लिखाण पुस्तक बद्ध झालेले आढळते.

मराठी साहित्यविश्वातल्या ह्या दालनाला समृध्द करणार्‍या लेखकांना सादर प्रणाम करून सहर्ष सादर करत आहोत असे कोडे ज्यामधे आपल्याला शोधायची आहेत असे लेखक गण ज्यांनी चित्रपट विषयक पुस्तके लिहिली.

एकूण नावे १३ आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके देखिल सांगा

Chitrapat lekhak_0.png

जो कोणी पहिल्यांदा हे सोडवेल त्याला जो कोणी बक्षिस देईल त्याला माझे धन्यवाद आणि नमस्कार Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिता पाध्ये
गणेश मतकरी
गौतम राजाध्यक्ष
सुलभ तेरणीकर
प्रभाकर पेंढारकर
श्री.दा.पानवलकर
इसाक मुजावर
ललीता ताम्हाणे
बापू वाटवे
रेखा देशपांडे
विश्वास पाटील

तर हे १३ लेखक

१ श्री. दा. पानवलकर
२ अनिता पाध्ये
३ गणेश मतकरी
४ गौतम राजाध्यक्ष
५ सुलभा तेरणीकर
६ बाबू मोशाय
७ रेखा देशपांडे
८ भाई भगत
९ प्रभाकर पेंढारकर
१० इसाक मुजावर
११ विश्वास पाटील
१२ ललिता ताम्हाणे
१३ बापू वाटवे