मला चळवळींमधे तसेच आंतरजालावर काही ठिकाणी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जातीअंताच्या लढ्या ऐवजी जातीय अस्मितेचच राजकारण होताना दिसते आहे.अनेक बुद्धीदांडगे विद्वान जातीय दरी कमी करण्याऐवजी विश्लेषणाच्या बहाण्यातून जातीय त्वेष व द्वेष फुलत राहतील याचीच व्यवस्था करतात. तरुणांची माथी सतत भडकत राहतील याची व्यवस्था करतात.विवेकी व विचारी अशी भूमिका कुणी घेतली वा घेण्याचा प्रयत्न केला कि त्याला 'भटाळला' विचारांचे बामनी करण झाले अशी दूषणे द्यायला सुरवात करतात. असो. विवेक व विद्रोह हे एका ठिकाणी नांदत नाही .पण विवेक विद्रोह समजून घेण्यास मदत करतो. हे आपल माझ मत.
आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे ही शब्दरचना तर मी कित्येक वर्षे ऐकतो आहे. यात ब्राह्मण्य म्हणजे काय तर अज्ञानाचा फायदा घेउन केलेले शोषण, समाजात जेजे काही विषमता पसरवणारे आहे ते म्हणजे ब्राह्मण्य. अन्यायाचे जे समर्थन करते ते ब्राह्मण्य.जे जे सकल कुटील ते ब्राह्मण्य. असा तो ब्राह्मण्याचा अर्थ अभिप्रेत आहे. सहवेदनेचा विचार तुम्ही मांडलात की त्याला ब्राह्मणी कावा म्हणतात. अंनिस चे नरेंद्र दाभोलकर देखील या आरोपातून सुटले नाहित. त्यांच्या तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाच्या मनोगतात पान ७ वर वाचा. http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5421983945435441997...
दलित हत्याकांड वा तत्सम प्रकरणात तुम्ही वा पुरोगाम्यांनी निषेध जरी व्यक्त केलात तरी तो तोंडदेखला आहे ही भावना संतापाने चिडून उठलेल्यांच्या मनात असणारच आहे. त्याला इलाज नाही. उद्या तुमच्यावर जर ही वेळ आली तर तुमचेही संतुलन बिघडणारच आहे. तिथे विवेक काम करणार नाही. पण या त्राग्याचे म्हणा विद्रोहाचे म्हणा रुपांतर द्वेषात होणार नाही याची काळजी समंजस लोकांनी घेतली पाहिजे. प्रसंगी फटकारल पाहिजे. जात धर्म हे वास्तव नाकारता येत नाही हे जरी खरे असले तरी ती सांस्कृतिक विविधता आहे या दृष्टीने पाहिले तर सामाजिक ऐक्यासाठी ते सकारात्मकच होईल. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असा सुसंस्कृत ,सुजाण व संवेदनशील नागरिक असा म्हणजे झालं.
साधना ८ मे १९९९ च्या अंकातील पुरोगामी चळवळींची धर्मविषयक भूमिका या लेखात सदानंद मोरे म्हणतात,".. ब्राह्मणांचा विचार केला तर असे दिसते की त्यांच्यातील मोठी संख्या समाजकारण राजकारणापासून अलिप्त व उदास आहे. राहिलेल्या अल्पसंख्येतील एक भाग प्रतिगामी कट्टरवादी तर दुसरा पुरोगामी.बरेच ब्राह्मण पुरोगामी आपल्या पुर्वजांनी केलेल्या उद्योगांचे ओझे विनाकारण आपल्या खांद्यावर क्रुसासारखे वाहात असतात. तो त्यांचा अपराधगंडच म्हणा ना! त्यामुळे अब्राह्मण विचारवंत,लेखक,कलावंत यांच्या प्रत्येक कृतीला त्यांचा पाठींबा असतो.अब्राह्मणांविषयी व विशेषकरुन दलितांविषयी आपण काही बोललो, त्यांचे काही चुकते आहे असे प्रतिपादन केले तर आपल्या पुरोगामीत्वाविषयी संशय घेण्यात येईल अशी भीती त्यांना वाटत असावी. आपल्यातले ब्राह्मण्य पार निपटून गेले आहे असे दाखवण्याची त्यांची धडपड चालू असते. त्यामुळे ब्राह्मणांवर एखादा खोटा आरोप केला गेला व तो खोटा असल्याची या पुरोगाम्यांची खात्री असली तरी तसे स्पष्ट सांगायला ते कचरतात. वस्तुत: आमचे पुरोगामित्व प्रमाणित करणारे तुम्ही कोण किंवा संशयास्पद ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असे विचारुन त्यांनी अब्राह्मणांच्या चुकीच्या गोष्टींना चूकच म्हणण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. राजारामशास्त्री भागवत हा या बाबतचा त्यांचा आदर्श असायला हवा. भागवतांची सहानुभूती सत्यशोधकांना होती, सहाय्य ही होते. शाहू छत्रपतींना आपली धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने होत नसून शुद्रोचित पुराणोक्त पद्धतीने होत आहेत ही जाणीव भागवतांनीच करुन दिली व त्यातूनच पुढील महाभारत घडले.परंतु आवश्यकता भासेल तिथे भागवत सत्यशोधकांचेही कान उपटायला मागेपुढे पहात नसत.
दुसर्या बाजूचे प्रतिगामी ब्राह्मण मात्र असल्या कुठल्याही दडपणापासून मुक्त असतात.त्यांच्या संघटनेतील अब्राह्मण त्यांना मनापासून मानतात. त्यांच्याविषयी शंका घेत नाहीत. त्यांना कोणतेही दिव्य करायला लागत नाही. पुरोगामी ब्राह्मणाच्या एखाद्या क्षुल्लक उक्तीवरुन किंवा कृतीवरुन त्याची विश्वासार्हता धोक्यात येउ शकते. आतापर्यंतच्या सर्व तपश्चर्येवर पाणी पडू शकते. पुरोगामी चळवळीतील अब्राह्मणाचे पुरोगामीत्व जणु स्वयंसिद्ध,स्वयंप्रकाशित व स्वत:प्रमाण.उलट पुरोगामी चळवळीतील ब्राह्मणाचे पुरोगामीत्व त्याला वारंवार सिद्ध करावे लागते. उजळून घ्यावे लागते. त्याचे प्रामाण्य परत:प्रामाण्य होय. १९४८ च्या गांधीहत्येच्या प्रसंगी ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ वगैरे झाली. त्यावेळी असे विचित्र चित्र दिसले की कट्टर ब्राह्मणेतर शंकरराव मोरे या कृत्यांचा निषेध करतात तर नानासाहेब गोरे समर्थन करतात! अब्राह्मण्याचे पुरोगामीत्व जणु कवच कुंडलासारखे जन्मसिद्ध,कर्णाप्रमाणे; ब्राह्मण्याला मात्र आपल्या पुरोगामीत्वाची श्रावणी करावी लागणार!! आंतरजातीय विवाह करुन घरात आलेली सून सासरचे कुलाचार जपण्याचा प्रयत्न अधिक कसोशीने करते. इतरांनी त्याविषयी थोडी बेफिकिरी दाखवली तरी त्यांच्याविषयी कोणी शंका घेणार नसते. ब्राह्मण पुरोगाम्यांच्या मर्मस्थानाचा गैरफायदा अब्राह्मण पुरोगामी घेत नाहीत हे निदान मी तरी म्हणू शकणार नाही. अब्राह्मण पुरोगाम्याची बायको जत्रेत गेली तर तो लोकधर्म व ब्राह्मण पुरोगाम्याची बायको हळदीकुंकवाला गेली कि ती पुरुषसत्ताक व्यवस्थेला शरण गेली म्हणायला सगळे तयारच."
जातीय विश्लेषणा बद्दल थोडसं
Submitted by प्रकाश घाटपांडे on 19 January, 2015 - 00:50
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> त्यांचे हातात
>> त्यांचे हातात म्हणण्यापेक्षा "मुखात" वेद देणे आजही कितपत संयुक्तिक आहे?
पूर्वग्रह दुषित विधान. आपल्याकडून अश्या विधानाची अपेक्षा नव्हती.
आपण ज्या संतांबद्दल बोलत आहात त्यांपैकी कुणी बहुजन नाहीतच का?
काय जात-पात करताय राव … जात
काय जात-पात करताय राव …
जात नावाची चीज फक्त शासकीय सुविधा घेण्याच्याच लायकीची आहे….
उगाच मी बामनाचा आणि तू मुसलमानाचा करण्यात काय अर्थ आहे????
जातीची व्याख्या माझ्यालेखी तरी "जात हि माणसाने माणसाच्या विभाजनासाठी तयार केलेली निरर्थक आणि गैरवाजवी व्यवस्था होय " अशीच आहे…
>>>> पण असे आहे, जेंव्हा
>>>> पण असे आहे, जेंव्हा धर्माचे वर्चस्व होते तेंव्हा ब्राह्मणांनी स्वतःच्या फायद्यासाठी असे केले नि हजारो वर्षे इतरांनी ते मुकाट्याने सहन केले, त्यात काही अन्याय आहे असे वाटेनासेच झाले. तसाच आपला धर्म आहे अशी चुकीची समजूत समाजात पसरली. <<<<
हे देखील अमान्य झक्कीसाहेब.
साडेतीन टक्क्याहून कमी संख्येचे ब्राह्मण स्वतःच्या फायद्याकरता स्त्रीयांना घुंगट/माजघरात डांबत होते हे गुहितकच अमान्य.
हिंदू धर्मातील स्त्रीयांवरील यच्चयावत व अन्य बरीच बंधने ही वायव्येकडूनच्या सततच्या परकीय आक्रमणांमुळे लादली गेली आहेत. वायव्य जवळ असलेल्या प्रांतात ती तीव्रतेने दिसतात व जसजसे दक्षीणेकडे जावे तस तसे त्यांची "तीव्रता" कमी दिसते. ही आक्रमणे कुणाची हे सु:स्पष्ट बोलण्याची कुणाची छाती नाही... माझीही नाही. सर्वधर्मसमभावाच्या दहशतीचा तो परिणाम आहे. व त्या आक्रमकांविरुद्ध बोलण्या ऐवजी साडेतिन टक्क्यांन्ना झोडपणे/ त्यांचे हिंदुस्थानातून निर्दाळण करण्याची भाषा उच्चारणे व तसे प्लॅन करणे सर्वात सोप्पे असल्याने तसे घडते आहे. यात नवल काहीही नाही.
आज पाकिस्तानही भारताला "हिंदुस्थान" म्हणूनच संबोधतो, व ज्याक्षणी येथिल ब्राह्मण नष्ट होतील/केले जातील त्याक्षणी पाकिस्तानही भारताला हिंदुस्थान म्हणण्याचे सोडून निव्वळ "काफिरराष्ट्र" म्हणू लागेल हे नक्की. (आता असे होईल, की त्या आधीच पाकिस्तानच......... जौदे )
>>>> आपण ज्या संतांबद्दल बोलत
>>>> आपण ज्या संतांबद्दल बोलत आहात त्यांपैकी कुणी बहुजन नाहीतच का? <<<
सोईस्कररित्या चूकीचा अर्थ काढून शब्दच्छल करीत बुद्धिभेद करुन आग लावू नका.
मी संत कोणत्या जातीचे होते वा नव्हते याबद्दल एक अक्षरही काढले नाहीये. संत महान होते, व सर्व जातीधर्मातील होते, व ते इतके महान होते/आहेत की आता त्यांची जात विचारात घेतली जात नाही जसे की नदीचे मूळ व ऋषीचे कूळ शोधत नाहीत.
परत वाचा, गेल्या उण्यापुर्या ३०० वर्षांतील संतांनी रचलेल्या आरतीदेखिल ज्या समाजाला जशाच्यातशा मुखोद्गत ठेवता येत नाहीत त्यांचे हाती/मुखी हजारो वर्षांची परंपरा असलेले वेद दिले असते तर काय झाले असते असे विचारतोय. मी तर उलट असे म्हणेन की तत्कालिक ब्राह्मण आपल्या वेद जसेच्या तसे "राखण्याच्या" कर्तव्याला जराही चूकले नव्हते, जे कर्तव्य समाजानेच त्यांचेवर सोपवले होते.
विजयी आर्यांनी धर्मग्रंथ
विजयी आर्यांनी धर्मग्रंथ केले!! शुद्रा नागविले !!दासापारी !!१!!
धुर्त भाटे मुळीं वेद लपविले !! पाहू नाही दिले !! अंत्यजास !!२!!
शुद्रादिक म्ह्णे माझा वेद धर्म !! अज्ञानास वर्म !! ठावें नाही !!३!!
वेदांतील वर्म मैदानीं आणावें !! जगा दाखवावें !! ज्योती म्ह्णे !!४!!
राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले.
गेल्या उण्यापुर्या ३००
गेल्या उण्यापुर्या ३०० वर्षांतील संतांनी रचलेल्या आरतीदेखिल ज्या समाजाला जशाच्यातशा मुखोद्गत ठेवता येत नाहीत त्यांचे हाती/मुखी हजारो वर्षांची परंपरा असलेले वेद दिले असते तर काय झाले असते असे विचारतोय. मी तर उलट असे म्हणेन की तत्कालिक ब्राह्मण आपल्या वेद जसेच्या तसे "राखण्याच्या" कर्तव्याला जराही चूकले नव्हते, >>>
वाचले, आणि हेही समजले की आपण ब्राह्मण्/ब्राम्हण आणि बहुजन यांच्या बौद्धिक क्षमतेत फरक करत आहात, आणि त्या आधारे बहुजनांना वेदांपासून दूर ठेवण्याचे समर्थन करत आहात.
आता विसंगती अशी की आपण ज्या संतांचा उल्लेख करताय त्यात बहुजनही आहेत, मग त्यांची बौद्धिक क्षमता कमी आहे असे होते का? आपले तसे म्हणणे नसावे, म्हणूनच मी विसंगती हा शब्द वापरला.
त्यानंतर चे तुमचे म्हणणे 'संत इतके महान होते की आता त्यांची जात लक्षात घेत नाहीत'.... म्हणजे बहुजनांनी जातीपलिकडे विचार व्हावा म्हणून संत (अथवा तत्सम) व्हावे की काय?
सारांश काढायचा तर 'ब्राम्हण जन्मतःच हुशार, पण बहुजनाने सिद्ध करून दाखवावे' असा निघतो.
आणि मजेशीर गोष्ट अशी की बुद्धिभेदा चा आरोप माझ्यावर होतो.
ता. क. मला आपल्या मतांबद्दल बरेचदा, आणि व्यक्तिशः आपल्याबद्दल नेहमीच आदर राहिला आहे. त्यामुळे ही पोस्ट आपल्या या पर्टिक्युलर मताबद्दल आहे हे कृपया लक्षात घ्या. गैरसमज नसावा.
हिंदू धर्मातील स्त्रीयांवरील
हिंदू धर्मातील स्त्रीयांवरील यच्चयावत व अन्य बरीच बंधने ही वायव्येकडूनच्या सततच्या परकीय आक्रमणांमुळे लादली गेली आहेत.
......
महाभारतात माद्री सती गेली , रामायणात इंद्रजिताची बायको सती गेली ... सगळे यवनांच्याच भीतीने का ?
मुलीला वारस न मानणं , तिला इस्टेटीत अदिकार न देणं , सती व केशवपन .... हिंदुंच्या या प्रथा हजारो वर्शापुर्वीपासुन आहेत. तेंव्हा लिंब्याचा लाडका शत्रूधर्म जन्मालाही आला नव्हता.
आणि ते वायव्याच्या दिशेनं बोंब मारणं बंद करा. वायवेकडुन जे मोघल भारतात आले त्यांच्या स्त्रीयांचा इतिहास जरा तपासुन पहा. शिक्षण , वारसा , संपत्ती, लग्न करणं / न करणं , पुनर्विवाह याबाबत त्यांचे अधिकार तपासुन पाहिलेत तर कदाचित हिंदु असल्याची लाज वाटण्याची शक्यता निर्माण होईल .
@ सुरेख जाती व्यवस्था
@ सुरेख
जाती व्यवस्था कोणत्याही प्रकारे समर्थनिय नसली तरी तुमच्या लॉजिक प्रमाणे बर्याच देशांना ब्रिटनवर राज़्य करण्याचा अघिकार मिळाला पाहिजे.
(No subject)
>>>>> वाचले, आणि हेही समजले
>>>>> वाचले, आणि हेही समजले की आपण ब्राह्मण्/ब्राम्हण आणि बहुजन यांच्या बौद्धिक क्षमतेत फरक करत आहात, आणि त्या आधारे बहुजनांना वेदांपासून दूर ठेवण्याचे समर्थन करत आहात. <<<<
पुन्हा शब्दच्छल व सोईस्कर अर्थ! वेद मुखोद्गत करून जसेच्या तसे म्हणता आले/व तसे टीकवले म्हणजे मी "ब्राह्मणांची बौद्धिक" क्षमता त्यावरून मोजतोय असा अर्थ तुम्हास का दिसतो आहे? इथे बौद्धिकतेचे नाही, तर हाती घेतलेले कर्म हजारो वर्षे पिढ्यान पिढ्या दर पिढीगणिक सुनिश्चितपणे चिकाटीने सातत्याने करीत रहाण्याच्या "निष्ठेचे" गुणगान गायला हवे. बौद्धिकतेचे नव्हे. अन अशी निष्ठा उण्यापुर्या ३०० वर्षातील संतांच्या मराठी आरतीच्या शब्दांवरही ठेवली जात नाही हे सत्य असल्याने मी वेगळे काही म्हणायची गरजच नाही, जे म्हणताय ते तुम्हीच म्हणताय.
(अन अजुन एक म्हणजे, जर एखादा ब्राह्मणच चूकीच्या आरती म्हणत असेल, तर त्यास तत्काळ सुयोग्य म्हणण्याचि तंबी दिली जातेच जाते, तरीही तो तसेच करीत राहीला तर त्यास ब्राह्मण जमातीत तरी कमसर ठरविले जातेच जाते. )
>>>>>> आता विसंगती अशी की आपण ज्या संतांचा उल्लेख करताय त्यात बहुजनही आहेत, मग त्यांची बौद्धिक क्षमता कमी आहे असे होते का? आपले तसे म्हणणे नसावे, म्हणूनच मी विसंगती हा शब्द वापरला. <<<<<
महाशय, संताची बौद्धिक क्षमतेवर भाष्य करण्यास मी असमर्थ आहे.
त्याचप्रमाणे महान संतांनी रचलेल्या आरतीतले साधे साधे मराठी शब्द/वाक्येही निष्ठेने/चिकाटीने/सातत्याने जसेच्यातसे म्हणण्याची गरज ज्या कोणत्या लोकांस वाटत नाही, त्यांना मी वेगळे काय म्हणणार?
मी "संतांनी रचलेल्या आरती" असा उल्लेख केल्यावर तेवढेच सूत पकडून आपण लगेच संतांमधे बहुजन आहेत तर त्यांच्या क्षमतेचा वगैरे विचार मला करायला का सांगता आहात? यास सोईस्कररित्या अर्थ काढून मूळ मुद्दा भलतीकडे न्यायचा प्रयत्न म्हणावा लागेल, जो घातक पायंडा आहे.
>>>>>> त्यानंतर चे तुमचे म्हणणे 'संत इतके महान होते की आता त्यांची जात लक्षात घेत नाहीत'.... म्हणजे बहुजनांनी जातीपलिकडे विचार व्हावा म्हणून संत (अथवा तत्सम) व्हावे की काय? <<<<<
होय, बहुजनांनीच नव्हे, तर ब्राह्मणांनी देखिल संतजनांसमान वागणूक ठेवावी ! या म्हणण्यात गैर काय आहे?
>>>> सारांश काढायचा तर 'ब्राम्हण जन्मतःच हुशार, पण बहुजनाने सिद्ध करून दाखवावे' असा निघतो. <<<<
हा सारांश तुमच्या पूर्वग्रहदुषित नि:ष्कर्षाचा भाग आहे. मी असे काहीही म्हणालेलो नाही. मी निव्वळ संतांच्या शब्दांन्ना जसेच्या तसे वापरण्यायेवढीही निष्ठा गमावून बसलेल्या हिंदू समाजाचा दृष्टांत दिला आहे.
>>>>> आणि मजेशीर गोष्ट अशी की बुद्धिभेदा चा आरोप माझ्यावर होतो. <<<<
मायबोलीचे वाचक सूज्ञ आहेत !
>>>> ता. क. मला आपल्या मतांबद्दल बरेचदा, आणि व्यक्तिशः आपल्याबद्दल नेहमीच आदर राहिला आहे. त्यामुळे ही पोस्ट आपल्या या पर्टिक्युलर मताबद्दल आहे हे कृपया लक्षात घ्या. गैरसमज नसावा. <<<<
धन्यवाद. गैरसमज नाहीच्चे.
तरी बरे, मला संगीतातील फारसे कळत नाही, नाहीतर संगीतातील/नृत्यादीक कलेची "घराणी" आपापली गायकि/स्वर/हालचाल जशाच्या तशा येण्याकरता, त्यात कानामात्रेचाही फरक होऊ नये म्हणुन, त्यात एकाही भिन्न स्वराची/सूराची/कृतीची भेसळ होऊ नये म्हणुन किती दक्ष असतात अन त्याकरता निव्वळ मानलेल्या शिष्यासच तेवढे "गुरुगृही" राहुनच शिकवुन, बाकी अन्य जनांस ते ते ज्ञान कसे दुर्मिळ करून ठेवले/ठेवतात याच्या कथा ऐकवत नाही !
आजही बारा बलुत्यातील व्यावसायीक त्यांच्या व्यावसायीक कलाकौशल्याच्या क्लुप्त्या कशा दडवून ठेवतात हे वेगळे सांगायला हवे का?
अहो याही पुढे जाऊन आख्खा पेटंट अन कॉपीराईट वगैरेचा कायदा तर बारीकसारीक बाबींनाही विशिष्ट अधिकारात ठेवतो, ते ही राजरोस पणे, "कायदेशीर सरकारी मान्यता" घेऊन.
त्यापुढे इथे वेदांची पडलीये कोणास? आहेत तिकडे नेटवर.... घ्या समजून त्यातली "वर्मे" हव्वी तितकी, बंदी कोणी केलीये?
पण सरळपणे तसेच केले तर "ब्राह्मण्याच्या" नावाखाली "ब्राह्मणांना" झोडपता कसे येईल? नै का?
ब्राह्मण या शब्दावरूनच ब्राह्मण्य हा शब्द तयार झाला हे शेंबडे पोरही सहज सांगू शकेल, असे असतानाही निव्वळ कोणत्यातरी एका कोर्टातील लढाई/शब्दच्छल जिंकल्यामुळे ब्राह्मण्य ब्राह्मण्य करीत ब्राह्मण्याच्या नावाखाली मनसोक्त शिवीगाळ करून प्रत्यक्षात ब्राह्मणांनाच हतोत्साहित/गर्भगळीत करून सोडण्याचे कारस्थान राजरोस करून परत कायद्याच्या कचाट्यातुन सुटण्याचे तंत्र आजचे नवे नाहीये अन त्यात नवलही नाहीये.
लिंब्या , शब्दाचा उच्चार
लिंब्या , शब्दाचा उच्चार चुकला म्हणुन तुमचा देव मला पावणार नसेल तर तुमचा देव व धर्म दोन्ही विसर्जित केलेलेच ठीक .
त्या काळात लोक संस्कृत बोलायचे म्हणुन ते संस्कृत मंत्र होते.
संतांनी मराठीत आळवणी केली तर त्याना देव पावलेच.
मुके बहिरे यांनी उच्चारही न करता देव पावत असतीलच..
त्यामुळे ब्राह्मणांनी वेद संभाळले वगैरे कितीही अभिमानास्पद असले तरी आज तो निरर्थक इतिहास आहे.
जी भाषा आम्ही बोलतो ती आमच्या देवाला समजते. त्यासाठी गद्य , पद्य , व्याकरण , वृत्त यांचा विचार का करायचा ?
मंत्र आरत्या यांच्या मोडतोडीची इतकी चिंता असेल तर स्पेशल शाळा काढ अन त्यात पढतपंडित तयार कर.
मुळात आरतीला लावलेली चाल हीही कुण्या मनुष्यानेच लावली आहे.. दुसर्या मनुष्याने त्यात बदल केला तर लगेच देव कोपतो की काय !
वेद आज शिकता येतात. वर
वेद आज शिकता येतात. वर लिम्बुभाऊनी सान्गीतले आहेच. तसे नसते तर आपले माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम सन्स्कृत शिकु शिकले नसते. बनारस हिन्दु विद्यापीठातुन कित्येक मुस्लिम बन्धु अस्खलीतरित्या सन्स्कृत शिकुन बाहेर पडले आहेत. परवाच सकाळमध्ये वाचले की काही हिन्दु कुटुम्बानी ( उत्तर प्रदेश) आपली मुले मदरशा मध्ये शिकण्यास पाठवली तर मुस्लिम कुटुम्बानी त्यान्ची मुले सन्घ शाखेत पाठवली आहेत. असे होत अस्रेल तर ( केवळ सन्घ नव्हे तर इतरही शिन्दु शिक्षण सन्स्था सामिल असाव्यात) समाजातली मोठी दरी कमी होईल.
उर्दु समजली तर मुस्लिम समाजाविषयीचे गैरसमज ( उर्दुची लिखावट समजून येत नसल्याने कोणाला काय म्हणायचे आहे हे समजत नाही) दूर होतील.
राहता राहीले अस्पृष्यता आणी जातीभेद या विषयी, तर हे बदललेच पाहीजे. माणसाला माणुस न समजता केवळ जाती आधारे हीन दर्जा देणे हे अजून नीचतेचे लक्षण आहे.
काऊ म्हणतो वेद म्हणजे निरर्थक
काऊ म्हणतो वेद म्हणजे निरर्थक इतिहास,
अजुन कोण सुरेख दाखले देतो ज्योतिरावांचे, जे म्हणतात, वेदातील वर्म सर्वांना समजले पाहिजे.
मला प्रश्न पडतो, हा काऊ खरा की ज्योतिरावांचे मत खरे? जर वेद म्हणजे निरर्थक इतिहास तर त्यातिल वर्म शोधण्यास सांगणारे ज्योतिरावांचे वरील मत काऊच्या दृष्टीने काय ठरते? कुतुहल आहे मला याचे !
>>>> लिंब्या , शब्दाचा उच्चार
>>>> लिंब्या , शब्दाचा उच्चार चुकला म्हणुन तुमचा देव मला पावणार नसेल.... <<<<<
या चर्पटपंजरीला नै उत्तर देत बसत, पण शब्दाचा उच्चार न चूकताही तुझ्या आयडीच्या "लिंग"संभवाबद्दल शंका निर्माण होताहेत त्याचे काय? मग उच्चारच चूकले तर किती गोंधळ होऊ शकेल? नै का?
अर्थात तू मान्य करणार नाहीसच... पण वाचक सूज्ञ आहेत यावर माझा अढळ विश्वास असल्याने "हे काउ" तुझ्या आयडीचा उल्लेख उदाहरणादाखल केला असे.
लिंब्या खोटारड्या , वेद
लिंब्या खोटारड्या ,
वेद संभाअले हा अभिमान्निरर्थक आहे असे मी बोललो.
वेदात अर्थ आहे की नाही हे जो तो ठरवेल.
अरे आंबट लिंब्या , मग
अरे आंबट लिंब्या ,
मग उच्चारच चूकले तर किती गोंधळ होऊ शकेल?
इतकी अक्कल आहे , तर जी भाषा आपल्याला येते तिच्यातच देवाचा धावा करावा नै का ?
वेदातील वर्म सर्वांना समजले
वेदातील वर्म सर्वांना समजले पाहिजे.>>>>बहुजणांना बेवकुफ बनवायचे.
आणि आता ते बहुजणांना समजत आहे.
त वेद वर्म is bookworm
त
वेद वर्म is bookworm
सुरेख, तुम्ही म्हणता ते बहुजन
सुरेख,
तुम्ही म्हणता ते बहुजन कोण? आणि कोण त्यांत मोडत नाहीत? हे विभाजन कोणी ठरवायचं?
मला तुमचा युक्तिवाद कम्युनिस्ट धर्तीचा वाटतो. जे माझी री ओढतात ते प्रोलेटॅरियेट आणि बाकी सारे बूर्झ्वा. थोडक्यात काय, मी सांगेन ते बहुजन आणि मला विरोध करतात ते सारे ब्राह्मण!
आ.न.,
-गापै.
प्रोलेटॅरियेट आणि बाकी सारे
प्रोलेटॅरियेट आणि बाकी सारे बूर्झ्वा.<<<
ह्या दोन शब्दांचा अर्थ काय?
अवांतराबद्दल क्षमस्व
बूर्झ्वा.>>>> हा शब्द भारीये!
बूर्झ्वा.>>>>:हाहा: हा शब्द भारीये! मला फार हसू येत हा शब्द ऐकला की.:फिदी::दिवा:
जेव्हा जेव्हा हे जातियवादी
जेव्हा जेव्हा हे जातियवादी विषय निघतात तेव्हा मला कायम असे वाटते कि माणसाच्या जडणघडणी,बुद्धी, वागणुकीमधे जन्मजात गुणांचा भाग किती आणि संस्कार, शिक्षण, यांचा वाटा किती याचे प्रयोग भारत मधे व्हायला हवे ना एकदा.....
Nature Vs Nurture....
पाश्चात्य देशात असे प्रयोग झाले आणि त्याचे निश्कर्ष बरेचसे त्या वेळेस धक्कादायक असे होते. त्यावेळेसच्या Belief System च्या विरुद्ध होते असे वाचल्याचे स्मरते. हे प्रयोग करायला भारता सारखा स्कोप कुठेही मिळणार नाही बहुतेक.
असेच प्रयोग जर भारतात झाले तर ????
म्हणजे Random Selection method ने प्रत्येक जातीत जन्माला आलेली २० ते २५ अर्भके घ्यावयाची, त्यांना जातीच्या आणि आर्थिक उतरंडीच्या दुसर्या टोकाला असलेल्या कुटुंबामधे द्यावयाचे. प्रत्येक कुटुंबाने त्यांचा संभाळ स्वताचे अपत्य असल्याप्रमाणे करावयचा. ३० ते ३५ वर्षाने त्यांचा व त्यांच्या मूळ भांवडांचे आचार विचार, शिक्षण, वागणुक यांसर्वांचा आढावा घ्यायचा.
काय निरिक्षणे येतील हे सांगावयाला कोणा शास्त्रज्ञाची गरज नाही पडणार बहुतेक.
जे ये भेद तो खुदही भगवान ने बनाया है...... शेर शेर होता है और बकरी बकरी होत है, दोनो एक नही होत सकत है, उसी प्रकार सवर्ण और दलित सृष्टी के बनाये है उनमे मिलन और संगत नही हो सकत है.... वगैरे बोलणार्यांना कदाचित उत्तर मिळू शकेल
बूर्झ्वा.>>>>हाहा हा शब्द
बूर्झ्वा.>>>>हाहा हा शब्द भारीये! मला फार हसू येत हा शब्द ऐकला की.
>>>
त्याचं स्पेल्लिन्ग तर त्याच्यापेक्षाही भारी आहे::फिदी:
: Bourgeoisie
अरे पण इथे ब्राह्मण चांगले की
अरे पण इथे ब्राह्मण चांगले की वाईट हा पॉइंट नाहीये. लिबरल/पुरोगामी व कर्मठ लोकांच्या वागण्याबद्दल ची पोस्ट आहे. त्यावर काय वाटते ते लिहा की. सदानंद मोर्यांचे निरीक्षण अगदी चपखल वाटले. तसेच खरोखरच पुरोगामी असणार्या अनेकांच्या एखाद्या वक्तव्यावर किंवा प्रसंगातील वागणुकीवरून त्यांना कर्मठ ठरवून त्यांच्यावर झालेली टीका ही लक्षात आहे.
सातीताईंच्या सर्व पोस्टी
सातीताईंच्या सर्व पोस्टी आवडल्या.
: Bourgeoisie>>>. अरारा!
: Bourgeoisie>>>. अरारा! स्पेलिन्गची टोटल च लागत नाही.:फिदी: फ्रेन्च की जर्मन शब्द आहे हा? या लोकान्च्या नावाचे, व्याख्यान्चे, व्याकरणाचे स्पेलिन्ग नेहेमी विचीत्रच असते, उच्चारताच येत नाही.
धन्यवाद वेदिकाताई.
धन्यवाद वेदिकाताई.
Bourgeois - बूर्ज्वा ('ज'
Bourgeois - बूर्ज्वा ('ज' जपानाचा)
bourgeoisie - बूर्ज्वाझी
धन्यवाद चिनुक्स.
धन्यवाद चिनुक्स.
बेफिकीर, बूर्झ्वा हा फ्रेंच
बेफिकीर,
बूर्झ्वा हा फ्रेंच शब्द आहे. हा शब्द साधारणत: युरोपातल्या सरदार दरकदारांना लावला जातो. हा झाला हुजूर वर्ग.
प्रोलेटॅरियेट हा लॅटिन शब्द असून साधारणत: मजूर वर्गास संबोधतांना लावला जातो.
कम्युनिस्ट विचारसरणीनुसार आधुनिक तंत्रज्ञान हे सामाजिक क्रांती घडवून आणते. तिच्यात मजूर वर्ग हुजूर वर्गास पूर्णत: नष्ट करतो. यालाच कम्युनिस्ट नंदनवन (युटोपिया) म्हणतात. या वेळी राजकीय सत्ता अस्तंगत पावते.
मात्र हे साध्य होतांना मध्यंतरीच्या काळात मजूर पक्षाची एकाधिकारशाही असते. या एकाधिकाराच्या कल्पनेच्या आधारे लेनिन, स्टालिन, इत्यादि कम्युनिस्ट क्रूरकर्मांनी जनतेवर अनन्वित अत्याचार केले. याकरिता कोणालाही हुजूरांचा हुजऱ्या समजले जाई आणि त्याची गर्दन मारण्यात येत असे.
असाच प्रकार ब्राह्मण आणि बहुजन या निर्बुद्ध विभाजनाद्वारे चालला आहे. आगोदरच्या माझ्या प्रस्तुत वाक्याचा संदर्भ असा आहे.
आ.न.,
-गा.पै.
Pages