निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला
मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!
मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!
कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी
शिरशिरी..ओठावर चरचरणार्या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत
नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!
धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज
असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:
ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच
महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.
परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंतीची फुले, मधुमालतीचे गुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!
गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी
चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्याखुर्या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे
कमी आहे!!!
..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या
शुभेच्छा!
(वरील लेखन व फोटो मायबोलीकर बी यांच्यातर्फे.)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गाच्या गप्पांचे मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
साधना मस्त आहे तुझी पोस्ट..
साधना मस्त आहे तुझी पोस्ट..
कापसाच्या शेती ची छान आहे माहिती..
लोक्स मी वेळ मिळेल तसं वाचतेय .. आज तुम्हा सर्वाना माझी आठवण करून
द्यायला आलेय... हा>>>य ऑल
नॅशनल पार्कातला लाल चतुर
नॅशनल पार्कातला लाल चतुर
वraha रnga कsला गोड आहे
वraha रnga कsला गोड आहे त्याचा.
एक्सपर्ट मंडळी, मी गच्चीत
एक्सपर्ट मंडळी, मी गच्चीत पपईचे ३ वर्षांपूर्वी कुंडीत लावलीय. फुले येतात पण फळ धरत नाही, काय करावे, कुणी सांगू शकाल का?
मस्त फोटो चतुराचा. विनिता,
मस्त फोटो चतुराचा.
विनिता, फुल एकच मोठे बुंध्याला येते कि तीन चारच्या गटाने एका काडीवर येतात. दुसर्या प्रकारचे असेल तर ते नर झाड आहे, त्याला फळे लागणार नाहीत. पहिल्या प्रकारचे असेल आणि तरीही फळे धरत नसतील तर आशा आहे अजून.
वर्षू.. आणखी ३ दिवसांनी आम्ही
वर्षू.. आणखी ३ दिवसांनी आम्ही तूझी आठवण काढणारच आहोत !
दिनेश आणी मी तुम्हा
दिनेश

आणी मी तुम्हा सर्वांची
वर्षा चतुर झकास आहे !!!!
नमस्कार निगकर्स! साधारण सहा
नमस्कार निगकर्स!
साधारण सहा महिन्यांपुर्वीची गोष्ट आहे,
रुमबाहेरच्या स्लॅपवर पाकोळीने घरटे बांधले होते पण वॉचमनच्या वडीलांनी ते खुप घाण करतात म्हणून काढुन टाकले,
मी त्यांना रागावले की असा न विचारता काही करु नका!
मुद्दा हा आहे की त्यानंतर आठच दिवसांत पाकोळीने परत तिथेच घरटे बांधले पण त्यानंतर तिथे कोणीच रहात नाही.
घरटे मोकळेच आहे.
एकदोनदा चिमणी येऊन पहाणी करुन गेली घरट्याची पण पसंत पडले नसावे.
अजुनही त्या घरट्यात कोणीच रहात नाही.
डी विनिता फो टो टाका ना पपई
डी विनिता फो टो टाका ना पपई च्या झाडा चा...
सारिका काही पKshee इ त र पKshaani बांधलेली घrटी वापर तात... उदा. बुलबुल..
Mircale Garden, Dubai
Mircale Garden, Dubai
वॉव लय भारी फोटो. मंजुताई
वॉव लय भारी फोटो.
मंजुताई सध्या दुबई का?
आज नाग्पुरात दुबई फिरुन ...
आज नाग्पुरात दुबई फिरुन ... घरटे आपुले छान!
वॉव,ंमस्त
वॉव,ंमस्त
मंजु , मस्तच आलेत फोटो!
मंजु , मस्तच आलेत फोटो!
हेमाताई राजस्थान लेख लिहा.
हेमाताई राजस्थान लेख लिहा.
मंजू मस्त फोटो.. मी गेलो होतो
मंजू मस्त फोटो.. मी गेलो होतो तेव्हा हे गार्डन उन्हाळ्यामूळे बंद होते. बघायचे राहिलेच.
सारीका, काही नर पक्षी
सारीका, काही नर पक्षी प्रॅक्टीस म्हणूनही घरटे बांधतात. त्यांचे कुठे काही ( लग्नबिग्न ) जमले नाही तर ते घरटे तसेच सोडून देतात. पण पिल्लेच काय अंडी तयार व्हायच्या आधीच घरट्याची सोय ते बघतातच बघतात. आपले असेल नाही तर इतरांचे.
मंजू, अप्रतिम फोटो. दा,
मंजू, अप्रतिम फोटो.
दा, कापसाची माहिती खुपच मस्त.
नमस्कार, मला थोडी मदत हवी
नमस्कार, मला थोडी मदत हवी आहे. माझ्या घराला मागच्या दारी छान मोठ्ठं अंगण लाभलं आहे. पण तिथे ऊन साधारण दुपारी चार नंतर येते. हिवाळ्यात तर अजिबात ऊन पडत नाही. मी मागच्या वर्षी तुळस, जास्वंदी, कडीपत्ता, कोथिंबीर, जांभूळ आणि मिरची लावली होती.
1. कडीपत्ता चांगला वाढला होता पण अट्टा हिवाळ्यात त्याची पानं गायब होत आहेत. बहुदा पक्षी खाऊन टाकतात. कीड दिसली नाही मला. एकदा कोणाचं तरी ऐकून टक टाकलं होतं मी. त्यानंतर कडीपत्ता नीट वाढलाच नाही.
2. तुळस - नीट वाढत नाहीये. सगळी पाने काली पडली आहेत आणि गळून गेली आहेत. छोटी छोटी पाने येत आहेत पण म्हणावं तशी वाढ नाही.
3. जास्वंदी - हिची पण वाढ हळूच आहे. 6 महीने झालेत लावून पण अजून काली आली नाहीये.
4. कोथिंबीर - ही पण हळूबाई. पाने फुटली पण म्हणावी तशी मोठी नाही झालीत आणि खूप नाजुक आहेत. जमिनीला चिकतूनच वाढते आहे.
5. जांभूळ - 6 महिन्यात फक्त 20 CM वाढल आहे.
6. मिरची - उगवलीच नाही.
पाणी साधारण किती आणि कधी घालू? मी 3-4 दिवसांनी देते सध्या थंडीमुळे.
खत कुठले टाकू? खुरपणी करून माती भुसभुशीत करावी लागते का वारंवार?
घरचं नेट २-३ दिवस बंद होतं
घरचं नेट २-३ दिवस बंद होतं
त्यामुळे इथे येऊ शकले नाही... आज बघते तो धागा कित्ती पुढे गेलाय..
सगळ्यांचेच फोटो मस्त!.. परत परत बघावेसे वाटताहेत...
साधना...:हाहा: मस्तए किस्सा!
दा, कापसावरची माहिती वाचून 'एक होता कार्व्हर' मधली माहिती आठवली.. बिना सरकीच्या बोंडांकडून सरकीने भरलेलं बोंड विकसित करणार्या कार्व्हरची! कारण सरकी किती उपयुक्त आहे हे त्याने जाणलं होतं..
आणि चित्त्यावर अॅ प्लॅ वर मागे अशीच एक फिल्म दाखवली होती..
स्नू, बागेतल्या रोपांना सकाळचं (दु. १-२ वाजेपर्यंतचं) ऊन जास्त चांगलं. तुमच्या सर्व समस्यांचं उत्तर एकच,, व्यवस्थित ऊन पाहिजे.
आधीचे घरटे साधारण तीन वर्ष
आधीचे घरटे साधारण तीन वर्ष जुने होते, तेव्हा एक पकोळीचे जोडपे रहात होते, पाडल्यानंतर त्यांनी पुन्हा बांधले पण रहात नाही कोणी, इतर पक्षी पण पाहुन जातात पण त्यांना सुरक्षीत वाटत नसावे.
दिनेशजी फोटो काढून पाठवते
दिनेशजी फोटो काढून पाठवते पपईच्या फुलांचा.
मंजू फोटो काय भन्नाट आहेत गं!
काय मस्त फोटो आहेत मंजु
काय मस्त फोटो आहेत मंजु ताई...
पाहून एक गाणं आ ठ व ल....
देखो मैने देखा है ये एक स प ना... फुलो के शेहर मै हो घ र अ प ना....:)
ते मोर आणि त्यांचे पिसारे...आ ई ग.... कीत्ती गोड ..
स ग ळे गेलेत कु ठे?...
स ग ळे गेलेत कु ठे?...
बापरे, कसले गार्डन आहे
बापरे, कसले गार्डन आहे ते..मला तर बाहेर पडवणारच नाही त्यातुन. किती सुंदर. मोर काय अफाट आहेत...... ...
स्नु, फक्त चारनंतर उन म्हणजे काहीच उन नाही हो. ह्या उन्हात झाडे वाढण्याची शक्यता खुप कमी आहे. तुम्ही जी झाडे लावलीत ती सगळीच उनप्रेमी आहेत. सावलीत वाढ खुंटणार त्यांची.
मी शहरी शेतीच्या क्लासला गेले होते तिथे सरांनी १६ तास उन लागणा-या एका वनस्त्पतीचा उल्लेख केलेला. आपल्या रोजच्या वापरातलीच आहे ती, पण आपण तिची लागवड वेगळ्या पद्धतीने करतो. नैसर्गिक रित्या करायचीअसल्यास १६ तास उन हवे. मी नाव विसरले आता
हो ना आज नि ग थंडावल्या
हो ना आज नि ग थंडावल्या आहेत.
साधना..... काय झालं? टिंबलीस का?
अरेच्या मी लिही पर्यन्त तू
अरेच्या मी लिही पर्यन्त तू लिहिलास पण प्रतिसाद!..
ag maajha laptop pahili
ag maajha laptop pahili pratikriya english madhye dyayla lavto. hi bagh ashi. mi ti sampadit karate tevhaa marathit lihayachi paravaanagi deto. mhanun aadhi timb ani mag lekhan
ओके.................
ही बाग, दरवर्षी नव्याने
ही बाग, दरवर्षी नव्याने फुलवावी लागते. तिथल्या उन्हाळ्यात ही सर्व झाडे टिकणे शक्यच नाही, तरीपण हा उद्योग केला जातो.
Pages