मला चळवळींमधे तसेच आंतरजालावर काही ठिकाणी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जातीअंताच्या लढ्या ऐवजी जातीय अस्मितेचच राजकारण होताना दिसते आहे.अनेक बुद्धीदांडगे विद्वान जातीय दरी कमी करण्याऐवजी विश्लेषणाच्या बहाण्यातून जातीय त्वेष व द्वेष फुलत राहतील याचीच व्यवस्था करतात. तरुणांची माथी सतत भडकत राहतील याची व्यवस्था करतात.विवेकी व विचारी अशी भूमिका कुणी घेतली वा घेण्याचा प्रयत्न केला कि त्याला 'भटाळला' विचारांचे बामनी करण झाले अशी दूषणे द्यायला सुरवात करतात. असो. विवेक व विद्रोह हे एका ठिकाणी नांदत नाही .पण विवेक विद्रोह समजून घेण्यास मदत करतो. हे आपल माझ मत.
आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे ही शब्दरचना तर मी कित्येक वर्षे ऐकतो आहे. यात ब्राह्मण्य म्हणजे काय तर अज्ञानाचा फायदा घेउन केलेले शोषण, समाजात जेजे काही विषमता पसरवणारे आहे ते म्हणजे ब्राह्मण्य. अन्यायाचे जे समर्थन करते ते ब्राह्मण्य.जे जे सकल कुटील ते ब्राह्मण्य. असा तो ब्राह्मण्याचा अर्थ अभिप्रेत आहे. सहवेदनेचा विचार तुम्ही मांडलात की त्याला ब्राह्मणी कावा म्हणतात. अंनिस चे नरेंद्र दाभोलकर देखील या आरोपातून सुटले नाहित. त्यांच्या तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाच्या मनोगतात पान ७ वर वाचा. http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5421983945435441997...
दलित हत्याकांड वा तत्सम प्रकरणात तुम्ही वा पुरोगाम्यांनी निषेध जरी व्यक्त केलात तरी तो तोंडदेखला आहे ही भावना संतापाने चिडून उठलेल्यांच्या मनात असणारच आहे. त्याला इलाज नाही. उद्या तुमच्यावर जर ही वेळ आली तर तुमचेही संतुलन बिघडणारच आहे. तिथे विवेक काम करणार नाही. पण या त्राग्याचे म्हणा विद्रोहाचे म्हणा रुपांतर द्वेषात होणार नाही याची काळजी समंजस लोकांनी घेतली पाहिजे. प्रसंगी फटकारल पाहिजे. जात धर्म हे वास्तव नाकारता येत नाही हे जरी खरे असले तरी ती सांस्कृतिक विविधता आहे या दृष्टीने पाहिले तर सामाजिक ऐक्यासाठी ते सकारात्मकच होईल. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असा सुसंस्कृत ,सुजाण व संवेदनशील नागरिक असा म्हणजे झालं.
साधना ८ मे १९९९ च्या अंकातील पुरोगामी चळवळींची धर्मविषयक भूमिका या लेखात सदानंद मोरे म्हणतात,".. ब्राह्मणांचा विचार केला तर असे दिसते की त्यांच्यातील मोठी संख्या समाजकारण राजकारणापासून अलिप्त व उदास आहे. राहिलेल्या अल्पसंख्येतील एक भाग प्रतिगामी कट्टरवादी तर दुसरा पुरोगामी.बरेच ब्राह्मण पुरोगामी आपल्या पुर्वजांनी केलेल्या उद्योगांचे ओझे विनाकारण आपल्या खांद्यावर क्रुसासारखे वाहात असतात. तो त्यांचा अपराधगंडच म्हणा ना! त्यामुळे अब्राह्मण विचारवंत,लेखक,कलावंत यांच्या प्रत्येक कृतीला त्यांचा पाठींबा असतो.अब्राह्मणांविषयी व विशेषकरुन दलितांविषयी आपण काही बोललो, त्यांचे काही चुकते आहे असे प्रतिपादन केले तर आपल्या पुरोगामीत्वाविषयी संशय घेण्यात येईल अशी भीती त्यांना वाटत असावी. आपल्यातले ब्राह्मण्य पार निपटून गेले आहे असे दाखवण्याची त्यांची धडपड चालू असते. त्यामुळे ब्राह्मणांवर एखादा खोटा आरोप केला गेला व तो खोटा असल्याची या पुरोगाम्यांची खात्री असली तरी तसे स्पष्ट सांगायला ते कचरतात. वस्तुत: आमचे पुरोगामित्व प्रमाणित करणारे तुम्ही कोण किंवा संशयास्पद ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असे विचारुन त्यांनी अब्राह्मणांच्या चुकीच्या गोष्टींना चूकच म्हणण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. राजारामशास्त्री भागवत हा या बाबतचा त्यांचा आदर्श असायला हवा. भागवतांची सहानुभूती सत्यशोधकांना होती, सहाय्य ही होते. शाहू छत्रपतींना आपली धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने होत नसून शुद्रोचित पुराणोक्त पद्धतीने होत आहेत ही जाणीव भागवतांनीच करुन दिली व त्यातूनच पुढील महाभारत घडले.परंतु आवश्यकता भासेल तिथे भागवत सत्यशोधकांचेही कान उपटायला मागेपुढे पहात नसत.
दुसर्या बाजूचे प्रतिगामी ब्राह्मण मात्र असल्या कुठल्याही दडपणापासून मुक्त असतात.त्यांच्या संघटनेतील अब्राह्मण त्यांना मनापासून मानतात. त्यांच्याविषयी शंका घेत नाहीत. त्यांना कोणतेही दिव्य करायला लागत नाही. पुरोगामी ब्राह्मणाच्या एखाद्या क्षुल्लक उक्तीवरुन किंवा कृतीवरुन त्याची विश्वासार्हता धोक्यात येउ शकते. आतापर्यंतच्या सर्व तपश्चर्येवर पाणी पडू शकते. पुरोगामी चळवळीतील अब्राह्मणाचे पुरोगामीत्व जणु स्वयंसिद्ध,स्वयंप्रकाशित व स्वत:प्रमाण.उलट पुरोगामी चळवळीतील ब्राह्मणाचे पुरोगामीत्व त्याला वारंवार सिद्ध करावे लागते. उजळून घ्यावे लागते. त्याचे प्रामाण्य परत:प्रामाण्य होय. १९४८ च्या गांधीहत्येच्या प्रसंगी ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ वगैरे झाली. त्यावेळी असे विचित्र चित्र दिसले की कट्टर ब्राह्मणेतर शंकरराव मोरे या कृत्यांचा निषेध करतात तर नानासाहेब गोरे समर्थन करतात! अब्राह्मण्याचे पुरोगामीत्व जणु कवच कुंडलासारखे जन्मसिद्ध,कर्णाप्रमाणे; ब्राह्मण्याला मात्र आपल्या पुरोगामीत्वाची श्रावणी करावी लागणार!! आंतरजातीय विवाह करुन घरात आलेली सून सासरचे कुलाचार जपण्याचा प्रयत्न अधिक कसोशीने करते. इतरांनी त्याविषयी थोडी बेफिकिरी दाखवली तरी त्यांच्याविषयी कोणी शंका घेणार नसते. ब्राह्मण पुरोगाम्यांच्या मर्मस्थानाचा गैरफायदा अब्राह्मण पुरोगामी घेत नाहीत हे निदान मी तरी म्हणू शकणार नाही. अब्राह्मण पुरोगाम्याची बायको जत्रेत गेली तर तो लोकधर्म व ब्राह्मण पुरोगाम्याची बायको हळदीकुंकवाला गेली कि ती पुरुषसत्ताक व्यवस्थेला शरण गेली म्हणायला सगळे तयारच."
जातीय विश्लेषणा बद्दल थोडसं
Submitted by प्रकाश घाटपांडे on 19 January, 2015 - 00:50
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कृपया समस्त मायबोलीकरांनी
कृपया समस्त मायबोलीकरांनी राष्ट्रहिताकरीता तसेच राष्ट्रउभारणीकरीता आणि मोदींना परत पंतप्रधान बनवण्याकरीता अपत्यजन्मयज्ञाचा आरंभ करावा. परदेशी मायबोलीकरांनी या यज्ञास आर्थिक हातभार लावावा. त्यामुळे भारतात विदेशीगुंतवणुकीचा ओघ प्रचंड प्रमाणात यायला सुरुवात होईल. अश्यामुळे डॉलरचा भाव कमी होउन देशात महागाईचादर अत्यल्प होईल आणि देशबांधवांना १० अपत्यांना पोसणे शक्य होईल. समस्त हिंदु लोकांनी राष्ट्र हिता करीता, धर्म हिता करीता, देशाला असणार्या धोक्यांकरीता, देशाच्या भवितव्याकरीता १०-१५-२० जितकी शक्य असतील तितकी अपत्य जन्माला घालण्यात यावी. ज्यांना अतिहौस आहे त्यांनी आधुनिक विज्ञानाची मदत घेउन स्त्रीमधे परिवर्तित होउन अपत्य जन्माला घालावी आणि राष्ट्रहित जपावे.
खरंतर आपल्या उज्ज्वल
खरंतर आपल्या उज्ज्वल भूतकाळाकडुन प्रेरणा घेऊन गांधारीप्रमाणे १०० पुत्र जन्माला घालता येतील कां, यावर संशोधन करण्यास सरकारने प्रयोगशाळांची तातडीने निर्मिती करावई. साडेचार वर्षांच्या आतच हे संशोधन पूर्ण होऊन अमलात आणावे.
अरे देवा! मुलगा लग्न करेल की
अरे देवा!
मुलगा लग्न करेल की नाही याचे टेंन्शन आलेय. आणि इथे १० अपत्य जन्माला घालायच्या गोष्टी चालल्यात.
कुठ्ल्या देवाला साकडे घालु?.
हिंदुभूमीप्रतिपालक
हिंदुभूमीप्रतिपालक मोघलकुलावतंस दिल्लीनरेश व अयोध्यापती साक्षात नूर ए इलाही माननीय वंदनीय आदरणीय बाबर महाराज >>>>>>>बाबर महाराज, काउन्चे प्रातःस्मरणीय आहेत हे बघुन सखेद हर्ष आणी परम सन्तोष जाहला.:फिदी::दिवा:
परदेशातून जे परतोनी पाहणार
परदेशातून जे परतोनी पाहणार असतील त्यांनीही तिथे दहा बालके जन्माला घालावीत. त्यामुळे अधिक सुसंस्कारित प्रजा आयतीच मिळेल. परतोनी पाहात नसतील वा असतील त्यांनी आपल्या भारतातील स्नेह्यांना प्रजननास उद्युक्त करावे.
मेक (हिंदू पॉप्युलेशन) इन इंडिया ग्रो या मिशनमुळे नव्या प्रकारच्या उद्योगांनाही चालना मिळेल.:
माताबालआरोग्याशी संबंधित वैद्यक व पूरक व्यवसायाला चलती येईल. जननक्षमता सरलेल्या वयाच्या महिलांना बालसंगोपनात करियर करता येईल.
स्त्रियांचा बहुतेक वेळ मुलांना जन्म देण्यात व संगोपनात जाणार असल्याने त्या नोकर्या करू शकणार नाहीत. त्यांना नोकर्या करायच्या नसल्याने उच्च शिक्षण घेण्याची गरज राहणार नाही. या दोन्ही मुळे पुरुषांमधील बेकारीचे प्रमाण कमी होईल. अल्पशिक्षित पुरुषांना शिक्षित , स्वावलंबी महिलांबद्दल वाटणार्या असूयेचे प्रमाण कमी झाल्याने व महिला बहुतांश काळात घरातच राहिल्याने बलात्कारासारख्या घटनांचे प्रमाण कमी होईल. तसेच भारताची डेमोग्राफी नव्या युगाची आव्हाने पेलण्यास अधिक समर्थ होईल.
यात कोणताही स्त्रीविरोधी दृष्टिकोन नाही तर निसर्गानेच स्त्रियांवर अपत्यजन्माची व संगोपनाची जबाबदारी टाकलेली असल्याने ही भूमिका निसर्गाशी सुसंगतच आहे.
यासाठी वैद्यकशास्त्रात संशोधनाला वाव मिळेल : एकाच वेळी जुळी/तिळी मुले जन्माला घालणे, सरोगसी इ.
महाभारत गांधारीने गर्भाशयाबाहेर गर्भ वाढवले त्या दिशेने संशोधन केल्यास बाळंतपणाचा त्रासही वाचेल. अनेक प्रगत देशांत महिला करियरसाठी अपत्यजन्म टाळतात, त्यांना, तसेच जिथे लोकसंख्या वाढण्याऐवजी घटते आहे अशा काही प्रगत युरोपीय राष्ट्रांनाही या संशोधनाचा उपयोग होईल.
७० वर्षाच्या आजीबाईने दिला
७० वर्षाच्या आजीबाईने दिला जुळ्यांना जन्म!
याबाबतचे वृत्त डेली मेलने दिले असून त्याच्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशातील उत्तर भागात असलेल्या एका गावातील ओमकारी सिंह या महिलेने ७० व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला असून आतापर्यंत कोणत्याही वयोवृध्द महिलेने या वयात मुलांना जन्म देण्याचा विक्रम आहे.
हिंदू धर्मातिल माताजी, आजी मुलांना जन्माला घालायचा विचार करु शकता.
जाती/ धर्म अंताचा लढा हा
जाती/ धर्म अंताचा लढा हा जगातल्या मानव प्राण्याच्या अंताबरोबरच संपणार असे दिसते.
देवा! कठिणै!
देवा! कठिणै!
नाही एक लढा नुकताच संपला आहे
नाही एक लढा नुकताच संपला आहे त्यासाठी मानवप्राण्याच्या अंतापर्यंत वाट पहावी लागली नाही![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
देवा! कठिणै! > काय कठिण आहे
देवा! कठिणै! > काय कठिण आहे १० अपत्ये होणे की लोकांना समजवणे ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लोकाना समजावणे.
लोकाना समजावणे.:अरेरे:
त्यापेक्षा गामा , कात्रे अशा
त्यापेक्षा गामा , कात्रे अशा परदेशातील श्रीमंत हिंदुनी घरवापसी करावी.>> कॄपया धाग्यातील चालू विषयावर चर्चा अपेक्षित असताना वैयक्तिक पातळीवर घसरण्याचे काहिच कारण नाही . जे स्वखुशीने धर्मान्तर करू इच्छितात ,त्याना सध्यातरी कायदा अडवित नाही , भविष्यात कदाचित अडवेल ,यास्तव वाट न पहाता काउसाहेब यानी त्वरित कार्य सिद्धीस नेण्याचे करावे!
प्रत्येक हिंदु स्त्रीच्या
प्रत्येक हिंदु स्त्रीच्या वैयक्तिक आयुष्यात तिने काय करावे हे लिहिलेले चालते बरे![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Hindu-mahasabha/articlesho...
पत्नीवर प्रेम असेल तर शाहरुख, आमिर, सैफने हिंदू व्हावे'
काय येडपटगिरी लावली आहे.
बरोबर आहे खानांनी हिंदु
बरोबर आहे खानांनी हिंदु व्हावे प्रेम असेल तर. सुरुवात नक्वी आणि शाहनवाज हुसेन यांच्याकडुन व्हावी.
जर खरे राष्ट्रप्रेम दाखवण्याचा हाच एक मार्ग जर मानला असेल तर सगळ्यांनीच चालावे. फक्त चित्रपट सृष्टी का चालावी. राजकारण्यांनी देखील चालावे.
शाहनवाज हुसेन, दिदे. खरंतर या
शाहनवाज हुसेन, दिदे. खरंतर या दोघांची 'घरवापसी' का केली नाही??![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
.
.
कात्रेसाहेब http://timesofind
कात्रेसाहेब
http://timesofindia.indiatimes.com/city/bareilly/Love-jihad-BJPs-Naqvi-S...
सत्य सत्य असते कुणाला वाटुन
सत्य सत्य असते कुणाला वाटुन सत्य खोटे तर होत नाही ना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काहो आंतरजातीय/ आंतरधर्मीय
काहो आंतरजातीय/ आंतरधर्मीय विवाह झाल्यावर मुलांना जन्मजात धर्म/ जात चिकटताना आईचा धर्म चिकटतो की बापाचा?
बापाचा
बापाचा
बघा बघा! इथेही पुरुषसत्ताक!
बघा बघा! इथेही पुरुषसत्ताक! समस्त स्त्रीवाद्यांनो जागे व्हा!
जागे होउन काय करा ? ते ही
जागे होउन काय करा ? ते ही स्पष्ट करा
जागे होउन मुलांना आईची जात
जागे होउन मुलांना आईची जात लावा!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Intercast-marr...
आंतरजातीय विवाह करणे हे समाजाने आखून दिलेल्या मर्यादांच्या विरोधात आहे, असे कारण पुढे करून डोंबिवली येथील संजय व श्वेता कदम या जोडप्याला रत्नागिरीमधील वाघिवारे गावातल्या समाजमंडळाने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. समाजात परत यायचे असेल; तर दंड भरा, असेही रत्नागिरीमधील व्याघ्रेश्वर सेवा गणेश मंडळाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या दडपशाहीला चोख उत्तर देत संजय आणि श्वेताने डोंबिवलीतील मानपाडा पोलिस स्टेशन, रत्नागिरीमधील रामपूर पोलिसस्टेशनसह मानवी हक्क आयोगाकडेही रितसर तक्रार नोंदवली आहे.
------------
काय म्हणावे अश्या लोकांना ?
हो हो , हिंदू बाईचा जन्म
हो हो , हिंदू बाईचा जन्म मिळाला असता तर मी स्वत: घातली असती 10-12 मुले जन्माला !>> आजकाल हिंदु मुली वयाच्या २७-३० च्या दरम्यान लग्न करतात. दोन मुलातील अंतर ३ वर्षे धरले तरी ४५ वया पर्यंत (प्रोडक्शन एक्सपायरीचा विचार करुन) मॅग्झीमम ५ मुलेच पैदा होऊ शकतील. म्हणजे दहाचा आकडा गाठायला एकतर १६ व्या वर्षीच पोरीचे लग्न लावा किंवा पुरुषाला द्वीभार्या लागू करा.
हा हा हा... आजच्यआ हिंदू बायका दोन्हीसाठी तयार होणार नाही.
दिदे खूप दिवसांपासून
दिदे
खूप दिवसांपासून वृत्तपत्रात कोकणातल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 'वाळीत' प्रकरणाच्या बातम्या येत आहेत. या वाळीत प्रकरणात आहेत तरी कोण, सामाजिक उतरंडीमध्ये जे कायम खालच्या स्तरावर आहेत ते.
मुंबईत कुठेतरी प्यूनची नोकरी करत लोकांची भांडी घासायची आणि गावात ''गावकार'' म्हणून माज करायचा.
स्वतःला शिक्षणाचा गंध नाही, एखादा जर स्वतःच्या हुशारीवर पुढे जात असेल तर त्याची सोबत करून आपलाही उत्कर्ष साधून घ्यायचा सोडून हे माजोरडे ''गावकार' त्याचाच विरोध करून आपल्याच पायावर धोंडा मारून पर्यायाने संपूर्ण समाजाचाच नुकसान करत आहेत.
खूप दिवसांपासून वृत्तपत्रात
खूप दिवसांपासून वृत्तपत्रात कोकणातल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 'वाळीत' प्रकरणाच्या बातम्या येत आहेत. >>> हे नुकतंच चालू झालेलं दिसतंय, अन्यथा एवढी वर्षे कोकणात राहून इतके आंतरजातीय, आंतरधर्मीय आंतरदेशीय विवाह पाहिले तरी वाळीत प्रकरण पाहिलेलं नाही.
खर तर हा प्रकार सरकारी
खर तर हा प्रकार सरकारी दरबारातुनच मोडुन काढायला हवा
मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांनी
मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जातीचे उल्लेख काढून टाकावेत असा पर्याय सुचवला होता.
Pages