जातीय विश्लेषणा बद्दल थोडसं

Submitted by प्रकाश घाटपांडे on 19 January, 2015 - 00:50

मला चळवळींमधे तसेच आंतरजालावर काही ठिकाणी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जातीअंताच्या लढ्या ऐवजी जातीय अस्मितेचच राजकारण होताना दिसते आहे.अनेक बुद्धीदांडगे विद्वान जातीय दरी कमी करण्याऐवजी विश्लेषणाच्या बहाण्यातून जातीय त्वेष व द्वेष फुलत राहतील याचीच व्यवस्था करतात. तरुणांची माथी सतत भडकत राहतील याची व्यवस्था करतात.विवेकी व विचारी अशी भूमिका कुणी घेतली वा घेण्याचा प्रयत्न केला कि त्याला 'भटाळला' विचारांचे बामनी करण झाले अशी दूषणे द्यायला सुरवात करतात. असो. विवेक व विद्रोह हे एका ठिकाणी नांदत नाही .पण विवेक विद्रोह समजून घेण्यास मदत करतो. हे आपल माझ मत.
आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे ही शब्दरचना तर मी कित्येक वर्षे ऐकतो आहे. यात ब्राह्मण्य म्हणजे काय तर अज्ञानाचा फायदा घेउन केलेले शोषण, समाजात जेजे काही विषमता पसरवणारे आहे ते म्हणजे ब्राह्मण्य. अन्यायाचे जे समर्थन करते ते ब्राह्मण्य.जे जे सकल कुटील ते ब्राह्मण्य. असा तो ब्राह्मण्याचा अर्थ अभिप्रेत आहे. सहवेदनेचा विचार तुम्ही मांडलात की त्याला ब्राह्मणी कावा म्हणतात. अंनिस चे नरेंद्र दाभोलकर देखील या आरोपातून सुटले नाहित. त्यांच्या तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाच्या मनोगतात पान ७ वर वाचा. http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5421983945435441997...
दलित हत्याकांड वा तत्सम प्रकरणात तुम्ही वा पुरोगाम्यांनी निषेध जरी व्यक्त केलात तरी तो तोंडदेखला आहे ही भावना संतापाने चिडून उठलेल्यांच्या मनात असणारच आहे. त्याला इलाज नाही. उद्या तुमच्यावर जर ही वेळ आली तर तुमचेही संतुलन बिघडणारच आहे. तिथे विवेक काम करणार नाही. पण या त्राग्याचे म्हणा विद्रोहाचे म्हणा रुपांतर द्वेषात होणार नाही याची काळजी समंजस लोकांनी घेतली पाहिजे. प्रसंगी फटकारल पाहिजे. जात धर्म हे वास्तव नाकारता येत नाही हे जरी खरे असले तरी ती सांस्कृतिक विविधता आहे या दृष्टीने पाहिले तर सामाजिक ऐक्यासाठी ते सकारात्मकच होईल. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असा सुसंस्कृत ,सुजाण व संवेदनशील नागरिक असा म्हणजे झालं.
साधना ८ मे १९९९ च्या अंकातील पुरोगामी चळवळींची धर्मविषयक भूमिका या लेखात सदानंद मोरे म्हणतात,".. ब्राह्मणांचा विचार केला तर असे दिसते की त्यांच्यातील मोठी संख्या समाजकारण राजकारणापासून अलिप्त व उदास आहे. राहिलेल्या अल्पसंख्येतील एक भाग प्रतिगामी कट्टरवादी तर दुसरा पुरोगामी.बरेच ब्राह्मण पुरोगामी आपल्या पुर्वजांनी केलेल्या उद्योगांचे ओझे विनाकारण आपल्या खांद्यावर क्रुसासारखे वाहात असतात. तो त्यांचा अपराधगंडच म्हणा ना! त्यामुळे अब्राह्मण विचारवंत,लेखक,कलावंत यांच्या प्रत्येक कृतीला त्यांचा पाठींबा असतो.अब्राह्मणांविषयी व विशेषकरुन दलितांविषयी आपण काही बोललो, त्यांचे काही चुकते आहे असे प्रतिपादन केले तर आपल्या पुरोगामीत्वाविषयी संशय घेण्यात येईल अशी भीती त्यांना वाटत असावी. आपल्यातले ब्राह्मण्य पार निपटून गेले आहे असे दाखवण्याची त्यांची धडपड चालू असते. त्यामुळे ब्राह्मणांवर एखादा खोटा आरोप केला गेला व तो खोटा असल्याची या पुरोगाम्यांची खात्री असली तरी तसे स्पष्ट सांगायला ते कचरतात. वस्तुत: आमचे पुरोगामित्व प्रमाणित करणारे तुम्ही कोण किंवा संशयास्पद ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असे विचारुन त्यांनी अब्राह्मणांच्या चुकीच्या गोष्टींना चूकच म्हणण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. राजारामशास्त्री भागवत हा या बाबतचा त्यांचा आदर्श असायला हवा. भागवतांची सहानुभूती सत्यशोधकांना होती, सहाय्य ही होते. शाहू छत्रपतींना आपली धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने होत नसून शुद्रोचित पुराणोक्त पद्धतीने होत आहेत ही जाणीव भागवतांनीच करुन दिली व त्यातूनच पुढील महाभारत घडले.परंतु आवश्यकता भासेल तिथे भागवत सत्यशोधकांचेही कान उपटायला मागेपुढे पहात नसत.
दुसर्‍या बाजूचे प्रतिगामी ब्राह्मण मात्र असल्या कुठल्याही दडपणापासून मुक्त असतात.त्यांच्या संघटनेतील अब्राह्मण त्यांना मनापासून मानतात. त्यांच्याविषयी शंका घेत नाहीत. त्यांना कोणतेही दिव्य करायला लागत नाही. पुरोगामी ब्राह्मणाच्या एखाद्या क्षुल्लक उक्तीवरुन किंवा कृतीवरुन त्याची विश्वासार्हता धोक्यात येउ शकते. आतापर्यंतच्या सर्व तपश्चर्येवर पाणी पडू शकते. पुरोगामी चळवळीतील अब्राह्मणाचे पुरोगामीत्व जणु स्वयंसिद्ध,स्वयंप्रकाशित व स्वत:प्रमाण.उलट पुरोगामी चळवळीतील ब्राह्मणाचे पुरोगामीत्व त्याला वारंवार सिद्ध करावे लागते. उजळून घ्यावे लागते. त्याचे प्रामाण्य परत:प्रामाण्य होय. १९४८ च्या गांधीहत्येच्या प्रसंगी ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ वगैरे झाली. त्यावेळी असे विचित्र चित्र दिसले की कट्टर ब्राह्मणेतर शंकरराव मोरे या कृत्यांचा निषेध करतात तर नानासाहेब गोरे समर्थन करतात! अब्राह्मण्याचे पुरोगामीत्व जणु कवच कुंडलासारखे जन्मसिद्ध,कर्णाप्रमाणे; ब्राह्मण्याला मात्र आपल्या पुरोगामीत्वाची श्रावणी करावी लागणार!! आंतरजातीय विवाह करुन घरात आलेली सून सासरचे कुलाचार जपण्याचा प्रयत्न अधिक कसोशीने करते. इतरांनी त्याविषयी थोडी बेफिकिरी दाखवली तरी त्यांच्याविषयी कोणी शंका घेणार नसते. ब्राह्मण पुरोगाम्यांच्या मर्मस्थानाचा गैरफायदा अब्राह्मण पुरोगामी घेत नाहीत हे निदान मी तरी म्हणू शकणार नाही. अब्राह्मण पुरोगाम्याची बायको जत्रेत गेली तर तो लोकधर्म व ब्राह्मण पुरोगाम्याची बायको हळदीकुंकवाला गेली कि ती पुरुषसत्ताक व्यवस्थेला शरण गेली म्हणायला सगळे तयारच."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mandar Katre,

मला वाटते नक्वी आणि शेहनाज हुसेन यानी हिंदू स्त्रीशी लग्न केलेले नाही>>>तुमच्या माहिती साठी.

बीजेपी चे शाहनवाज हुसैनजी ची पत्नी मुरली मनोहर जोशीजी ची मुलगी आहे
.
बीजेपी चे मुख्तार अब्बास नकवी ची पत्नी वीएचपी चे अशोक सिंघल ची भतीजी आहे.

सुब्रह्मण्यम स्वामी ची मुलगी सुहासिनी ने मुस्लिम बरोबर लग्न केले.

नंदिनी
माझ्या लग्नामुळे मला रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजातील अशा ''गावकार'' गिरीची ओळख झाली. हे आधी पासूनच होत. फक्त लोक त्यावेळेस आवाज उठवत नव्हते, पण निदान शिक्षण आणि माध्यम त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे आता आवाज वाढतोय.

माझे लग्न ही आंतरजातिय झाले. जेव्हा सपत्निक गावाला गेलेलो तेव्हा गावकरी कुजबुजत होते. शोभते का वगैरे वगैरे. सरळ दुर्लक्ष करायचे.

Raigad jilhyatil loan ratnagiri paryant pochla ??

गामा
ज्यांना जातीचे उल्लेख दाखल्यावर नको आहेत त्यांना तसे नको असण्याची मुभा असावी असा तो मुद्दा आहे. ज्यांना जातीचे / आरक्षणाचे फायदे घ्यायचे आहेत त्यांनी उल्लेख ठेवले तरी हरकत नाही. सध्या कस होतय की जातीचे उल्लेख हे कंपल्शन आहे. आंबेडकरांचा हेतु हा कि जातीय दरी कमी करण्याचा तोही एक मार्ग असावा.

दिदे,

>> गामा तुम्हाला काही प्रश्न विचारले

कोणते प्रश्न? कृपया परत सांगा वा दुवा द्या.

आ.न.,
-गा.पै.

Pages