निसर्गाच्या गप्पा (भाग -२४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 December, 2014 - 06:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला
मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!

मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!

कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी
शिरशिरी..ओठावर चरचरणार्‍या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत
नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!

धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज
असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:

ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच
महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्‍या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.

परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्‍याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंतीची फुले, मधुमालतीचे गुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!

गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी
चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्‍याखुर्‍या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्‍या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे
कमी आहे!!!

..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या
शुभेच्छा!

(वरील लेखन व फोटो मायबोलीकर बी यांच्यातर्फे.)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गाच्या गप्पांचे मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवसानी आले नि.ग.वर. जवळ जवळ २०० पोस्ट आत्त वाचून काढल्या.
सर्व फोटो मस्त आहेत.
दिनेशदा, रोडच्या क्लिप मस्त.
परवा मुशाफिरि दिवाळी अंकात वर्षूचा चायनावरचा लेख वाचला. फार सुरेख लिहिलाय. खूप आवडला.

वा मस्त माहिती आणि फोटो! हळूहळू वाचतेय सगळं!
ही शेंग आपट्याच्या झाडाची आहे का? खाली आपट्यासारखं पान पडलेलं दिसतंय!
डिझाइन इतकं सुंदर आहे अगदी कापडावर प्रिन्ट करण्यासारखं!
वर्षूचा लेख? अरे.......नेमका दिवाळी अंक राहिलाय वाचायचा. इथे देता येईल का?

मानु.. खूप आर्टिस्टिक दिस्ताहेत शेंगा.. झालंच तर एका माशी बाई ने पण फोटू काढून घ्यायची हौस भागवून घेतलेली दिस्तीये Lol

दिनेश जवळ आहे मुशाफिरी मासिक.. त्याला स्कॅन करून तुला मेल करायला सांग..

मानुषी, हा आपटा नाही तर कांचन आहे. खाली पाने पडलीत ती कांचनाची आहेत. तु बिया लावल्या तर लगेच रुजतील. माझ्याकडेही रुजल्या होत्या. Happy

आपटाही कांचनाचाच चुलतभाऊ. पण पाने खुप लहान असतात. हल्ली कांचनालाच आपटा म्हणुन दस-याला खपवतात.

वर्षू यू आर अगदीच टू मच! Biggrin
मुशाफिरीचं सांगते दिनेशला.
साधना मिस्टर आपटे यांच्या चुलतभावाची Proud माहिती इन्टरेस्टिन्ग! कांचनाचं झाड पहिल्यांदाच पाहिलं!
हं ...वाटंत होतं खरं.........पण आम्ही कामानिमित्त मोहट्याला(नगरजवळचं जगदंबेचं देवस्थान) गेलो होतो तिथे हे श्री.कांचन आपटे भेटले!!!!!!!!!
तिथले फोटो डकवीन. आणि एक लेख उसगावात असताना वाचनात आला होता. एका अमेरिकन बाईला लोणी/क्रीम कढवून तूप कसं करायचं त्याचा अचानक शोध लागला. लोणी कढवून तूप करण्याची प्रोसेस तिला खूपच देवाच्या जवळ जाणारी आणि स्पिरिच्युअल कशी वाटली याचं तिने खूप सुंदर वर्णन केलं आहे. त्याचं भा षांतर मी करून ठेवलं आहे. इथे देऊ का?

हो कांचनच्याच बिया आहेत Happy

माझ्याकडे आहे मुशाफिरीचा दिवाळी अंक. जमल्यास वर्षूदीचा लेख स्कॅन करून पाठवतो मानुषीताईला. Happy

सगळ्यांचे फोटो मस्त.

जिप्सी इथे जमल्यास लिंक देना त्या वर्षुताईच्या लेखाची.

कांचनचे झाड आमच्याकडे आहे कोकणात पण मी शेंग नाही पहिली.

किती सुंदर रेखीव शेंग आहे. हो नवरा पण म्हणतोय कांचनची आहे.

हा तो लेख....कसा वाटला सांगा
About an article in an American yoga magazine. Yoga Journal (March 2009)
वसंत ॠतूचं आगमन जवळ आलं तरी माझ्या विस्कोन्सिन प्रांतातल्या मेडीसन या गावावर निसर्गाने रेकॉर्ड ब्रेकिंग (न भूतो न भविष्यति) बर्फ वर्षाव चालूच ठेवला होता.
वर्षातला हा काळ माझ्या नवऱ्याच्या कामात ढवळाढवळ करतो. माझा नवरा हा बायोडिझेल ट्रकमधून दुधाचा व्यवसाय करणारा आधुनिक काळातला दूधवाला आहे.
त्याने आपला ट्रक हॉस्टन गाईसारखा दिसावा म्हणून काळ्या पांढऱ्या रंगात रंगवला आहे.
मागील वर्षी वसंत ॠतूत एका आठवडा तो रस्त्यावर ट्रक चालवूच शकला नाही. त्यामुळे आमच्या घराच्या मागील दारी क्रीमचे ६० पिंटस बर्फात तसेच पडून राहिले. चार जणांचं कुटुंब फ्रेश क्रीम खाण्याची चैन किती दिवस करणार? फ्रेश क्रीम खाऊन खाऊन किती खाणार?
मला माहिती होतं की या चविष्ट पदार्थाचं जर काही केलं नाही तर हे नक्की वाया जाणार.
तेव्हाच माझ्या योगाच्या ग्रुपमधल्या काही मैत्रिणींनी मला या क्रीमचं क्लेरीफाईड बटर बनवण्याची कल्पना सुचवली.
अनसॉल्टेड लोण्याला उष्णता देऊन तूप बनवतात. अश्या पद्धतीने उष्णता देऊन कढवलेल्या लोण्याचे तीन घटकांमध्ये विघटना होते.
हे ते तीन घटक……. लेक्टोज(साखर), मिल्क प्रोटीन आणि फेट.
मंद आचेवर लोण्यातली आर्द्रता नष्ट केली जाते. मग साखर आणि प्रोटीन बेरीमध्ये रूपांतरित होऊन भांड्याच्या तळाशी साठत जाते. नंतर तयार तूप गाळून घेऊन ही बेरी बाजूला काढली जाते.
यानंतर जे तूप मिळते ते अत्यंत सात्विक आणि सुमधुर असे असते.
तुपाचा स्मोकिंग पॉईन्ट 485°F ( 252°C) इतका उच्च असल्याने कोणताही पदार्थ परतण्यासाठी किंवा तळण्यासाठी तूप हा लोण्याला अगदी उत्तम पर्याय होऊ शकतो.
तुपाच्या जबरदस्त स्वादामुळे आपण याचा वापर कोणत्याही पदार्थासाठी सीझनिंग म्हणून करू शकतो.
तुपाचं सीझनिंग (फोडणी) आपण अगदी ओटमील्सपासून ते भातापर्यंत, तसेच वाफवलेल्या भाज्यांपासून विविध प्रकारच्या करीजमध्येही वापरू शकतो.
इतकंच काय पण आपण याचा वापर ब्रेडवर (ब्रेड स्प्रेड) लावण्यासाठी सुद्धा करू शकतो.
तूप हे लेक्टोज फ्री असल्याने पचायलाही हलके असते.
Down to the essence
सम्पूर्ण भारतात तूप हे शुभ शकुनाचे आणि पावित्र्याचे, मांगल्याचे प्रतिक मानले जाते.
भारतीय घरातील औषधांच्या कपाटात आणि स्वयंपाकघरातही तुपाच्या बरणीला अनन्यसाधारण महत्व आहे.
फक्त काही थोडी खबरदारी घेतली तर तूप वर्षभर फ़्रीजबाहेरही टिकते. तूप जर डायरेक्ट सूर्यप्रकाशापासून आणि आर्द्रतेपासून लांब ठेवले तर वर्षभर चांगले टिकते.
तरी काही लोक तूप फ़्रिजमध्येही ठेवतात.
"आयुर्वेदात भारतातली पाच हजार वर्ष पुरातन अशी रोग निवारण पद्धतीची जी परंपरा आहे, त्यानुसार तूप हा जितका अन्नपदार्थ म्हणून जितका महत्वाचा आहे, तितकेच महत्वाचे तुपाचे औषधी गुणधर्म आहेत." असं कन्याकुमारी आयुर्वेद एज्युकेशन एंड रिट्रीट सेंटर, मिलवॉकी इथल्या सर्टिफाइड आयुर्वेदिक प्रेक्टीशनर रीमा शाह म्हणतात.
"हा माणसाचं तेज वाढवणारं एकमेव महत्वाचा अन्न पदार्थ आहे. तेज किंवा ओजस म्हणजेच जीवन जगण्याची उर्जा जी आपणा सर्वांमध्ये असतेच!"असंही त्या पुढे स्पष्ट करतात.
शाह यांच्या म्हणण्याप्रमाणे प्राचीन पुराणांमध्ये आपल्याला तुपाचा उल्लेख सापडतो.
या पुराणांमध्ये तुपाचा तेजाविषयी,महत्वाविषयी खूप दाखले सापडतील. आपल्या महान भारतीय महाकाव्य महाभारतात, ज्याच्यात भगवद गीताही आहे, तुपाचं वर्णन …जीवनाचं सार किंवा जगाला धरून ठेवणारा धागा असं केलं आहे.
"प्राचीन वेदांमध्ये तूप हे दैवी शक्तीचं रूपक (prateek) आहे."असे केलिफोर्निया स्थित बॉलीनास या शहरातील आयुर्वेदिक प्रेक्टीशनर पीटर मलाकॉफ म्हनतात.
"ज्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या निर्मितीत दैवी शक्ती लपलेली असते, आणि तीच शक्ती निर्मितीचा अर्क असते, तसेच तूप हे दुधामध्ये लपलेले असते, आणि तुपाला
दुधाचा अर्क किंवा सार समजले जाते." असेही मलाकॉफ म्हणतात.
The right churn
अमेरिकेत तुम्ही नेचरल फ़ूड स्टोअर्स मधून किंवा ऑनलाइन ऑर्डर करून तूप मागवू शकता. पण खूपसे लोक घरीच लोण्याचं तूप बनवू शकतात.
मलाकॉफ यांच्या म्हणण्याप्रमाणे …. तीव्र संप्रेरके, कीटकनाशके आणि प्रतिजैविके जर टाळायची असतील तर तुम्ही ऑर्गेनिक पांढऱ्या लोण्यापासून सुरुवात करू शकता.
अर्थातच आता माझी पहिली पायरी म्हणजे माझ्याकडच्या असलेल्या क्रीमपासून लोणी बनवणे. मी एका जुना काउंटर टोप मिक्सर वापरून रात्रीच्या शांत वेळी काम करण्याचे ठरविले.
मिक्सरची पाती फिरत होती त्यामुळे भांड्यातलं क्रीमही फिरत राहीलं.
तोपर्यंत मी एकीकडे स्वयंपाकघरातली बारिकसारिक कामे उरकंत राहिले आणि एकीकडे मिक्सरवरही लक्ष ठेऊन होते.
जेव्हा मिक्सरच्या नेहेमीच्या आवाजात thodaआणखी badal houn एका आवाजाची भर पडायची तेव्हा मी तिथे असलेल्या ताटल्या जरा लांब ठेवायचे.
जिकडे तिकडे मिक्सरममधला द्रवपदार्थ उडला होता. ओट्यावर, जमिनीवर सगळीकडे!
सगळा नुसता गोंधळ, पण तरीही मला लोणी काढता आलं, हेही नसे थोडके!

मी क्रीमच्या जवळ जवळ १९ बेचेस घुसळल्या. त्यानंतर मला ताकात तरंगणाऱ्या लोण्याच्या गोळ्याचा इशारा देणारा मिक्सरचा एक जबरदस्त आणि वेगळा आवाज बरोब्बर समजायला लागला. अगदी पहाटेपर्यंत सुद्धा माझं काम संपलेलं नव्हतं. पण नंतर मात्र मला, फ्रीजमधल्या त्या २४ पौंडाच्या लोण्याच्या गोळ्याच्या विचाराने छान झोप लागली.

Hot stuff

नंतरच्या २ संध्याकाळी माझ्या घरी काढलेल्या लोण्याला तुपात रूपांतरित करण्यासाठी समर्पित होत्या. घरातले सर्वात मोठे भांडे लोण्याने भरले. मग गेस चालू केला.
मग लोणी एकसारखं वितळू लागलं. मग गेस बारिक केला. जेणेकरून लोण्यातलं लेक्टोस आणि प्रोटीन हे फेटपासून वेगळं होईल
जेवढा वेळ लोणी गेसवर आहे, तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे. लक्ष ठेवा आणि ऐकत रहा. लोणी गेसवर असताना ते उकळत राहील आणि एका प्रकारचा तडतडणारा आवाजही लोण्यातून येत राहील. मग हळूहळू ते शांत होईल.
लोणी जेव्हा उष्णतेवर उकळत असते, तेव्हा ते ढवळण्याचा मोह आवरा. हे खूप महत्वाचे आहे. लोणी उकळताना अगदी त्याच्यातून जरी बुडबुडे येत असले तरी जर तुम्ही हा मोह आवरला तर लोण्यातील लेक्टोस आणि मिल्क प्रोटीन यांच्यापासून सोनेरी रंगाचा तो अर्क म्हणजेच तूप आपोआपच वेगळा होइल.
या सगळ्या प्रक्रीयेला २० मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत कितीही वेळ लागू शकतो. ते तुम्ही किती लोणी कढवताय, भांडे किती मोठे आहे अश्या बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे.
तूप तयार झालंय की नाही हे बघणे फार सोपे आहे. पातेल्यातल्या लोण्यात आता सगळं शांत आहे आणि बुडबुडे नाहीसे झालेत. एक छान सुगंध सगळीकडे पसरलाय.
आता मी गेस बंद करून लोण्याचं पातेल खाली उतरवते आणि ते अर्धा तास तसेच ठेवते. एकदा ते स्थिर झाले की डबल केलेल्या पातळ फडक्यातून ते गाळून घेते. हे तूप स्वच्छ आणि कोरड्या हवाबंद बरण्यांमध्ये भरून ठेवते.
भारतात तळाशी साठलेल्या बेरीचा वापर तुपाचे दिवे लावण्यासाठी करतात. पण माझ्या स्वयंपाकघरात ही बेरी म्हणजे माझ्या कुत्र्यांची मेजवानी!
Divine flow
गरम तुपामुळे बरणीच्या झाकणावर वाफ धरली जाऊ नये म्हणून, मी बरण्या बंद करण्याआधी तूप पूर्णपणे थंड होऊ देते.
याबाबत मलाकॉफ म्हणतात, "असे केल्याने आर्द्रता बाहेरच रोखली जाते आणि तूप वर्षभर टिकते."
तूप चमच्याने काढून घेताना सुद्धा स्वच्छ कोरडा चमचा वापरला पाहिजे.
तुपाचा मेल्टिंग पॉईंट रूम टेम्परेचर इतकाच असल्याने तूप रुम टेम्परेचरला कधी लोण्याइतके पातळ तर कधी ओलिव्ह ओइल इतके पातळ असते. १ पौंड लोण्यापासून साधारणपणे पाऊण किलो तूप बनते.
मी १७ पिंटस तूप मिळवलं. जर यात आणखी थोडं सांडलेलं, थोडं गाळताना वाया गेलेलं, थोडं नमुन्यादाखल वगळलेलं असंही धरलं तर ते १८ पिंटस असू शकतं.
तीन दिवस माझ्या डेअरीतलं सगळं क्रीम वापरून मी त्या क्रीमचं रुपांतर जेव्हा त्याच्याच सर्वात शुद्ध स्वरूपात केलं, तेव्हा लोणी कढवून तूप करणे म्हणजेच देवत्वाशी नातं जोडणं असं मलाकॉफ का म्हणतात हे कळलं .
माझे स्वत:चेच विचार या सर्व प्रक्रियेत खूपच शांत झाले. या प्रक्रियेमुळे माझ्यात एक अविचल असा अवेअरनेस आला जो तुम्हाला अंतत: चिंतनाच्या किंवा ध्यानाच्या दिशेने घेऊन जातो.
…ज़ी प्रक्रिया खूप अविरत काळ चालते अश्या एका प्रक्रियेत भाग घेताना माझ्या मनाला एका प्रकारच्या शांततेची जाणीव होत होती.
आणि मी जणु स्वत:लाच पहात होते …… गाळणीतून खाली झिरपणारं तूप आनंदात निरखणारी मी, याच्या दाटपणाचं कौतुक करणारी मी आणि या द्रवरूप सोन्याच्या साध्या सरळ प्रवाहापासून प्रेरणा घेणारी मी!

वाह!!! मानु सुंदर भाषांतर !!!

लोण्यापासून तूप बनवण्याच्या प्रक्रिये मधे आध्यात्म शोधणारी अमेरिकन बाई खूप भावली.. Happy

आपल्या स्वैपाकघरात रोजची साधी कोशिंबीर, सलाद किंवा एखादा साधारण पदार्थही मन लावून करताना याच

(डिवाईन) भावनेचा प्रत्यय येत असतो नै?? Happy Happy

वाह!!! मानु सुंदर भाषांतर !!!

लोण्यापासून तूप बनवण्याच्या प्रक्रिये मधे आध्यात्म शोधणारी अमेरिकन बाई खूप भावली.. स्मित

आपल्या स्वैपाकघरात रोजची साधी कोशिंबीर, सलाद किंवा एखादा साधारण पदार्थही मन लावून करताना याच

(डिवाईन) भावनेचा प्रत्यय येत असतो नै?? स्मित स्मित + १०००००

मानुषी - कस्लं भारी वाटत होतं हे अध्यात्मिक (लोणकढं) घृत प्रक्रिया वाचताना .... म्हणजे - धन्य, धन्य, साधु, साधु - असे उद्गार अंत:करणात उठत होते ... Happy

भाषांतर अग्दीच जमलंय ...

शशांक ती गणेशवेलीची लाल फुले .... कसला सॉलीड रंग आहे तो.
ममो मस्त रंगीबेरंगी फुले.
मानुषी लेख वाचते अजुन वाचल नाही.
बाकी त्या फोटोतल्या हातावरच्या शेंगा पाहुन काँ चा हात + आप चा झाडु आठवले. Uhoh

वर्षू, तूला स्कॅन नाही मिळाला का ? परत पाठवू ?

मानुषी, छान आहे तो लेख... साधी लोणी काढण्याची क्रिया, पण त्यामागे कृष्णाच्या बालपणापासून, एकनाथ महाराजांच्या रचनेपर्यंत सगळे गुंतलेय.

वर्षानुवर्ष लोणी काढुन तूप करतेय पण त्यामागचा हा विचार मानुषी तुझ्यामूळे कळला. भाषांत्तर अप्रतिम केले आहेस. मजा आली वाचताना.

सर्वांचे खूप आभार..........इस्कुब्बोल्तैहौस्लाअफजाई!

अरे सगळे गेलेत कुठे?
ह्या चाफ्याच्या शेंगा पाहुन 'बी' यांची आठवण झाली... Lol म्हणजे बी यांनी खुप छान प्र.ची आणि माहिती दिली होती ना चाफ्यावर,, ( बी ह ल के घ्या :))

chafa.jpg

जागु तुला परत मेल पाठवला आहे,,,

Pages