मला चळवळींमधे तसेच आंतरजालावर काही ठिकाणी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जातीअंताच्या लढ्या ऐवजी जातीय अस्मितेचच राजकारण होताना दिसते आहे.अनेक बुद्धीदांडगे विद्वान जातीय दरी कमी करण्याऐवजी विश्लेषणाच्या बहाण्यातून जातीय त्वेष व द्वेष फुलत राहतील याचीच व्यवस्था करतात. तरुणांची माथी सतत भडकत राहतील याची व्यवस्था करतात.विवेकी व विचारी अशी भूमिका कुणी घेतली वा घेण्याचा प्रयत्न केला कि त्याला 'भटाळला' विचारांचे बामनी करण झाले अशी दूषणे द्यायला सुरवात करतात. असो. विवेक व विद्रोह हे एका ठिकाणी नांदत नाही .पण विवेक विद्रोह समजून घेण्यास मदत करतो. हे आपल माझ मत.
आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे ही शब्दरचना तर मी कित्येक वर्षे ऐकतो आहे. यात ब्राह्मण्य म्हणजे काय तर अज्ञानाचा फायदा घेउन केलेले शोषण, समाजात जेजे काही विषमता पसरवणारे आहे ते म्हणजे ब्राह्मण्य. अन्यायाचे जे समर्थन करते ते ब्राह्मण्य.जे जे सकल कुटील ते ब्राह्मण्य. असा तो ब्राह्मण्याचा अर्थ अभिप्रेत आहे. सहवेदनेचा विचार तुम्ही मांडलात की त्याला ब्राह्मणी कावा म्हणतात. अंनिस चे नरेंद्र दाभोलकर देखील या आरोपातून सुटले नाहित. त्यांच्या तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाच्या मनोगतात पान ७ वर वाचा. http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5421983945435441997...
दलित हत्याकांड वा तत्सम प्रकरणात तुम्ही वा पुरोगाम्यांनी निषेध जरी व्यक्त केलात तरी तो तोंडदेखला आहे ही भावना संतापाने चिडून उठलेल्यांच्या मनात असणारच आहे. त्याला इलाज नाही. उद्या तुमच्यावर जर ही वेळ आली तर तुमचेही संतुलन बिघडणारच आहे. तिथे विवेक काम करणार नाही. पण या त्राग्याचे म्हणा विद्रोहाचे म्हणा रुपांतर द्वेषात होणार नाही याची काळजी समंजस लोकांनी घेतली पाहिजे. प्रसंगी फटकारल पाहिजे. जात धर्म हे वास्तव नाकारता येत नाही हे जरी खरे असले तरी ती सांस्कृतिक विविधता आहे या दृष्टीने पाहिले तर सामाजिक ऐक्यासाठी ते सकारात्मकच होईल. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असा सुसंस्कृत ,सुजाण व संवेदनशील नागरिक असा म्हणजे झालं.
साधना ८ मे १९९९ च्या अंकातील पुरोगामी चळवळींची धर्मविषयक भूमिका या लेखात सदानंद मोरे म्हणतात,".. ब्राह्मणांचा विचार केला तर असे दिसते की त्यांच्यातील मोठी संख्या समाजकारण राजकारणापासून अलिप्त व उदास आहे. राहिलेल्या अल्पसंख्येतील एक भाग प्रतिगामी कट्टरवादी तर दुसरा पुरोगामी.बरेच ब्राह्मण पुरोगामी आपल्या पुर्वजांनी केलेल्या उद्योगांचे ओझे विनाकारण आपल्या खांद्यावर क्रुसासारखे वाहात असतात. तो त्यांचा अपराधगंडच म्हणा ना! त्यामुळे अब्राह्मण विचारवंत,लेखक,कलावंत यांच्या प्रत्येक कृतीला त्यांचा पाठींबा असतो.अब्राह्मणांविषयी व विशेषकरुन दलितांविषयी आपण काही बोललो, त्यांचे काही चुकते आहे असे प्रतिपादन केले तर आपल्या पुरोगामीत्वाविषयी संशय घेण्यात येईल अशी भीती त्यांना वाटत असावी. आपल्यातले ब्राह्मण्य पार निपटून गेले आहे असे दाखवण्याची त्यांची धडपड चालू असते. त्यामुळे ब्राह्मणांवर एखादा खोटा आरोप केला गेला व तो खोटा असल्याची या पुरोगाम्यांची खात्री असली तरी तसे स्पष्ट सांगायला ते कचरतात. वस्तुत: आमचे पुरोगामित्व प्रमाणित करणारे तुम्ही कोण किंवा संशयास्पद ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असे विचारुन त्यांनी अब्राह्मणांच्या चुकीच्या गोष्टींना चूकच म्हणण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. राजारामशास्त्री भागवत हा या बाबतचा त्यांचा आदर्श असायला हवा. भागवतांची सहानुभूती सत्यशोधकांना होती, सहाय्य ही होते. शाहू छत्रपतींना आपली धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने होत नसून शुद्रोचित पुराणोक्त पद्धतीने होत आहेत ही जाणीव भागवतांनीच करुन दिली व त्यातूनच पुढील महाभारत घडले.परंतु आवश्यकता भासेल तिथे भागवत सत्यशोधकांचेही कान उपटायला मागेपुढे पहात नसत.
दुसर्या बाजूचे प्रतिगामी ब्राह्मण मात्र असल्या कुठल्याही दडपणापासून मुक्त असतात.त्यांच्या संघटनेतील अब्राह्मण त्यांना मनापासून मानतात. त्यांच्याविषयी शंका घेत नाहीत. त्यांना कोणतेही दिव्य करायला लागत नाही. पुरोगामी ब्राह्मणाच्या एखाद्या क्षुल्लक उक्तीवरुन किंवा कृतीवरुन त्याची विश्वासार्हता धोक्यात येउ शकते. आतापर्यंतच्या सर्व तपश्चर्येवर पाणी पडू शकते. पुरोगामी चळवळीतील अब्राह्मणाचे पुरोगामीत्व जणु स्वयंसिद्ध,स्वयंप्रकाशित व स्वत:प्रमाण.उलट पुरोगामी चळवळीतील ब्राह्मणाचे पुरोगामीत्व त्याला वारंवार सिद्ध करावे लागते. उजळून घ्यावे लागते. त्याचे प्रामाण्य परत:प्रामाण्य होय. १९४८ च्या गांधीहत्येच्या प्रसंगी ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ वगैरे झाली. त्यावेळी असे विचित्र चित्र दिसले की कट्टर ब्राह्मणेतर शंकरराव मोरे या कृत्यांचा निषेध करतात तर नानासाहेब गोरे समर्थन करतात! अब्राह्मण्याचे पुरोगामीत्व जणु कवच कुंडलासारखे जन्मसिद्ध,कर्णाप्रमाणे; ब्राह्मण्याला मात्र आपल्या पुरोगामीत्वाची श्रावणी करावी लागणार!! आंतरजातीय विवाह करुन घरात आलेली सून सासरचे कुलाचार जपण्याचा प्रयत्न अधिक कसोशीने करते. इतरांनी त्याविषयी थोडी बेफिकिरी दाखवली तरी त्यांच्याविषयी कोणी शंका घेणार नसते. ब्राह्मण पुरोगाम्यांच्या मर्मस्थानाचा गैरफायदा अब्राह्मण पुरोगामी घेत नाहीत हे निदान मी तरी म्हणू शकणार नाही. अब्राह्मण पुरोगाम्याची बायको जत्रेत गेली तर तो लोकधर्म व ब्राह्मण पुरोगाम्याची बायको हळदीकुंकवाला गेली कि ती पुरुषसत्ताक व्यवस्थेला शरण गेली म्हणायला सगळे तयारच."
जातीय विश्लेषणा बद्दल थोडसं
Submitted by प्रकाश घाटपांडे on 19 January, 2015 - 00:50
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गापै - सहमत.
गापै - सहमत.
धन्यवाद गामा
धन्यवाद गामा
जात जाउदे खड्ड्यात , हा
जात जाउदे खड्ड्यात , हा भस्मासुर बघा ... आणी विचार व कॄति करा
गेल्या दशकातील धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला मिळालेल्या या अहवालातील ताज्या आकडेवारीनुसार, मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर आजही राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे.
देशातील लोकसंख्या वाढीचा सरासरी दर १८ टक्के असला तरी २००१-२०११ या दशकात मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं देशातील मुस्लिमांची एकूण संख्या १३.४ टक्क्यांवरून वाढून १४.२ टक्के इतकी झाली आहे.
उडन खटोला, धन्यवाद!
उडन खटोला, धन्यवाद! टक्केवारीत आसामात सर्वात जास्त वाढ दिसते आहे. ही बांगलादेशी मुस्लिमांमुळे आहे हे वेगळे सांगणे नलगे.
आ.न.,
-गा.पै.
छान.
छान.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=vzblEvFrfrI
लेख आवडला. (लेखावर नरहरी छाप
लेख आवडला. (लेखावर नरहरी छाप दिसते आहे )
साती व लिंबु यांचे मुद्दे आवडले.
आम्हाला मुस्लिम चालतील पण
आम्हाला मुस्लिम चालतील पण आम्ही शूद्राना जवळ करणार नाही !
(No subject)
देशातील लोकसंख्या वाढीचा
देशातील लोकसंख्या वाढीचा सरासरी दर १८ टक्के असला तरी २००१-२०११ या दशकात मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं देशातील मुस्लिमांची एकूण संख्या १३.४ टक्क्यांवरून वाढून १४.२ टक्के इतकी झाली आहे.
<<
ही आकडेवारी कुठली आहे ते ठाऊक नाही, पण,
शेकडा पाऊण माणूस वाढला आहे. साडेतेरा होते, आता सव्वाचौदा आहेत. ही २४% वाढ कशी?
शिवाय याच्यात भस्मासूर काय आहे? तुमच्या देशातले हे शंभरपैकी १४ च्या १४ लोक काय गुन्हेगार, चोर, दरवडेखोर वा अतिरेकी खुनी आहेत का?
वैदिक गणित वापरुन केलेला
वैदिक गणित वापरुन केलेला हिशोब आहे.
नस्ते प्रश्न विचारु नयेत..
जातीय विश्लेषणावर धार्मिक
जातीय विश्लेषणावर धार्मिक विश्लेषण का बरं?
वेगळा धागा काढा (हवं तर)
टक्का वाढला हे तर खरे ना? तो
टक्का वाढला हे तर खरे ना? तो कमी करण्यासाठी हिकडची रेघ वाईच लांब काढायची हे बिरबलीय तत्वज्ञान तुमास्नी कळत न्हाय काय? त्यासाठीच तर 'अधिक धान्य पिकवा ' मोहीम एन जी ओं मार्फत पुरस्कृत केली आहे.
त्यापरीस नेपाळातून काही हिंदू 'घुसवले ' तर? इथल्या कुटुंबांचे 'श्रम 'वाचतील !
ऐडिया कैसन हय ?
देश सोडून गेलेल्या हिंदूंची
देश सोडून गेलेल्या हिंदूंची घरवापसी हा आणखी एक मार्ग आहे
त्यापरीस नेपाळातून काही हिंदू
त्यापरीस नेपाळातून काही हिंदू 'घुसवले ' तर? इथल्या कुटुंबांचे 'श्रम 'वाचतील ..
...
नेपाळातुन हिंदु घुसतातच.. नेपाळातुन भारतात यायला पासपोर्ट विसा लागत नाही.
त्यापेक्षाही सोपा उपाय
त्यापेक्षाही सोपा उपाय आहे.
आठव्या अवतारानंतर हिंदु अवतार बंद झालेले आहेत.. त्यामुळे दुसर्या धर्मातल्या बुद्धालाच हिंदुनी आपला नब्ववा अवतार घोषीत केला.
आता वाळवंटातील प्रेषिताला दहावा कल्की अवतार घोषीत करावे.
काउ एक शंका आहे गौतम बुद्ध
काउ एक शंका आहे
गौतम बुद्ध जन्मापासुनच बुद्ध धर्माचा होता काय?
महंमदही नव्हता!
महंमदही नव्हता!
पण हिंदु हा शब्दच वेदांमधे
पण हिंदु हा शब्दच वेदांमधे नाही आहे हे विसरु नये. बाकी चालु द्या
देशातील लोकसंख्या वाढीचा
देशातील लोकसंख्या वाढीचा सरासरी दर १८ टक्के असला तरी २००१-२०११ या दशकात मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं देशातील मुस्लिमांची एकूण संख्या १३.४ टक्क्यांवरून वाढून १४.२ टक्के इतकी झाली आहे.
<<
शेकडा पाऊण माणूस वाढला आहे. साडेतेरा होते, आता सव्वाचौदा आहेत. ही २४% वाढ कशी?
>>>>>>
हे गणित मी समजावतो.
समजा दशकापूर्वी मुसलमान १०० होते, आणि आता १२४ झालेत. म्हणजे २४ टक्के वाढ कबूल.
तर तेव्हा, एकूण लोकसंख्येच्या ते १३.४ टक्के असल्याने तेव्हा एकूण लोकसंख्या होती (१००/०.१३४) = ७४६ भारतीय
आजच्या लोकसंख्येच्या मुस्लिम १४.२ टक्के असल्याने आजची एकूण लोकसंख्या आहे (१२४/०.१४२) = ८७३ भारतीय.
म्हणजेच मुस्लिम वाढीचा दर १२४/१०० = २४ टक्के
भारतीत वाढीचा दर = ८७३/७४६ = १७ टक्के
मुस्लिमेतर वाढीचा दर = (८७३-१२४) / (७४६-१००) = १६ टक्के
तरीपण २४ टक्के म्हणजे जरा
तरीपण २४ टक्के म्हणजे जरा जास्तच होताहेत. नाही का?
आता वाळवंटातील प्रेषिताला
आता वाळवंटातील प्रेषिताला दहावा कल्की अवतार घोषीत करावे.>>>>>
काउ चा हा उपाय चांगलाआणि सोप्पा वाटतोय.
ऋण्मुभौ, २४% ग्रोथ रेट हा
ऋण्मुभौ, २४% ग्रोथ रेट हा मागच्या दशकापेक्षा कमी झालेला रेट आहे. हे कोण सांगेल?
बातमी लिहिताना अशी लिहायची, की जणू कायतरी भयंकर मोठा लोचा होतो आहे. मग आहेतच हिंदू बायकांनी १०-१० पोरे जन्माला घालावीत वगैरे.
या असले डायलॉग बोलणार्यांना तात्काळ बाई बनवून प्रेग्नंट करून टाकावे असा विचार मनात येतो. करू देत प्रेग्नंसी 'एंजॉय' अन नंतरची चाईल्डबर्थही.
या असले डायलॉग बोलणार्यांना
या असले डायलॉग बोलणार्यांना तात्काळ बाई बनवून प्रेग्नंट करून टाकावे असा विचार मनात येतो. करू देत प्रेग्नंसी 'एंजॉय' अन नंतरची चाईल्डबर्थही>>>......
इकाका
इकाका
सुरुवात इथल्या स्वघोषित
सुरुवात इथल्या स्वघोषित रक्षकांकडुन करा
२४% ग्रोथ रेट हा मागच्या
२४% ग्रोथ रेट हा मागच्या दशकापेक्षा कमी झालेला रेट आहे. हे कोण सांगेल?
बातमी लिहिताना अशी लिहायची, की जणू कायतरी भयंकर मोठा लोचा होतो आहे. मग आहेतच हिंदू बायकांनी १०-१० पोरे जन्माला घालावीत वगैरे.>>
मागच्या दशकापेक्षा कमी झालेला असला तरी इतर धर्मीय /बहुसंख्यांक हिंदुपेक्षाही ग्रोथ रेट खूप जास्त आहे ,हे विसरता का ? की जाणूनबुजून अल्पसंख्यांकांची बाजू घेताय ?
या असले डायलॉग बोलणार्यांना तात्काळ बाई बनवून प्रेग्नंट करून टाकावे असा विचार मनात येतो. करू देत प्रेग्नंसी 'एंजॉय' अन नंतरची चाईल्डबर्थही.>>
हो हो , हिंदू बाईचा जन्म मिळाला असता तर मी स्वत: घातली असती 10-12 मुले जन्माला ! अगदी 50/60 वर्षापूर्वी पर्यन्त एकेका महिलेला 10/12 मुले व्हायचीच की. त्यात काय विशेष एवढे ? की तेव्हाच्या आणि आताच्या महिलांच्या क्षमतेत काही फरक पडला आहे ? (कथित भंपक वैचारिक सुधारणा हा भाग वगळल्यास )
मागच्या दशकापेक्षा कमी झालेला
मागच्या दशकापेक्षा कमी झालेला असला तरी इतर धर्मीय /बहुसंख्यांक हिंदुपेक्षाही ग्रोथ रेट खूप जास्त आहे ,हे विसरता का ? की जाणूनबुजून अल्पसंख्यांकांची बाजू घेताय ?
शतप्रतिशत सहमत.
उडन खटोला, तुमच्या पत्नीचे पण
उडन खटोला, तुमच्या पत्नीचे पण विचार असेच आहेत का?
हिंदू बाईचा जन्म मिळाला असता
हिंदू बाईचा जन्म मिळाला असता तर मी स्वत: घातली असती 10-12 मुले जन्माला ! अगदी 50/60 वर्षापूर्वी पर्यन्त एकेका महिलेला 10/12 मुले व्हायचीच की. त्यात काय विशेष एवढे ? की तेव्हाच्या आणि आताच्या महिलांच्या क्षमतेत काही फरक पडला आहे ? >>>
एक तर घरी विचारा. अथवा इथे धागा उघडा. तुम्हाला अतिशय योग्य आणि अचुक उत्तरे मिळतील.
Pages