मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंबे पिकवायचा सर्वात सोप्पा ,घरगुती आणि रसायनमुक्त उपाय : एक पेटीत आंबे भरा आणि ती पेटी झाकण न लावता तुमच्या टी व्ही समोर ठेवा आणी आता टिव्हीवर रेशीम गाठी , चार दिवस सासूचे, होणार सून मी या घरची किंवा अशीच कुठली तरी महापकावू मालिका लावून ठेवा. आंबे कॅल्शियम कार्बाईडची पावडर न टाकताही झकास पिकतील !

त्या अवकाळीने समदी समाजाला, निर्सगाला आणी टिव्ही लाईनला अवकळा आलीया, मग काय आम्ब पिकणार आणी आमी खाणार!:अरेरे:

कालचा भाग अतिशय भिकार होता :रागः
सुभा सारख्या दिग्गज कलाकाराला इतके दिवस काम करणं ठिक होतं, पण कालच्या भागात त्याचा पार मामा करून टाकलाय.
काहितरी विचित्र आहे हे साधं त्याने सेन्स करू नये याचं आश्चर्य वाटतंय. Uhoh

त्या एका लग्नाची तिसरी गोष्ट का दुसरी गोष्ट सारखी भरपूर लपवाछपवी करायला चिक्कार स्कोप आहे मालिकेत आणि तेच त्याचं चाललय Happy

अनिल दाभोळकर फारच पत्थरदिल हो, अगदी मुलीला खोचुन विचारले आपला सम्बन्ध काय म्हणून.:अओ: बाकी सगळ आपल्या फान्दीवर ( प्रेक्षक) मस्त चाललय यान्च.

पप्पा दाभोळकरांची हफिसातील धाड थोडीशी मिळाली बघायला, नवर्याने दटावले म्हणून (त्याला म्याच बघायाची होती) पूर्ण करता आली नाही (माझी TV भ्रमंती सुट्टीच्या दिवसात दुपारी असते).
बर ते दाभोळकर कसले निष्ठुर वाटले आपल्या लेकीला जराही वाव देत न्हवते आर्गुमेंत मध्ये. ती त्या नेभलट जयरामची एवढी बाजू सावरत होती तरीही यांचे आपले चालूच. Angry

खरय अपर्णा. मला दुसर्‍या व्यक्तीला त्याची बाजू मान्डता देऊ न देणार्‍याचा खूप सन्ताप येतो. अगदी जवळचा अनूभव आहे. आपण काही आपली बाजू मान्डायला जावी तर एक शब्द बोलु नकोस असा समोरच्याचा थयथयाट पाहीलाय. मग कधी कधी असे वाटते की सिरीयल मध्ये असली माणसे असतात ते काही खोटे नाही. कारण खर्‍या जीवनात अगदी वाईट्ट अनूभव घेतलाय.

हो ना.. आपल्याला डे टू डे लाइफ़ मध्ये असे अनुभव नेहमीच येत असतात. त्यावेळी आपणही गांगरतो आणि मग एकांतात कधी ते प्रसंग आठवले तर आपण असे बोललो असतो तसे बोललो असतो तर त्याची जिरली असती वैगरे वाटायला होते. Sad Sad Sad

बाकी सगळं सोडा, पण अदिती ज्या पद्धतीने 'क्लायन्ट'शी बोलत असते ते शहाजोगपणाचं आहे (सिरियलीत त्याला तिची तडफ आणि हुशारी म्हणतात :अओ:). असं खरंच कोणी क्लायंटशी बोललं तर नोकरीला मुकावं लागेल.

* काल काल जय ला मौनरोग झाला होता.
* औंनी सगळ्यांना पिवळ्या वेष्टनात गुंडाळून लॅपटॉप दिलेत (खेळण्यातले असतील असंच मला वाटलं. कारण नंदिनीने दोन बोटात ते प्रेझेंट उचलल्याचं मी चोरून पाहिलं होतं.
* नुसतं प्रेझेंटेशन छान झालं म्हणून देव टूर वाले जाम नाचानाच करतायत. दाभोळकरांनी खरोखरी बिझनेस दिला तर काय करतील?

* काल काल जय ला मौनरोग झाला होता.>>> काल??? Uhoh मला तर तो बरेच दिवस मुका आहे असेच वाटत होते.
* औंनी सगळ्यांना पिवळ्या वेष्टनात गुंडाळून लॅपटॉप दिलेत (खेळण्यातले असतील असंच मला वाटलं. कारण नंदिनीने दोन बोटात ते प्रेझेंट उचलल्याचं मी चोरून पाहिलं होतं.>>> मला ते मिठाईचे बॉक्सेस वाटले. Proud

मला ते साडीचे बॉक्सेस वाटले Wink

जय आणि आदितीला जुयेरेगा मधल्या अर्चु समोर आणायला हवं, जे काही थोडं फार बोलतात ते पण विसरून जातील Wink

डायलॉग किती बावळ ट असावा या ला काही प्रमाण? Uhoh

लॅपटॉप मिळालाय म्हणल्यावर नंदिनी लगेच म्हणे की मी त्यावर देवाचे सगळे फोटो डालो करिन आणि आरत्या पण.. Uhoh अरे आवरा Angry

मी काल अर्धवट (नेहेमीप्रमाणे) बघीतले. दाभोळकर पप्पानी प्रेझेन्टेशनबद्दल अदितीचे कौतुक केले आणी त्याचे श्रेय तिला दिले, जयला नाही. यामुळे जय निराश् ,हताश, दु:खी, हतभागी, असहाय असा झाला. जुई-टुईने काय पराक्रम केला काल? आजच्या भागात जय आणी अदिती बोलत असताना ती मध्येच येऊन बोलते असे दाखवलेय.

अतिशय गोगलगाय स्पीडने चालू आहे मालिका. Sad फार बोर होतं बघताना.

कन्या आणि सून काय करतात ते पण अपडेट द्या
रिपिट्स चुकतात माझे.

अतिशय गोगलगाय स्पीडने चालू आहे मालिका. Sad फार बोर होतं बघताना.

कन्या आणि सून काय करतात ते पण अपडेट द्या
रिपिट्स चुकतात माझे.

रिपिट्स चुकतात माझे.>>>> हे तू रिपीट केलस.:फिदी: कन्या म्हणजे कन्यादान आणी सून म्हणजे जानुबाई का?

Pages