मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो वॉलेटचा सीन म्हणजे तद्दन बिनडोकपणा, मूर्खपणा, लेखकाचं कल्पनादारिद्र्य होतं. Angry
"हे वॉलेट कुणाचं आहे?" असं विचारलं गेल्यावर पटकन पुढे होऊन "माझं आहे" असं म्हणून विचारणारीच्या हातातून काढून नाही का घेता येत? उसासे कसले टाकत बसतात? कुणीच पुढे येत नाही म्हटल्यावर विचारणारी वॉलेट उघडून बघणारच.

बाकी, त्या आदिती झालेलीचा चेहरा मला झीनत अमानसारखा वाटतो.

अत्यंत फालतू सिन.
आणि इतकं खोटं वागतोय तर जरा जिथे तिथे चित्त थार्‍यावर ठेवून वागायचं ना.
वॉलेट विसरा, त्यात फोटॉ, खिशातून मंगळसुट्र पाडा वेंधळेपणाची हैट Angry

लेखक नाताळच्या सुटिवर गेल्यामुळे सीन लिहायाची जबाबदारी आदिती वर असल्यामुळे .. तीने तिच्या कुवती प्रमाणे वॉलेट चा सीन लिहिला असल्याचे कळते ... असो... पुन्हा असे करनार नाहि च्या लेखी कबुली वर तिला मालिके मधे कायम करन्यात आले आहे...

दरम्यान मोठि सुन बाइ .. या वर्षी खलनायिका पुरस्कार मिळावा म्हनुन लेखनात मदत करीत आहे .. सन्वाद सुधा तीचे तीच म्हनते ...

त्यामुळे सह कलाकार वैतागले आहेत..

तीचा नवरा तर .. आता हि काय म्हननार आहे याचा अन्दाज येत नसल्या सारखा चेहरा करुन असतो कायम ... ती म्हनेल त्याला फक्त मान डोलावतो...

कणेकराचा लेख ट्वीटर मार्फत सुयश टिळक पर्यन्त पोचवला आहे ..

महाफालतू सिरियल
नवरे सरांच्या ऑर्डर शिवायच मेमो काढतात.
ऑफिसात कोण का आलं नाही याची चर्चा होते. (मिळून)
शिवाय रजनी ही बाई जाब विचारते. आणि तिला कुणी काहिही बोलत नाही. Uhoh

जयचे नाव काढल्यावर जूई लग्न ठरल्यासारखी लाजत असते. एकतर ती सारखी लाजत बसते, नाहीतर हासत बसते नाहीतर रडके हावभाव दाखवते. तो जय तोन्ड उचकटेल तर शपथ्थ! सारखा अदिती कडे याचनामय दृष्टीने बघत असतो.

जरा त्या अदितीचे प्रेझेन्टेशन दाखवले असते तर बरे झाले असते नाही. आणी ती भोचक जाऊ एवढी पिडतेय, तर तिला वेळच्या वेळी जागा दाखवायला नको? अती आदर्शवादी भूमिका.

या नोकरीत इतकी लपवाछपवी करावी लागते तर ते दोघं दुसरी नोकरी का बघत नाहीत?

आणि कुणाला प्रत्यक्ष काम करताना दाखवलेलंच नाहीये. मीटिंगला जाते, प्रेझेंटेशन छान झालं, ही फाईल घे, तो रिपोर्ट दे - असे नुसते संवादच चालू असतात Angry

वास्तविक त्या दोघांची दुसर्‍या नोकरीसाठीची धडपड, त्याच वेळी इथे एक-एक जबाबदार्‍या अंगावर येत गेल्यामुळे अडकायला होणं असं झकास काहीतरी दाखवता आलं असतं. वेगवेगळे कस्टमर्स, क्लायंटस...भरपूर स्कोप होता. पण मग लेखक-दिग्दर्शक मंडळींना भरपूर मेहनत करावी लागली असती...ती कोण करणार?

ललीचा सात्त्विक संताप बाहेर पडतोय Lol

या सिर्यलीतही मुद्दाम घडवलेले गैरसमज आहेत. कोणीच स्पष्ट बोलत नाही. अगदी मळल्या वाटेवरून चाललेलं आहे सगळं.

झी मराठीवाल्यांना स्पार्टाकसची ट्रॅप वाचायला द्यायला हवी. अर्थात त्यातही ते शलाका-प्रीतिकाच्या भांडणावर पंधरा एपिसोड करा म्हणून हुकूम सोडतील.

अशी लपवाछपवी आणि खोटं बोलून नोकरी करणं हा गुन्हा होतोना. मग तो कोणीही कुठल्याही कारणासाठी केलेला असो.

सिरीयलच चुकीच्या बेसवर आधारित.

झी मराठीवाल्यांना स्पार्टाकसची ट्रॅप वाचायला द्यायला हवी. >>नको गं मंजुडी चांगल्या कथेची वाट लावतील ते

प्रत्यक्ष काम करताना दाखवलेलंच नाहीये. मीटिंगला जाते, प्रेझेंटेशन छान झालं, ही फाईल घे, तो रिपोर्ट दे - असे नुसते संवादच चालू असतात राग >> लले अगदी अगदी. आणिआजकाल कोण फायली वापरतं? सारखी कागदं इकडून तिकडे फिरवत बसायचं. सुबोध ला एकच काम. झालं का प्रेझेंटेशन्,झालं का प्रेझेंटेशन? यांचं सगळं आवडतं क्लायंटला. कुणी भांडा कांडायला येत नाही.
आदिती फक्त काम करते. म्हणून सुबोध फक्त तिच्याशिच बोलतो. आजतागायत तो रजनी किंवा नंदिनीशी बोलताना दाखवलेलाच नाही.
तो जय बावळटांचा महाराजा...:राग: त्या कदमच्या मागावर असतो सतत हे पहायला की तो कुठे काही पचकत तर नाही ना? Uhoh

ती नंदिनी, कदम, त्यांचे घरमालक दांपत्य एकापेक्षा एक नाटकी अभिनय करतात. झी मराठीची निवड चुकतेय कुठेतरी लागोपाठ फ्लॉप मालिका. अजूनही चांदरात आहे, मला सासू हवी, जावई विकत घेणे आहे आणि आता ही. कन्यादान च्या शरद पोंक्षेमुळे उगाच अपेक्षा उंचावतायत कथानकात काही दम नसणार.

कन्यादान च्या शरद पोंक्षेमुळे उगाच अपेक्षा उंचावतायत कथानकात काही दम नसणार. >>> अगदी!

दुरावा मालिका सुबोध भावेनं का स्वीकारली? असं वाटतं नेहमी, त्याप्रमाणे शरद पोंक्षेच्या बाबतीत नको वाटायला.

अवांतर - परवा शरद पोंक्षेचं 'त्या तिघांची गोष्ट' नाटक पाहिलं. स्टेजवर कस्सला वावर आहे त्याचा! त्यानं नाटकच करावं. मालिका वगैरे सब झूठ आहे!

मी गेल्या आठवड्यात एक दोन भाग पाहिले. तेव्हा ते लोणावळ्याला चालले होते.
आणि कोण ती मैत्रीण जयला प्रपोस करणार होती असे काहितरी होते का?

सुबोध भावे नायिकेच्या प्रेमात पडलेला दाखवलाय का?

मला कोणीतरी पाडा (प्रकाश) जरा मजा येइल चिरफाड करायला.

सुबोध इज वर्थ डिवोर्सिन्ग दॅट भेंडी जय. जुन्या घरोंदा सिनेमा तल्यासारखे.

ते आउ प्रकरण, जाडी कॉमेडिअन बाई हे फार डोक्यात जाते. सर्व कायम एकत्र जेवतात वगैरे. व्हेरी पिट्स.

भेंडी जय Lol गँवार पण चालेल. सिरीयसली अमा. किती ते ओढूनताणून आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे हे बडबडत बसायचं. काय मजबूरी आहे तेच कळत नाही यांची.

किती ते ओढूनताणून आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे हे बडबडत बसायचं>>जानी, जो बोलते है वो करते नही. जो करते हैं वो बोअर करते नही. जय खरा खिलाडी असता तर बायको परी बायको परत ऑफिशीअली बॅचलर म्हणून कोण ती जुई ( सेन्सिटीव) आणि एक आगाऔ मुलगी आहे त्या सर्वांना फिरविले असते. एक सेंट्रल एक वेस्टर्न एक हार्बर. हा उगीच भेंडी आहे. सुबोध इज लीग्ज अबव्ह दीज पीपल.

अश्या हपिसातून आउ येऊन राहिल्या असत्या तर काय हवे होते. कुठे राहतात हे प्रोड्यूसर?

चम्या इज द नेम फॉर जय. सुभा लीग्ज अहेड आहे म्हणून तर त्याला घेतला ना त्या रोलात आणि त्यानेही केला. इतकं तुपकट जोडपं बघवत नाही राव. जे काय एकमेव थ्रिल होतं आयुष्यात त्याची पण गाजराची कोशिंबीर करून टाकली. पौष्टिक आणि सात्विक पण खाताना सारखा गाजर हलवा आठवतो त्याचं काय!

Pages