मला चळवळींमधे तसेच आंतरजालावर काही ठिकाणी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जातीअंताच्या लढ्या ऐवजी जातीय अस्मितेचच राजकारण होताना दिसते आहे.अनेक बुद्धीदांडगे विद्वान जातीय दरी कमी करण्याऐवजी विश्लेषणाच्या बहाण्यातून जातीय त्वेष व द्वेष फुलत राहतील याचीच व्यवस्था करतात. तरुणांची माथी सतत भडकत राहतील याची व्यवस्था करतात.विवेकी व विचारी अशी भूमिका कुणी घेतली वा घेण्याचा प्रयत्न केला कि त्याला 'भटाळला' विचारांचे बामनी करण झाले अशी दूषणे द्यायला सुरवात करतात. असो. विवेक व विद्रोह हे एका ठिकाणी नांदत नाही .पण विवेक विद्रोह समजून घेण्यास मदत करतो. हे आपल माझ मत.
आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे ही शब्दरचना तर मी कित्येक वर्षे ऐकतो आहे. यात ब्राह्मण्य म्हणजे काय तर अज्ञानाचा फायदा घेउन केलेले शोषण, समाजात जेजे काही विषमता पसरवणारे आहे ते म्हणजे ब्राह्मण्य. अन्यायाचे जे समर्थन करते ते ब्राह्मण्य.जे जे सकल कुटील ते ब्राह्मण्य. असा तो ब्राह्मण्याचा अर्थ अभिप्रेत आहे. सहवेदनेचा विचार तुम्ही मांडलात की त्याला ब्राह्मणी कावा म्हणतात. अंनिस चे नरेंद्र दाभोलकर देखील या आरोपातून सुटले नाहित. त्यांच्या तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाच्या मनोगतात पान ७ वर वाचा. http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5421983945435441997...
दलित हत्याकांड वा तत्सम प्रकरणात तुम्ही वा पुरोगाम्यांनी निषेध जरी व्यक्त केलात तरी तो तोंडदेखला आहे ही भावना संतापाने चिडून उठलेल्यांच्या मनात असणारच आहे. त्याला इलाज नाही. उद्या तुमच्यावर जर ही वेळ आली तर तुमचेही संतुलन बिघडणारच आहे. तिथे विवेक काम करणार नाही. पण या त्राग्याचे म्हणा विद्रोहाचे म्हणा रुपांतर द्वेषात होणार नाही याची काळजी समंजस लोकांनी घेतली पाहिजे. प्रसंगी फटकारल पाहिजे. जात धर्म हे वास्तव नाकारता येत नाही हे जरी खरे असले तरी ती सांस्कृतिक विविधता आहे या दृष्टीने पाहिले तर सामाजिक ऐक्यासाठी ते सकारात्मकच होईल. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असा सुसंस्कृत ,सुजाण व संवेदनशील नागरिक असा म्हणजे झालं.
साधना ८ मे १९९९ च्या अंकातील पुरोगामी चळवळींची धर्मविषयक भूमिका या लेखात सदानंद मोरे म्हणतात,".. ब्राह्मणांचा विचार केला तर असे दिसते की त्यांच्यातील मोठी संख्या समाजकारण राजकारणापासून अलिप्त व उदास आहे. राहिलेल्या अल्पसंख्येतील एक भाग प्रतिगामी कट्टरवादी तर दुसरा पुरोगामी.बरेच ब्राह्मण पुरोगामी आपल्या पुर्वजांनी केलेल्या उद्योगांचे ओझे विनाकारण आपल्या खांद्यावर क्रुसासारखे वाहात असतात. तो त्यांचा अपराधगंडच म्हणा ना! त्यामुळे अब्राह्मण विचारवंत,लेखक,कलावंत यांच्या प्रत्येक कृतीला त्यांचा पाठींबा असतो.अब्राह्मणांविषयी व विशेषकरुन दलितांविषयी आपण काही बोललो, त्यांचे काही चुकते आहे असे प्रतिपादन केले तर आपल्या पुरोगामीत्वाविषयी संशय घेण्यात येईल अशी भीती त्यांना वाटत असावी. आपल्यातले ब्राह्मण्य पार निपटून गेले आहे असे दाखवण्याची त्यांची धडपड चालू असते. त्यामुळे ब्राह्मणांवर एखादा खोटा आरोप केला गेला व तो खोटा असल्याची या पुरोगाम्यांची खात्री असली तरी तसे स्पष्ट सांगायला ते कचरतात. वस्तुत: आमचे पुरोगामित्व प्रमाणित करणारे तुम्ही कोण किंवा संशयास्पद ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असे विचारुन त्यांनी अब्राह्मणांच्या चुकीच्या गोष्टींना चूकच म्हणण्याचे धैर्य दाखवले पाहिजे. राजारामशास्त्री भागवत हा या बाबतचा त्यांचा आदर्श असायला हवा. भागवतांची सहानुभूती सत्यशोधकांना होती, सहाय्य ही होते. शाहू छत्रपतींना आपली धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने होत नसून शुद्रोचित पुराणोक्त पद्धतीने होत आहेत ही जाणीव भागवतांनीच करुन दिली व त्यातूनच पुढील महाभारत घडले.परंतु आवश्यकता भासेल तिथे भागवत सत्यशोधकांचेही कान उपटायला मागेपुढे पहात नसत.
दुसर्या बाजूचे प्रतिगामी ब्राह्मण मात्र असल्या कुठल्याही दडपणापासून मुक्त असतात.त्यांच्या संघटनेतील अब्राह्मण त्यांना मनापासून मानतात. त्यांच्याविषयी शंका घेत नाहीत. त्यांना कोणतेही दिव्य करायला लागत नाही. पुरोगामी ब्राह्मणाच्या एखाद्या क्षुल्लक उक्तीवरुन किंवा कृतीवरुन त्याची विश्वासार्हता धोक्यात येउ शकते. आतापर्यंतच्या सर्व तपश्चर्येवर पाणी पडू शकते. पुरोगामी चळवळीतील अब्राह्मणाचे पुरोगामीत्व जणु स्वयंसिद्ध,स्वयंप्रकाशित व स्वत:प्रमाण.उलट पुरोगामी चळवळीतील ब्राह्मणाचे पुरोगामीत्व त्याला वारंवार सिद्ध करावे लागते. उजळून घ्यावे लागते. त्याचे प्रामाण्य परत:प्रामाण्य होय. १९४८ च्या गांधीहत्येच्या प्रसंगी ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ वगैरे झाली. त्यावेळी असे विचित्र चित्र दिसले की कट्टर ब्राह्मणेतर शंकरराव मोरे या कृत्यांचा निषेध करतात तर नानासाहेब गोरे समर्थन करतात! अब्राह्मण्याचे पुरोगामीत्व जणु कवच कुंडलासारखे जन्मसिद्ध,कर्णाप्रमाणे; ब्राह्मण्याला मात्र आपल्या पुरोगामीत्वाची श्रावणी करावी लागणार!! आंतरजातीय विवाह करुन घरात आलेली सून सासरचे कुलाचार जपण्याचा प्रयत्न अधिक कसोशीने करते. इतरांनी त्याविषयी थोडी बेफिकिरी दाखवली तरी त्यांच्याविषयी कोणी शंका घेणार नसते. ब्राह्मण पुरोगाम्यांच्या मर्मस्थानाचा गैरफायदा अब्राह्मण पुरोगामी घेत नाहीत हे निदान मी तरी म्हणू शकणार नाही. अब्राह्मण पुरोगाम्याची बायको जत्रेत गेली तर तो लोकधर्म व ब्राह्मण पुरोगाम्याची बायको हळदीकुंकवाला गेली कि ती पुरुषसत्ताक व्यवस्थेला शरण गेली म्हणायला सगळे तयारच."
जातीय विश्लेषणा बद्दल थोडसं
Submitted by प्रकाश घाटपांडे on 19 January, 2015 - 00:50
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घाटपांडे, आजकाल "अस्मिता"
घाटपांडे,
आजकाल "अस्मिता" कुरवाळण्याचे दिवस आहेत. तटस्थ, समतोल वगैरे बोलाल तर सुडोसेक्युलर हिंदूद्वेष्टे इ. आरत्या ऐकाव्या लागतात.
तेव्हा जौद्या की!
घाटपांडे, हा लेख लिहिताना
घाटपांडे,
हा लेख लिहिताना तुम्ही स्वतःबद्दल 'मी ब्राह्मण आहे' हा विचार आपल्या मनातून बाजूस सारू शकलात का, याविषयी मला शंका आहे.
असा विचार जेव्हा तुमच्या आणि सगळ्या भारतीयांच्या मनातून जाईल तेव्हा इथे उरलेला उहापोह करण्याला अर्थं आहे.
मूळात जातीव्यवस्थेला, अंधश्रद्धांना, जुन्या रूढींना, ज्योतिषाला आणि पुराणातल्या विमानांना विरोध केला की तुम्ही 'ब्राह्मणविरोधी' असा शिक्का तुमच्यावर बसतो.
आत्तापर्यंत आंतरजालावर माझ्या जितक्या प्रतिक्रीया प्रसिद्ध झाल्यात त्यातली एकही ब्राह्मणांविरोधी नसताना किंवा एखाद दोन असल्या तर त्यांच्या बाजूनेच असताना उगाच मी ब्राह्मणविरोधी लिहिते अश्या कंड्या इथे किंवा इतर संस्थळावर पिकविणारे लोकही कमी नाहीत.
पण खरंच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 'मी ब्राह्मण्याला विरोध करते' असं चुकीचं बोलण्यापेक्षा 'मी जन्मावर आधारित उच्चनीचत्वाला आणि जुन्यापुराण्या चुकीच्या रुढींना विरोध करते' असे म्हणायला हवे.
खरं म्हणजे किमान वयाच्या १५व्या वर्षांपर्यंत एका विशिष्टं विचारशाखेच्या प्रसारामुळे 'सगळ्या सगळ्या वाईट गोष्टीना ब्राह्मणच जबाबदार' असा विचार माझ्याही मनात थोडाफार रुजला होता पण नंतर स्वत:ला विचार करता येऊ लागल्यावर असे काही नसते, प्रत्येकच समाज व्यवस्थेत एक सहन करणारा आणि एक त्रास देणारा , एक शासन लादून घेणारा आणि एक शासन करणारा असा वर्गं असतो हे लक्षात आले.
आत्ता मी ज्या गावात - समाजात रहाते तिथे ब्राह्मणांना आर्थिक्/धार्मिक्/सामाजिक संस्थेत काही महत्त्वाचे किंवा कसेही स्थानच नाही.
तरी इथे जातींवर अत्याचार आहेत,तरी अस्पृश्यता आहे, तरी देवाधर्माच्या नावाने भक्तांची आबाळ आहे.
बाकी तुमच्या शेवटच्या दोन ओळींची संपूर्ण लेखाशी काय सुसंगती लागली नाही.
>>हा लेख लिहिताना तुम्ही
>>हा लेख लिहिताना तुम्ही स्वतःबद्दल 'मी ब्राह्मण आहे' हा विचार आपल्या मनातून बाजूस सारू शकलात का, याविषयी मला शंका आहे.
असा विचार जेव्हा तुमच्या आणि सगळ्या भारतीयांच्या मनातून जाईल तेव्हा इथे उरलेला उहापोह करण्याला अर्थं आहे.<<
तुमच्या शंकेच निरसन करण्याची माझ्यात कुवत नाही. दुसर्या ओळीशी सहमत नाही. त्यातून अन्यथा उहापोह करण्यात अर्थ नाही असा अर्थ ध्वनित होतो. माझ्या मते अन्यथा देखील उहापोह ही विचारांची देवाणघेवाण आहे. त्यातूनच समाज पुढे जात असतो.
>>बाकी तुमच्या शेवटच्या दोन ओळींची संपूर्ण लेखाशी काय सुसंगती लागली नाही<<
आपण नीट वाचल्यास आपल्या हे लक्षात येईल की ते अवतरण चिन्हात असलेल्या परिच्छेदातील वाक्य वा ओळी आहेत.. त्यामुळे त्या ओळी सदानंद मोरे यांच्या लेखातील उधॄत आहे.
मी नविन धर्म काढतो ज्यात
मी नविन धर्म काढतो ज्यात जातीजमाती नसेल. त्यात वेगवेगळे पंथ देखील निर्माण होणार नाही याची काळजी घेणार. एक भारतीय म्हणुन ज्या गोष्टीचा अभिमान असेल तेच या धर्मात पुजनिय असेल.
>>>>>मी नविन धर्म काढतो ज्यात
>>>>>मी नविन धर्म काढतो ज्यात जातीजमाती नसेल. त्यात वेगवेगळे पंथ देखील निर्माण होणार नाही याची काळजी घेणार. एक भारतीय म्हणुन ज्या गोष्टीचा अभिमान असेल तेच या धर्मात पुजनिय असेल.
"अजात" ?
देशमुखसाहेब असे दोन धर्म आधीच
देशमुखसाहेब असे दोन धर्म आधीच आहेत-
दिने ईलाही
बहाई
हो पण त्या दोन्हीही धर्म एका
हो पण त्या दोन्हीही धर्म एका धर्माशी जोडलेले असल्याने त्यांचा स्वीकार लोक इतर धर्मातील लोक करतील का?
निव्वळ भारतीय असणारेच धर्मात घेतले जाणार
धर्म स्थापनेचा दिवस कधीचा
धर्म स्थापनेचा दिवस कधीचा ठरला आहे? धर्मा चे नामकरन काय?
"आम्ही सारे भारतिय"?
होईल. त्यात कुणाला स्वतच्या
होईल. त्यात कुणाला स्वतच्या जातीचा फुकाचा अभिमान नसेल आणि जातच नसल्याने त्यानावाने आयडी नावे वगैरे निघणार नाही. त्या धर्माचे नेते वगैरे काहीच नसल्याने जाज्ज्वल्य अभिमान असणारे लेख बुंदी पाडल्यासारखे निघणार नाहीत. समानत्व आणि शांतता हे मुख्य ध्येय असल्याने इथले काही लोकांना त्यात प्रवेश काही अटी पार पाडल्यानंतरच मिळतील
घाटपांडे साहेब, तुमचा लेख
घाटपांडे साहेब, तुमचा लेख आवडला. बाकी सुरवातीच्याच काही प्रतिसादातून कुणाला लेख अधिक झोंबला आहे ते दिसलेच.
काही प्रतिसाद नासक्या
काही प्रतिसाद नासक्या आंब्यांना चांगलेच झोंबले
साधारणत सर्व धर्म, पंथ,
साधारणत सर्व धर्म, पंथ, राष्ट्र यांची सुरुवत चांगल्या (च) उद्देशाने होते. नंतर जस जसा विस्तार होतो, अनुयायी वाढतात तसतसे फाटे फुटत जातात.
तरी सुद्धा दिदे तुम्हाला शुभेच्छा.
अनुयायी वाढतात तसतसे फाटे
अनुयायी वाढतात तसतसे फाटे फुटत जातात. > हो ते काही प्रतिसादावरुन दिसलेच आहेत
आपण नीट वाचल्यास आपल्या हे
आपण नीट वाचल्यास आपल्या हे लक्षात येईल की ते अवतरण चिन्हात असलेल्या परिच्छेदातील वाक्य वा ओळी आहेत.. त्यामुळे त्या ओळी सदानंद मोरे यांच्या लेखातील उधॄत आहे>>
हो खरं आहे.
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. लेखातला ६०टक्केहून अधिक भाग कुणी सदानंद मोरे काय म्हणतायत त्यानेच व्यापलेला आहे.
पण हे सदानंद मोरे ब्राह्मण आणि ब्राह्मण्य सोडून अचानक पुरुषसत्ताक व्यवस्थेवर कसे गेले ते कळत नाहीये.
ब्राह्मण नसणारा, पुरोगामी नसणारा किंवा असणारी/नसणारी पुरुषसत्ताक व्यवस्थेची समर्थक असू शकते.
>>लेखातला ६०टक्केहून अधिक भाग
>>लेखातला ६०टक्केहून अधिक भाग कुणी सदानंद मोरे काय म्हणतायत त्यानेच व्यापलेला आहे.<<
प्रा.सदानंद मोरे हे घुमान येथे होणार्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. तसेच ते संतसाहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक आहेत.
घाटपांडे, कुठे काय लिहावे हे
घाटपांडे,
कुठे काय लिहावे हे तुम्हाला समजत नाही का?
आधी आडनाव बदलून सर्वांना रुचेल असे एखादे आडनाव घ्या. घाटपांडे म्हणे!
मग बघा कसे प्रतिसाद येतात ते!
बेफी जी या वरुन आठवले आजचा
बेफी जी या वरुन आठवले
आजचा सुधारक या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकात एकदा आमचे मित्र (तसेच आ.सु चे लेखक सुद्धा व अंनिस तील कार्यकर्ते सुद्धा ) टी बी खिलारे व प्रभाकर नानावटी यांनी एक प्रयोग केला. त्यात आजचा सुधारक मधे ब्राह्मणेतर लोकांचे किती लिखाण प्रसिद्ध होते/ ब्राह्मणेतर लोक किती लिहितात असा सर्व्हे घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुमची जात कोणती हे प्रत्येकाला विचारणे शक्य नसल्याने आडनावांवरुन तारतम्य वापरुन जात ठरवली व आ.सु मधील लेखकात ब्राह्मण लेखकांचाच जास्त भरणा आहे असा निष्कर्ष काढून आसु ला आरोपीच्या पिंजर्यात उभ केल होते.
उपक्रम वर त्याविषयी लिहिल होत. पण आता उपक्रम तांत्रिक दृष्ट्या बंद असल्याने लिंक देता येत नाही. असो.
घाटपांडे, आजचा सुधारक च्या
घाटपांडे,
आजचा सुधारक च्या लिंकबद्दल धन्यवाद.
वाचून बघते.
भारताची ३० % प्रजा मुस्लिम ,
भारताची ३० % प्रजा मुस्लिम , ३०% ख्रिस्चन , ३० % बौद्ध व १० % इतर अशी स्थिती झाल्यानंतर या देशाची प्रगती होईल.
.. आलमगीर काउखान
अय्या! मग आम्ही कुठे जायचे?
अय्या! मग आम्ही कुठे जायचे?:अओ::फिदी:
१०% मधे ३% वाले का?
१०% मधे ३% वाले का?
३% की ३.५% एकदा ठरवा. नविन
३% की ३.५% एकदा ठरवा. नविन जनगणना झाली असेल.
मला आधी वाटायचं लोक उगीचच
मला आधी वाटायचं लोक उगीचच ब्राम्हणांना नावं ठेवतात . पण स्वतःला अनुभव आल्यावर खरोखर ब्राह्मणांची चीड यायला लागली . नुसतंच नावाला ब्राह्मण आणि वृत्ती मात्र शूद्राची असे तर खूप जन भेटले.
वेद , उपनिषदे वाचल्यावर समजलं ब्राह्मणांनी इतरांना ते वाचायला बंदी का केली होती . इतरांना सत्य समजल्यावर ब्राह्मणांची काहीच किंमत राहणार नवती म्हणून हे बंदीच नाटक .
डिस्क्लेमर : वरील वाक्ये ब्राम्हन्य म्हणजे काय हे ज्यांना काळात नाही अश्या ढोंगी ब्राह्मणांसाठी आहेत . खरोखरच्या ब्राह्मणांसाठी नाहीत .
वरिल सर्वच प्रतिसाद
वरिल सर्वच प्रतिसाद
'मी जन्मावर आधारित
'मी जन्मावर आधारित उच्चनीचत्वाला आणि जुन्यापुराण्या चुकीच्या रुढींना विरोध करते' +१.
ब्राह्मण, ब्राह्मण्य, पुरोगामी किंवा कट्टरवादी ब्राह्मण वगैरे बद्दल बरीच चर्चा इथे वाचली आहे गेली काही वर्षे.
तर आता एक प्रश्नः ब्राह्मणेतरांमधे जन्मावर आधारित उच्चनीचत्व, जुन्यापुराण्या चुकीच्या रूढी असतात की नसतात, त्यांनी शूद्रांना अस्पृश्य मानलेच नव्हते का, त्यांच्याशी विवाहसंबंध ठेवले होते का, नसल्यास का नाही? याचा कुणि अभ्यास केला आहे का? त्यांचे या बाबत काय मत आहे? सर्व काही ब्राह्मणांबद्दलच का?
तसे पाहिले तर समाजात माझ्या माहितीप्रमाणे ब्राह्मणांपेक्षा ब्राह्मणेतरच जास्त आहेत, सध्याचा अपवाद सोडल्यास निदान महाराष्ट्रात तरी राजकारणात ब्राह्मणेतरांचेच वर्चस्व नाहीये का?
मग त्याचा वरील दृष्टीने कुणि विचार केला आहे का?
सारखे काय ब्राह्मण ब्राह्मण?
वेद , उपनिषदे वाचल्यावर समजलं
वेद , उपनिषदे वाचल्यावर समजलं ब्राह्मणांनी इतरांना ते वाचायला बंदी का केली होती . इतरांना सत्य समजल्यावर ब्राह्मणांची काहीच किंमत राहणार नवती म्हणून हे बंदीच नाटक .
बर्याच प्रमाणात सहमत.
पण असे आहे, जेंव्हा धर्माचे वर्चस्व होते तेंव्हा ब्राह्मणांनी स्वतःच्या फायद्यासाठी असे केले नि हजारो वर्षे इतरांनी ते मुकाट्याने सहन केले, त्यात काही अन्याय आहे असे वाटेनासेच झाले. तसाच आपला धर्म आहे अशी चुकीची समजूत समाजात पसरली. काही अन्याय दूर करण्यात आले - जसे स्त्रियांना शिक्षण, पुनर्विवाहाला मान्यता बालविवाह बंद इ. पण ब्राह्मणेतरांवरील अन्याय तसेच राहिले,
आता धर्माचे वर्चस्व नाही, राजकारण, अर्थकारण याचे वर्चस्व आहे. सर्वांना समान कायदा, न्याय, संधि वगैरे गोष्टी बोलल्या जातातच. पण आता , सत्ता मिळवणे, पैसे मिळवणे अश्या फायद्यांसाठी भ्रष्टाचारी, गुंडगिरी करणारे, निरनिराळे बेकायदेशीर कृत्ये करणारे लोक इतरांवर अन्याय करतच आहेत ना? हे असेच चालायचे म्हणून ते सहन केल्या जातेच आहे ना?
तेंव्हा आता ब्राह्मणांनी काय केले या पेक्षा आजकालचे अन्याय दूर करणे महत्वाचे नाही का?
>> आजचा सुधारक या विवेकवादाला
>>
आजचा सुधारक या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकात एकदा आमचे मित्र (तसेच आ.सु चे लेखक सुद्धा व अंनिस तील कार्यकर्ते सुद्धा ) टी बी खिलारे व प्रभाकर नानावटी यांनी एक प्रयोग केला. त्यात आजचा सुधारक मधे ब्राह्मणेतर लोकांचे किती लिखाण प्रसिद्ध होते/ ब्राह्मणेतर लोक किती लिहितात असा सर्व्हे घेण्याचा प्रयत्न केला.
>>>
या पेक्षा आसुचे लेखक किती व वर्गणीदार/वाचक किती हा सर्वे करावा. आमच्या मातोश्री म्हणतात की 'वाचकांपेक्षा लेखकांची संख्या जास्त असलेले हे जगातले एकमेव नियतकालिक आहे'
अगदी लेख लिहिले नाहीत तरी 'वाचकांच्या पत्रांतून' केशवराव जोशी, अनंत बेडेकर असे न-लेखक झळकत असत.
त.टी.: मराठीतील मोजक्या वैचारीक नियतकालिकांपैकी आसु एक आहे. त्याच्या वाचकसंख्येची खिल्ली उडवणे इतकाच हेतू आहे, त्यांच्या विचारांचा व कार्याची खिल्ली उडवलेली नाही. प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे हे माशिक आहे.
झक्कीकाका धन्यवाद! मी वर
झक्कीकाका धन्यवाद!
मी वर म्हटल्याप्रमाणे सध्या मी जिथे रहातेय तिथे ऑलमोस्ट १२ व्या शतकापासून बाह्मण/ब्राह्मणत्व नावाच्या गोष्टी नावालाही नसूनही जातीभेद, अस्पृष्यता, बालविवाह , स्त्रियांना शिक्षणासाठी कमी संधी असे सगळे आहे.
अमेरिका आणि अफ्रिका खंडात जिथे ब्राह्मण हा शब्दं कुणी ऐकलेलाही नसेल(अमेरिकेत अश्या जागा आता कमी अस्तील म्हणा)
तिथेही हे सगळे प्रकार आहेतच. कदाचित जातीऐवजी वर्ण, वंश असे शब्द वापरत असतील.
चांगले लिहीले आहे. नेमके
चांगले लिहीले आहे. नेमके विचार.
मूळात "ब्राह्मण्य" या शब्दाला जाणुनबुजून जो अर्थ दिला आहे, तो कुणी व का दिला, तो कुठुन आला हे प्रश्नच इथे कुणाला पडत नाहीत. "ब्राह्मण" व "ब्राह्मण्य" हे वेगवेगळे असूच कसे शकते? पण कोणत्याश्या कोर्टाच्या निकालानेही हे दोन वेगळे शब्द आहेत हे सांगून ठेवले आहे (संदर्भ शोधावा लागेल).
अन त्यामुळेच, ब्राह्मण्य या शब्दाचा अर्थ कोणी कसा लावुन कसे गरळ ओकावे यावर कायद्याचे बंधन नसल्याने ब्राह्मणांना शिव्याशाप घालताना "ब्राह्मण्य" हा शब्द वापरून कायद्याच्या कचाट्यातून सुटका करून घेतली जाते. असो. विषय तो नाही.
विषय असा की ब्राह्मणातील वर वर्णन केलेली कट्टर/पुरोगामी/सांसारीक-सामान्य मंडळी या सर्व प्रकाराकडे गेली १०० वर्षे (१९४८ धरून) कशाप्रकारे बघताहेत याचा मागोवा घेणे रंजक तर ठरेलच पण डोळ्यात अंजन घालणारेही ठरेल. वरील नानासाहेब गोर्यांचे याबाबतचे उदाहरण पुरेसे बोलके आहे.
एनिवे.... लेख विचारप्रवर्तक आहे. मात्र यावर हुकमी भाष्य करावे/मत बनवावे असा अभ्यास अजुन झाला नाहीये.
>>> वेद , उपनिषदे वाचल्यावर
>>> वेद , उपनिषदे वाचल्यावर समजलं ब्राह्मणांनी इतरांना ते वाचायला बंदी का केली होती . इतरांना सत्य समजल्यावर ब्राह्मणांची काहीच किंमत राहणार नवती म्हणून हे बंदीच नाटक .
बर्याच प्रमाणात सहमत. <<<<
मी संपुर्णतया असहमत.
साध्या मराठीतील आरती धड पणे मूळ रूपात कुणाला म्हणता येत नाहीत/म्हणावे अशी कुणा जनसामान्य/बहुजनाला गरज वाटत नाही, तेवढी इच्छा नाही, तर जिथे संतांनी रचलेल्या आरतींचीही तोडमोड/भ्रष्ट/अपभ्रंश वगैरे केले जाते त्यांचे हातात म्हणण्यापेक्षा "मुखात" वेद देणे आजही कितपत संयुक्तिक आहे? पूर्वी तर कितपत होते?
अर्थात आता तर, नेटवर शोधलेत तर सर्व वेदादी वाङमय नेटवर सहज उपलब्ध आहे पीडीएफ फॉर्म मधे. घ्या ज्यांना हवे त्यांना.
Pages