मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

जी काही ४-५ वेळा येता जाता ही मालिका बघितली त्यात जय आणि अदिती ऑफिसमध्ये पापण्यांनी बोलतात एकमेकांशी.

हो, हो! मुळात डोळ्यांनी तेही मिटलेल्या अभिनय करायचा असेल तर कमाल एक्स्प्रेशन्स लागतात. इथे अविनाश सर, रजनी, नवरे, जुई, तांगडे आणि शोभाचा फोन सर्वांना समान न्याय. "असू दे" च्यापुढे "मै हूँ ना" पर्यंतही गाडी जात नाही मिटल्या डोळ्यांनी. अभिनयाची सोन्यासारखी संधी घालवतायत. आपल्या "बाय बाय बाय बाय बाय" सारखी सिग्नेचर व्हायला हवी होती ही डोळ्यांची गंमत एव्हाना. च, च रजनीला जमलं असतं भारी.

"असू दे" च्यापुढे "मै हूँ ना" पर्यंतही गाडी जात नाही मिटल्या डोळ्यांनी.>>>> अगदी! काहीतरी व्हरायटी हवी किनै?

एकाच ऑफिसमध्ये आहेत म्हणून मुद्दाम कमी बोलल्यासारखे कशाला करायचे? त्यामुळे अजूनच कोंडमारा होतोय त्यांचा. मित्र मैत्रिण म्हणून पण मोकळेपणाने वागू शकतात ना? नवरा बायको घरी.

शिवाय थोडंसं काही बोलायचं असेल, तर लगेच उठून एकमेकांच्या डेस्कपाशी कशाला जातात? आणि मग बाकीचं कुणी बघत नाहीये ना? याची चिंता...हळू आवाजात बोलायचं.... एस.एम.एस, व्हॉटसअ‍ॅप वगैरे नसतं का? Uhoh

एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, गूगल इत्यादी वापरण्यावर अविनाश सरांनी बंदी घातली आहे. लग्नं न करण्याबरोबर नोकरीवर ठेवतानाच्या अटींपैकी हीपण एक अट होती.

च्यायला इतक्या डोक्यावर पडलेल्या ट्रॅव्हल एजन्सीतून कोण महाभाग बुकींग करेल? यांना सुटेबल गिर्‍हाईक फक्तं श्री आणि जान्हवीच असू शकतात नाहीतर मेघना आणि आदित्य विथ चित्रा कॉम्प्लीमेंटरी.

सूटेबल गिर्‍हाईकं Proud

अदितीला नवे ड्रेस दिले बर्का!

काल शोभाच्या आईने अदितीला न येण्यासाठी जे कारण दिलं ते अगदीच फालतू. ती रोज येत असेल (आणि ती येईलही बावळट) आणि तिला आयता स्वयंपाक करून घालत असेल तर ती का तिला नाही म्हणेल? आण्णांना तिच्या चवीची सवय झाली तर होऊदेत की, प्रॉब्लेम काय आहे? Uhoh हळूहळू गाडी रुळावरून सरकायला लागली आहे!

त्याच वेळी ईटीव्हीवर कमला बघावी काय? कोणी पाहिली का?

एस.एम.एस, व्हॉटसअ‍ॅप वगैरे नसतं का? >>>> ललिता मेसेंजर पण असतात की ग ऑफीसमधुन... गप्पा, बोलण झाल की पर्सनल चॅट हिस्टरी डिलीट करायची.. बर यांच ऑफीस काही इतक हाय फंडु नाहीये की तिथे आयटी इन्फ्रा टीम वगैरे असेल चॅट्स मॉनिटर करायला..

एवढ्या चोर्‍या करायच्याच कशाला? एकीकडे खोटे बोललेले आवडत नाही याचे पालुपद नि पदोपदी खोटे बोलायचे!!
जो सासरा चहा करू शकतो तो स्वत:चे जेवण नाही का बनवु शकत? कशाला उपाशी राहिला होता मोठी सून बाहेर गेली तेव्हा?
रोज तांगडे बसस्टॉपवर भेटतो तर जय पुढच्या बसस्टॉपवर का नाही चढत, किंवा पुढे निघून जात? कशाला तांगडे नि आदितीची वाट वघतो?

चांगुलपणाचा उदो करण्याच्या नादात सगळे तार्किकतेच्या पलिकडचे दाखवणे चालू आहे.

मालिकेच्या लेखकांनी आयुष्यात कध्धीह्ही खोटेपणा, थापेबाजी केली नसेल...त्यामुळे कथानकात त्यांना तो दाखवता येत नाहीये नीट Proud

मुग्धे आधी त्या हापिसात बघेल तो पीसी लॉक्ड असतो. चॅट किंवा मेसेंजर असे प्रकार अस्तित्वात आहेत हे तरी माहित असेल का या हापिसला?

शिवाय जी येते ती त्या जय ला बैला सारखं ओढून नेते, कधी जेवायला कधी शॉपिंगला. ह्या नंदी बैलाला नाही हा शब्द माहित नाहि का? अगदिच मतं नैत बै मुलाला.

हो ग दक्षे... एकदा तरी विंडोज बुट होत असलेली स्क्रीन दाखवली होती चालु कॉम्प्युटर दाखवायचा म्हणुन..

ह्या नंदी बैलाला नाही हा शब्द माहित नाहि का? अगदिच मतं नैत बै मुलाला. >>>> नैतर काय... लग्न झालेल लपवायच आहे.. मला तुझ्यात काडीचाही इंटरेस्ट नाही अस सांगायला काही मनाई नाही केलेली.. मी तर म्हणते आदितीने पण फ्लर्ट कराव जयबरोबर रजनीसारख.. नवर्‍याबरोबर रहात असल्याचा फील तरी येईल.. आणि नवराच असल्याने ऑकवर्डनेस पण येणार नाही..

मी तर म्हणते आदितीने पण फ्लर्ट कराव जयबरोबर रजनीसारख.. नवर्‍याबरोबर रहात असल्याचा फील तरी येईल.. आणि नवराच असल्याने ऑकवर्डनेस पण येणार नाही..>>>>>> मुग्धटले.:हाहा: ये हुई न बात, सही शॉट मारा.:फिदी:

नैतर काय रश्मी उगाच नवरा आपल्या हातातुन सुटेल याच टेन्शन घेत बसलीय... त्या जयलाही जरा बर वाटेल बाय्को रोमँटीक झालेली बघुन... नैतर सदानकदा आपली दु:खी, कष्टी चेहरा करुन बसलेली असते..

आणि सगळ्या पोरी एकजात या एकट्यासाठी खुळ्या झाल्यात? >> तो दुसरा अमित नावाचा यडपट बघ एकदा... त्यातल्या त्यात जय बरा म्हणुन सगळ्याजणी त्याच्या मागे पडल्यात.. सु.भा.ने फारसे ऑप्शन्स ठेवले नाहीत पोरींना

मी तर म्हणते आदितीने पण फ्लर्ट कराव जयबरोबर >>>> सही शॉट मारा Proud +१
सु.भा.ने फारसे ऑप्शन्स ठेवले नाहीत पोरींना >> पण सुबोध भावे Happy एवढा मोठा ऑप्शन असताना या पोरींनी दुसरयांकडे का पहा ,बॉस असला म्हणुन काय झालं तोही आदितीला जरा जास्तच भाव देतोय ना .त्या जय पेक्षा तरी जास्त भारी आहे सु. भा. Happy

अग सिनी सु.भा बॉस आहे त्यामुळे तो जास्त पटकन हाडहुड करु शकतो.. सगळ्यात मोठा धोका म्हणजे नोकरी जाण्याचा..

काल कधी नव्हे ते माझ आणि नवर्‍याच "आदितीने पण फ्लर्ट कराव जयबरोबर" या बद्दल एकमत झाल..

करेक्ट. अदिती-जयने फ्लर्ट करावं हे आम्ही कधीचंच म्हणत होतो.

मंजूडी, लॉजिकल मालिकांची परवानगीच नाही आपल्याकडे Sad

Pages