मला चळवळींमधे तसेच आंतरजालावर काही ठिकाणी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जातीअंताच्या लढ्या ऐवजी जातीय अस्मितेचच राजकारण होताना दिसते आहे.अनेक बुद्धीदांडगे विद्वान जातीय दरी कमी करण्याऐवजी विश्लेषणाच्या बहाण्यातून जातीय त्वेष व द्वेष फुलत राहतील याचीच व्यवस्था करतात. तरुणांची माथी सतत भडकत राहतील याची व्यवस्था करतात.विवेकी व विचारी अशी भूमिका कुणी घेतली वा घेण्याचा प्रयत्न केला कि त्याला 'भटाळला' विचारांचे बामनी करण झाले अशी दूषणे द्यायला सुरवात करतात. असो. विवेक व विद्रोह हे एका ठिकाणी नांदत नाही .पण विवेक विद्रोह समजून घेण्यास मदत करतो. हे आपल माझ मत.
आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे ही शब्दरचना तर मी कित्येक वर्षे ऐकतो आहे. यात ब्राह्मण्य म्हणजे काय तर अज्ञानाचा फायदा घेउन केलेले शोषण, समाजात जेजे काही विषमता पसरवणारे आहे ते म्हणजे ब्राह्मण्य. अन्यायाचे जे समर्थन करते ते ब्राह्मण्य.जे जे सकल कुटील ते ब्राह्मण्य. असा तो ब्राह्मण्याचा अर्थ अभिप्रेत आहे. सहवेदनेचा विचार तुम्ही मांडलात की त्याला ब्राह्मणी कावा म्हणतात. अंनिस चे नरेंद्र दाभोलकर देखील या आरोपातून सुटले नाहित. त्यांच्या तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाच्या मनोगतात पान ७ वर वाचा. http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5421983945435441997...
दलित हत्याकांड वा तत्सम प्रकरणात तुम्ही वा पुरोगाम्यांनी निषेध जरी व्यक्त केलात तरी तो तोंडदेखला आहे ही भावना संतापाने चिडून उठलेल्यांच्या मनात असणारच आहे. त्याला इलाज नाही. उद्या तुमच्यावर जर ही वेळ आली तर तुमचेही संतुलन बिघडणारच आहे. तिथे विवेक काम करणार नाही. पण या त्राग्याचे म्हणा विद्रोहाचे म्हणा रुपांतर द्वेषात होणार नाही याची काळजी समंजस लोकांनी घेतली पाहिजे. प्रसंगी फटकारल पाहिजे. जात धर्म हे वास्तव नाकारता येत नाही हे जरी खरे असले तरी ती सांस्कृतिक विविधता आहे या दृष्टीने पाहिले तर सामाजिक ऐक्यासाठी ते सकारात्मकच होईल. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असा सुसंस्कृत ,सुजाण व संवेदनशील नागरिक असा म्हणजे झालं.
साधना ८ मे १९९९ च्या अंकातील पुरोगामी चळवळींची धर्मविषयक भूमिका या लेखात सदानंद मोरे म्हणतात,".. ब्राह्मणांचा विचार केला तर असे दिसते की त्यांच्यातील मोठी संख्या समाजकारण राजकारणापासून अलिप्त व उदास आहे. राहिलेल्या अल्पसंख्येतील एक भाग प्रतिगामी कट्टरवादी तर दुसरा पुरोगामी.बरेच ब्राह्मण पुरोगामी आपल्या पुर्वजांनी केलेल्या उद्योगांचे ओझे विनाकारण आपल्या खांद्यावर क्रुसासारखे वाहात असतात. तो त्यांचा अपराधगंडच म्हणा ना! त्यामुळे अब्राह्मण विचारवंत,लेखक,कलावंत यांच्या प्रत्येक कृतीला त्यांचा पाठींबा असतो.अब्राह्मणांविषयी व विशेषकरुन दलितांविषयी आपण काही बोललो, त्यांचे काही चुकते आहे असे प्रतिपादन केले तर आपल्या पुरोगामीत्वाविषयी संशय घेण्यात येईल अशी भीती त्यांना वाटत असावी. आपल्यातले ब्राह्मण्य पार निपटून गेले आहे असे दाखवण्याची त्यांची धडपड चालू असते. त्यामुळे ब्राह्मणांवर एखादा खोटा आरोप केला गेला व तो खोटा असल्याची या पुरोगाम्यांची खात्री असली तरी तसे स्पष्ट सांगायला ते कचरतात. वस्तुत: आमचे पुरोगामित्व प्रमाणित करणारे तुम्ही कोण किंवा संशयास्पद ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असे विचारुन त्यांनी अब्राह्मणांच्या चुकीच्या गोष्टींना चूकच म्हणण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. राजारामशास्त्री भागवत हा या बाबतचा त्यांचा आदर्श असायला हवा. भागवतांची सहानुभूती सत्यशोधकांना होती, सहाय्य ही होते. शाहू छत्रपतींना आपली धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने होत नसून शुद्रोचित पुराणोक्त पद्धतीने होत आहेत ही जाणीव भागवतांनीच करुन दिली व त्यातूनच पुढील महाभारत घडले.परंतु आवश्यकता भासेल तिथे भागवत सत्यशोधकांचेही कान उपटायला मागेपुढे पहात नसत.
दुसर्या बाजूचे प्रतिगामी ब्राह्मण मात्र असल्या कुठल्याही दडपणापासून मुक्त असतात.त्यांच्या संघटनेतील अब्राह्मण त्यांना मनापासून मानतात. त्यांच्याविषयी शंका घेत नाहीत. त्यांना कोणतेही दिव्य करायला लागत नाही. पुरोगामी ब्राह्मणाच्या एखाद्या क्षुल्लक उक्तीवरुन किंवा कृतीवरुन त्याची विश्वासार्हता धोक्यात येउ शकते. आतापर्यंतच्या सर्व तपश्चर्येवर पाणी पडू शकते. पुरोगामी चळवळीतील अब्राह्मणाचे पुरोगामीत्व जणु स्वयंसिद्ध,स्वयंप्रकाशित व स्वत:प्रमाण.उलट पुरोगामी चळवळीतील ब्राह्मणाचे पुरोगामीत्व त्याला वारंवार सिद्ध करावे लागते. उजळून घ्यावे लागते. त्याचे प्रामाण्य परत:प्रामाण्य होय. १९४८ च्या गांधीहत्येच्या प्रसंगी ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ वगैरे झाली. त्यावेळी असे विचित्र चित्र दिसले की कट्टर ब्राह्मणेतर शंकरराव मोरे या कृत्यांचा निषेध करतात तर नानासाहेब गोरे समर्थन करतात! अब्राह्मण्याचे पुरोगामीत्व जणु कवच कुंडलासारखे जन्मसिद्ध,कर्णाप्रमाणे; ब्राह्मण्याला मात्र आपल्या पुरोगामीत्वाची श्रावणी करावी लागणार!! आंतरजातीय विवाह करुन घरात आलेली सून सासरचे कुलाचार जपण्याचा प्रयत्न अधिक कसोशीने करते. इतरांनी त्याविषयी थोडी बेफिकिरी दाखवली तरी त्यांच्याविषयी कोणी शंका घेणार नसते. ब्राह्मण पुरोगाम्यांच्या मर्मस्थानाचा गैरफायदा अब्राह्मण पुरोगामी घेत नाहीत हे निदान मी तरी म्हणू शकणार नाही. अब्राह्मण पुरोगाम्याची बायको जत्रेत गेली तर तो लोकधर्म व ब्राह्मण पुरोगाम्याची बायको हळदीकुंकवाला गेली कि ती पुरुषसत्ताक व्यवस्थेला शरण गेली म्हणायला सगळे तयारच."
जातीय विश्लेषणा बद्दल थोडसं
Submitted by प्रकाश घाटपांडे on 19 January, 2015 - 00:50
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो माझी बायको चांगली खमकी
हो माझी बायको चांगली खमकी आहे. आणि तुम्हीच सांगा ...काय असा शारीरिक बदल झाला आहे पूर्वीच्या व आताच्या बायकांमध्ये ? ज्यामुळे त्या पूर्वीपेक्षा कमजोर होतील ? उलट अत्याधुनिक औषधोपचार व मेडिकल सोयीसुविधा यांच्या आधारे बालकांचा व बाळंतिंनी चा मृत्युदर कमी व्हावयास हवा खरे तर !
सर्वप्रथम तुमचे अभिनंदन. आता
सर्वप्रथम तुमचे अभिनंदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता धागा काढुन विचारा
उडन खटोलाजी पण बायका खमक्या
उडन खटोलाजी पण बायका खमक्या असल्या तरी आर्थिक विचार करता आजकाल कुणाला परवडेल?
भारत में जन्म देते समय प्रति
भारत में जन्म देते समय प्रति 100,000 महिलाओं में से 301 महिलाएं मौंत के मुंह में चली जाती हैं। विकसित देशों मे बच्चे के जन्म के दौरान मरने वाली महिलाओं की संख्या 20 से कम है।
http://www.jsk.gov.in/hindi/maternal_mortality_ratio.asp
उडन खटोला, कुठल्याही सरकारने
उडन खटोला, कुठल्याही सरकारने ( कॉन्गी असो भाजपा) मतान्साठी पाचकळपणा करण्या ऐवजी बान्गलादेशी आणी पाकी घुसखोर याना वेचुन त्यान्ची घरवापसी केली ना, तर बक्कळ फरक पडेल. त्याकरता हिन्दु आणी त्यान्च्या बायकाना १० मुले जन्माला घालायची गरज पडणार नाही.
पण हे होणार नाही. पण माझ्या पहाण्यात तरी असेच आहे की महाराष्ट्रीयन मुस्लिम ( हो मराठीच, कारण आपली प्रान्तरचनाच झालीये ना तशी) सुशिक्षीत आहे. माझ्या बाबान्चे जेवढे मुस्लिम मित्र आहेत आणी माझ्या पहाण्यातले जेवढे ओळखी-पाळखीचे मुस्लिम कुटुम्ब आहेत, त्याना २ च मुले आहेत. अपवादाने एखाद्याला ३ मुले आहेत.
या साक्षी- बाबा-बाई यान्च्यासारखी तुमची मते बनवु नका. जग कुठे चाललय, आपण कुठे जातोय? या रिकामटेकड्याना काय उद्योग नाहीत. ते काहीही बोलतात. दुसर्याना सान्गण्यापेक्षा मग हेच का त्या क्रिकेट टिमला पैदा करत नाहीत? वर्ल्ड कप साठी पर्यायी टीम ठेवा म्हणावे २०२३ सालासाठी.
जय मोदी सरकार. तुमच्या विपुत
जय मोदी सरकार.
तुमच्या विपुत बघितल्यावर कळल.
धन्यवाद. आपला दिवस शुभ जाओ
राजकारणी लोकांना पैसा खायला
राजकारणी लोकांना पैसा खायला मिळावा म्हणून हे सगळे चालू असते. फोडा आणि लुटा . भाजप पण काही फार वेगळा आहे असे वाटत नाही.
http://www.loksatta.com/kg-to-college-news/govt-get-1023-cr-to-engineeri...
अभियांत्रिकी महाविद्यालयांवर शासनाची १०२३ कोटींची खैरात!
या महाविद्यालयांमधून शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्काच्या प्रतिपूर्तीपोटी समाजकल्याण विभागाला तब्बल १०२३ कोटी रुपयांचा 'चुना' लावणाऱ्यांना हिसका दाखवून भाजप सरकार अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात खऱ्या अर्थाने 'अच्छे दिन' आणणार का, असा सवाल करण्यात येत आहे.
ऑ! कोणाच्या विपुबद्दल बोलताय?
ऑ! कोणाच्या विपुबद्दल बोलताय? माझ्या? माझ्या विपुत समाजवादी पक्ष सोडुन सर्व पक्षीयाना निमन्त्रण आहे. मला मुलायम सिन्गसारख्या विचारसरणीचे लोक पटत नाहीत.
रश्मी..उडन खटोला ची विपु.
रश्मी..उडन खटोला ची विपु.
धन्यवाद सुरेख. मला वाटले
धन्यवाद सुरेख. मला वाटले माझ्या मेसेजपाठोपाठ दिवाकर यान्चा मेसेज आल्याने माझा गोन्धळ झाला.
लोकहो, श्री इब्लिस यांची दोन
लोकहो,
श्री इब्लिस यांची दोन रोचक विधानं सापडली.
१.
>> बातमी लिहिताना अशी लिहायची, की जणू कायतरी भयंकर मोठा लोचा होतो आहे.
लोचा होतो आहेच. २३ % मुस्लिमांना ३०% भूमी वेगळी करून देऊन पाकिस्तान बनवण्यात आला. देश पैदा केला खरा पण चालवायची अक्कल नाही. परत तशीच मागणी कशावरून करण्यात येणार नाही? काश्मिरात हिंदूंची ससेहोलपट आम्ही पाहतोय. आमचे डोळे फुटले नाहीत आजून. मुस्लिमांची संख्या वाढणे हिंदूंना घातक आहेच.
२.
>> मग आहेतच हिंदू बायकांनी १०-१० पोरे जन्माला घालावीत वगैरे.
श्री इब्लिस यांचा काय संबंध या विषयाशी? त्यांना जन्माला घालायला सांगितलीयेत का? नाहीना? मग गप्प बसायला काय जातं? हिंदूंनी सुसंस्कारित पोरं जन्माला घातली तर देशाचं भलंच होणार आहे. ज्यांना स्वत:ला दहाबारा पोरे होणं मान्य आहे त्या बायका बालसंगोपनाचे कष्ट सोसतील. श्री इब्लिस यांच्याकडे भीक तर मागत नाहीयेत ना, आमची पोरं पोसा म्हणून?
सुसंस्कारितांची संख्या पाकिस्तान्यांच्या तुलनेत वाढलीच पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
पैलवान, मठ्ठपणा करण्यासाठी
पैलवान,
मठ्ठपणा करण्यासाठी पैलवान हा आयडी सुयोग्य आहे.
"सुसंस्कार" हे जन्मानंतर करतात. ते कुणावरही करता येतात. त्यासाठी जास्त पोरे पैदा करायची गरज नसते. तुमच्या शेजारच्या घरातल्या मुसलमानावरही ते करता येऊ शकतात. अमक्यांना देश चालवता येतो की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? तुम्हीच एक जन्मसिद्ध श्रेष्ठ, ही फॅसिस्ट वृत्ती तुमच्या संस्कारांचाच भाग आहे.
अन बायकांना 'प्रॉपर्टी' समजून त्यांनी काय करायचे हे डिक्टेट करणे हेच तुम्हा हिंदुत्ववाद्यांचे भिकारडे वर्तन मला आवडत नाही.
शूद्र अन स्त्रिया यांच्या स्तरात फारसा फरक नकोच अन ही पूर्वीची उतंड योग्य, हेच तर तुमचे मूळ 'सुसंस्कार' आहेत. या विचारांचे गरळ तुम्ही प्रगत देशात राहून तिथले जगणे पाहूनही ओकता, हे दिसल्यावर जे शब्द तोंडात येतात, ते इथे लिहायचे मोठ्या प्रयासाने आवरतो. कारण त्या शब्दांनी तुमच्या धुतल्या मेंदूत फरक पडणार नाहिये. "धर्म" पढवून आत्महत्या करून लोकांचे जीव घ्यायला तयार केलेला जिहादी, अन तुमच्यात काहीच फरक मलातरी दिसत नाही.
शिवाय, कसली घंट्याची ससेहोलपट सुरू आहे हिंदूंची???
ज्यांना स्वत:ला दहाबारा पोरे
ज्यांना स्वत:ला दहाबारा पोरे होणं मान्य आहे त्या बायका बालसंगोपनाचे कष्ट सोसतील.
...
धन्य !
आसाराम बापुला समर्थन
आसाराम बापुला समर्थन करणार्यांच्या पोस्ट गंभिर पणे घेऊ नयेत.
लोकहो, श्री इब्लिस यांची
लोकहो,
श्री इब्लिस यांची येथली काही विधाने मननीय आहेत.
१.
>> मठ्ठपणा करण्यासाठी पैलवान हा आयडी सुयोग्य आहे.
पैलवान हा आयडी नसतांनाही मठ्ठपणा करता येतो. कसा ते खालच्या मुद्यात पाहूया.
२.
>> अन बायकांना 'प्रॉपर्टी' समजून त्यांनी काय करायचे हे डिक्टेट करणे हेच तुम्हा हिंदुत्ववाद्यांचे भिकारडे वर्तन
>> मला आवडत नाही.
याला म्हणतात मठ्ठपणा. हिंदूंचे आदर्श शिवाजीमहाराज बायकांना कसे वागवीत होते बरे?
बायकांना 'प्रॉपर्टी' समजून त्यांनी काय करायचे हे डिक्टेट करणे एका विशिष्ट पंथात राजरोसपणे चालते. श्री इब्लिस यांना एव्हढाच कळवळा आला असेल तर विशिष्ट पंथीयांना शहाणपणा शिकवावा. त्यांच्या वर्तनाचा उगम इथे आहे :
३.
>> "सुसंस्कार" हे जन्मानंतर करतात. ते कुणावरही करता येतात. त्यासाठी जास्त पोरे पैदा करायची गरज नसते.
हा दुसरा मठ्ठपणा! पाकिस्तान भारतापासून तोडण्यात आला तो संख्याबळाच्या आधारे. म्हणून प्रश्न हिंदूंच्या संख्येचा असतांना हे विद्वान विषयांतर करून सुसंस्कार कसे करायचे यावर प्रवचन देताहेत.
४.
>> तुमच्या शेजारच्या घरातल्या मुसलमानावरही ते करता येऊ शकतात.
बरोबर आहे. घरच्या शेजारच्या तसेच पाकिस्तानातल्या मुस्लिमांवर भारतप्रेमाचे सुसंस्कार करणे आवश्यक आहे.
५.
>> अमक्यांना देश चालवता येतो की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण?
हा तिसरा मठ्ठपणा. पाकिस्तानात जे काही चाललंय त्याला देश चालवणे म्हणतात?
६.
>> तुम्हीच एक जन्मसिद्ध श्रेष्ठ, ही फॅसिस्ट वृत्ती तुमच्या संस्कारांचाच भाग आहे.
आम्ही आमचं श्रेष्टत्व आमच्या कर्माने सिद्ध करून दाखवू. त्याची चिंता इतरांनी बाळगायची गरज नाही.
७.
>> शूद्र अन स्त्रिया यांच्या स्तरात फारसा फरक नकोच अन ही पूर्वीची उतंड योग्य, हेच तर तुमचे मूळ 'सुसंस्कार'
>> आहेत.
कोण म्हणतो असं?
८.
>> या विचारांचे गरळ तुम्ही प्रगत देशात राहून तिथले जगणे पाहूनही ओकता, हे दिसल्यावर जे शब्द तोंडात येतात,
>> ते इथे लिहायचे मोठ्या प्रयासाने आवरतो. कारण त्या शब्दांनी तुमच्या धुतल्या मेंदूत फरक पडणार नाहिये.
प्रयत्न करून पहा की. कोणी अडवलंय?
९.
>> "धर्म" पढवून आत्महत्या करून लोकांचे जीव घ्यायला तयार केलेला जिहादी, अन तुमच्यात काहीच फरक
>> मलातरी दिसत नाही.
हे मात्र बरोबर. ज्यांना पाकिस्तानातलं अराजक दिसत नाही ते लोकं असली विधानं करणारच. यांत काही नवल नाही.
१०.
>> शिवाय, कसली घंट्याची ससेहोलपट सुरू आहे हिंदूंची???
लोकहो, या इसमाला हिंदूंबद्दल जराही सहानुभूती नाही. काश्मिरात हिंदूंचं जे काही झालं ते जगात कुणाच्याही वाट्याला येऊ नये. स्वत:च्या देशात निर्वासित म्हणून राहायची वेळ जगात कोणावर तरी आलेली आहे का? नाही ना? मग अशा परिस्थितीत हा इसम 'कसली घंट्याची ससेहोलपट' वगैरे शब्द वापरतो. यावरून या इसमाला हिंदू देशोधडीला लागायला हवे आहेत. भारताचा पाकिस्तान बनवणे हे याचं स्वप्न आहे. याच्यापासून सावधान.
आ.न.,
-गा.पै.
काउ, >> धन्य ! तुमच्यापुढे
काउ,
>> धन्य !
तुमच्यापुढे हात पसरलेत का, की आमची पोरं पोसा म्हणून?
आ.न.,
-गा.पै.
तुम्हाला किती गामा?
कठीण आहे. गामा, हिंदूस्थानात
कठीण आहे.
गामा, हिंदूस्थानात परत या. तुमच्यासारख्यांची गरज आहे हिंदू लोकसंख्या वाढवायला.
ज्यांना स्वत:ला दहाबारा पोरे
ज्यांना स्वत:ला दहाबारा पोरे होणं मान्य आहे त्या बायका बालसंगोपनाचे कष्ट सोसतील.>>>>>> याबाबतीत कोणतीही स्त्री ,खचितच मान्यता देणार नाही.
गामा जी, आपल्या सर्व
गामा जी, आपल्या सर्व विधानांशी १००% सहमत .
दुसरे म्हणजे , माबो वरील सर्व भगिनीवर्ग आणि समस्त हिन्दु महिलावर्ग यांचा संपूर्ण आदर राखून एक प्रश्न विचारावासा वाटतो की,
हिन्दुंची घटती व "शान्तताप्रिय कथित अल्पसंख्य "समाजाची वाढती लोकसंख्या हे राष्ट्रीय हिताच्या द्रॄष्टीनी घातक आहे, याचे कारण त्या समाजाची अशी धारणा आहे की , इतर धर्मीय बहुसंख्य /सत्ताधारी असतील (दार-उल-हरब) अशा देशात राहणे पाप(हराम) असून तो देश लव्करात लवकर आपली लोकसंख्या वाढवून आपल्या कब्जात आणणे व शरियत लागू करणे (दार-उल-इस्लाम) हे पवित्र कर्तव्य असल्याची त्यांची भावना आहे. व त्यासाठीच "जिहाद" पुकारला जातो.
आफ्रिका तर बहुतांश इस्लामय झालीच आहे जगभरात व विशेषतः युरोप आणि भारतात सध्या हे कार्य जोरात सुरू आहे. सर्वच "शान्तताप्रिय कथित अल्पसंख्य "समाज असा असेल असे नव्हे, पण सध्या एम आय एम /आयसिस व तत्सम संघटनाना मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहून तरूण वर्गात जिहाद चे अनेक प्रकार ,(जसे लव्ह जिहाद इ.) फारच लोकप्रिय होत आहेत . यास्तव त्यचा परिणाम म्हणून दुसरा अथवा तिसरा पाकिस्तान बनण्याचा व भारत देशाची शकले पडण्याचा धोका आहे.
हा धोका वेळीच लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना म्हणून हिंदूनी आपली जनसंख्या वाढवणे क्रमप्राप्त आहे, यास्तव राष्ट्रीय कर्तव्य म्हणुन महिलावर्ग अधिक मुले जन्माला घालण्यास साहाय्य व सह्कार्य /सहमती देवु शकेल काय ?
स्पष्टोक्ती आहे, कोणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व !
इतर धर्मीय बहुसंख्य
इतर धर्मीय बहुसंख्य /सत्ताधारी असतील (दार-उल-हरब) अशा देशात राहणे पाप(हराम) असून तो देश लव्करात लवकर आपली लोकसंख्या वाढवून आपल्या कब्जात आणणे व शरियत लागू करणे (दार-उल-इस्लाम)>> यामुळे त्या राष्ट्रातील नैसर्गिक साधनसंपती व उत्पन्नाचे स्रोत(रिसोर्सेस ) यावर किती प्रचंड ताण येत असेल त्याची कल्पना करा ............
>>>मट्ठपणा, भिकारडे वर्तन,
>>>मट्ठपणा, भिकारडे वर्तन, 'हेच तुमचे सुसंस्कार', गरळ, 'जे शब्द तोंडात येतात'. धुतला मेंदू, जिहादी, घंट्याची ससेहोलपट'<<<
अरे अरे!
मायबोलीवरील कोणी एक सदस्य हिंदूत्ववाद्यांना उद्देशून हे एवढे सगळे लिहितात आणि एकटे गामा त्याचा प्रतिवाद करत बसतात? जणू हिंदुत्ववादी असणे हा गुन्हाच! हिंदूंनी फक्त क्षमाशील आणि सश्यासारखे असावे जणू! बाकी धर्म जमेल त्या प्रकारे स्वतःचे वर्चस्व वाढवत राहोत. ह्या सर्व विशेषणांचा, त्यांचा जाहीर उल्लेख ह्या स्थळावर करण्याचा निषेध! स्वतःचा मुद्दा पटवून देण्यासाठी सतत आग लागल्यासारखे आकांडतांडव करण्याची काहीही आवश्यकता नाही. दुसर्याला आपले म्हणणे मांडण्याचे येथे पूर्ण स्वातंत्र्य असावे असा अंदाज आहे. आपल्या खिश्यावर ताण आणून दुसरे सदस्य येथे वैचारीक लुडबुड करत आहेत अश्या भ्रमात कोणी राहू नये.
मुळात हा धागा जातींबद्दल! त्यावर कोणीतरी धर्माचा विषय आणला.
एक असा सदस्यसंच आहे जो निव्वळ स्वतःची मते सर्वांनी मान्य करावीत ह्यासाठी अत्यंत आक्रमकपणे संस्थळावर कार्यरत आहे.
ह्या सदस्यसंचातील आक्रमक सदस्य व त्यांना साळसूदपणे वैचारीक टेकू देणारे इतर सदस्य ह्यांची करावी तेवढी नालस्ती कमी आहे. ते कोणत्या जातीच्या / धर्माच्या बाजूने बोलतात हे येथे इर्रिलेव्हंट असून ते दुसरे काहीही करत नाहीत व स्थळावरील अनेक धागे निव्वळ अश्याच विषयांकडे हिरीरीने वळवताना वर्तनाची निंद्य पातळी गाठतात.
पुन्हा एकदा निषेध! फक्त त्यांचाच नाही, तर अश्या धाग्यांवर वाद चाललेले पाहून जे चूपचाप बसतात त्यांचाही!
-'बेफिकीर'!
हा धोका वेळीच लक्षात घेऊन
हा धोका वेळीच लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना म्हणून हिंदूनी आपली जनसंख्या वाढवणे क्रमप्राप्त आहे, यास्तव राष्ट्रीय कर्तव्य म्हणुन महिलावर्ग अधिक मुले जन्माला घालण्यास साहाय्य व सह्कार्य /सहमती देवु शकेल काय
हा स्वतंत्र् धाग्याचा विषय आहे.
( माझ मत - नाही .
मी भविष्यात माझे धर्मपरिवर्तन करणार आहे. )
पोरं पैदा करणे हा उपाय होऊ
पोरं पैदा करणे हा उपाय होऊ शकत नाही.
कारण त्याचे परिणाम दिसायला वीस वर्षे लागतेल.
त्यापेक्षा गामा , कात्रे अशा परदेशातील श्रीमंत हिंदुनी घरवापसी करावी.
मी व माझी पत्नी मध्यमवर्गीय
मी व माझी पत्नी मध्यमवर्गीय आहे. एकच मूल परवडते.
आम्ही दुसरे मूल काढायला तयार आहोत. त्याचा वीस वर्षाचा खर्च श्रीमंत गामा वा श्रीमंत कात्रे देणार असतील तर त्यानी तसे कळवावे.
जातीय चर्चा शेकायला लागल्याने
जातीय चर्चा शेकायला लागल्याने धागा धार्मिकता आणि कुटूंबकल्याण नियोजनावर यशस्वीरित्या काहींनी वळवला आहे.
संबंधितांनी योग्य नोंद घेऊनच ठेवावी
माझी अजुन एक शंका आहे.
माझी अजुन एक शंका आहे. संख्या वाढवुन हिंदु जिंकु शकतात का ?
हिंदुभूमीप्रतिपालक मोघलकुलावतंस दिल्लीनरेश व अयोध्यापती साक्षात नूर ए इलाही माननीय वंदनीय आदरणीय बाबर महाराज इथे अवतरीत झाले तेंव्हा त्यांच्याकडे फक्त पन्नास की साठ हजार लोक होते व हिंदुंची संख्या त्यांच्या कैक पट होती.
आता धागा भरकटलेला आहेच तेव्हा
आता धागा भरकटलेला आहेच तेव्हा काउ तुमच्या शंके वर अजुन एक शंका
बाबराच्या काळात भारत आत्ता आहे तसा एकसंध देश होता?
आत्ता आहे तसा>>>?????
आत्ता आहे तसा>>>?????
इंडीया!!!
इंडीया!!!
Pages