Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अन्जू, केवळ तुझ्या आणि
अन्जू, केवळ तुझ्या आणि तुझ्याचमुळे मी पण माझे मा.म.तु.झा. पाहायला लागले, हे खुप्प दिवसांपासून सांगायचं राहूनच गेलं होतं.. युट्युबवर पहिला भाग ठीक ठाक वाटला. अगदी घरातली मालिका वाटली. शुभ्रा साकारणार्या मुलीचा डेब्यू आहे हा बहुतेक.. सुरुवातीच्या भागांमध्ये तिला अॅक्टिंग जमत नव्हती. ऐश्वर्या नारकरसाठी बघत राहिले.
फॉरवर्ड करत करत सगळे भाग पाहिले. स्टोरीलाईन कॅची वाटली. मुख्य म्हणजे संवाद फार आवडले विशेषतः शेखर देसाईचे.. ते कॅरेक्टरच मला फार आवडलं..
तुझ्यामुळेच मी ई टिव्ही कडे वळले. कारण युट्युबवर पहात असल्याने ई टिव्हीचा विचार पण कधी मनात आलेला नव्हता. सगळे लोक झी च बघतात, हा समज होता. पण आता तिकडे तू माझा सांगाती, कमला अशा छान छान मालिका आल्या आहेत. तिकडे मालिका विशेष भरकटू देत नाहीत आणि व्यावसायिकीकरण जरा कमी असल्याचं आणि लेखक, संवाद, पटकथाकार यांना कल्पनांच्या भरार्या कथानकाशी प्रामाणिक राहून मारता येतायत आणि कथाविस्ताराचं स्वातंत्र्य असल्याचं लक्षात आलंय.. आता माझं झी मराठी प्रेम कमी झालंय. सध्या दोनच मालिका बघते झी च्या. जुयेरेगा आणि होसुमि. जुयेरेगा अजूनतरी आवडतेय.. होसुमि गेलीये कामातून. बाकी मालिकांचे इकडचे धागेच तेवढे वाचते.
मला कल्पना होती, ही सगळी गोष्ट तुला सांगेन तेंव्हा माझी पोस्ट मोठी होणार आहे, आणि कुठे लिहावी हाही प्रश्न होताच..त्यामुळे आजपर्यंत लिहायची राहूनच जात होती.. पण तुला श्रेय द्यायचंच होतं मला तिकडे वळवल्याबद्दलचं.. आज ते झालं याचा आनंद आहे. थँक्स..
पात्र रजनी= महा भोचक जुई =
पात्र
रजनी= महा भोचक
जुई = बथ्थड
अदिती-जय = सहनशीलतेचे महामेरु, गरीबान्चे कैवारु, दिनजनान्चे आधारु वगैरे वगैरे....
कदम काका = धर्मराज युधिष्ठीर
नन्दिनी = मी नाही त्यातली, कडी लावा आतली
अमित = जुईसाठी एकतर्फा प्रेमवीर
नवरे = जन्गल मे दन्गल
तान्गडे = गाववाला छोरा
बॉस ( अविनाश सर) = छप्पन छुरा
सानी thanx, हो मालिका आधी
सानी thanx, हो मालिका आधी बरीच चांगली होती आता नाही राहिली.
शेखर पहिल्या दिवसापासूनच आवडला, शुभ्राला आधी acting जमायची नाही पण आता तिचा ग्राफ छान उंचावलाय. चांगलं करते ती. आणि ह्या दोन कलाकारांमुळेच दर्जा घसरलाय तरी मालिका बघते मी.
सानी असं नाहीये तिथेही असावा सुंदर स्वप्नांचा बंगला ही फालतू मालिका आहे, कमला मी आता नाही बघत. गंध फुलांचा पण फालतूच होती
sorry ह्या बाफवर लिहिल्याबद्दल.
अदिती-जय = सहनशीलतेचे
अदिती-जय = सहनशीलतेचे महामेरु, गरीबान्चे कैवारु, दिनजनान्चे आधारु वगैरे वगैरे....
>>
अन्जू, मी रमाच्या
अन्जू, मी रमाच्या लग्नापर्यंतचे भाग पाहिलेत. शेखरला काहीतरी प्रॉब्लेममध्ये फसवायचा एका नक्षलवाद्याचा कट शिजतोय, इथपर्यंतचे भाग पाहून झालेत. बाकीचे बघेन सवडीने.. अजूनतरी मला मालिका आवडतेय. दोघांची अॅक्टिंग बरीच सुधारलीये की नंतर नंतरच्या भागात.. काश ही मालिका झी वर असती.. नक्कीच लोकप्रिय झाली असती. पण झी वाल्यांनी बेक्कार भरकटवली असती हे नक्की.. सो जे आहे ते बरं आहे. तिकडेच राहूदेत तिला प्रोटेक्टेड
तू काढ बरं मालिकेचा धागा.. इतक्या वेळेला उल्लेख करत असतेस.. सॉरी तरी कितीदा म्हणशील? आँ कोणी नाही आलं तरी मी येईन चर्चा करायला तिकडे. ती कमला सुद्धा एक सॉलिड थ्रिलिंग चाललीये.. फार आवडते मला..
छातिवर प्यँट घालणारे कदम
छातिवर प्यँट घालणारे कदम >>>>>>>>>> ओ प्यँटवाल !!!!!! अशी एक हाक (रंजना गतकाळातील एक मराठी अभिनेत्री) अशोक सराफांस ....... इथे नंदिनी कदम काकांना इम्याजून
अन्जू, तू संपादित करण्याआधी
अन्जू, तू संपादित करण्याआधी लिहिलंय मी कमलाबद्दल.. कमला छान आहे. तिकडच्या मी ह्याच दोन मालिका पहातेय. तू माझा सांगाती बोअर झाले. बाकी काहीही पाहिलेलं नाहीये. पण झी मराठी पासून ई मराठी हा चांगला एस्केप पॉईंट मिळालाय मला.. फक्त तुझ्यामुळे.
अन्जू, तू आणि मी वेगळंच
अन्जू, तू आणि मी वेगळंच स्टेशन लावून बसलोय इकडे. पब्लिक वैतागलं असेल..
पब्लिक वैतागलं
पब्लिक वैतागलं असेल
>>
हम्म्म!
मी एडीट करू का comments.
मी एडीट करू का comments.
नायिका सगळ्याच सिरीयलच्या अशा नसतात म्हणून मी एक वाक्य मालिकेचं नाव न लिहिता लिहिलं होतं फक्त. प्रश्न आले म्हणून उत्तरे दिली
नको गं.. एडिट कशाला करतेस..
नको गं.. एडिट कशाला करतेस.. राहू दे तसंच. नाहीतरी ज्यांना वाचायचं होतं त्यांचं वाचून आणि ज्यांना वैतागायचं होतं त्यांचं वैतागाचे हुंकार भरून झालेलं आहेच आता.
असू दे गं, मूळ मालिकेत इतकं
असू दे गं, मूळ मालिकेत इतकं पाणी घालतात हे लोक्स, धाग्यावर जरा २-४ थेंब उडाले तर काय बिघडलं
दक्षे thanx
दक्षे thanx
दक्स
दक्स
@ रश्मी.... मला वाटले की आता
@ रश्मी....
मला वाटले की आता त्यांच्या राशी देखिल लिहुन टाकताय की काय.
लिहु का मग काल्पनीक राशी.
लिहु का मग काल्पनीक राशी.:खोखो: लिहीतेच. खर्या राशीवाल्यानी सिरीयसली घेऊ नये ही नम्र विनन्ती.
रजनी = वृश्चिक
जुई = कर्क
अदिती = कर्क
जय = मीन
अविनाश सर = सिन्ह/ मेष/ धनु
नन्दिनी = वृषभ
अमित = वृषभ
नवरे = मेष
केतकर काका = मिथुन
काकु = वृषभ
रश्मी ..
रश्मी ..
केतकर काका सडेतोड आहेत म्हणून
केतकर काका सडेतोड आहेत म्हणून मिथुन. अदिती, जुई अती सहनशील आहेत म्हणुन कर्क, रजनी फटकळ व सन्षयी म्हणून वृश्चिक. नवरे तापट आहेत म्हणून मेष, अविनाश शिस्तप्रीय बॉस व स्पष्टवक्ता आहे म्हणून सिन्व्ह, काकु व नन्दिनी शान्त आहेत म्हणुन वृषभ तर अमित प्रेमवीर म्हणून वृषभ. जय सहनशील पण वेन्धळा म्हणून मीन.
रश्मे मी कर्क आहे, तुला
रश्मे मी कर्क आहे, तुला कोणत्या अँगलने मी सहनशील दिसते?
दक्षिणा. कर्क नुसतीच चन्द्र
दक्षिणा.:फिदी: कर्क नुसतीच चन्द्र रास असुन उपयोग नाही, जर नक्षत्र पुष्य असेल तर थोडे कडक शिस्तीचे, अनुशासन्प्रीय असतात. पण मनाने खरच हळवे असतात. दुसर्याला दुखा:त पाहु शकत नाहीत.:स्मित:
चल, बाकीचे राशीन्च्या स्वभावाच्या बाफावर लिहीन.
लिंबूदादा भलताच पंखा आहेस का
लिंबूदादा भलताच पंखा आहेस का काय शिरेल अन आदितीचा??:फिदी:
भयंकर आहे बुवा ही शिरेल. अन आमच्या कडे भयंकर इंटरेस्टने बघतात.. मी त्यपेक्षा गेम खेळत बसते..
व्व्वा... नवरे+ मेष आवडलं
व्व्वा... नवरे+ मेष आवडलं
रश्मी... झकास, परफेक्ट
रश्मी... झकास, परफेक्ट अंदाज.
कल्याणी... फॅन वगैरे नाही. मला सक्तिने बघायला/ऐकायला लागते, त्यावेळेस मी डाटाएन्ट्रीचे काम करत बसतो, पण कानावर पडतच रहाते. मग निदान नशिबाच्या वाट्याला जे आहे त्यातले त्यातल्या त्यात चांगले तरी निवडायचे म्हणुन..... !
तशा मला त्या दुसर्या सेरिअल मधल्या जान्हवी, अन तशीच दिसणारि दुसरी कोणतरी, अन हिंदी मधील इतना ना करो प्यार मधील... सगळ्याच आवडतात (वा आवडून घेतो.. न आवडून घेऊन सांगतो कुणाला? अन त्या स्क्रीनवरच्या तेव्हड्याच त्या आवडून घेण्याची परवानगी आहे ना! )
व्व्वा... नवरे+ मेष आवडलं>>>
व्व्वा... नवरे+ मेष आवडलं>>> मला नाही आवडलं. मी मेष आहे.
पण बाकी भारीये
मी पण मेष गं नताशा,,, म्हणूनच
मी पण मेष गं नताशा,,, म्हणूनच आवडलं. एकदाच काय तो विषय खतम
इतना करो ना.. मधे मला वाटतं
इतना करो ना.. मधे मला वाटतं ती पल्लवी कुलकर्णी आहे
नवरे हे या हाफिसात नेमके
नवरे हे या हाफिसात नेमके कोणत्या पोस्ट वर आहेत. ते एखाद्या शालेय मास्तराप्रमाणे (अभ्यास करा अभ्यास) काम करा काम असे ओरडतात तेव्हा अजब वाटते. कोणत्याही कार्पोरेट ऑफिसात असे अजब ध्यान एकतर हाउसकीपिंग चा इंचार्जे तरी असतो नाहीतर सिक्युरिटी गार्ड मध्ये. पण हे 'बेन' तर काय आणि काय ............
>>>> कोणत्याही कार्पोरेट
>>>> कोणत्याही कार्पोरेट ऑफिसात असे अजब ध्यान एकतर हाउसकीपिंग चा इंचार्जे तरी असतो नाहीतर सिक्युरिटी गार्ड मध्ये. <<<
अहो, ते कार्पोरेट ऑफिस नसून प्रायव्हेट्/प्रोप्रायटरी फर्मचे ऑफिस आहे, तिथे एकतरी असे ध्यान असतेच असते व ते बॉसच्या जवळपास वावरणारे असते, सहसा "हरकाम्या" म्हणून. त्या जवळीकीचा फायदा बाकिच्यांवर रोब (हा मराठि शब्द आहे का?) झाडण्याकरता करतात. बॉस लोकांन्नाही अशी बार्किंग स्क्वाड हवीच असते हे एक वैश्विक सत्य आहे. त्यामुळे बरेचदा कॉर्पोरेट ऑफिसेसमधेही उच्चपदस्थाची पाळलेली अशी बार्किंग स्क्वाड्स बघायला मिळतात.
थान्क्स लीम्बुजी. मला शंका
थान्क्स लीम्बुजी. मला शंका आलीच होती कि ते बहुदा हरकाम्या प्रकारात मोडत असावे म्हणून, पण खात्री करून घेतली.
अहो, ते कार्पोरेट ऑफिस नसून
अहो, ते कार्पोरेट ऑफिस नसून प्रायव्हेट्/प्रोप्रायटरी फर्मचे ऑफिस आहे, तिथे एकतरी असे ध्यान असतेच असते व ते बॉसच्या जवळपास वावरणारे असते, सहसा "हरकाम्या" म्हणून. त्या जवळीकीचा फायदा बाकिच्यांवर रोब (हा मराठि शब्द आहे का?) झाडण्याकरता करतात. बॉस लोकांन्नाही अशी बार्किंग स्क्वाड हवीच असते हे एक वैश्विक सत्य आहे. त्यामुळे बरेचदा कॉर्पोरेट ऑफिसेसमधेही उच्चपदस्थाची पाळलेली अशी बार्किंग स्क्वाड्स बघायला मिळतात. >>>> +१
Pages