संगीत-आस्वादगट :)

Submitted by चैतन्य दीक्षित on 29 July, 2014 - 08:35

नमस्कार मंडळी

शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे या धाग्यावरच्या चर्चेतून संगीतविषयक कार्यशाळा घेतली जावी अशी कल्पना पुढे आली.
कार्यशाळा घेण्याइतपत माझी पात्रता नाही, पण मी जे शास्त्रीय संगीत आवडीने ऐकतो, त्याचा आनंद लुटतो, तोच आनंद इतरांनाही मिळावा, त्यांनाही शास्त्रीय संगीताची गोडी लागावी, ज्यांना आधीच शास्त्रीय संगीताची गोडी वाटते त्यांना त्यातील तंत्राचा भाग अजून चांगल्या प्रकारे कळावा, अशा उद्देशाने एक शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेणारा गट तयार करावा असे माझ्या मनात आहे. ज्यांना थोडं किंवा फार येतंय अशांनी त्यांच्यापेक्षाही थोडं किंवा अजिबात येत नाही अशांना ते ज्ञान देणं अशी शास्त्रीय संगीतविषयक देवाण-घेवाण व्हावी असा या गटाचा उद्देश असेल. गटाचे सर्वसाधारण स्वरूप (जे माझ्या डोक्यात आहे) ते पुढीलप्रमाणे. यात कुणाला काही सुधारणा सुचवावीशी वाटली किंवा पूर्णपणे वेगळी कल्पना मांडावीशी वाटली तर स्वागतच आहे.

१) स्थळ- पुणे
सुरुवातीला पुण्यातल्या मायबोलीकर आणि त्यांचे मित्र-मैत्रिणी यांच्यापैकी जे इच्छुक आहेत अशांचा एक गट तयार करायचा.
पुण्यात कुठे भेटायचे हे इच्छुक ज्या भागात राहतात त्यावरून ठरवावे लागेल.

२) वेळ- महिन्यातून एकदा/ दोनदा
सगळ्यांकडे किती वेळ उपलब्ध असेल याची खात्री नसल्याने महिन्यातून किमान एकदा भेटावे. सगळ्यांच्या वेळा जुळल्यास दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळाही भेटता येईल. किंवा जवळपासच्या भागात राहणारे मायबोलीकर स्वतंत्रपणेही भेटू शकतीलच.

३) उपक्रम- प्रत्येक भेटीच्यावेळी (आधी) एखादा राग/ ताल/वाद्य/ गायक- गायिका ठरवून त्या रागाची प्रस्तुती सगळ्यांनी मिळून ऐकणे. (कमाल ३० मिनिटे)
हे ऐकणे चालू असताना, शक्यतो कुठलेही स्पष्टीकरण टाळून, ऐकून झाल्यावर, रागाबद्दल/ तालाबद्दल ज्याला जी जी माहिती आहे ती त्याने द्यावी.
ज्याला त्यातला जो भाग उमगला तो भाग त्याने / तिने सगळ्यांना सांगावा.
गटात काही जण अगदीच नवखे असू शकतात ही शक्यता गृहित धरून शक्य तितक्या बेसिक पातळीवर स्पष्टीकरण द्यावे. बर्‍याचदा, आपण भिडस्त होऊन, माहिती असूनही काही बोलत नाही- यावरही मात करता येईल Happy

४) शक्य झाल्यास- काही तज्ज्ञांना बोलावून त्यांच्याकडून डेमो किंवा काही माहिती घेणेही जमेल असे वाटते आहे.
आपल्या मायबोलीवर शास्त्रीय संगीतातली अनेक जाणकार मंडळी आहेत उदा- दाद, अनिलभाई, अनिताताई, अगो, रैना, हिम्सकूल.सगळेच पुण्यात नाहीत खरे, पण ऑफलाईन त्यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळते का तेही पाहता येईल (हे अगदीच गृहित धरल्यासारखे लिहिले आहे खरे, पण अशी मदत मिळेल याची खात्री आहे).
जे पुण्यात आहेत त्यांना या गटात सामील होण्याची आग्रहाची विनंती _/\_

५) सुरुवातीला एक-दोन महिने या गटाचे भेटणे कितपत नियमित होते आहे ते पाहून पुण्यात नसलेल्या परंतु गटात येऊ इच्छिणार्‍या मित्र-मैत्रिणींना 'स्काईप' द्वारे गटात घेणे शक्य आहे.

सुरुवात-
खालीलपैकी कोणत्याही एका दिवशी सुरुवात करता येऊ शकेल.

६ सप्टेंबर (शनिवार)- गणपतीचा काळ आहे त्यामुळे किती जणांना जमेल हे सांगणे अवघड आहे, पण गणपतीच्या मंगलमय दिवसात सुरुवात होऊ शकेल Happy

१३ किंवा २० सप्टेंबर (शनिवार)- गणपती संपून पितृपक्ष चालू असेल त्यामुळे घरी सण आहे म्हणून जमणार नाही इ. कारणे नसतील आणि बर्‍याच लोकांना जमू शकेल.

इच्छुकांनी मला वि.पु. मधून सांगितले तरी चालेल.
किंवा संपर्कातून ई-मेल केला तरी चालेल.

पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की मला फार काही येतं असं नाही, पण शास्त्रीय संगीताचा आस्वाद अनेकांना घेता यावा हा एकमेव उद्देश मनात आहे. त्यामुळे जितके म्हणून मला येतंय/ माहिती आहे ते मी नक्कीच सांगू शकेन.
माझी खात्री आहे की मला योग्य वेळी योग्य ती मदत मायबोलीकर जाणकार आणि माझ्या परिचयातील कलाकार मंडळींकडून नक्की मिळेल.

-चैतन्य दीक्षित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्कीच सई... अगदी दोघे-तिघे असले तरी चालू करायला हरकत नाही.
प्रत्येकाने शनिवार/ रविवार पैकी एक दिवस सांगा जानेवारीतला.
शक्यतो संध्याकाळी ४:३०-५:०० ला भेटलेले बरे असे वाटते आहे. यापेक्षा वेगळी वेळ अपेक्षित असेल तर तेही कळवा.
ठिकाण सगळ्यांना मध्यवर्ती ठरेल ते ठरवू सुरुवातीला. त्यानंतरच्या भेटीबद्दल त्या त्या वेळी ठरवत जाऊ.

२४ जानेवारीला शनिवार आहे. जमणार असेल तर भेटू.
दादनं सुचवल्याप्रमाणे भूपाने सुरुवात करु, खरोखरच शुभारंभ होईल.

मी सिंहगड रोडलाच रहाते. दक्षिणालाही विचारते. आधी ज्यांना ज्यांना यायचं होतं त्यापैकी अवलला, हर्पेनलाही विचारते. बघू जमू शकतोय का.

मी पण भारतात आहे तोवर अटेंड करीन नक्की! मी पुण्याला येऊ शकतो तोपर्यंत.
"दाद" आणि "चैतन्य" मस्ट आहेत पण यासाठी!

सई,२४ ला नेमका मी पुण्यात नाहिये. २५ ला येतोय. २५ ला संध्याकाळी चालणार असेल तर मी आहेच. नाही तर तुम्ही भेटून सुरुवात तरी करा. भूपानेच करू सुरुवात.अवलला विचारतो मी.

अय्यो...
तुमचे ५ म्हणजे माझ्याकडे १०३० रात्रीचे.कतरी जमवलं असतं.. पण रवीवारी २५ जानेवारी मी कामात आहे (ऑफिसच्या कामात). आमचं प्रोजेक्ट कुरुक्षेत्र फेजला आहे. अनेक जण कृष्णं म्हणून वावरतायत... अर्जुन नाहीच...
भांडी वाजो लागली.. सुरू झालय.
असो... माझं काम वेळेत आटपलं तर नक्की टपकेन.

सॉरी चैतन्य, २५-२६ मी पुण्यात नसण्याची शक्यता आहे. दक्षिणा पण ३०-३१ पर्यंत अडकलेली आहे. सुरुवातच नकारघंटेनं!
अवल Sad

तूर्तास २५ ला भेटायचे नक्की करूया का?
सई, जर पुण्यात असलीस तर ये, नसलीस तर इथे थोडक्यात एखादी पोस्ट टाकतो आणि काय ऐकलं त्याची लिंक देतो. अवल, कुठे भेटायचे हे ऑफलाईन ठरवूया.
कुलदीपही यायला जमेल असे म्हणालाय फोनवर.

मंडळी, भेटण्याचा दिवस २५ तारखे ऐवजी १ फेब्रुवारी असा बदलला आहे.संध्याकाळी ५.
दाद, तुम्हालाही जमेल ना १ फेब्रुवारीला??

आजतरी १ फेब जमेल असं दिसतय. माझ्याकडे रात्रीचे १०३० झालेले अस्तिल त्यामुळे कितीवेळ दंगा करू शकेन माहीत नाही.
चैतन्यं, एक सर्वसाधारण रूपरेखा दे रे म्हणजे नुस्ताच दंगा होणार नाही.

दाद, सर्वसाधारण रूपरेखा म्हणजे-
सुरुवातीला राग भूप निवडतो आहोत.
भूप रागावर आधारित दोन गाणी ऐकायची.
आणि नंतर भूप राग व्होकल १०-१५ मिनिटे
आणि शक्य झाल्यास इन्स्ट्रुमेंटल थोड़ा वेळ ऐकायचे.
ह्यातल्या मधल्या वेळात गप्पा...अर्थात भूपाशी संबंधितच
त्यातूनही प्रत्यक्ष भेटल्यावर अजून स्पष्टता येईल

नंदिनी, लीलावती, स्काइप किंवा गूगल हँग आऊट वर भेटू शकतो
मला अजून १ दिवस वेळ द्या. मी संपर्क साधतो तुमच्याशी.
@सायली, राहायला पुण्यातच आहात/ आहेस का?
संपर्कातून फोन नंबर कळवा/ कळव

हो पुण्यातच आहे.. संजय भाव्यांकडच्या उमाताईंच्या कार्येक्रमाला होते.. पण तुझ्याशी बोलता आलं नाही.. ते आहेत का?
नंबर कळवते..

मेल केली आहे.. चेक करणार का प्लीज ?

सायली, मला अजून ईमेल मिळाले नाही,
संपर्कातून माझा पत्ता पाठवतो.
संजय दादांशी अजून बोलणं व्हायचंय, पण येतील तेही कदाचित.

चैतन्य संपर्क सुविधा सध्या निट कार्यरत नाही, त्यामुळे विपुत तु तिला तुझा ईमेल पत्ता द्यावस हा माझा सल्ला.

मंडळी, रविवारी १ तारखेला संध्याकाळी ५ वाजता खालील पत्त्यावर या.
चैतन्य दीक्षित
अक्षय कॉम्प्लेक्स,ए बिल्डिंग,फ्लॅट १२
विश्रांतीनगर, सिल्वर क्रेस्ट शाळेसमोर
हिंगणे, सिंहगड रस्ता, पुणे ५१

चैतन्य, वेळेत सुरु झालं तर पहिला तासभर मी नक्की असेन. साडे पाच तासांचा फरक असल्याने आणि दुसर्‍यादिवशी पापी पेटाच्या सवालाच्या उत्तराला जायचं असल्याने... (म्हणजे ऑफिस)... त्यानंतर नाही राहू शकत Sad

कसं करू? फोन करू का तुला? स्पीकर फोनवर टाक.

Pages